"हॅलो....
"हाय बेबी... आज तु चक्क मला कॉल केलास...?!
वाह..!! म्हणजे तुला कळलं तर माझं प्रेम.." तिकडून ती व्यक्ती बोलत होती.
"हा. मला कळलं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते म्हणूच मला तुला भेटायचं आहे." मी घाबरत बोलले. हे बोलत असताना माझे हात थरथरत होते हे निशांतने पाहिलं आणि माझ्या हातांना त्याने आपल्या हातांची उब दिली. आणि का कोण जाणे मला असख्य हत्तीचं बळ आल आणि मी त्या व्यक्तीशी खुप काही बोलु लागले..
"डार्लिंग तु बोलते आहेस. हा तुमचा काही प्लॅन नाही ना मला पकडायचा..?? काय आहे ना आज काल तु आणि तो तुझ्या मित्र निशांत सारखे त्या राजच्या घरी जात असतात ना म्हणून विचारत." त्याच्या या वाक्यावर मी लगेच आपले डोळे मोठे केले. पण मिस्टर गोखल्यांनी सगळं काही सांभाळून घेतलं.
"नाही नाही. अस काही नाही. पण आता मला ही तुला भेटायची इच्छा झाली आहे. कोण आहेस तू हे जाणुन घ्यायच आहे. मग भेटशील ना मला.." मी जरा लाडात बोलत होते जेणे करून मी त्याला जास्त वेळ माझ्याशी बोलण्यात गुंतवून ठेवू शकते. अस केल्याने आम्हाला त्याच लोकेशन कळू शकत होते आणि मिस्टर गोखल्यांची माणसं त्याचा शोध घेऊ शकत होते..
"होका.. माझ्या राणीला मला भेटायचं आहे तर, मग मला भेटावच लागेल. पण एका अटीवर. तु एकटी यायच भेटायला त्या राज आणि निशांतची गरज नाहीये मी असताना. बॉडिगार्ड कुठले..." आणि जोरजोरात हसत सुटला. त्याच्या अशा बोलण्याने राज आणि निशांत दोघे हि चांगलेच भडकले पण त्यांनी स्वतःला सावरलं. आणि पुढे ऐकू लागले..
"नाही रे. मी नाही त्यांना घेऊन येणार. आपण दोघेच भेटु.
फक्त तु आणि मी बाकी कोणी म्हणजे कोणीच नको आपल्यात.." हे सगळं भले मी गोड आणि लाजुन बोलत होते. पण प्रत्येक क्षण मला त्रास होत होता..
मिस्टर गोखल्यांनी पाच मिनिटं अजून असा इशारा केला आणि मी स्वतःला सावरले.
"मग येताना कोणत्या रंगाचा ड्रेस घालू. तुझ्या आवडीचा घालते हा.. तुझ्या आवडीचा रंग रेड आहे ना..?? नक्कीच त्याच रंगाचा अरे तूच दिलेला घालेन. तुला आवडते ना मी त्यामध्ये.."
"हो नक्की घाल. कसली कमाल दिसतेच त्यात. फुल आयटम..." त्याच्या या वाक्यावर मला रडूच कोसळलं पण निशांतने स्वतःचा हाताचा दाब वाढवला आणि मी कंठात आलेल रडणं तिथेच दाबलं..
"काही ही हा तुझं..." आणि उगाच हसण्याची ऍक्टिग केली.
"अग खरच.. खूप सुंदर आहेस तु.. अप्सरे सारखी. माझी बायको बनणार तर तूच...." तो हसत बोलत होता.
अचानक तिकडे बेल वाजवण्याचा आवाज आम्हाला ही ऐकु आला..
"अरे हा पिझा वाला ही आताच आला.. बेबी थांब हा मी आलोच.." एवढं बोलून त्याने दरवाजा उघडला.. पण समोर पिझ्झा बॉयच्या डेस मध्ये मिस्टर गोखल्यांची मानस होती आणि ती व्यक्ती जोरजोरात स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती..
"कोण आहात तुम्ही.. का अस पकडलं आहे मला.. सोडा मला..." त्याच्या ओरडण्याचा आवाज इकडे येत होता. तो आवाज पुरावा होता त्याच्या अटक होण्याचा..
तिकडे तो अटक झाला आणि इकडे माझा बांध सुटला. मी निशांतला घट्ट मिठी मारून रडु लागले.. मिस्टर गोखल्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते बाहेर गेले. राज ही माझ्या बाजूला बसला होता. काही वेळ तसाच गेला. काही वेळाने मी शांत झाले...
फ्रेश होऊन आले. रडुन डोळे लाल आणि सुजले होते. निशांत आणि राज दोघे ही माझी काळजी घेत होते. काही वेळाने मी शांत झाले. आणि आम्हाला तिघांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आल.
To be continued....