........... साधारण एक च्या नंतर तिच्या फोन ची मेसेज टोन वाजली.. तसा तिने पट्कन मेसेज open करून बघितला...
📱 I m home..
Don't worry
I m OK
Good night..
विहान चा मेसेज होता...!
तिला हायसं वाटलं!... आणि थोड्यावेळासाठी ती शांत झोपली...
रात्री उशीरा झोपूनही तिला सकाळी लवकरच जाग आली...! तिने लवकर आवरून विहान ला भेटायचं ठरवलं... तिने पटापट अंघोळ वगैरे उरकली... भूक तर नव्हतीच.. तिला विहान ला भेटायची ओढ लागली होती... कसा असेल तो.. 😓कुठे गेला असेल काल🙁.. खूप सारे प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते... तिने आईला विहान कडे जात असल्याचं सांगितलं.. पण आईने 'आधी नाश्ता कर मग जा' असं सांगितल्यावर तिचा नाईलाज झाला... ती कशीबशी नाश्ता करायला बसली.... इतक्यात तिचा फोन वाजला... तिने तो घाईघाईत रिसीव्ह केला....
"hello....." सोनिया
"............"
"काsssssय???... कधी?? " पलीकडच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सोनिया ओरडलीच..! 😨
"मी आलेच..." म्हणत तिने फोन कट केला.. पायात चपला सरकवल्या.. पर्स घेतली आणि आईला सांगून घाईघाईतच बाहेर पडली....
- - - - - - - XOX - - - - - - -
'Lakeshore Hospital' समोर तिने ड्रायवर ला कार थांबवायला सांगितली... घाईघाईतच ती आतमध्ये गेली... Reception वर चौकशी केली आणि थर्ड फ्लोअर ला आली... 304 नंबर रूम मध्ये शिरली......
समोर बेड वर विहान ला बघून तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले....😢 ..ती त्याच्याजवळ गेली.... तो झोपला होता.... सोनिया ला बघून विहान ची मॉम उठून तिच्याजवळ आली... सोनिया ने विचारलं...
"आँटी काय झालं विहान ला अचानक??😕"
खरं तर विहान च्या या अवस्थेचं कारण त्याच्या मॉम पेक्षा तिलाच जास्त माहीत होतं.. पण तिला काहीच माहित नाही असं तिने दाखवलं..
"अगं.. काल तुझ्यासोबत नव्हता का तो रात्री??😦"
"नाही आँटी... त्याने मला आठ वाजताच घरी सोडलं आणि तो निघून गेला... 😓... कदाचित तो कॉलेज फ्रेंड्स सोबत असेल " सोनिया ने आवंढा गिळत म्हटलं..
" अच्छा... मला वाटलं तू आहेस त्याच्या सोबत... मला फक्त त्याचा एक कॉल आला होता... लेट होईल म्हणाला... म्हणून मी परत कॉल नाही केला त्याला... रात्री उशिरा कधीतरी लॅच उघडल्याचा आवाज आला... विहान आलाय हे मी ओळखलं.. मग मी परत झोपले.. सकाळी सहा वाजता उठले तर त्याच्या रूम चा दरवाजा लॉक नव्हता.. अर्धवट उघडा होता... म्हणून मी सहज आत गेले.. तर बेड वर त्याचे कपडे, मोबाईल, कार ची चावी सर्व अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यातच तो झोपला होता... त्याचा चेहरा ही मला उतरल्यासारखा वाटला.. म्हणून मी त्याच्या जवळ गेले आणि अंगाला हात लावून बघितलं तर.. त्याचं अंग तापाने फणफणत होतं... 😓 मी लगेच त्याच्या डॅडींना उठवलं आणि आम्ही त्याला इकडे घेऊन आलो... डॉक्टर ने high fever असल्याचं सांगितलं... आम्हाला तर कळंतच नव्हतं अचानक असं कसं झालं🙁... तुला कळवावं म्हणून सकाळ सकाळच फोन केला...! सॉरी हा .. पण मला वाटलं तुला तरी माहित असेल त्याला अचानक काय झालंय.. 😓"
" it's ok aunty... बरं झालं तुम्ही मला सांगितलंत.. आता एक काम करा.. तुम्हाला घरी जायचं असेल तर जाऊन या.. मी थांबते इथे.... "
" ठीक आहे बेटा... बरं झालं तू आलीस... मी घरी जाऊन विहान साठी काहीतरी बनवून आणते... त्याचे डॅडी ही थोड्या वेळासाठीच ऑफिस ला गेलेत.. येतीलच इकडे... "
" No problem aunty.. मी आहे... तुम्ही नका काळजी करू.... ☺️"
" OK.. चल मग येते मी.. "
" हो आँटी.. बाय "
आणि सोनिया एक सुस्कारा सोडत रूम मधल्या सोफ्यावर बसली... विहान चा निरागस चेहरा बघून तिला भरून येत होतं... तिला त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होतं... 😖 थोडा वेळ ती तशीच बसून होती... काल जे झालं ते आठवत होती... निहिरा चे शब्द आठवून तिला खूपच त्रास होत होता.. विहान ने कसं सहन केलं असेल एकट्याने 😢 विचार करूनच तिला त्याची कणव आली...😑
विचारांत हरवली असताना तिला विहान उठल्याची चाहुल लागली.... ती धावतच विहान जवळ गेली... त्याने डोळे उघडले..
