ti ek ratr in Marathi Short Stories by Vrushali books and stories PDF | ती एक रात्र

Featured Books
  • ऋषि की शक्ति

    ऋषि की शक्ति एक बार एक ऋषि जंगल में रहते थे। वह बहुत शक्तिशा...

  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

Categories
Share

ती एक रात्र

ती एक रात्र

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या स्पर्शाने ती फुलून जाताना अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला "आहह..... उहह..." तिने ते सुख साठवून घेण्यासाठी अलगद आपले डोळे मिटले. तिच्या मिटलेल्या डोळ्यासमोरून काही वेळा आधीचा प्रवास तरळू लागला.

तिने वैतागून घड्याळात पाहिलं. एव्हाना ७.३० वाजून गेलेले. आज तिला लवकर घरी जायचं होत पण मंदगतीने चालणाऱ्या ट्रेनमुळे उशिरच होणार हे पक्क. डब्ब्यातील बायकांची असह्य बडबड आणि गरमीमुळे तिचा जीव अगदी त्रासून गेला होता. पंख्याच्या जोराने कपाळावर जबरदस्ती कब्जा करू पाहणाऱ्या केसांना दूर करून ती कंटाळली आणि तशीच वैतागलेल्या अवस्थेत आपल्या स्टेशन वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

अजुन तब्बल अर्धा तास खाल्ल्यानंतर तिचे स्टेशन आले. रोजचीच धक्काबुक्की करत आणि साडी सावरत ती कशीबशी त्या गर्दीतून उतरली..... त्याला साडीच का आवडते..? नेहमी त्याच्यामुळेच साडी नेसावी लागते आणि मग प्रवासात ही अशी तारांबळ उडते... नाही नेसली तर..." विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. " मला तर बाई अजिबात नाही आवडत हे साडी प्रकरण... मनातल्या मनात तिने त्याच्यावर चरफडून घेतल.

आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. या तस तिला ह्या दिवसाचं काही सुख दुःख नव्हतं. पण तिच्या आडमुठ्या आणि विचित्र स्वभावाच्या नवऱ्यासोबत तिला तो जबरदस्ती साजरा करावा लागणार होता ह्याचच तिला टेन्शन होत. रोजप्रमाणे आजही त्याच्या सगळ्याच विकृत मागण्यांना तिला बळी पडायचं होत. त्या नुसत्या विचारांनीच तिला शिसारी आली.

विक्षिप्त स्वभावाच्या माणसाला कोणी मुलगी देत नसेल म्हणूनच की काय त्याने गावाकडच्या ' साध्याभोळ्या ' तिच्याशी लग्न केलं. मुंबईचं स्थळ ते ही स्वतःहून चालत आलंय म्हटल्यावर घरच्यांनीही आढेवेढे न घेता हो बोलून जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली. खरतर तिला ह्या मुलाशी लग्न करायचं नव्हतच. तसही तिच्या मतांना फारशी किंमत नसल्यामुळे नाईलाजाने तिला लग्नाच्या बोहल्यावर चढाव लागलं आणि नंतर मात्र घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे तीच आयुष्य गोल फिरू लागलं. रोज सकाळी उठून सगळं आवरून, नवऱ्याच्या विक्षिप्तपणाला पुरून उरून ऑफिसला जायचं. नोकरी ही केवळ बहाणा होता नवऱ्यापासून, त्या घरापासून काही वेळ का होईना दूर राहायला मिळावं. नोकरीचे नऊ तास ती मनमुराद जगायची. पुन्हा संध्याकाळी घरी जाताना मात्र पावलं जड व्हायची. पुन्हा तेच घर, तोच विचित्र नवरा, त्यांना असह्य असा काही तरी विक्षिप्तपणा, त्याच तिच्या शरीरावर अधाश्यासारख तुटून पडण, जेवढा जोर असेल तेवढा तिच्यात ढकलून मोकळं होण ह्या सगळ्यांने ती प्रचंड वैतागायची. कितीवेळा घर सोडून जावस वाटायचं. ती प्रयत्न ही करायची पण तो नवरा मात्र तिला शोधून काढायचा. सरतेशेवटी आपल हेच प्राक्तन आहे हे तिने जबरदस्ती आपल्या मनावर ठसवलच. पळताही येत नाही आणि प्रतिकारही नाही अशी अवस्था होती तिची.

