Prem ase hi - 5 in Marathi Love Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | प्रेम असे ही (भाग 5)

Featured Books
Categories
Share

प्रेम असे ही (भाग 5)

मागील भागावरून पुढे.....


करण आणी आरती दोघात आता चांगलेच जमू लागले. दोघे आता अगदी मोकळ्या मनाने एकमेकांशी गप्पा मारायचे... कधी काही स्पेशल काही बनवायचे असेल तर ती सुट्टीत त्याच्या घरी जायची.. अगदी बिनधास्त... मग दोघे मिळून खूप मज्जा करायचे.. एकमेकांना मदत करत जेवण बनवणे असो , की एखादा पिक्चर बघणे असो...
आता ती त्या घरात पण चांगलीच रुळली होती.. आधी त्याच्या घरात खूप अजागळता होती... तो कपडे कुठे पण फेकत असे... कोणतीही वस्तू जागेवर नसे....पहिल्याच वेळी तिच्या ते लक्षात आले होते पण तेव्हा तो आजारी असल्याने त्याने घर आवरले नसेल असे तिला वाटले... पण नंतर तिच्या लक्षात आले की ही त्याची सवयच झाली आहे.. म्हणून मग जेव्हा पासून ती त्याच्या घरी जायला लागली तिने त्याला चांगलीच सवय लावली... सगळे सामान व्यवस्थित लावायचे... कपडे व्यवस्थित कबाटात लावून ठेवायचे... अगदी आपले स्वतःचे घर असल्या सारखे ती त्याला सगळे करायला लावी..

तिचे त्या घरात वावरणे... त्याच्या बरोबर ची जवळीक.. त्यामुळे करण पण आता आराध्याला विसरायला लागला... आणी शेवटी एक दिवस त्याने आपले प्रेम व्यक्त करायचे ठरवले...
रविवार होता... सकाळीच त्याने तिला फोन केला...

" काय करतेस...? "

" काही नाही... आता तु फोन केलास म्हणून तर उठली आहे... "

" आज तुला माझ्या कडे येणार आहेस ? "

" का रे? काही काम होते...? "

" काम असं नाही... पण तुझ्या बरोबर बोलायचे आहे... जमेल का तुला यायला प्लिज... "

" अरे प्लिज कशाला म्हणतोस येते मी..." तिने म्हंटले..

" बरं मी वाट बघतोय... बाय.. "

" बाय..." तिने मोबाईल ठेवला आणी विचार करायला लागली. असे काय महत्वाचे बोलायचे असेल त्याला... मागील काही दिवसापासून तो तिच्यात गुंतत चालला होता हे तिला कळलेच होते... आज नां उद्या तो आपल्याला विचारणार हे पण तिला माहित होते... पण अचानक एव्हड्या लवकर ती वेळ येईल असे तिला वाटले नव्हते..

तिने आपली तयारी केली.. आणी आईला सांगून ती बाहेर पडली... थोड्याच वेळात ती त्याच्या घरी पोचली...

" आलीस ये... " तो नेहमी प्रमाणे म्हणाला...

" काय एव्हडे बोलायचे होते... "

" तु आधी बस तर खरं... आज मी चिकन चा बेत केलाय.. आपण दोघे मिळून बनवूया... मग जेवण झाले की आपण बोलूया... चालेल..? "

" बरं... चल..." तिने आपली पर्स तशीच सोफ्यात फेकली आणी ओढणी खांद्यावरून घेऊन कमरेत बांधली. आणी दोघे जेवणाच्या तयारीला लागले... पुढच्या दीड एक तासात त्यांचे जेवण तयार झाले...

" एक रिक्वेस्ट आहे... "

" ह्म्म्म... "

" तुला तर माहीत आहे की , तु सोबत असताना मी पीत नाही... पण आज थोडी घ्यावी असे वाटतेय... जर तुझी काही हरकत नसेल तर... "

" बरं... पण एकदम जराशी..." ती विचार करत म्हणाली..

" थँक्स... " आणी त्याने शोकेस मधून एक उंची व्हिस्की ची बॉटल काढली. आणी ग्लासात एक लार्ज पेग भरला... त्यात आईस आणी थंड पाणी टाकून त्याने सावकाश एक एक सिप घेत प्यायला सुरवात केली..

त्याचा ग्लास खाली झाला आणी दोघे जेवायला बसले.. ती शांतपणे जेवत होती.. आणी तो मनात कसे बोलायचे ह्याची तयारी करत होता...

