सोफ्यावर बसुन आता निशा ने आपल्याला तिच्या बदल विचारले तर काय व कस सांगायच या विचारात असताना त्याच्या हातातून ते लाँकेट सुटते व निशा बेडरूम मधून आली असतानाच तिच्या पायाखाली जाऊन पडते.
निशाचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तेवढ्यात ते पडलेले लाँकेट व त्यावरील कोरलेली नावे व सपना च्या हातावरील टॅटू वरील नावे यामुळे तिचा राग अजूनच वाढतो. निशा आता विचार न करता सूरजवर जोरात ओरडते, " एवढच करायच होत तर माझ्याशी लग्न कशाला करायच ? कोण आहे ती तुमची ? कशाला आणली तिला इकडे ? संबंध काय तुमचा तिच्याशी?"
सूरज तिला शांतपणे म्हणतो," निशा शांत हो तूला काही तरी गैरसमज झाला आहे, तू शांतपणे खाली बैस, मी तुला सगळ सांगतो. " …..
सूरज म्हणतो," याआधी मी तुला या बद्दल कधी बोललो नाही पण, कधी- कधी भुतकाळ नाही सांगू वाटत एखाद्याला, तुला माझा भुतकाळ ऐकायचा पूर्ण अधिकार आहे. "खरतर तुला हे लग्नाच्या आधी सुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न केला होता पण मला ते जमल नाही. पण एक गोष्ट लक्ष्यात ठेव पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नकोस. तूला काही ठिकाणी मी चुकीचा वाटेल मी मान्य करतो पण तरीही तू पूर्ण गोष्ट एक व मगच काय तो निर्णय घे आणि तो गोष्ट सांगायला सुरुवात करतो.
भुतकाळ
सुरज सांगता झाला-
तीन वर्षापुर्वी ची गोष्ट आहे. आमची भेट ट्रेन मध्ये झाली .समोरासमोर बसल्यामुळे एकमेकांची नावे विचारल्यावर आम्ही आपापल्या घरी आलो. नंतरसुद्धा मनात एकच विचार हिला परत भेटण होईल का? डोक्यात तिचाच विचार असताना मला एक युक्ती सुचली मी ‘सपना पाटील’ फेसबुक वर सर्च केले खूप जणींच अकाऊंट दिसायला लागली. त्या दिवशीच्या भेटीला जास्त दिवस झाले नसल्यामुळे मला तिचा चेहरा पण थोडा थोडा लक्ष्यात होता. प्रोफाईल पिक्चर वरुण तिला शोधायला मला फक्त पंधरा मिनिट लागले. मी रिकवेस्ट तर पाठवलीच पण ‘हाय ‘म्हणून मेसेज पण करून ठेवला. मी तब्बल तीन दिवस तिचा मेसेज येण्याची वाट पाहिली पण काहीच रीप्लाय आला नाही. माझ्या एक गोष्ट लक्ष्यात येत नव्हती आजकालच्या जमान्यात ही मुलगी फेसबुक वापरत नाही म्हणायची की आपल्या कडे दुर्लक्ष करते आहे.
पण चौथ्या दिवशी तिकडून रीप्लाय आला. मी तिला विचारलं की, "बोलायचे की नाही याचा विचार करायला तीन दिवस घेतलेस." यावर ती मला मेसेज मधून म्हणाली, "मी जास्त वापरत नाही फेसबुक." मी उत्सुक होऊन विचारलं की, "कुठे असतेस? आपण परत भेटू शकतो का?" तिने मला एकच मेसेज केला, " डेस्टिनी, नशिबात असेल तर नक्की."
सरळ सरळ तिने दुर्लक्ष केल्यामुळे मी ही हताश होऊन मेसेज करायचे बंद केले. मला तरी काय ठाऊक होते की ती म्हणत होती ती 'डेस्टिनी' च या पुढे माझी एक दिवस वाट लावणार आहे. एक दिवस गाडी स्लिप होऊन मी खाली पडलो पूर्ण पायाला फ्रॅक्चर झाल होते. माझा अपघात पिंपरी जवळ झाल्यामुळे एका अनोळखी इसमाने मला जवळच्याच वाय .सी .एम मध्ये नेले. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हे 45167 sq. m जागे मध्ये 1989 मध्ये बांधलेले एक प्रशस्त व भव्य हॉस्पिटल. या आधी कधी इथे येण्याचा प्रसंग मला आला नव्हता व त्या दिवशी गेलो नसतो तर कदाचित पुन्हा ही येणार नव्हता. पायाला झालेल्या फ्रॅक्चर मुळे मला सात दिवस बेड रेस्ट म्हणून तेथेच अॅडमिट करून घेतले. कितीतरी डॉक्टर किती, तरी पेशंट याची नुसती धावपळ चालू होती आजूबाजूला...
डॉक्टरनी दोन नर्सला मला कोणती सलाईन लावायची आहे हे सांगून दुसर्या पेशन्टकडे आपला मोर्चा वळवला. ‘मी माझ्याच चिंतेत पाय कधी बरा होतोय व परत कधी ऑफिसला जायला भेटेल ?’ या विचारात असताना त्या दोघी माझ्या शेजारी आल्या.