Ek chukleli vaat - 5 in Marathi Moral Stories by Vrushali books and stories PDF | एक चुकलेली वाट - 5

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

एक चुकलेली वाट - 5

एक चुकलेली वाट

भाग - ५

दिवसभर निरनिराळ्या प्रकारे चौकशी करूनही दिपकने तोंड उघडल नव्हतं. दमलेले देसाई आणि अनिकेत जरा बाहेर येऊन बसले. दीपक एवढा निगरगट्ट माणूस त्यांनी आजवर पहिला नव्हता. काही म्हणजे काहीच बोलत नव्हता आणि तसंही पोलिसांकडे फारसे काही पुरावे नसल्याने ते जबरदस्ती करू शकत नव्हते.

संध्याकाळची उन्हं उतरून गेली होती. दिवसभराने पक्ष्यांसोबत माणसंही घराच्या ओढीने परतत होती. पक्षांच्या पंखांच्या फडफडीतून आणि माणसांच्या पावलाच्या आवाजाने त्यांची घरी जाण्याची घाई कळून येत होती. केवळ पोलीस स्टेशनमधल्या कोणाला घरी जावस वाटत नव्हतं. नंबरचा सुगावा लागल्यानंतर झालेला हर्ष, फुटल्यावर फुग्यातील हवा निघून जावी तसा निघून गेला. आता पुन्हा कुठून सुरुवात करावी ते कळेना.

हजारो वेळा पहाडी पालथी घालूनही एकही पुरावा मिळत नव्हता. कॉलेजमध्ये सोनिया कोणाला काही सांगून गेली नव्हती. प्रत्यक्षदर्शी म्हणूनही कोणी नव्हता. खूनापश्चात मृतदेहाच्या कपड्यांव्यतिरिक्त काही सापडलं नव्हतं. बर खुनाची जागा शहरापासून इतकी दूर होती की चौकशी करायला जवळपास साधी पानाची टपरीही नव्हती. जवळपासच्या भागातील प्रकाश बिअर शॉपी हे एकच ठिकाण. तिथेही संध्याकाळी गर्दी असे. दिवसभर प्रकाशशिवाय काही मोजकीच टाळकी असत. त्यात प्रकाशाच्या फोनवरून केला गेलेला कॉल. म्हणजे प्रकाशाचा काहीतरी सहभाग नक्की असावा. पण हे कोड कसं सोडवायच..???
_______________

टीवीवर हळू आवाजात गाणी चालू होती. दमलेला अनिकेत सोफ्यावर पडल्या जागीच झोपी गेला होता. टीवीच्या आवाजाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट बऱ्याच दिवसांच्या श्रमाने त्याच मनही थकून गेलं असावं. आत स्वयंपाकघरात अनुराधा रात्रीच्या जेवणाच्या तयारीत गुंतली होती. अनिकेतला भात फारसा आवडत नसे. त्यामुळे घाईघाईने ती त्याच्यासाठी भाकऱ्या करत होती. मधेच गॅसवर शिजत असलेल्या भाजीला चमच्याने मिक्स करत पुन्हा भाकऱ्यांकडे वळताना तिची तारांबळ उडत होती. समोरच जेवण करताना उद्या सकाळच्या नाश्त्याचे आणि दुपारच्या जेवणाचे विचार फिरत होते. त्या नादात टीवीचा आवाज फक्त तिच्या कानाला स्पर्शून जात होता. मेंदूमध्ये मात्र कामांची यादी बनत होती.

" अनिकेत उठ, जेवण तयार आहे..." तिने प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवत त्याला जागं केलं.

" यार मस्त झोप लागलेली... का उठवल तू..?" जेवणाच्या टेबलवर बसत त्याने ताट समोर ओढल.

" उपाशीच झोपणार होता का मग??" ती लटक्या रागाने फणाकारली.

" रागवू नको बाई तू आता.. जेवतो मी.." अनुच्या रागापुढे त्याची काय बिशाद की तो काही बोलेल.