" आरती... मी आता जे बोलणार आहे ते शांतपणे ऐकून घे... तुला ते चुकीचे वाटत असेल किंव्हा पटत नसेल तरी आपल्या मैत्रीमध्ये त्याच्याने काही एक फरक पडता कामा नये...... तुला मंजूर आहे... "

" आणी समजा त्याच्याने आपल्या मैत्री फरक पडत असेल तर..." तिला साधारण कल्पना आली होती. की , तो काय विचारणार आहे. त्याचे स्वप्नाळू डोळे , मनाची होत असलेली चिलबिल....बोलण्याचा धीर आणण्या साठी घेतलेली व्हिस्की.... जी गोष्ट तिला नको होती तीच आता घडत होती. तिला माहित होते की , आपला भूतकाळ ऐकल्यावर प्रेम तर सोडा तो आपल्या बरोबर मैत्री तरी ठेवेल ?.... ती त्याच्या मैत्रीत खूप खुश होती. त्याच्या रूपांनी तिला एक चांगला जिवलग मित्र भेटला होता. ज्याच्यावर ती डोळे झाकून विश्वास ठेऊ शकत होती.. त्याच्या बरोबर कुठे ही , कधीही फिरू शकत होती. तिला पण तो आवडत होता पण जे घडले आहे ते बदलता येणार नव्हते... आता त्याने विचारल्यावर त्याला उत्तर देणे भाग होते.. अर्थात मग त्याचे कारण पण सांगणे आले... आणी हेच तिला नको होते...

" तर मग राहूदे..... मी विचारतच नाही.... " तो ठामपणे म्हणाला...

" बघ.. करण... " ती त्याच्या जवळ सरकली... ती नेहमी त्याच्या बरोबर एक सेफ डिस्टंस ठेऊन राहायची पण आज ती अगदी त्याच्या जवळ येऊन बसली होती.

" मला अंदाज आहे की , तु काय विचारणार आहेस..."

" खरंच...? " त्याचे डोळे चमकले..

" हो..... पण नको विचारूस.... "

" का ? " त्याने पुढे विचारले आणी तिने एक मोठा निश्वास सोडला..

" तुझा एकदा प्रेमभंग झालाय... पुन्हा एकदा नकार पचवू शकशील ? " ती अतिशय शांत आवाजात म्हणाली..

" हरकत नाही.... तुझ्या मनात कोणी दुसरे असेल तर.." तो हताश आवाजात म्हणाला.

" तसें नाही... करण... माझा भूतकाळ तुला माहीत नाही...आणी मी तो कधी तुला सांगितला नाही. मला भीती वाटत होती तो ऐकल्यावर तु माझ्या पासून लांब जाशील.. खूप दिवसांनी मला एक चांगला मित्र मिळाला होता. त्याला गमावण्याची माझी तयारी नव्हती.. "

" बघ तुझा भूतकाळ काहीही असुदे...मला त्याचा काहीही फरक पडत नाही... "

" हे बोलणे खूप सोपे आहे. पण प्रत्यक्षात..." ती शांत झाली. तो पण गप्प बसला... काही वेळ दोघे ही निशब्द बसून राहिले...

" ठीक आहे आरती , मला तुझा मित्र समजतेस नां ? "

" हो त्यात कोणतीच शंका नाही.... "

" मग मला सांग की , काय घडले आहे... तुझे पण मन हलके होईल आणी जर मी त्यात तुला काही मदत करू शकलो तर मला आनंद होईल... "

" तु मला काहीही मदत करू शकत नाहीस... "

" बरं ठीक आहे... किमान आपल्या मनाची घुसमट तरी बाहेर काढ... मी त्याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही.... आय प्रॉमिस... " तो अगदी गळ्याला हात लावून शपथ घेत म्हणाला.... तिने त्याच्या डोळयांत खोल पाहिले.त्याच्या डोळ्यात तिला सच्चाई दिसत होती..

" करण , आम्ही पाहिले नगर जिल्ह्यात एका छोट्या खेडेगावात राहत होतो..." तिने शेवटी बोलायला सुरवात केली...

" ह्म्म्म.. "तो आता कान देऊन ऐकत होता..

" मी कॉलेज ला असताना माझ्या बरोबरच्या माझ्या दोन मित्रानी माझ्यावर बलात्कार केला होता...तीन वर्ष त्याची केस चालू होती शेवटी त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली आणी लोकांच्या नजरा आणी टोमणे ऐकून बेजार झालेले आम्ही तिघे शेवटी ते गाव सोडून मुंबईत आलो. "
ती क्षणभर थांबली..

