Ti Ek Shaapita - 20 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 20

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

ती एक शापिता! - 20

ती एक शापिता!

(२०)

दोन-तीन दिवसांनी अशोकला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तो घरी आला. घरातील वातावरण बरेच तंग होते. माधवीने घर सोडायची पुन्हा चर्चा केली नाही. त्या सायंकाळी अशोक बैठकीतल्या पलंगावर डोळे लावून पडला होता. समोरच्या सोफ्यावर सुबोधही चिंताग्रस्त चेहऱ्याने बसला होता. अशोकच्या चेहऱ्याकडे सुबोधचे लक्ष गेले. त्याच्या मनात विचार आला,

'अशोकचे असे का झाले? देवाने माझ्यासारख्या अर्धवट पुरुषाला संतती दिली तीही तशीच अर्धवट! मुलगी दिली तीही तशीच वासनांकित! परजातीच्या मुलासोबत पळून गेली. तो घाव अशोककडे बघत सहन केला परंतु भविष्यात हे ताट वाढून ठेवलेय हे माहिती असते तर? मी त्याला समजून घ्यायला कमी पडलो. मी माझ्याच विवंचनेत राहिलो. तो तारुण्यात येत असताना, महत्त्वाचे म्हणजे तो लग्नाला ठामपणे नकार देत असताना मी त्याच्याशी चर्चा करायला हवी होती. संकोच आडवा येईल म्हणून मी पीयूषच्या मदतीने त्याचे मत जाणून घ्यायला हवे होते. लग्न करण्यासाठी खरे तर अशोकवर सक्ती झाली. कदाचित त्याचे अपूर्णत्व त्याला अगोदरच समजले असावे म्हणूनच तो लग्नाला नकार देत असावा. परंतु त्याचे न ऐकता, न समजून घेता मीच त्याला लग्न करायला भाग पाडले. त्याचे जीवन मीच उद्ध्वस्त केले. त्यापूर्वी सुहासिनीच्या जीवनात अशीच परिस्थिती आली होती परंतु मला एक मानसिक समाधान तरी आहे की, काही काळासाठी तिला निलेशकडून ते सुख मी मिळवून दिले. काय वाटले असावे त्यावेळी सुहासिनीला? नक्कीच तिचे समाधान झाले असावे. त्या काळात तिने निलेशकडून भरपूर सुख मिळविले म्हणूनच पुन्हा तिला त्या 'पूर्ण' सुखाची गरज भासली नाही. त्या कालावधीत आशा तिच्या पोटात असताना तिने निलेशकडून ते सुख भरभरून मिळवले आणि कदाचित तेच धडे आशाला तिच्या पोटात असताना मिळाले म्हणूनच तारुण्यात आशाची पावले वाकडी पडली. तिने लग्नापूर्वीच अमरसोबत नको ते संबंध जोडले, ओलांडू नये ती पायरी ओलांडली. परंतु..." तशा विचारात गुरफटलेल्या सुबोधला अचानक ते ऑडिट प्रकरणही आठवले...

तपासणीसाठी आलेल्या त्या अधिकाऱ्याने दबाव टाकला. भ्रष्टाचार प्रकरण उघड करून तुला खडी फोडायला तुरुंगात पाठवतो अशी धमकी दिल्यानंतर त्याच्या इच्छापूर्तीसाठी बायकोला अर्थात सुहासिनीला हॉटेलमध्ये घेऊन येतो असे वचन सुबोधने त्या अधिकाऱ्यास दिले. परंतु खरा, मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा टाकला तो म्हणजे सुहासिनीला त्याबाबत सांगावे कसे? काही दिवसांपूर्वी निलेशसोबत तसे संबंध तिने ठेवावेत अशी केवळ प्रस्तावना त्याने तिच्यासमोर केली होती. तिला त्या प्रस्तावावर विचार करायला अवधी मिळालाच नव्हता कारण लगेच ऑडिट होणार ही बातमी आली आणि सारे जण त्या तयारीला लागले आणि आता अचानक तिला हे कसे सांगावे की, ऑडिट प्रकरण माझ्यावर शेकू नये म्हणून तू तपासणी अधिकाऱ्याला खुश कर म्हणून! ती ही गोष्ट मान्यच कशी करेल? मग काय करु? साहेबांना तर ...साहेबांची इच्छा पूर्ती नाही झाली तर ते मला तुरुंगात पाठवतील... या विचारात असणारा सुबोध निलेशसमोर जाऊन उभा राहिला. त्याला सारी परिस्थिती समजावून सांगितली. तसा निलेशने एक उपाय सांगितला अर्थात तो उपाय पत्करणे हा धोका होताच परंतु तो स्वीकारणे आवश्यक होता...