"विहान कसं वाटतंय?? 😓"
"ठीक आहे मी.." उसने अवसान आणून तो म्हणाला...
"चेहरा बघ किती बदललाय एका दिवसात..... 😕" सोनिया काळजीने म्हणाली...
"ह्म्म्म... चेहरे बदलायला वेळ नाही लागत...😏" विचारात हरवल्यासारखं बघत विहान म्हणाला..
"विहान प्लीज.. नको विचार करू जास्त.. त्रास होईल तुला..... काही हवंय का?"
त्याने नकारार्थी मान हलवली..
" मग शांत पडून रहा बघू... 😓"
विहान कसनुसं हसला...
तिला खूप वाटत होतं की त्याला विचारावं काल रात्री कुठे होतास.. काय करत होतास एवढा वेळ? पण त्याची अवस्था बघुन ती गप्पच राहिली... खरं तर त्याचा चेहरा बघूनच तिच्या लक्षात आलं होतं की काल काय झालं असेल... 😐 विचार करूनच तिच्या अंगावर शहारा आला... 😖😖
- - - - - - - XOX - - - - - - -
इकडे निहिरा ने फार्म हाऊस सोडल्यावर ती आणि तिचा ग्रुप त्यांच्या स्कूटी वरुन घरी जात होत्या... निहिरा चा चेहरा अजूनही रागाने लालेलाल झालेला दिसत होता... अवनी ने मध्येच पार्क जवळ स्कूटी थांबवली.. रीतू आणि अदितीही थांबल्या..
"थांबलीस का?... मला घरी जायचंय..." निहिरा वैतागूनच म्हणाली...
"या अशा अवतारात घरी जाणार आहेस?.. काय सांगशील घरी.. विहान सोबत breakup करून आलीस म्हणून?? 😧" अवनी म्हणाली..
"अवनी प्लीज... मला नाही बोलायचंय त्या विषयावर... 😡😩"
"दूर पळालीस म्हणून सत्य बदलणार आहे का? आणि तुझा त्रास तरी कमी होणार आहे का?? 😐.. इथे ये... बसून बोलू... तुला पण हलकं वाटेल... "
निहिरा जड पावलाने अवनी च्या मागे गेली... आणि चौघीही एका बेंच वर बसल्या... निहिरा खाली मान घालून अजूनही हुंदके देत होती...😥
अवनी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली...
" निहू.. तुला खरच वाटतंय की विहान ने केलंय हे सर्व...? 😓 "
" अवनी... डेटा डाऊनलोड करायला ठेवला आणि पाचच मिनिटे मी बाहेर गेली गं..😓 परत आले तर विहान त्या रूम मधून बाहेर पडत होता... मलाही खरं नव्हतं वाटत की विहान ने हे केलंय .. पण बाकी सर्व तर हॉल मध्येच होते.. मग दुसरं कोण करणार सांग...😩" निहिरा रडता रडता म्हणाली..
" तरीही.. मन नाही मानत गं की विहान असं करेल 😕.. किती प्रेम करतो तो तुझ्यावर! 🙁" रीतू म्हणाली
" त्याचं माझ्यावरचं प्रेम पण खरं होतं की फक्त दिखावा ते ही कळत नाहीये... 😢 फक्त सुडाच्याच भावनेने त्याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं असंच वाटतंय मला... 😥😥"
" नाही निहू.. मला नाही वाटत असं.. 😐" अदिती ही विहान ची बाजू घेत म्हणाली...