" सुरवातीला मी तुझ्यावर चिडायची त्याचे कारण पण तेच होते.. माझा तेव्हा कोणावर विश्वासच राहिला नव्हता.. पण तु हळूहळू माझ्या जवळ येत गेलास.. तुझी निखळ मैत्री मनाला भावत गेली...कधीही तु मैत्रीचा गैरफायदा घेतला नाहीस.. तुझ्या बरोबर मला सगळ्यात सुरक्षित वाटते.. एव्हडे सगळे होऊन ही मी अगदी बिनदिक्कत तुझ्या घरी येते... कितीतरी वेळ इथे तुझ्या बरोबर घालवते.. हे फक्त आपल्या मैत्रीवर विश्वास आहे म्हणून... तुला हे सगळे सांगायचे होते रे... पण.. पण मला भीती वाटत होती रे... की, हे सगळे ऐकल्यावर तु जर माझ्या पासून लांब गेलास तर...? खूप मुश्किल ने मी लोकात वावरायला लागली होती , कोणत्या मुलावर विश्वास ठेवायला लागली होती , तुझा मला खूप आधार वाटत होता.. म्हणून कितीतरी वेळा मनात येऊन पण मी गप्प बसली... " आरतीचे डोळे आता पाण्यानी भरले होते.. त्या डबडबलेल्या डोळ्यांनी तिला करण कडे बघणे शक्य नव्हते.. ती मान खाली घालून हुंदके देत होती...

" आरती.... आरती... रडू नकोस... जे झाले त्यात तुझा काही दोष नव्हता... आणी त्यांना त्यांच्या अपराधाची शिक्षा पण मिळाली आहे... प्लिज तु रडू नकोस.. "
त्याने तिचे डोळे पुसले...

" जा... चेहरा धुवून ये... तुला जरा बरं वाटेल... " त्याने तिला सुचवले..आणी ती उठून गेल्यावर तो विचार करत बसला.. तिचे म्हणणे खरं होते... तिच्या बाबतीत घडलेला प्रकार खुप वाईट होता. अश्या मुलींचे भविष्य खुप खडतर असते... त्यांच्या कडे बघण्याची समाजाची मानसिकता अजून बदलली नव्हती... अश्या मुलींना धीर देऊन समाजात परत उभे करण्या ऐवजी त्या संधीचा फायदा घेण्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते... तीला पण एक मन आहे. अगोदर झालेल्या प्रकाराने ते खूप व्यथित झाले आहे ह्याचा काहीही विचार न करता सगळे लांडग्या सारखे मिळेल त्या संधीच्या शोधात असतात... करण आपल्याच विचारत एकदम हरवला होता. ती कधी येऊन बाजूला बसली त्याला ही कळले नाही...

" कसला विचार करतोस ? तुला जर माझ्या बरोबर मैत्री करण्यात लाज वाटत असेल तर.... मी समजू शकते..." ती उपरोधक म्हणाली..

" अहं... काय...? " त्याने विचारले.. त्याचे डोळे रागानं लाल झाले.. त्याने साट्कन एक तिच्या कानाखाली आवाज काढला...

" पुन्हा कधीही अशी बोलू नकोस...एव्हडेच ओळखलस मला..? " त्याचा हात जरा जोरातच पडला होता.. ती अचानक त्याच्या ह्या कृत्याने दचकली.. आज पर्यंत कधीही आईबाबानी ही तिला कधी हात लावला नव्हता आणी ह्याने तर चक्क कानाखाली ओढली होती.. तीचे डोळे पुन्हा पाण्याने भरले... आता मात्र करण स्वतःला रोखू शकला नाही.. त्याने पुढे होत तिला आपल्या मिठीत घेतले....

" मला माफ कर... सॉरी यार... तु म्हणालीसच तसें.. मला राग आवरता आला नाही..." तो सावकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.. आज त्याच्या मिठीत असून पण तिला कोणतीही भीती वाटत नव्हती.. उलट त्याच्या मिठीत एकदम सुरक्षित..आपलेपणा वाटत होता... ती त्याच्या मिठीत तशीच राहिली..

" बघू... जोरात लागले का ?" त्याने तिचा गाल पाहिला..
खरोखर अस्पष्ट का असेना पण तिच्या गोऱ्या गालावर त्याच्या बोटाची नक्षी उठली होती..

" थांब मी थोडा बर्फ चोळतो... नाहीतर उद्या पर्यंत काळे पडेल..." त्याने बर्फ आणला.. आणी हलक्या हातानी तिच्या गालावर चोळत राहिला.. हळूहळू तिचा गालावरील बोटाचे ठसे निघून गेले...

" आता बरं वाटतेय नां..? "

" ह्म्म्म... "

" सॉरी.. मगाशी मला खूप राग आला.. "

" असुदे... पण मला आता कळले नां तु माझी साथ कधीही सोडणार नाहीस... नाहीतर तुला एव्हडा राग आला असता? "

" आरती.... "

" ह्म्म्म.. "

" माझ्याशी लग्न करशील ? " अचानक त्याने विचारले...

" काय..? " ती दचकली.. एव्हडे सगळे सांगून झाल्यावर पण तो आता विचारत होता...