हॉटेलच्या प्रतिक्षालयात वाट पाहत बसलेल्या सुबोधजवळ ती तरुणी पोहोचली. तिला पाहताच सुबोधने अगतिकतेने विचारले,

"काय झाले? त्यांना काही शंका आली का?"

"बिलकुल नाही. तुमची पत्नी असल्याचं नाटक इतकं हुबेहूब वठवलं ना की, त्याला आताच काय पण पुढेही समजणार नाही...."

"चहा..." असे म्हणत माधवीने हातातली कपबशी सुबोधच्यासमोर ठेवली आणि ती पलंगावर अशोकच्या शेजारी बसली. चहा पित असताना सुबोधचे लक्ष माधवीच्या चेहऱ्यावर गेले आणि त्याला वाटले,

'हसण्या-खेळण्याच्या वयात या मुलीच्या चेहऱ्यावर अशी उदासीनता? काय चुकले हिचे? कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या मारण्याचे वय असताना भरारी घेऊ पाहणारे पंख हवेतच कापल्या जावेत अशीच तडफड हिच्या नशिबी आली आहे. अशोकची अवस्था काय असेल? त्याने माझ्या सारखा विचार केला तर? पण तो तसा विचार का करेल? स्वतःच्या पत्नीला दुसऱ्याच्या मिठीत पाहण्याचे धाडस तो करेल? माझा 'तसा' वारसा तो पुढे चालवेल? त्याला तसे सुचवावे का? तो ऐकेल? त्याला पटेल? त्याला रुचेल? स्वतःची बायको इतर कुणाच्या तरी मिठीत हा विचार त्याच्यासारख्या रक्तदाबाच्या व्यक्तीला आवडेल? सहन होईल त्याला? तसा विचार ऐकून त्याला अटॅक आला आणि त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर? नाही. नाही. तो झटका मी नाही सहन करू शकणार? अशोकचा अंत मी नाही पाहू शकणार. परंतु माधवीचे काय? तिच्या सुखाचे काय? तिला का भावना नाहीत? तिला का तो हक्क नाही? ती सुहासिनीसारखी तडफडत राहील काय? माधवी सुहापेक्षा आक्रमक आहे. तिने तसा विचार केलेला दिसतोय. त्यादिवशी माधवी किती आक्रमकपणे बोलत होती. तिला कुणाची तरी निश्चितच साथ आहे. त्यामुळेच ती घर सोडायला निघाली होती...' तो विचारात असताना पीयूषचा आवाज आला आणि तो वास्तवात परतला...

दुपारची वेळ होती. सुबोध-सुहासिनी कार्यालयात गेले होते. अशोक त्या आजारापासून रजेवर होता. जेवणे झाली. अशोक पलंगावर आराम करत असताना माधवी आतल्या खोलीत होती. दवाखान्यातून घरी आल्यानंतर अशोक हळूहळू सुधारत होता. परंतु तरीही त्याला जपणे आवश्यक होते. किमान कार्यालयातल्या कामाचा ताण पडू नये म्हणून अशोक रजेवरच होता...

"अशोक, अशोक..." बाहेरून पीयूषचा आवाज आला आणि अशोकने मुद्दाम डोळे मिटले, झोपल्याचे सोंग घेतल्याप्रमाणे! पीयूष घरात शिरला. बैठकीत अशोककडे पाहत थोडा रेंगाळला. काही क्षणातच 'हा तर झोपलाय' असे पुटपुटत माधवीच्या खोलीत गेल्याचे पाहून अशोकने डोळे उघडले. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू होते.. समाधानाचे!

तिकडे पीयूष माधवीच्या खोलीत शिरला आणि पलंगावर लक्ष जाताच जागेवरच खिळून उभा राहिला. माधवी खोलीत लोळत होती. हातात वर्तमानपत्र होते. कुणी येणार नाही हा विश्वास असल्यामुळे अस्ताव्यस्त लोळत असल्यामुळे कपड्यांचे भान नव्हते. ते आसमानी, दिलखेच सौंदर्य पाहताच पीयूष भान हरपला. डोळे विस्फारुन तो त्या सौंदर्याला ह्रदयात साठवून घेत होता. पापणीसुद्धा हलत नव्हती. काही क्षणातच माधवीला त्याच्या उपस्थितीची जाणीव झाली. पीयूष आपल्या शरीराकडे पाहतोय हे लक्षात येताच ती गोंधळली. गडबडीने उठत बसत तिने विचारले,

"त..त.. तू?"

