आजही कुठे प्रामाणिक हा शब्द आईकला किंवा वाचला तर मला प्रतापची आठवण आल्याशिवाय राहत नाही .
प्रताप हा आमच्या आयुष्यात आला तो पण त्याचा एक प्रतापच होता . तर घडलं असं कि एका रात्री सगळं शांत असताना . अचानक एका लहानशा कुत्र्याच्या पिंलाचा भुकण्याचा आवाज आला . तेवढ्यात
सोसायटी वाचमन जोरजोरात शीट्टीचा व ओरडण्याचा आवाज आला . "चोर-चोर" म्हणुन तसे सगळे जागे झाले. चोरांना अखेर पकडलं आणि सोसायटीचे सेक्रेटरीनी पोलिसांना
बोलावले . पोलिसांनी व्याचमनची दम देऊन चौकशी केली आणि शेवटी तो म्हणाला " उस चोर को हमने नही पकडा " मग कोणी पकडलं बाबांनी व्याचम्यानला
विचारले . व्यचम्यानने नाराजी दर्शवत कुत्र्याच्या पिल्लांकडे बोट दाखवले . पण चोरी कोणाकडे झाली .
सगळे एक मेकांकडे प्रश्नाच्यानजरेने बघू लागले . तेवढ्यात आई धावत--पळत आली आणि म्हणाली आहो आपल्याच घरात चोरी झाली .बाबा म्हणाले अरेरे नक्षीब बरे म्हनूण आपण वाचलो . बाबांनी थोडा वेळ विचार केला . आणि म्हनाले आपण या पिंलाला सोसायटी अंतरगत पाळुया . तेवढ्यात सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले. आणि म्हनाले "नाही" या पिंलाला सोसायटी अंतरगत पाळायला नको . सेक्रेटरीच्या नाही म्हणण्याने आमच्या घरातले सगळे नाराज झाले.
कारण त्याने आमचे मोठे नुकसान होता-होता वाचवले . बाबांनी थोडा वेळ विचार केला . आणि म्हणाले आपण या पिलाला पाळूया . दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं नाव काय ठेवायचं यावर आम्ही विचार केला पण काही सुचलच नाही .मग बाबा म्हणाले याने एवढ्या लहान वयात एवढा मोठा प्रताप दाखवलाय तर मग आपण
याचे नाव "प्रताप" ठेवुया. तेव्हा पासून प्रताप हा आमच्या घरचा एक सदस्य झाला .सगळे त्याचे फार लाड करत . लहानपणी तो गुटगुटीत पांढरा वळलेली गोल शेपूट .त्यांच्या गुडघ्यापासुन खालचा भाग हा काळा होता . त्यामुळे पायात एखाद्या सैनिका सारखे बुट घातल्या सारखे भासत असे .
पाहता पाहता दोन वर्ष झाली . ज्या प्रमाणे आई वडीलांनी आमच्या वर संस्कार केले त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांचे त्यांच्यावर नकळत सस्कार झाले होते .आता तो फार मोठा झाला होता आणि त्यासोबतच स्वाभिमानीही झाला होता. याचाच एक किस्सा म्हणजे एकदा गावावरून आमची आजीं आली आणि तिने आल्या-आल्या दारात हे कुठलं कुत्र आलंय असं म्हणत प्रतापला हाकललं .
प्रतापला हे अजिबात आवडले नाही.
तो उठला आणि समोरच्या रस्त्यावर जाऊन बसला .
त्यानंतर आम्ही त्याला किती तरी वेळा समजूवुन घरात आनन्याचा प्रयत्न केला. पण प्रताप काही जागा सोडायला तयार नव्हता . शेवटी संध्याकाळी बाबा घरी आले त्यांना घडलेला प्रसंग सांगितला मग बाबांनी स्वता त्याची समजूत काढली मग कुठे महाराज घरात यायला तयार झाले . यावरुन आम्हाला प्रताप कीती स्वाभिमानी आहे हे उमगले .
थोड्याच दिवसात बाबांना बढती मिळाली आणि आम्ही कंपनीने दिलेल्या नविन घरात रहायला गेलो . त्या घरात प्रतापला सुरूवातीला करमत नव्हत म्हणून दीदी त्याला सकाळी फिरायला बाहेर घेऊन जात आणि बाबा आणि मी त्याला संध्याकाळी फिरायला बाहेर घेऊन जात .
दिवसा तो शांत असला तरी रात्री तो तंलख पणे लक्ष देत . कुठं खुंस झालं तरी त्याच्या नजरेतून ते राहत नसे.
तीथे घरा शेजारी जोशी काका , त्याची पत्नी व लहान निकिता राहत . आम्ही तिला लाडाने छबू म्हणत .
ति कायम आमच्या घरी खेळायल यायची .
ती आली की प्रताप नाराज वाह्यचा
कारण ती आली की प्रतापचे कान ओढायची . त्याची शेपटी खेचायची त्याला फार त्रास द्यायची . यामुळे तीला पाहिले की प्रताप लपून बसत .
"कायले ए कुंत्तु "अशा बोबड्या आवाजात तासण -तास त्यांच्याशी गप्पा मारत बसत .
हळूहळू या सगळ्यांची त्याला सवय झाली. आणि आम्हाला सुथां.
पण या सगळ्या मथे आमच्या एक गोष्ट लक्षात आली की शहरातील लहान मुलांना उचलनारी टोळी सक्रिय झाली आहे आणि पोलिस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्तंबल एक महिन्यानंतर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलं .पण टोळी तील पाच पैकी फक्त
तिघांनां पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि इतर दोन त्याच्या हातातून निसटून गेले . त्यांचा शोध अजून
सुरूच होता . यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले
होते.
एका दिवशी सकाळी छबू अंगणात खेळत होती
आणि तेवढ्यात दोन दुचाकीस्वार आले. त्याने दुचाकी
धांबवताच प्रतापची नजर त्याच्यावर पडलीं आणि त्यातला मागे बसलेला दुचाकी वरून खाली उतरून
छबू कडे चालला तसा प्रताप लपून छपून त्यांच्यापर्यंत पोहोचला . त्याने छबूला उचलताच प्रसादने त्याच्यावर
झडप घातली .तसा तो घाबरला त्यानं छबूला तिथेच टाकलं तेवढ्यात प्रताप त्याच्या पोटावर चावला त्याने आपल्या बचावासाठी चाकुने प्रतापवर वार केला.प्रतापच्या ग्ळ्यावर चाकु लागला .रक्त सांडू लागले . दुचाकीस्वार पळनार हे वघून प्रताप धावत गेला आणि त्याच्या गुडघ्याला चावला तरी त्याने दुचाकीवर थोडे अंतर काढले आणि पुढे जाऊन पडला . प्रताप पण
बेशुद्ध पडला.आम्हि त्याला दवाखान्यात भरती करुन घरी आलो आणि तेवढ्यात पोलिस निरीक्षक संजय
पाटील साहेब घरी आले . त्यांनी प्रतापच्या कामगिरीचं
मनापासून कौतुक केले. तेवढ्यात दवाखान्यातून एक माणूस प्रतापचं उपचारादरम्यान मृत्यू झाला हे कळवायला आला .हे आएकताच सर्वांना फार दुःख झाले. आपल्या घरातील सदस्य वारला यामुळे प्रत्यकाला रडू आवरत नव्हते . तेवढ्यात पोलिस साहेब म्हणाले की प्रतापची हि कामगिरी आम्ही वाया जाऊ
देनार नाही .प्रतापला या कामगिरी बद्दल हि प्रतापला
प्रतापराव हि पदवी देत आहे......!