"मला पण नसतं वाटलं अदिती... जर मी सकाळी त्याला त्या मुलीसोबत बघितलं नसतं... 😢"
" मुलगी?? कोण मुलगी?? " अवनी ने आश्चर्याने विचारलं... 😨
निहिरा ने रडत रडतच त्यांना सकाळी जे बघितलं ते सर्व सांगितलं... तिच्या हातातल्या ब्रेसलेट बद्दल ही!!! त्या तिघींनाही हे सर्व ऐकून धक्काच बसला 😨😨.. खरंच विहान असं वागू शकतो???? त्यांनाही आता काही कळेनासं झालं होतं... निहिरा पुढे म्हणाली...
"इतकंच नाही ....जेव्हा फार्म हाऊस वर आतल्या रूम जवळ आम्ही एकमेकांना धडकलो आणि त्याने मला त्याच्या हातावर सावरलं तेव्हा त्याच्या हातावर टॅटू ने मुलीचं नाव काढलं होतं आणि त्याच्या भोवती रेड हार्ट शेप काढला होता ..आणि ते नाव माझं नव्हतं.. ते नक्कीच त्याच मुलीचं असणार.😭😭"..आणि निहिरा जोरजोरात रडायला लागली...
त्या तिघींसाठी हा अजून एक धक्का होता!! 😓.... त्यांनी निहिरा ला जवळ घेतलं आणि शांत करायचा प्रयत्न केला...
" निहू.. तुझ्या बघण्यात तर काही चूक झाली नाही ना... 😐"
अदिती ने कुठे आशेचा किरण दिसतोय का या उद्देशाने तिला विचारलं..
"नाही गं... मी स्पष्ट बघितलंय.. त्या मुलीलाही आणि त्याच्या हातावरच्या टॅटूलाही...! 😥 तो नेहमी full sleeves t-shirt घालायचा त्यामुळे दिसलं नाही कधी...पण आज त्याने मला हातावर झेललं तेव्हा त्याचे sleeves वर सरकवलेले होते.. म्हणूनच मी बघू शकले.. 😓😥.... खरं तर मलाही कळत नाहीये मी नक्की कोणत्या गोष्टीवरून चिडले त्याच्यावर... 😩.. त्याने जाणूनबुजून माझा प्रोजेक्ट डिलीट केला म्हणून.. की त्याने मला चीट केलं म्हणून.... 😣😥 काहीही असू दे पण आता सर्व संपलंय... माझा विश्वासघात केलाय त्याने... 😥 पण तुम्हाला माझी शप्पथ आहे की मी आत्ता जे विहान बद्दल तुम्हाला सांगितलं ते कोणाजवळ ही बोलायचं नाही... 😓"
" निहू.. पण मला वाटतं.. तू एकदा त्याच्यासोबत बोलायला हवं होतंस.. कदाचित सर्व clear झालं असतं 😓" रीतू म्हणाली..
" माझा प्रोजेक्ट डिलीट झाल्यानंतर ... माझं स्वप्नं असं धुळीला मिळाल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था झालीये याचा विचार केलास तू रीतू??? त्यात विहानचं सकाळचं वागणं... तो टॅटू... या सर्वानंतर मी तिथे त्याच्याशी बोलत बसायला हवं होतं असं वाटतंय तुला??? 😡 😫😫" निहिरा परत चिडली ...
" निहू प्लीज शांत हो.... तुझ्या आणि विहान मध्ये breakup व्हावं असं आम्हाला तिघींनाही वाटत नाहीये... म्हणूनच आम्ही एखादा मार्ग काढायचा प्रयत्न करतोय... 😔😔"
" नका करू कसलाच प्रयत्न... आता आमचं एक होणं अशक्य आहे... 😐😔 किती स्वप्ने बघितली होती मी त्या प्रोजेक्ट ला घेऊन... माझ्या आई बाबांची मी एकुलती एक.. त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत माझ्याकडून.. सुवर्णसंधी होती ही माझ्यासाठी....! आता स्वत:च्या खर्चाने तिथे जाणं, तिथे राहून जॉब बघणं.. परवडणार आहे का मला.... बाबांची कितीही इच्छा असली तरी त्यांची ऐपत नाहीये तेवढी 😢 आणि मला ते कळत होतं म्हणून मला ही संधी सोडायची नव्हती... म्हणूनच मी जीव तोडून मेहनत घेतली होती या प्रोजेक्ट साठी.... त्यासाठी मी माझ्या विहानलाही दूर ठेवलं होतं स्वतः पासून... 😥 किती खुश होते बाबा मला प्रोजेक्ट साठी एवढी मेहनत करताना बघून.. किती proud फील करायचे.... आता.... आता काय सांगू त्यांना??? " तिला परत जोराचा हुंदका आला... 😫😫
त्या तिघींनीही मग त्या विषयावर बोलायचं थांबवलं... कसबसं तिला शांत केलं... आणि मग चौघीही घरी निघून गेल्या... अवनी निहिरा ला बाहेरूनच सोडून आणि स्कूटी ची चावी तिच्याकडे देत घरी निघून गेली... एवढा वेळ निहिरा ने स्वतःवर कंट्रोल ठेवला होता.. पण घरात पाऊल टाकताच तिला पुन्हा भरून आलं... तितक्यात तिचे बाबा तिला समोर दिसले... तिने धावतच जाऊन त्यांना मिठी मारली... आणि ती जोरजोरात रडू लागली... तिच्या आवाजाने आईही घाबरून हॉल मध्ये आली....😨
"काय झालं निहू?? का रडतेयस अशी 😨😨" तिच्या बाबांनी घाबरून विचारलं.. त्यांना तर काही अंदाज ही लावता येईना....