" माहितेय मला तू बिजी आहेस केस मध्ये... पण... स्वतःकडे दुर्लक्ष होतंय तुझं.." अनु स्वर अनिकेतच्या काळजीने घोगरा झाला होता.

" ह्या केसचा गुंता काही सुटत नाहीये बघ... डोकं नुस्त फिरतं माझं.. काहीच प्लॅन काम करत नाहीये..."

" अनी, तूच म्हणतोस ना प्रत्येक गुन्हेगार एक तरी चूक करतोच. तशीच ह्यांनी पण केली असेल ना. भले तुमच्या नजरेआड झालं असेल काही.... शांतपणे विचार कर पुन्हा केसवर "

" अनु... पण.. अग मी सगळं चेक केलंय.." अनिकेत पुन्हा त्याच्या पोलिसी भूमिकेत शिरत होता.

" आता पटापट जेवण संपवायचं बास्स.... नो मोअर डिस्कशन..."

_______________

" परब... त्या सारीकाच्या स्टेटमेंटच काय झालं..?" अनिकेत हातातील फाईल चाळत काहीतरी नोंदी करत होता.

" तीच स्टेटमेंट नाही घेतलं साहेब.." परब ओशाळून उत्तरले.

" का..?" अनिकेत जोराने ओरडला. त्याला परबांकडून अशा उत्तराची अपेक्षाच नव्हती.

" ती काही दिवस बाहेरगावी होती.."

" हा मग...." अनिकेतच्या अंगाचा तिळपापड होत होता. त्यांच्या कडून असा हलगर्जीपणा अजिबातच अपेक्षित नव्हता.

" ......" स्वतःच्या बाजूने बोलायला त्यांना काही सुचेचना. अनिकेत ला इतकं रागात पाहून लोकांना घाबरवणाऱ्या परबांचीच बोलती बंद झाली होती.

" मला पुढच्या चोवीस तासात तीच स्टेटमेंट पाहिजे... काहीही करून.."
______________

" बराच टेंशनमधे आहेस अनिकेत.." समोरच्या खुर्चीत बसत देसाईंनी त्याचा चेहरा वाचला.

" हो.. ह्या केसच टेंशन.. म्हणजे बघा ना फक्त बॉडी मिळाली.. ती ही कापलेली..."

" धारधार हत्याराने कापलेली बॉडी.." देसाईंनी पॉइंट अधोरेखित केला. अनिकेत चमकला. इतका महत्त्वाचा पॉइंट त्यांच्या नजरेतून निसटला होता.

" कोणतं हत्यार होत...?"

" मोठ्या पात्याची कुऱ्हाड.."

" शिट्ट... हा पॉइंट कसा काय मिस झाला माझ्या डोक्यातून... शी.... " अनिकेत स्वतःवरच वैतागला. काय झालं होत हल्ली त्याला काय माहित.

" अनिकेत.... शांत हो... का डिस्टर्ब होतोय... होतात अशा चुका कामात..." देसाईंनी त्याच्या पाठीवर थोपटल.

" पण ही खूप मोठी चूक आहे. येवढे दिवस गमावल्यानंतर आज तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं..." अनिकेत अजूनही चुकचुकत होता.

" मलाही आधी लक्षात नव्हतं आल... काल पुन्हा सगळ्या गोष्टी समोर मांडून निरीक्षण करत होतो.. तेव्हा लक्षात आलं. म्हणून सकाळी लॅबला पहिला कॉल केला आणि कन्फर्म झाल्यावर तडक इथे आलो..."

" खूप मोठी गोष्ट सुटली होती नजरेतून... मोठ्या पात्याची कुऱ्हाड खूप कमी लोकांकडे असेल ना.." गाव असल तरी ते आता शहरीकरणाकडे वळत होत. त्यामुळे घरातील हत्यार काम नसल्याने बाजारात कधीच विकले गेले होते. नाही म्हणायला काही जणांनी जुनी श्रीमंती मिरवायला अशा हत्यारांना आपल्या घराच्या संग्रहात स्थान दिले होते.