आज तर खूप उशीर झाला होता स्टेशनला पोचायला. नवऱ्याचा फोन यायच्या आत तिला पोचणं गरजेचं होतं. नाहीतर त्यानंतरची शिक्षा... निदान आज तरी नको. ती पळतच स्टेशनच्या बाहेर आली. पण आज तीच नशीबच खराब होत वाटत. आज नेमका काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे बाहेर एकही रिक्षा नव्हती. ती राहणाऱ्या भागात तर बस सर्व्हिस नव्हतीच. अर्थात चालत जाण हा एकमेव पर्याय होता. इतक्या रात्री एकटीने चालत जायचं ही तिच्या साध्यासुध्या विचारांच्या पलीकडील गोष्ट होती. नवऱ्याला फोन करून बोलवावं का....? मनाचा हिय्या करून तिने मोठ्या मुश्किलीने नवऱ्याला कॉल केला. पण त्याच प्रत्युत्तर म्हणून अर्वाच्य शिव्या आणि कसही करून अर्ध्या तासात घरी ये नाहीतर... अशी धमकीही मिळाली. आधी वैतागलेल्या तिच्या जीवाला नवऱ्याच्या धमकीने थरकाप सुटला. आपली मेल्याशिवाय काही सुटका नाही व्हायची ह्या साऱ्यातून.... डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूंना साधं पुसावस देखील वाटत नव्हतं. मनातल्या मनात देवाचं नाव घेत आणि खांद्यावरची पर्स व साडी सावरत ती कशीबशी चालू लागली. स्टेशनच्या दिव्यांचा प्रकाश काही फार वेळ तिची सोबत करणार नव्हता आणि पुढचा अंधुक रस्ता कसा पार करायचा म्हणून कोणी सोबती मिळेल का ह्या आशेने तिने थांबून उगाचच इकडे तिकडे पाहिलं. परंतु तिच्या भागात जाणार कोणी नव्हतं. आता एकटच जावं लागणार ह्या जाणिवेने तिने आपला पदर दोन्ही खांद्यावरून सावरून घेतला आणि झपाझप चालू लागली.

नाल्याबाजूच्या वळणावरून पुढे रस्त्यावर दिवेच नव्हते. आयुष्यच अंधारलय तिथे हा रस्त्यावरचा अंधार काय..? मनाशी पुटपुटत ती पुढे चालू लागली. दहा बारा पावलं चालली असेल की तोच मागून काहीतरी आवाज आला म्हणून तिने कान टवकारले. सारा परिसर निशब्द होता. घाबरतच तिने सभोवार नजर फिरवली. मिट्ट काळोखात तो परिसर बुडून गेला होता. वळणावळणाचा एखाद्या नखरेल ललनेसारखा तो रस्ता आपल्या घाटदार अंगावर अंधाराची चादर पांघरून कोणाचीतरी वाट बघत असल्यासारखा पहुडला होता. भोवतीच्या झाडांच्या सावल्याही त्याने स्वतःत सामावून घेतल्या होत्या. बाजूचा नाला अंधाराला गिळून आपल काळशार पाणी मिरवत होता. इतक्या मिट्ट काळोखात आपण चालतोय ह्याच तिला स्वतःलाच आश्चर्य वाटल. नवऱ्याच्या फोनची आठवण आली आणि ती स्वतःशीच हसली. इतका भयानक नवरा असताना अजुन कशाची भीती वाटेल...??... पण तो आवाज.... जाऊदे.... मनाचे खेळ....

काही पावलं चालल्यावर पुन्हा तोच आवाज. आता मात्र तिच्या पोटात मोठाला गोळा आला. त्या भयाण अंधारातही तिचा चेहरा दिसून येईल इतका तो पांढराफटक पडला. कितीही नकोसा असला तरीही जीवावर काही आल की माणूस घाबरतोच. खरतर अश्या वेळी मागे वळून बघायचं नसत पण.... मनाची भीती घालवायला खात्री तर करावी लागणार ना.. अजुन बरच अंतर पार करायचं होत. तिने सावकाश मान वळवली. कपाळावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले. मागे फिरेपर्यंत काहीतरी जाणवलं. भीतीची एक लहर नकळत तिच्या अंगातून शहारून गेली. तिचे डोळे भीतीने विस्फारले. मानेवरच्या नसा ताठरल्या. घामाचा एक ओघळ तिच्या मानेवरून छातीवर पसरत गेला.