"अगं बाळा बोल.. काय झालंय.. का रडतेयस तू? आम्हाला काळजी वाटायला लागलीय खूप 😧😧" निहिरा ची आई म्हणाली...
निहिरा च्या तोंडातून मात्र शब्द फुटत नव्हता... काय सांगू ह्यांना आता... कसं सांगू? 😧 म्हणून ती विचारात पडली... कसेबसे शब्द जुळवत ती म्हणाली... "आई-बाबा... माझा सिंगापूर वाला प्रोजेक्ट डिलीट झाला लॅपटॉप मधून... 😭😭😭".. आणि ती परत रडायला लागली...
आई बाबा दोघांनाही कळेना काय बोलावं... त्यांनाही खूपच वाईट वाटलं... त्यांनी इतके दिवस निहिरा ने घेतलेली मेहनत बघितली होती... 😐 त्यामुळे तिला या गोष्टीचा किती त्रास होत असेल याचा अंदाज त्यांना होता... म्हणून त्यांनी स्वतः ला सावरलं आणि मग तिला शांत केलं.. बाबांनी तिला समजावलं..
"निहू बेटा.. झालं ते खरच खूप वाईट झालं.. आम्हालाही तुझ्या एवढंच वाईट वाटतंय बेटा... पण जे गेलं त्यासाठी आता दुःख करत बसून काही उपयोग आहे का.. तू आता काय करू शकतेस त्याचा विचार कर... मला वाटतं तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यावंस.. आणि फायनल एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवावेस..! आणि लक्षात ठेव... जे होतं ते चांगल्या साठीच होतं.... ☺️"
निहिरा ला बाबांचं म्हणणं पटलं.. ती एक गोड smile करून आई बाबांना थँक यू म्हणुन तिच्या रूम मध्ये गेली.. ती फ्रेश झाली तेव्हा तिला थोडं बरं वाटलं... आईच्या आग्रहाखातर तिने थोडसं खाल्लं आणि ती झोपायला गेली...
आजूबाजूला लोकांचं सेलिब्रेशन चालू होतं... न्यू इयर पार्टीज् रंगात आल्या होत्या सर्वांच्या.. पण निहिरा च्या आयुष्यातला जणू सर्व रसच निघून गेला होता... 😐😥
ती बेड वर पडल्या पडल्या सकाळपासून जे जे झालं ते परत परत आठवत होती... 😓 तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून आसवे ओघळत होती... तिला नक्की कशाचा त्रास जास्त होतोय तेच तिला कळत नव्हतं...😩 पण विहान ला ती खूप मिस करत होती एवढं नक्की...!
- - - - - - - - XOX - - - - - - - -
सोनिया रोज विहानला हॉस्पिटल मध्ये भेटायला जात होती.. पण विहान ने एकदाही निहिरा चा विषय काढला नव्हता... तो गप्प गप्पच रहायचा... कुणाशीही कामाशिवाय बोलायचा नाही... विहान च्या आईनेही दोन तीन वेळा त्याच्याकडून कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही सांगितलं नाही... आतून तो तिळ तिळ तुटत होता.. हे सोनिया ला ही कळत होतं... पण तो काही बोलत नाही म्हणून मग तिनेही त्याला त्रास होऊ नये म्हणून निहिरा विषयी बोलणं टाळलं होतं..
