Ghungharu - 5 in Marathi Fiction Stories by Vanita Bhogil books and stories PDF | घुंगरू - 5

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

घुंगरू - 5

#@घुंगरू@#भाग 5
सौ. वनिता स. भोगील
,, मालती माळावरून आली ती खूप आनंदात दिसत होती,
तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून बापू म्हणाले,
बघ माई तू उगच काळजी करत होतीस....
बघ मालू किती खुश हाय पर तुझं आपल काय बी आसत...
.. बापू बाहेर निघून गेले,
मालती तयारीला लागली..
. मुहूर्ताचा दिवस उजाडला, सकाळ पासूनच घाई गडबड चालू होती,
सगळ सजवण्यात शेजारच्या बायका मदतीला बोलवल्या होत्या माईन.....
.. थोड्याच वेळात दारातून जोरजोरात बोलल्याचा आवाज येऊ लागला,
माई कोण बोलत आहे हे बघायला दाराकडे गेल्या....
.. दारात भरजरी चमकणाऱ्या कपड्यात सहा सात किन्नर होते,
हासत च आत आले , टाळ्यांचा आवाज जोरात करत मालतीला हाका मारू लागले,
माई त्यांना काही बोलण्याच्या आतच त्यांच्यातील एकजण माईच्या हाताला धरून म्हणाला,,,, आग ए माई कसल्या काळजीत हाय तू?
सगळ....... नीट व्हणार,
तू का काळजी करती,
तुझी सून लय गुणी हाय बघ, लाखात एक...
.
माईन मानेनेच हो म्हटल,
सगळे वाड्यात आले, त्यांना पाहून मालतीला खूप आनंद झाला होता,
तिने त्या सगळ्यांची बसन्या खाण्याची व्यवस्था केली,
बापू बाहेरून आले त्यांना बघताच त्यातील काहीजण ताडकन उभे राहिले...
तस बापू म्हणाले काय झाल बस की सारे, म्या काय वाघ हाय व्हय मला बघून उठलासा?तुमि आमच अतिथी मंग अस उभ का?

ते सगळे बापूकडे एकटक बघत होते,त्यातील एकाने इशारा केला अन सगळे खाली बसले....
.. थोड्यावेळात ओटी भरणाचा कार्यक्रम चालू झाला..
.. शेजारच्या बायकांनी मालतीची ओटी भरली, सगळ्याच झाल्यावर किन्नराला मालती म्हणाली तुमि नाय व्हय भरणार वटी?
त्यावर माई रागात म्हणाल्या काय ग माले?
ते न बाप्या न बाय आन त्यासनी वटी भराय सांगतीस व्हय?
त्यावर मालती म्हणाली ,माई तस नाय पर आपुन आशीर्वाद घेतु का नाय त्यांचा मंग आता बी आशीर्वाद म्हणूनच वटी भरून दया की.....
..
माई गप राहिल्या, सगळे किन्नर एकापाठोपाठ एक अस ओटी भरत होते,,,,
प्रत्येकांनी काही न काही आणले होते,
सगळ्यांच झाल्यावर त्यांनी ओटीत घातलेल लुगडं मालतीने काढल आणि आतल्या घरात गेली,
अंगावरच लुगड फेडून ओटीतल लुगड नेसली,
अंगावरच लुगडं आणि सगळ ओटीच सामान घेऊन बाहेर आली आणि सगळं किन्नरांच्या हवाली केलं
त्यावर माई म्हणाल्या ...आग मालू अस सकूनाच आलेलं कुणाला देत नसत्यात,
तेव्हा मालती म्हणाली,, आव माई हे कुनिबि नाहीत जवळचीच हायती
आणि हसून मालतीने सगळं त्यांना देऊन टाकल,
सगळे जण जेऊन निघून गेले...

माईला काही समजेना,, त्या विचार करत होत्या..
माली वर ह्यांनी कायतरी चेटूक केलय मनून ती अशी वागती...
...
दिवसामागून दिवस सरत होते,,, मालतीला नऊ वा महिना लागला पण तीच माळावर जायचं काही केल्या थांबलं नव्हत...
...
भरली भरली सून अशी कुणाकडे का जाती हे माईना खूप वेळा विचारावस वाटल पण खूप दिवसाने घरात पाळणा हलणार होता म्हणून उगीच अपशकुन नको त्यासाठी माई काहीही बोलत नसत...
...
मनात विचार करत असत एकदाची मोकळी झाली की मंग ईचारते जाब हिला,
एकदाच काय ते हुन जाऊदे.....
महिना गेला नऊ दिवस गेले ,,,,
शेवटच्या दिवशी मालती शेतावरून आली, कशीबशी पावल टाकत,
पाय उचलत नव्हता,
घामाघूम झालेली,
माईना लांबूनच तिला पाहिलं, भराभर पावल टाकत त्या मालती जवळ गेल्या,
दोन्ही हातानी तिला सावरून वाड्यात आणली,
ढाळजात बसवलं, तांब्या भरून आनला,
तिच्या तोंडावर पाणी शिंपडल तसाच तांब्या तिच्या तोंडाला लावला,
.....
एक घोट पिऊन मालती म्हणाली.....
माई लई दुखाय लागलय,
बसवणा झालं,
पोटात कळा येत्यात,
कायतरी करा माई नायतर म्या काय जगायचे नाय......
....
माई म्हणाले माले आग आस आभद्र बुलू नये,
या बाळतणीच्या कळा हायती, घाबरू नगस काय बी व्हायच नाय, म्या बघते सगळं तू आत चल.....