"अं...अं... होय. अशोकला झोप लागलीय म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलावे. आपल्याला काय कुणाशीही बोलायचे नि टाईमपास करायचा.." शेवटच्या दोन शब्दांवर भर देत पीयूष म्हणाला. त्या शब्दातील आणि पीयूषच्या डोळ्यातील भाव ओळखूनही माधवी म्हणाली,

"ये. बस ना." पडत्या फळाची आज्ञा घेतल्याप्रमाणे पीयूष पलंगाजवळच्या खुर्चीवर बसला.

"गुंग होऊन वाचण्यासारखे काय आहे वर्तमानपत्रात?" पीयूषने विचारले.

"स्त्रीमुक्तीवर एक सुंदर लेख आहे. थोडा प्रवाहाच्या विरोधात आहे."

"म्हणजे असे काय लिहिले आहे?"

"लग्नानंतर म्हणे बायकांनी कोणतेही सौभाग्याचे लेणे लेवू नये. कुंकू लावू नये, मंगळसूत्र घालू नये. याच गोष्टी म्हणजे कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र पुरुषांनीही वापरावे किंवा मग स्त्रियांना ऐच्छिक असावे."

"या गोष्टी तर तिच्या वैवाहिक जीवनात..."

"नाही. काही महत्त्वाच्या नाहीत. वैवाहिक जीवनात स्त्रीने एकच गोष्ट नाइलाजाने का होईना पण स्वीकारावी.."

"ती कोणती?" पीयूषने विचारले.

"वंशवृद्धी! महत्त्वाचे म्हणजे स्त्री जन्मल्यापासून कुणाच्या ना कुणाच्या धाकात म्हणा, दबावात राहते. तिला समजायला लागल्यापासून ती पित्याच्या आज्ञेत म्हणा किंवा त्याच्या कलानुसार वागते. ती वयात आली की, मग तर बंधनं विचारूच नका. तिच्यासाठी नवरा मुलगा शोधण्याचे अधिकारही पित्यालाच! पूर्वीच्या काळी तर बाप म्हणेल त्याच्या गळ्यात माळ घालून आजीवन संसार थाटावा लागे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या जाळ्यात स्त्री एवढी गरगरतेय ना की, ती स्वतःचा हक्क, अधिकारही गमावून बसलेय की काय अशी शंका यावी. आजही पतीची परवानगी असेल तरच तिला गर्भपात करता येतो अन्यथा नाही. दुसरीकडे मुलीचा गर्भ असताना तिची इच्छा नसली तरीही तिचा गर्भपात करण्यात येतो. नसबंदीचेही तसेच. वास्तविक पाहता पुरुष नसबंदी किती सोपी आणि सरळ पण तरीही पुरूषांचे प्रमाण नगण्य! आपण मारे नुसता स्त्रीमुक्तीचा ढोल बडवत राहतो पण वास्तव काय आहे? थोडाफार फरक पडला असेल पण त्यामुळे कुणी हुरळून जाऊ नये. तुला स्त्रीमुक्तीचे वास्तव अजून एक वास्तव सांगू का?"

"अजून कोणते वास्तव?"

"लैंगिक मुक्तीचे! आज काय वातावरण आहे, जे पुरुष घरी.. बायकोपासून समाधानी असोत किंवा नसोत पण अनेक पुरुष स्वतःची व्यवस्था बाहेर करतात. मग स्त्रीला अशी परवानगी का नको? भलेही स्वैराचार नसावा पण ज्या स्त्रिया घरी नवऱ्यापासून असंतुष्ट आहेत, असमाधानी आहेत त्या स्त्रियांना स्वतःची लैंगिक भूक इतरत्र भागवून घ्यायची परवानगी का नसावी?" माधवीचा तो बेधडक प्रश्न ऐकून पीयूष चक्रावून गेला.

"माधवी, तुझे विचार पटत असले तरीही एक प्रश्न पडतो, मीतासारख्या स्त्रिया या समाजात आहेत. त्यांचे काय? येतो मी.." असे म्हणत पीयूष बाहेर पडला. तो गेला त्या दिशेने अशोकने समाधानाने पाहिले...

******