" हो.."

" पण ही कुऱ्हाड वजनालाही बरीच जड असते ना.... शरीराच्या तुकड्यांना एकच घाव पुरेसा असावा शरीरापासून वेगळं व्हायला..." अनिकेतने घाईने मृतदेहाच्या तुकड्यांचे फोटो समोर मांडले. बारकाईने पाहील तर सर्वच घाव वर्मी होते. कुऱ्हाडीच्या धारेने आपल काम चोख बजावलेल होत.

" साधारण शरीरयष्टीचा माणूस नाही उचलू शकत ही इतकी जड कुऱ्हाड आणि इतक्या सफाईने तर नाहीच नाही... पूर्ण ताकदीने जोरदार प्रहार केलेयत...." देसाई प्रत्येक फोटो अगदी बारकाईने निरखत होते.

" अशी कुऱ्हाड कोणाच्या घरी मिळेल ते शोधलं पाहिजे.. मग माणूस आपोआप मिळेल...."
____________

" हं.. सारिका मॅडम, तुम्हाला का बोलावलंय ते माहीत असेलच...." अनिकेत एक खुर्ची ओढत तिच्यासमोर बसला.

" पण माझा काय संबंध...?" सारिकाचा उलट सवाल.

" ते आम्ही ठरवू... तू फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे.." अनिकेतने आपली जळजळीत नजर तिच्यावर रोखली.

" उत्तर तर मी माझ्या बापाला पण नाही देत... तुम्हाला का देऊ...?" सारिकाचा उद्धट स्वभाव तो ऐकून होता पण ती इतकी उद्धट असेल अस त्याला वाटलं नव्हतं.

" बाहेरगावी काय कारणासाठी गेलेलीस ते तुझ्या बापाला सांगितलं तर मात्र तुला उत्तर द्यावं लागेल.." अनिकेतने शांत आवाजात आपला एक्का फेकला.

" तुम्हाला काय माहित आहे..?" सारिकाचा आवाज नरमला असला तरी गुर्मी मात्र तशीच होती.

" अंजली लॉज, रूम नंबर १०३.... हे बघ.." म्हणत अनिकेतने रजिस्टरच एक पान तिच्या समोर ठेवलं.

" बे*@#..." तिने रागाने शिवी हासडली. तिच्या गव्हाळ चेहऱ्यावर फिकट दिसणाऱ्या नसा रागाने ताणून हिरव्यागार झाल्या होत्या. क्षणभर विस्फारलेल्या तिच्या डोळ्यात घृणा भरली होती. " मी..... आणि ह्या असल्या लॉजवर.... शक्यच नाही....."

" तू नाही तर मग कोण....? आणि तुझ्यासोबत ज्याचं नाव आहे.... त्याची टाईमपास आहे का तू..?" अनिकेतने गालात हसत प्रश्न केला.

" तो बॉयफ्रेंड आहे माझा.." ती रागाने उत्तरली. एव्हाना तिच्या डोळ्यात रक्त उतरलं होत. डोक्याची शीर भयाण संतापाने ताडताड उडत होती.

" काय... तुझा बॉयफ्रेंड... पण त्याच तर.." तिच्या खुलाश्यावर अनिकेत मात्र हैराण झाला. " अच्छा म्हणून तू सोनियाचा खून करवलास तर.."