" हो.... माझ्याशी लग्न करशील ? तु सगळे लपवून ठेऊ शकत होतीस पण तु तसें केले नाहीस.. सगळे सांगितलेस.. जे झाले त्यात तुझा काही दोष नाही... तु चांगली आहेस , चांगले जेवण बनवतेस मग मला तरी अशी चांगली मुलगी कुठे भेटेल...?" ती विचारत पडली..
खरंतर हे सगळे सांगितल्यावर तो आपल्या पासून लांब जाईल की काय असे तिला वाटले होते... पण तो तर सरळ तिला आयुष्यभरासाठी आपली जोडीदार म्हणून निवडयाण्या प्रयन्त गेला...

" आणी बाबाचे काय? "

" त्यांचे काय ? त्यांच्या मुलीचे लग्न एका चांगल्या मुलाबरोबर , सगळे माहित असून पण होतेय एव्हडे पुरेसे नाही का ? "

" मी माझ्या नाही तुझ्या बाबांन बद्दल बोलतेय.. बुद्धू..." तिने एक टपली त्याच्या डोक्यात मारली..

" आच्छा.... अग त्यांना ह्यातले काही सांगायचे नाही.. लग्नाला ते काही आडकाठी घालणार नाहीत मला खात्री आहे.. "

" नको.... नको.... त्यांना सगळे सांगूनच टाक.. भले पुढे त्याचे परिणाम काहीही होवो... "

" अग पण.... हे सगळे ऐकल्यावर ते लग्नाला परवानगी देतील...? "

" म्हणूनच म्हणतेय की , काहीही लपवून ठेवायचे नाही.. समज , मी ही गोष्ट लपवूंन ठेवली असती आणी कधी लग्ना नंतर तुला माहित पडले असते तर तुला कसे वाटले असते... तसेंच त्यांच्या बद्दल पण विचार कर नां... "

" ह्म्म्म... बरं... त्यांना विचारायला मला काही वेळ लागेल..चांगली संधी बघून त्यांना विचारावे लागेल.. "

" चालेल नां अपल्याला कुठे घाई आहे.... सावकाश विचार पण त्यांना हे कळलेच पाहिजे... त्याच्या घरात येणाऱ्या सुनेचा भूतकाळ त्यांना माहित असणे गरजेचं आहे..." ती म्हणाली..

" बरं... आता मी निघू.....?" तिने पुढे विचारले..

" एव्हडया लवकर..?" त्याने आश्चर्याने विचारले...

" चार तास होऊन गेलेत. मी इथे आहे..." तिने हसून म्हंटले.

" काय बोलतेस ?..... थोडा वेळ थांब अजून.. आता परत उद्या पासून तुझ्याशी जास्त बोलता येणार नाही... प्लिज..." तो तिला विनंती करत म्हणाला.. आता त्याचा आग्रह काही तिला मोडवेना...

" बरं ठीक आहे... बसते अजून थोडा वेळ... " ती पुन्हा त्याच्या बाजूला बसली.
" माझ्यात असे काय बघितलेस की माज्या बरोबर लग्न करायला निघालास..." तिने शांतपणे विचारले...

" ह्म्म्म..." तो ही तितक्याच शांतपणे तिला पाहत बसला... त्यामुळे ती काहीशी लाजली आणी त्याच्या उत्तरांची प्रतीक्षा करत राहिली... बराच वेळ गेला पण तो काहीच बोलला नाही..

" बोल नां ? काय पाहिलेस माझ्यात... "

" अग... थांब जरा... एक तरी चांगली गोष्ट सापडू देत... मग सांगतो..." तो हळूच म्हणाला...

" काय...?" तीने चिडून त्याचे कुरळे केस पकडले.. आणी गदगदा त्यांना हलवत...
" पुन्हा एकदा बोल..." ती रागानी म्हणाली...

" अग.. केस सोड. मी मस्करी करत होतो... तुझ्यात न आवडण्या सारखे काय आहे ते पाहत होतो... "

" मग..? " तिने त्याचे केस सोडले.. आणी त्याने हुश्श केले..

" तु वर पासून खाल पर्यंत सगळी... अख्खीच्या अख्खी आवडतेस... तुझा स्वभाव , प्रामाणिकपणा , प्रेम सगळेच एकदम वेगळे आहे... "

" खरंच.... ! "

" हो...माझ्या आईची शपथ..." तो अगदी प्रामाणिक पणे म्हणाला आणी तिच्या डोळ्यात पाणी तरळले...

" आता परत रडायला सुरवात करू नकोस.." त्याने म्हणत तिला आपल्या मिठीत घेतले.. आणी आता ती ही आवेगाने त्याच्या मिठीत शिरली... आज तिला तिच्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करणारा सापडला होता... त्याचा हात तिच्या पाठीवरून अगदी प्रेमाने फिरत होता. काय नव्हते त्या स्पर्शात?
प्रेम , समर्पण ,आपलेपणा सगळे काही त्यात होते....

पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे...