The Author Kushal Mishale Follow Current Read मधुचंद्राची रात्र - 1 By Kushal Mishale Marathi Love Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books THE WAVES OF RAVI - PART 17 BABA SANTA SINGH The Sutlej River was flowing slowly.... Hate to Love - 3 Hate to love - 3 New delhi , India We read that When Aphara... King of Devas - 3 Brahma's ancient brows furrowed slightly, revealing his conc... Trembling Shadows - 20 Trembling Shadows A romantic, psychological thriller Kotra S... Was it GHOST? Was it GHOST?A torch has enough light to make them reach to... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Kushal Mishale in Marathi Love Stories Total Episodes : 2 Share मधुचंद्राची रात्र - 1 (17) 5.2k 15.4k मार्च महिन्यातील Targets, Financial Year Ending आणि सर्वांची धावपळ, दगदग असताना देखील व्यवस्थित पार पडलेल्या लग्न समारंभामुळे विजय आणि त्याचे कुटुंबीय सर्व खरच खुप आनंदी होते जणूकाही त्यांनी राजाचा गडच जिंकला होता, कारण विजय एका Sales कंपनीमध्ये कामाला होता त्यामुळे त्याला मार्च महिन्यात सुट्टी मिळण शक्यच नव्हतं ते ही अखेरच्या दिवसांमध्ये कारण तेव्हा सर्वात जास्त Pressure असतो. तरीही मुलीकडच्या लोकांनी लवकरात लवकर लग्न व्हाव असा तगादा लावल्यामुळे विजयला आपली सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेऊन त्याला लग्नकार्यात लक्ष द्याव लागल. मुहुर्त ३१ मार्च चा मिळाला आणि लग्नाची तारीखसुद्धा तीच ठरवण्यात आली. आता जवळ आला होता तो क्षण मनात गुदगुल्या करणारा, काही कळल का..? "अहो, मधुचंद्राची रात्र" विजय त्याच्या बेडरूममध्ये आला त्याला वाटल होत सिनेमात दाखवतात असा काहिसा सीन होईल की मी आत जाईन दुधाचा ग्लास रिकामा करीन आणि मग हळुवारपणे डोक्यावरचा पदर बाजूला करीन पण इकडे अस काहीच घडत नव्हतं रिया आधीच खुर्चीवर बसून होती जणूकाही विजयचीच येण्याची वाट बघत होती. विजय आत आला तस लगेच ती त्याला म्हणाली, "हे बघ, माझ एका दुसर्या मुलावर प्रेम आहे, तुम्ही माझी आवड नाही. " हे एकताक्षणीच विजयच्या पायाखलची जमिनच सरकली. त्याला कळतच नव्हतं हे अस अचानक कस झाल तरीही त्याने समजुतदारपणा दाखवून तिला बसायला सांगितल आणि सर्वकाही नीट सांगण्याची विनंती केली. मग रिया सांगू लागली की लहान असतानाच तिचे आई-वडिल एका कार अपघातात मरण पावले होते त्यानंतर तिची सर्व जबाबदारी तिच्या काका-काकूंनी घेतली. आधी मला तिकडे व्यवस्थित ठेवल जायच मीदेखील खुषच असायचे. काही वर्षांनी त्यांना स्वतःचा मुलगा झाला आणि हळूहळू माझ्याकडे दुर्लुक्ष करु लागले माझे लाड देखील बंद झाले होते उलट आता सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत माझ्याकडून एखाद्या मोलकरणीप्रमाणे कामे करुन घेतली जात होती त्यातही काही चुका झाल्या तर मला मारायला देखील आता मागे पुढे बघत नव्हते. दिवसेंदिवस माझे खूप हाल होत होते पण यातून बाहेर निघायला मला कुठला मार्गच सापडत नव्हता आणि अश्यातच माझ्या आयुष्यात सूरज आला तो आमच्याच बाजूला रहायला होता कधी आमच्या दोघांच बोलण, लपून छपून भेटण वाढत गेल कळलच नाही. हळूहळू सूरज आणि मी खूप जवळ येत होतो आता आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली होती की आम्ही राहूच शकत नव्हतो पण देवजाणो ही गोष्ट कशी माझ्या घरी कळली आणि त्यांनी घाईघाईत माझ लग्न तुमच्याबरोबर लावून देण्याच ठरवल. मी आधी नकार दाखवला पण मला या संकटातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग दिसत होता आणि म्हणून मी कुठलेही आढेवेढे न घेता लगेच तुम्हाला होकार कळवला. पण माझी तुम्हाला विनंती आहे आम्हा दोघांना वेगळ करु नका मी नाही राहू शकत सूरज शिवाय आणि मला माफ करा मी तुम्हाला फसवल, मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाहीये मी उद्याच्या उद्या हे घर सोडून सुरज कडे निघुन जाणार आहे.आता विजयची चिंता वाढली कारण कालच त्यांच लग्न झाल होत आणि आता हे सर्व त्यामुळे तो पुरता गोंधळून गेला. तरीही त्याने समजूतदारपणे निर्णय घेतला की आपण सुरज आणि रियाच्या मध्ये यायच नाही. तो रियाला शांतपणे म्हणाला की मी उद्या घरी सर्वांना सांगतो की तुझी काही official काम बाकी आहेत त्यामुळे तुला २-३ दिवसानंतर तुझ्या माहेरी जाव लागेल त्यानंतर तू तुझ्या मार्गाने जायला मोकळी आहेस पण याबद्दल घरी कोणाला काहीच सांगू नकोस. रियाने सुद्धा हे मान्य केल आणि ती बेडवरच झोपी गेली.विजय जमिनीवर बिछाना करुन झोपायचा प्रयत्न करत होता पण काही केल्या त्याला झोपच येत नव्हती सारखा मनात एकच प्रश्न येत होता, "तिने मला होकार दिला...पण..!! " (पुढचा भाग लवकरच....) › Next Chapter मधुचंद्राची रात्र - 2 Download Our App