" नाही... मी नाही केलं काही... मी आणि तो दोन वर्षांपासून प्रेमात आहोत.... घरच्यांपासून लपून.. सगळ बऱ्यापैकी चाललेलं... बोलणं, भेटणं, सेक्स.... सगळच.. पण इथे नाही... पण अचानक ती सोनिया अवतरली... बऱ्याच वेळा मी तिला त्याच्यासोबत बोलतानादेखील पाहिलं. मला खूप राग यायचा तिचा. आणि तो... तिला बघितल आणि पाघळला... पुरुषांची अक्कल पँटीत असते म्हणतात ते खोटं नाही... मी त्यावरून खूप भांडली त्याच्याशी.. ते काहीतरी नातेवाईक होते म्हणे एकमेकांचे... पण मला नव्हतं होत ते.... मी सोनियाला बरेचदा धमकी ही दिली होती त्यावरून.. पण मारायचा हेतू नव्हता माझा... तेवढी हिम्मत नाहीये माझ्यात..." एका दमात बोलताना तिच्या चेहऱ्यावर कितीतरी भाव तरळून गेले होते. तीच त्याच्यावरच प्रेम, सोनियाबद्दलचा तिरस्कार, त्याच्यावरचा अविश्वास... सगळच...

" तुझं तिच्या खुनाच्या आदल्या दिवशी बाहेरगावी जाणं..."

" मी महिन्यातून दोन तीन वेळा जातेच..." अनिकेत च बोलणं अर्धवट तोडत सारिका बोलू लागली. " तिथे जायचं खर कारण म्हणजे मला आणि त्याला तिथे राजरोसपणे भेटता येत.."

" कसं काय.." नकळत अनिकेतच्या तोंडून निघून गेलं.

" त्याचाही एक मित्र राहतो तिथे. चार तासांच्या तर अंतरावर आहे ते गाव. मावशीच्या घरापासून जवळच आहे त्याच घर. तिथेच भेटतो आम्ही... खर तर तिथेच आम्ही खूप जवळ आलो. आताही केव्हा एकमेकांची ओढ लागते तेव्हा आम्ही तिथेच जातो. त्या भिकारड्या लॉजवर नाही." शेवटचं वाक्य पूर्ण घृणेसरशी ती बोलून गेली.

" मग तिथे तुमचं नाव कसं आल...?" अनिकेत स्वतःच कोड्यात पडला.

" माहित नाही.. तो कधी कोणासोबत गेला असेल तर..." भीतीची एक लहर तिच्या अंगातून सरसरत गेली.

" ती निशा काही पटत नाहीये भावा.." सिगारेटचा धूर हवेत सोडत रोहन चुकचुकला. संध्याकाळी कॉलेजच्या बाजूच्या टपरीवर त्या तिघांची मैफिल जमली होती. एका हातात चहाचा ग्लास सांभाळत दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये पकडलेल्या सिगारेटचे कश मारत त्यांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या होत्या.

" साल्या, एक पोरगी नाही पटत तुला... कसला यार तू... दम नाही तुझ्या गां@*#..." बाकीचे दोघे एकमेकांना टाळ्या देत हसू लागले.

" अबे... दाखवू का तुला दम.." हाताने अश्लील हातवारे करत रोहन बोलला.

" गप रे...कशाला उगा कटकट करताय..." तिसऱ्याने त्यांना शांत करायचा प्रयत्न केला.

" ह्याला बोल ना..." रोहन जाम चिडला होता. " निशा गेली उडत... पण पटलीय दुसरी.. मी तर माझा दम तिच्यावर दाखवेन... तू तुझं बघ.." हातातील सिगारेट पायाखाली चिरडत रोहन निघून गेला.

" रडवलस पोराला.." दोघेही एकमेकांकडे पाहत हसू लागले.
_______________

देसाई आणि शिंदेंना तातडीने बोलावत अनिकेतने चहाची ऑर्डर सोडली. अनिकेतच्या ओरड्याने बावरलेले परब मूकपणे सारी कामं आवरत होते. मागच्या भिंतीवर अनिकेतने कसलेसे नंबर लिहून त्याखाली फोटो चिकटवले होते. त्यावर कुठे कुठे बाण मारून त्याखाली बारीक बारीक अक्षरात माहिती लिहिली होती. टेबलवर खूप साऱ्या फाईली आणि कागदांचा ढीग होता. पंख्याच्या हवेने कागद उडू नये म्हणून येवढ्या गरमीतही पंखा कासवाच्या चालीने फिरत होता.

