Paar - ek bhaykatha - 2 in Marathi Thriller by Dhanashree Salunke books and stories PDF | पार - एक भयकथा - 2

Featured Books
  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

  • ખજાનો - 76

    બધા એક સાથે જ બોલી ઉઠ્યા. દરેકના ચહેરા પર ગજબ નો આનંદ જોઈ, ડ...

  • જીવનની ખાલી જગ્યાઓ કોણ પુરશે ?

    આધ્યા અને એના મમ્મી લગભગ પંદર મિનિટથી મારી સામે બેઠેલા હતાં,...

Categories
Share

पार - एक भयकथा - 2

पार - एक भयकथा

भाग - २

“बाय मनु दोन तासात तुम्हाला घ्यायला येतो,काही लागलं तर फोन कर” अरविंदने मनीषा आणि मालती मावशीला सकाळी गावाच्या बाजारात सोडले.

“मम्मा आज बाबा आम्हाला त्याच्या साईट वर नेणार आहे ” खिडकीतून मान बाहेर काढून आर्या मनीषाला कौतुकाने सांगू लागली

“हो माहितीये मला, बाबांन जवळच रहा जास्त लांब जाऊ नका ” आर्याने बाहेर काढलेली मान हाताने आत सारत मनीषाने मुलांना सुचना दिली आणि दोघी खरेदीला निघाल्या.

“मावशी जास्त भाज्या नको घ्यायला फ्रीज नाही तर खराब होतील ”

“बाजार काय तसा लांब नाय म्हनल तर मी बी येईन एकली, मोजक्या भाज्या अन किरणाच घेऊया ”

दोघी खरेदी करू लागल्या. सगळं समान घेऊन झालं.दोघी बाजारातून बाहेर आल्या.उन्हामुळ दोघी खूप थकल्या होत्या. अरविंदची वाट पाहत दोघी तिथल्या एका घराच्या ओसरीवर सावलीत बसल्या मनीषा ओढणीने घाम टिपत होती. ते मीनाच माहेर होत ते. मीना, तिची आई आणि सोबत दोन बायका भाज्या निवडत गप्पा मारत बसल्या होत्या. ह्या दोघींना बसलेलं पाहून त्या कुजबुज करू लागल्या.मीना आत गेली आणि तांब्यात पाणी आणले आणि मनीषाला दिले.

“धन्यवाद ” अनपेक्षित आपुलकीने मनीषाला बरे वाटले. पाणी पिऊन तांब्या तिने मालती मावशी कडे दिला.

“त्यात काय ताई उन्हात फिरल्यागत वाटल्या म्हणल तहान लागली असेल ” मीना एकदम सहज बोलली.

“नाव काय हाय तुझं, इथच राहता का ” मालती मावशीने मीनाला विचारले

“मी मीना, पोरांना उन्हाळ्याची सुट्टी म्हणून माहेराला आले मला तिकडे सातारला दिलीये ” मीना मनमोकळेपणाने बोलता होती.

“फारच ऊन आहे पण इथे ” मनीषा ओढणीने वारा घेत बोलू लागली.

“इथला उन्हाळा असाच कडक असतोय.पर तुम्ही इथले वाटत नाही बाहेरून आलाय का ताई ” मीनाने विचारले

“हो आम्ही पुण्यावरून आलोय ”

“अस होय कोणाचे पाहुणे मग तुम्ही ” मीना एकावर एक प्रश्न विचारात होती. इतरवेळी मनीषाला ते आवडलं नसतं पण मीनाच्या बोलण्यात एक आपुलकी होती.

“खरतर या गावात मी कोणाला ओळखत नाही माझ्या मिस्टरांनी इथला साखर कारखान्याचा प्रोजेक्ट घेतलाय त्यांच्या सोबत आलीये” ते ऐकून मीनाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले, बाकीच्या दोन बायकापण ते ऐकून त्यांच्या जवळ येऊन बसल्या.

“तुम्ही सगळे असं का पाहताय ” मनीषाने विचारले

“ताई तुम्ही गावाच्या येशीच्या पुढच्या रानात तो साखर कारखाना बांधणारे त्या बद्दल बोलताय का ” मीनाने विचारले

“हो तुम्हाला माहितीते का या प्रोजेक्ट बद्दल” मनीषाने विचारले आणि मीना गप्प बसली.

“बाई बोलू का नग तुम्हाला, रानावारला वडाचापार झपाटलेला आहे शान्या असाल तर तिथून लांबच रहा ” मीनाची आई बोलली.अचानक असे काहीतरी ऐकल्याने मनीषाला आश्चर्य वाटले.मालती मावशीला मात्र ते ऐकून भीती वाटली.

“अन तुम्हाला कसं माहिती ” मालती मावशीने विचारले. तितक्यात अरविंद गाडी घेऊन आला.

“जिंदगी गेलीये गावात माझी माझ्या समोर गीळलय किती तरी जणाना ”मीनाची आई बोलली.

मनीषाला पुढे काहीच ऐकायची इच्छा न्हवती.तिने खरेदीच्या पिशव्या गाडीत टाकल्या मिनाचा निरोप घेतला आणि मालती मावशीना निघण्यासाठी सांगू लागली.

“पूर्ण ऐकून तरी घ्या की काय सांगतायत ते ” मालती मावशी बोलल्या

“गरज नाही ” असे म्हणत मनीषाने मावशींना गाडीत बसवले ती driving seat शेजारी बसली. मुले मागच्या सीटवर झोपी गेली होती. गाडी चालू झाली.

“थकलीस” अरविंदने विचारले.

“नाही रे ”

“मग चेहरा का उतरलाय ”

“मला सांग तू साईट पाहायला गेलतास ना तिथे कुठे वडाच झाड आहे का ज्याला मोठ पार आहे ”

“हो अगं काय सुंदर, विस्तीर्ण असं वड आहे मी पाहताच राहिलो पण मनु तुला माहितीये का....” अरविंद काही तरी सांगत होता पण त्याच बोलणं मनीषाने अर्धवट तोडलं.

“अरे तिथे म्हणे भूत आहे, नोंनसेन्स”

“कोण बोललं तुला आणि तुला त्यावर एवढ चिडायला काय झालं ” अरविंदला तिच्याकडे पाहून हसू लागला

“भूत आहे हे सांगितलं याच चिडायला नाही आल, ते झाड जीव घेतं असं काहीपण बोलत होत्या त्या आता तू महिनाभर तिथे काम करणार मग मला.... ” बोलता बोलता मनीषाला रडू आल. अरविंदने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.

“ए येडोबा तुला माहितीयेना लोकं काहीपण अफवा पसरवतात आणि तुझापण या गोष्टींवर विश्वास नाहीना मग ”

“नाहीये माझा विश्वास पण तरी खूप कसतरी वाटलं ऐकून, तू काळजी घेशील ना अरु ”

“हो गं ” अरविंदने तिच्या गालावर टीचकी मारली.

“वेडी आहेस तू ” अरविंद बोलला आणि त्याने गाडी पुन्हा सुरु केली.

मालती मावशी मात्र अजूनही त्याच विचारात हरवल्या होत्या.

संध्याकाळच्या चहाला सगळे जमले.

“मग काय काय मज्जा केली बाबा बरोबर ”

“खूप मज्जा केली नदीच्या पाण्यात पण खेळलो,वी हॅड लोटस ऑफ फन मम्मा ” ध्रुव बोलला

“आणि मम्मा त्या बिग ट्री पाशी कोणी तरी सॉंग लावलं होत ” आर्या बोलली

“ए मी बोलणार ते सॉंग” ध्रुव म्हणाला

“नाही मी ”आर्या त्याला रागावली

“अरे भांडू नका दोघे म्हणा पण अस्धी चहा घ्या ” मनीषा बोलली.

चहा पिताना अशाच गप्पा चालू होत्या.पण ऐकलेल्या गाण्याचा विषय तिथेच थांबला.

रोजरात्री प्रमाणे मनीषा आणि अरविंद अंगणात बसलेले असतात

“काय रे आज एवढा गप्प का ”

“अग ते झाड नाही का साईट वरचं ते कापाव लागणार आहे, इतक बहरलेल सुंदर झाड कापायचं जीवावर येतंय ग ”

“अच्छा म्हणून उदास आहेस का, हे बघ अरु तू आज पर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांमधून हजारो झाडे लावलीस त्यामुळे एक झाड तोडलं तर काय होईल ”

“एक एक करूनच इतकी झाडे तोडली गेलीयेत आज पर्यंत, पण अगं तसं नाही काल मी ते झाड न्याहाळत होतो तेव्हा ते जस काय माझाकडे आशेने पाहत होतं न तोडण्याची दया मागत होतं असं वाटलं मला ”

“अरविंद तू खूप विचार करतो आहेस, कधी कधी न पटणाऱ्या गोष्टीपण कराव्या लागतात”

“हमम... तुझं बरोबर आहे चल झोपायाला जाऊ उशीर झाला” दोघे झोपायाला गेले. अरविंदला मात्र उशिरापर्यंत झोप आली नाही.

“उठा उठा बेड टी तैय्यार आहे” मनीषाने अरविंदला उठवले. त्याचे डोळे लाल झाले होते

“पोरं कुठाय ” डोळे चोळत तो उठून बसला

“अरे इथे आल्यापासून मनानेच रोज लवकर उठून बसतात आत्ता अंगणात खेळायला गेलेत ” मनीषाने हातातला कप त्याला दिला.तितक्यात दोघे आत आले.

“गुड मोर्निंग बाबा ” दोघे जाऊन अरविंदला बिलगले

“गुड मोर्निंग पिल्लांनो आज मम्मापाशी सोडून जाणार आहेर तुम्हाला तिला त्रास द्यायचा नाही काय ”

“हो बाबा ” आर्या आणि ध्रुव एका सुरात बोलले

“मम्मा खेळ सूर-पारंब्याचा म्हणजे काय गं ” आर्याने विचारले

“मलापण माहीत नाही मालती मावशी तुम्हीच सांगा ”

“अग तुम्ही पोर कशी जीमिनीवर पकडापकडी खेळता तशी गावातली पोर झाडावर पकडापकडी खेळत्यात अन ज्याच्यावर राज्य आहे त्याने पकडलं तर बाद अन झाडावरून खाली उतरल तर बाद ” मालातीमावाशी एक्साइटेड होऊन सांगू लागल्या

“पण आर्या तूला कुठून कळला हा खेळ ” मनीषाने विचारलं

“अग काल नाहीका आम्ही त्या बिग ट्री पाशी गेलो होतो तिथेच ऐकलं ते एक सॉंग आहे कोणी तरी मोबाईल वर का टेप वर लावलं होतं,थांब आम्ही सिंग करून दाखवतो ” आर्या बोलली.

आर्या आणि ध्रुव ते गाणे म्हणू लागले

“वडाच्या झाडाला खेळ सूर-पारंब्याचा

वडाच्या झाडाला खेळ सूर-पारंब्याचा....”

“आर्या काही तरी उगाच सांगू नको कोणी टेपवर हे गाणं कसं लावेल सांग कुठून ऐकलंस ते ” मनीषा तिच्यावर रागावली

“मम्मा आय स्वेयर त्या ट्री पाशीच हे गाणं लागला होत आणि तिथे कोणीच न्हवत मग आवाज काय झाडातून येणार आहे मम्मा ? म्हणजेच कोणीतरी टेप किंवा मोबाईल वर प्ले केल होतं हे गाणं विचार धृवला ”

“हो मम्मा ” ध्रुव बोलला

“दोघांना मी punishment देईल मला खर खर सांगा ”मनीषा रागावली

“मनु अग काल गवत छाटायला खूप कामगार आले होते त्यांच्या मुलांसोबत हे थोडा वेळ खेळत होते त्यांच्याकडून ऐकलं असेल गाणं तू का एवढ मनावर घेतीयेस ” मनीषाला अरविंदने शांत केले.

पण ते ऐकून मालती मावशीची भीती आणखीनच वाढत चालली होती कारण आर्या आणि ध्रुव कधीच खोटं बोलत न्हवते.

“ताई मी आज गावात जाऊन थोडी भाजी अनु का ” मालती मावशीने विचारले

“कालच तर आणली होती आणि बाजार दोन दिवसा आड असतो इथे ” मनीषा बोलली

“असं होय, घरात बसून करमत न्हवत म्हणून म्हणल जरा फिरून येऊ माणसा सारखी मानस दिसली की बर वाटतं जरा ”

“मला माहितीये तुम्हाला कुठे जायचंय ते जा मावशी तुम्ही पण दुपारी लवकर या मी स्वयपाक बनून ठेवते ” थोडे नाराज होऊन मनीषा बोलली.

मालती मावशी घाईत निघून गेल्या

“मनु कुठे गेल्या त्या ” अरविंदने विचारले.

“त्यांना कालची पूर्ण स्टोरी ऐकायची असेल ना त्या मीनाच्या घरी गेल्यात ”मनीषाने अचूक ओळखले.

अरविंद साईट वर जाण्यासाठी तैय्यार झाला.पण खुर्चीवर जाऊन विचार करत शांत बसला.

“काय रे बरं नाही वाटत का ” तिने कपाळाला हात लाऊन ताप आहे का ते पहिले.

“खूप अस्वस्थं वाटतंय गं ” असे म्हणत त्याने तिला कंबरे भोवती मिठी मारली.

“राजा काय झालं, तू ठीक तर आहेस ना ” मनीषाने त्याचा चेहरा वर केला त्याचे डोळे पाणावले होते.

“आय लव्ह यु गाईज अलोट, मी तुमच्या शिवाय जगू नाही शकणार ” असे म्हणत त्याने ढसढसा रडायला सुरुवात केली.त्याच्या अशा वागण्याने मनीषा चक्रावून गेली.कालच्या गोष्टी डोक्यातून जात न्हवत्या त्यात अरविंदच अचाकन असं रडणं.

“अरे अचानक काय झालं, आपण आहोत ना सगळे सोबत ” मनीषा त्याला समजावत होती. बाबांला रडताना बघून मुलंपण त्याला बिलगली

“काही झालं तरी एवढ लक्षात ठेव माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे ” असे म्हणत अरविंद उठला आणि आणि साईट वर निघून गेला. मनीषा आता सुन्न झाली होती.

******