Julale premache naate - 72 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-७२

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७२

सफेद रंगाच्या त्या कुर्त्यामध्ये खुललेलं तीच सौंदर्य त्यात आताच आंघोळ करून आल्याने अजून ही ओले असलेले तिचे केस तिच्या त्या चेहऱ्यावर येत होते. हलकं ऊन असल्याम त्या सोनेरी किरणांमध्ये तिचा तो चमकणारा चेहरा मला वेड लावणारा होता.. आता पर्यंत खूप मुलींना पाहिल पण ही वेगळी होती.. हृदयात घर करून गेली. मी मोबाईल सोडून फक्त तिलाच बघत होतो की एक मुलगा आला आणि तिला घरात घेऊन गेला."


"त्या दिवसानंतर माझं आयुष्यच बदललं. मला तिला सारखं बघण्याची ओढ वाटु लागली होती. तिचा चेहऱ्या मला सगळीकडे दिसु लागला होता.. हवी हवीशी वाटावी अशीच होती ती.."


"एक दिवस हिम्मत करून मी तिच्या घरी गेलो... बेल वाजवली आणि समोर तीच... ती काही तरी विचारत होती पण माझं मन, डोळे फक्त तिलाच बघत होते. तिचा शरीराचा गंध वेडावणारा होता.."

"कोण हवंय तुम्हाला..???"

"ओह सॉरी हा.. ते काका आहेत का.?? मी बाजुच्या बंगल्यात राहतो. आमची लाईट गेली होती तेच बघायला आलो होती की तुमची ही गेली आहे का..?" मी काही ही प्रश्न विचारत होतो. कारण मला तिला भेटायचं होत, बोलायच होत.

"मामा आत आहे. आणि आमची लाईट आहे. कदाचित तुमची गेली असावी. एक काम करा आता या. मी मामा ला सांगते ते फोन जरून काय प्रॉब्लेम आहे ते सांगतील..."
एवढं बोलून ती आता गेली.



मी सोफ्यावर बसलो होतो. काही वेळाने तिचा मामा बाहेर आला. "अरे देवांश तुम्ही. आमच्याकडे कस येणं केलंत. काही काम होत तर मला सांगायचं मी आलो असतो.."

"अहो काका मला अहो आजो नका करू मी तुमच्यापेक्षा लहान आहे. नावानेच मला हाक मारा. भले माझे वडील एसीपी असतील पण मी तर सामान्य माणूस आहे ना "

"मग मी तिच्या मामासोबत चांगलं नात तय्यार केलं. तिच्यासोबत ही बोलायच प्रयत्न केला. पण ती कमी बोलायची.. काही दिवसांनी ती देखील माझ्याशी बोलु लागली. मी तिच्यापेक्षा वयाने मोठा होतो. तेव्हा मी दहावीत तर ही आठवीत होती."


"कधी मी तिच्या घरी तर कधी ती आमच्या घरी यायची. माझ्या घरी ही सर्वाना ती आवडायची. आहेच मुळात ती अशी सर्वांना आवडेल. फक्त सुंदरता नव्हती.., कोणाशी कस वागावं याची तिला चांगली जाण होती. आणि म्हणूनच मला ती आवडायची.."


"एक दिवस मी तिला माझ्या मनातल सांगायचं ठरवल कारण ती लवकरच तिच्या घरी जाणार होती. म्हणून मी तिला बोलावलं होतं माझ्या घरी जेवायला. पण नेमकं त्या दिवशी माझ्या आत्याची मुलगी अभिलाषा आली आणि माझा प्लॅन तसाच राहिला. पण ती आली तेव्हा एक कळलं की अभि आणि प्रांजल या शाळेपासूनच्या मैत्रिणी.. वाह...!! काय नात आहे. म्हणजे आता मला तिला सहज मिळवता येणार होत. असा विचार करून मी खुश झालो."


"आता प्रांजल आमच्याकडे जास्त येऊ लागली होती. एक दिवस माझे आई-बाबा बाहेर गेले होते त्यामुळे घरात मी, अभि आणि प्रांजल आणि तिच्या मामाचा मुलगा असे चौघेचं होतो."


"दुपारी गप्पा-गोष्टी करून आम्ही एकत्र जेवलो. प्रांजल ला आवडणारा पिझा मी मागवला होता. आज काही करून मला तिला माझ्या मनातल सांगायचं होत. पण कस हे कळत नव्हतं. कारण उद्या ती तिच्या घरी जाणार होती आणि ही संधी मला सोडायची नव्हती. मनाशी ठरवुन मी लपाछपी चा खेळ खेळूया अस सुचवलं. यात एकत्र सगळे वेग वेगळे होणार होते. त्याचाच फायदा मला घेता येणार होता."



"मग आम्ही ठरल्याप्रमाणे खेळाला सुरुवात केली. पण पहिलाच डाव प्रांजल वर आल्याने आम्हाला लपाव लागलं. मी सर्वकाही ठरवुन ठेवलं होतं. दुसऱ्यांदा जेव्हा प्रांजलच्या मामाच्या मुलावर डाव आला याचाच फायदा घ्यायचा मी ठरवला. मी मुद्दाम प्रांजला माझ्या सोबत यायला सांगितलं आणि मी तिला घेऊन माझ्या रूममधे लपायला गेलो..."


"अरे दादा मला इथे का घेऊन आलास तु.???"

"अग मला दादा नको ना बोलूस. देव बोल सगळेच बोलतात. आणि आपल्यात फक्त दोन वर्षांचा अंतर आहे. लगेच दादा काय ग..."

"बर ठीक आहे. पण मला इथे का घेऊन आला आहेस."

"आता सगळं इथेच सांगू का.. चल असे लपुया म्हणजे कोणी बघणारच नाही..." मी तिचा हात ठरला आणि बाथरूम मध्ये घेऊन गेलो.



To be continued....