" अनिकेत... बऱ्याच तातडीने बोलावलं..." देसाई जवळपास पळतच आले होते. लाकडी खुर्चीवर धपकन बसत त्यांनी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. एव्हाना शिंदे ही धापा टाकत येऊन पोचले.

" हो कामच तस आहे...." अनिकेत उत्साहाने बोलत होता.

" एक क्लू मिळालाय... " अनिकेतच्या चेहऱ्यावर नेहमीची स्माईल होती.

" काय..?" शिंदे आणि देसाई एकाच सुरात ओरडले.

" आधी चहा तर घ्या.." चहा वाल्याने समोर ठेवलेला चहा देसाईंना ऑफर करत त्यांनी परबांना हाक दिली.." परब... तुम्ही पण घ्या... रागवलात की काय माझ्यावर.."

" अनिकेत तू लवकर सांग बाबा... धीर धरवत नाहीये.." देसाई चेष्टेने बोलले.

" हे बघा.." अनिकेतने हातातील पेन एका नंबरवर ठेवलं. " ही सारिका.."

" हं...." सर्वच एकसुरात हूंकारले. सर्वांनाच ऐकायची घाई होती.

" हा दुसरा पर्सन आहे ना तो सारिकाचा बॉयफ्रेंड.."

" आर यू सिरियस.." देसाई जवळपास किंचाळले. " तो फोटो दे इकडे नीट पाहु दे "

" माझीही प्रतिक्रिया हीच होती देसाई.." देसाईंच्या हातात फोटो देत अनिकेत बोलला

" हे दोघं मागच्या दोन वर्षांपासून प्रेमात आहेत. आपलं सो कॉल्ड शारीरिक प्रेम व्यक्त करायला ते दुसऱ्या शहरातील त्यांच्या एका मित्राच्या घरी भेटतात. "

" अच्छा..." देसाई आता सावरून बसले. हातातील घड्याळ सैल करून त्यांनी पुन्हा नीट बांधलं. तिथल्या उकाड्याने असह्य होऊन शर्टाच पाहिलं बटन खोलल.

" अंजली लॉजच्या रजिस्टर मध्येही ह्या दोघांची नाव मिळाली म्हणून थोडा चौकशी करायला गेलो तर "

" तर काय.." देसाईंनी उत्सुकता अस्वस्थ करत होती.

" तर ह्यांच्या नावाने वेगळेच चेहरे त्यांचा हनिमून साजरा करायला येतात हे कळलं. " अनिकेतने खुलासा केला. " तरी बरं आम्ही पूर्ण अल्बाम घेऊन गेलो होतो.. म्हणून चेहरा तरी कळला. "

" लॉजवाले आय डी घेत नाही का..?"

" त्याला समजावून आलोय चांगलाच... बर त्या सारिकाच्या जबानीवरून काही गोष्टी स्पष्ट झाल्यात आणि हा त्यांच्या रुमवाल्या मित्राचा फोटो आहे. " अनिकेतने अजुन एक फोटो देसाईंच्या समोर ठेवला.

" ओह... स्वतःच घर मित्राला देऊन स्वतः लॉजवर जाऊन मजा मारतो...बर.. ह्याच्यासोबतची पोरगी कुठे आहे " देसाई.

" ती ही आहे.." आपल्या अल्बममधून अजुन एक फोटो काढून त्यांनी देसाईंना दाखवला.

" पोलिसांशी शिरजोरी काय..? ह्यांना बोलावून घे अनिकेत स्टेशनला.. बघतोच मी "

तेवढ्यात अनिकेतचा फोन वायब्रेट होऊ लागला. कुठलासा अनोळखी नंबर झळकत होता. " हॅलो.." अनिकेत नेहमीच्याच त्याच्या भारदस्त आवाजात बोलला. पलीकडून दोन चार वाक्य बोलून फोन कट झाला.

" नको. त्यापेक्षा थोड चोरपोलीस खेळूया आपण.."

क्रमशः