विहान चार दिवसांनी हॉस्पिटल मधून घरी आला होता... सोनिया दुपारी जेवण वगैरे उरकून विहान ला भेटायला गेली... खरं तर त्याने तिच्यासोबत काहीतरी बोलावं
आणि थोड्या वेळासाठी का होईना स्वतःचं दुःख विसरावं असं तिला मनापासून वाटत होतं.... 😐 त्यामुळे आजही ती त्याच्यासोबत वेळ घालवायला आली होती... सोनिया विहान जवळ होती म्हणून विहान ची मॉम थोडावेळ त्यांच्या रूम मध्ये जाऊन पडल्या...
सोनिया विहान जवळ येऊन बसली...जेवलास का? कसं वाटतंय? वगैरे जुजबी बोलून सोनिया गप्प बसली... विहान जेवढ्यास तेवढंच उत्तर देत होता... गेले चार दिवस त्याने त्याचा मोबाईल ही हातात घेतला नव्हता.. बंद करून ठेवला होता... त्याचं असं गप्प बसणं तिला सलत होतं...😖 पण तो काही response देत नाही म्हणून ती तिच्या मोबाईल सोबत टाइमपास करत बसली... दोन क्षण असेच शांततेत गेले.. आणि एकाएकी त्याने येऊन सोनिया ला घट्ट मिठी मारली...आणि तो रडायला लागला...😭😭 त्याच्या या अनपेक्षित वागण्याने ती गोंधळली..!! त्या एका मिठीतूनच तिला त्याचं सगळं सगळं दुःख जाणवलं...!! 😢
"विहान....😖" ती एवढंच म्हणू शकली..तिलाही त्याची अवस्था बघून रडू आलं😫😫... त्याने अजूनही तिला तशीच मिठी मारलेली होती...
तिने त्याला शांत केलं...
"सोनिया... मी नाही राहू शकत गं तिच्याशिवाय... एक क्षण ही असा गेला नाही की तिची आठवण आली नाही.. 😫 तिच्याशिवाय काहीच सुचत नाही गं... खूप त्रास होतोय...😭 मला कळतंय मॉम, डॅड.. इतकंच काय तुलाही त्रास होतोय मला असं बघून... पण मी काय करू सांग ना... 😫 मॉम, डॅडना तर मी काही सांगू ही शकत नाही.. काय सांगणार त्यांना...?? मला माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला नाही आवडणार ... 😥 काय करू मी सोनिया... सांग ना तूच..! 😭" तो सोनिया चे हात हातात घेऊन रडतच बोलत होता...
" विहान... एकदा निहिरा सोबत बोलून क्लिअर का नाही करून घेत 😓"
" काय क्लिअर करू सांग... मी सुद्धा खूप विचार केला की तिच्याशी बोलून तिला समजवावं... तिचे गैरसमज दूर करावेत.. पण जिथे तिला माझ्यावर विश्वासच नाहीये तिथे मी तिला काय समजवणार सांग...😩 तिने थोडा जरी विश्वास दाखवला असता तर मी सर्व क्लिअर केलंही असतं... पण विश्वासच नसेल तर त्या नात्याला तरी काही अर्थ उरणार आहे का?? पुढे तरी ते नातं टिकेल का सांग... 😥"
सोनिया गप्पच बसली... विहानचं म्हणणंही बरोबर होतं.. विश्वासच नसेल तर नातं पुढे नेण्यात काय अर्थ होता.... 😑😑
विहान ने एखाद्या लहान मुलासारखं तिच्या मांडीवर डोकं टेकवलं... आणि तो परत निहिरा च्या आठवणीत रडू लागला...
" सोनिया.. माझं कशातच लक्ष लागत नाही गं... सारखी तीच डोळ्यासमोर येते.. तिला येत असेल का गं माझी आठवण??😭😭" म्हणून तो अजूनच रडायला लागला...
सोनिया तरी काय सांगणार होती त्याला... तीही त्याच्यासोबत मूकाश्रू ढाळत होती...! 😢
🎶🎵🎶🎵
तू तिथे दूर.. मी इथे दूर..
दाटला ऊर ये ना...
छेडितो सूर.. हरवला नूर
जीव आतुर ये ना.....
सखे गं साजणी ये ना.....!
विरहाची आग.. जाळी मला गं
झाली जिवाची दैना..
सुन्नाट रात.. बेभाट आत
अंगार हा विझेना....
सखे गं साजणी ये ना....!
श्वासात गंध.. ध्यासात स्पर्श
का तोल सावरेना...
आलीस तू.. की नुसताच भास
काही मला कळेना....
सखे गं साजणीss.. ये ना....!! 😭😭
To be continued..
🙏
#प्रीत