छान असा नॉनव्हेजचा बेत होता. जेवताना अचानक राजच्या डॅड ला ठसका लागला तस मी समोरच्या ग्लासमधील पाणी त्यांच्या समोर धरलं. पण काही केला त्यांचा ठसका कमी होण्याचं नाव घेत नव्हता. शेवटी मी उठले आणि माझ्या डाव्या हाताने कसला ही विचार न करता त्यांच्या पाठीला चोळलं आणि त्यांना वर बघायला लावलं. तेव्हा कुठे त्यांचा ठसका कमी झाला. आणि त्यांना बर वाटल.
"सॉरी हा काका मी काही न विचारता तुमच्या कोटला आणि पाठीला हात लावून चोळल." मी जरा घाबरतच त्यांची माफी मागितली. नाही म्हटलं तरी ते श्रीमंत आणि बाहेरच्या देशात रहाणारे. काय माहीत त्यांना हे आवडेल नाही आवडेल.
"अग बेटा त्यात सॉरी काय.. बरोबर केलंस तु. मला नेहमी नॉनव्हेज खाताना ठसका लागतो आणि तुला नाहीत आहे माझी बायको म्हणजे राजची आई अशीच माझ्या पाठीला चोळुन द्यायची जस आज तु केलंस. मी तर तुलाच थँक्स म्हटलं पाहिजे. खुप वर्षांनी कोणी तरी तिच्या सारख वागलं. तिची आठवण करून दिलीस. थँक्स टु यु प्रांजल.. आणि हो तुम्ही ही मला डॅडच बोला.." डोळ्यात पाणी आणि गालावर गोड स्माईल देत त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. आणि राजकडे बघून काही तरी इशारा केला जो निशांतच्या नजरेतुन सुटला नाही.
त्याच तर आधीपासून मन नव्हतं. पण फक्त मी बोलले म्हणून तो आला होता आणि त्यांच्या खुप ओळखी होत्या ज्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार होता.
त्यांनतर जेवुन आम्ही राजच्या रूममधे बसलो होतो की डॅड आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती आली जी साध्या कपड्यात होती.
"राज हे मिस्टर गोखले. पोलीस आणि सोबत डिटेक्टिव्ह ही आहेत. यांनी आतापर्यंत खुप केसेस सोडवल्या आहेत. आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते आपली केस ही तितक्याच लवकर आणि विश्वासाने सोडवतील..."
राजच्या डॅडनी माझी आणि निशांतची मिस्टर गोखल्यांशी
ओळखलं करून दिली.
"हे बघा तुम्ही तिघांनी ही मला सगळं नीट सांगा म्हणजे मला त्या व्यक्तीची माहिती गोळा करायला आणि त्याला पकडायला मदत मिळेल." मिस्टर गोखले बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो.
नंतर त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही त्यांना देऊ केलं. आता आम्ही बोलत होतो आणि ते ऐकत होते. आमच बोलण ऐकुन त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ही बदलत होते.
"अच्छा. म्हणजे तो जो आहे तो स्वतःला जरा जास्तच शहाणा समजत आहे तर. जर त्याने हर्षल चा खूण केला असेल ना तर त्याला शिक्षा तर होणारच आहे. आणि तुला अस त्रास देतो आहे. आपण लवकरच त्याचा शोध घेऊ."
त्यानंतर आम्हाला त्यांनी बाहेर जायला सांगितलं आणि त्यांचं राजच्या डॅड सोबत काही बोलण झालं. आम्ही ही बाहेर आलो आमचं ही बोलण झालं एकमेकांसोबत.. बोलण्यावरून तरी ते यातून नक्कीच मार्ग काढतील अस वाटतं होत. काही वेळाने ते निघून गेले आणि मी आणि निशांत जायला निघालो...
"राज आता आम्ही निघतो." मी निशांतकडे बघत विचारले.
"निघालात..???" त्याच्या या वाक्यावर निशांतने आपली भुवई उंचावली... मी तर कसतरी हो म्हटलं आणि आम्ही दोघेही निघालो. तोच समोरून त्याचे डॅड आले.
"निघालात का..??"
"हो डॅड..." मी चाचपडत बोलले. माझ्या "डॅड" शब्दावर राजची कळी मात्र खुलली होती. जे निशांतला बिलकुल आवडल नव्हतं. शेवटी आम्ही परत भेटु अस बोलुन निघालो. निघाल्यापासून निशांतचा मुड काही ठीक वाटतं नव्हता.
न राहुन मी विचारलेच...,"काय झालं निशांत राजच्या घरून निघाल्यापासून तु गप्प आहेस.. काही झालंय का..??"
माझ्या बोलण्यावर ही त्याने जास्त काही रियाक्त नाही केलं. आम्ही निघालो तेव्हा संध्याकाळ झालीच होती. हिवाळा चालू झाल्याने हवेत गारवा ही वाढला होता. आणि त्यात बाईक असल्याने चांगलीच थंडी वाजत होती. अजून ही निशांत शांतच होता.
"खडूस जरा चहा घेऊया का टपरिवरचा..??" माझ्या बोलण्यावर त्याने बाईक बाजुला लावली. मी उतरले तसा तो ही बाईक बाजुला लावून आला. राजच घर कॉलेज च्या पुढच्या दिशेने असल्याने आम्हाला कॉलेज पार करून पुढे जायला लागणार होतं. कॉलेज जवळ एक आमचा ठरलेला चहावाला असल्याने आम्ही तिथे नेहमी चहा घ्यायचो. तसा आज ही घेतला.
नेहमीप्रेमाने निशांत हातात चहाची दोन काचेची ग्लास घेऊन माझ्या समोर आला.
"काय झालं आहे निशांत..?? तु राजच्या घरातुन निघाल्यापासून बोलत नाही आहेस. तुला आवडल नाही ना त्याच्या डॅड ने आपल्याला मदत करणं..!! की अजून काही प्रॉब्लेम आहे. तु सांगशील तर मला कळेल ना.. असा गप्प बसून राहशील तर कस होईल." माझे एका मागून एक प्रश्न चालूच होते.
To be continued....