ती आता मागे वळली. मागे कोणीच नव्हतं पण का कोण जाणे कोणाचं तरी अस्तित्व जाणवत होत. घाबरून ती पळत सुटली. त्या मिट्ट काळोखात अस सैरावरा धावण म्हणजे एक दिव्यच होत. एका हातात बॅग आणि पायात गोंधळनारी साडी सगळच सावरत पळताना साडीच्या निऱ्यांमध्ये अडकून तोल गेला. धाडदिशी जमिनीवर आदळणार इतक्यात कोणीतरी तिला सावरल्यासारख जाणवलं. ह्या क्षणी तिला तो अदृश्य स्पर्श जास्त आश्वासक वाटला. तिच्याही नकळत तिला ती सेफ समजत होती. स्वतःला सावरून भारावल्यासारखी ती शांतपणे चालत घरी निघाली.

घरी नवरा तिला शिव्या घालायच्या तयारीतच होता. पण रोज भित्र्या सश्यागत येणारी त्याची बायको आज एक निर्विकार हास्य घेऊन मजेत चालत येताना पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. जन्मोजन्मीचा तिचा शत्रू असल्यासारखा तीच हास्य त्याला हैराण करायचं. तिने घरात पाऊल टाकताच क्षणी तिच्यावर शिव्याची लाखोली वाहिली. तरीही तिला स्तब्ध बघून त्याच्या डोळ्यात रक्त उतरले. कपाळावरच्या शिरा फुगल्या. त्याने जोराने मानेला हिसका दिला. कोपऱ्यातील काठी घेऊन तिला खेचून जमिनीवर ढकलले. तरीही तिची काहीच हालचाल नाही. एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती पडून राहिली. आता त्याला राग आवरेनासा झाला. शक्य तितका जोर लावून त्याने त्या काठीचा रट्टा तिच्या पाठीवर मारला. तरीही ती तसूभरही हलली नाही की विव्हळली नाही. त्याला चेव चढत गेला. तिच्या पाठी पोटावर मार पडत गेला. अंगावर वळ उठत होते. मात्र तोंडातून साधा हुंदकाही निघाला नव्हता. तिला रडताना बघून समाधान पावणाऱ्या त्याच्या अभिमानाला आज धक्का पोचला. त्याच्यातला विकृत पुरुषार्थ जागा होऊ लागला. तसा तो आधीपासूनच पाशवी आणि विकृत विचारांचा. त्यांच्यातल्या विकृतीला कंटाळून त्याचे आईवडिलसुद्धा त्याच्यापासून दूर राहायचे. त्याचे शेजारी आणि ऑफिसवाले त्याला वचकून असायचे. तिच्याशी लग्न झाल्यावरही तो काही बदलला नव्हता. उलट त्याचे विचार तिच्यावर लादायला सुरुवात केली. आधीच लाजरी बुजरी ती...अजुनच बावरून गेली. सतत त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करायची. परंतु त्याच अस भीषण रूप तिने आजपर्यंत बघितल नव्हतं. आता ती अश्या काही गोष्टीला सामोरी जाणार होती ज्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. त्याच्यातील पशुला ती फक्त भक्ष्याच्या स्वरूपात दिसत होती. चवताळलेल्या वाघाने जशी भेदरलेल्या हरिणीवर झेप घ्यावी तसा तो तिच्यावर तुटून पडला. लग्न संस्थेच्या नावाखाली अजुन एक समाजमान्य बलात्कार होत होता. ना ती प्रतिकार करत होती ना समर्पण.....

बऱ्याच काळानंतर शिकार सापडल्यावर असावा असा आसुरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिच्या अंगावरची साडी खेचून तिला विवस्त्र केलं. तिच्या उघड्या शरीराने लचके तोडवेत तसा तिच्यावर तुटून पडला. तिच्या स्त्रित्वात हळूहळू सुखाचा परमोच्च आनंद उपभोगायचा असतो ते सोडून जबरस्तीने आपल पौरुषत्व तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यासाठी सरसावणारा तोच अचानक.... अचानक त्याचा वेग मंदावला. त्याने आपली नख तिच्या हातावर रूतवून आधार घेत पुन्हा प्रयत्न करू लागला. पण त्याच शरीर त्याला साथ देईना. आपल्याला नक्की काय होतंय हे न समजून तो घाबरला. त्याची उघडी छाती जी त्याच्या पुरुष असण्याच्या अभिमानाने फुगली होती ती भीतीने धपापू लागली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खुलला होता. तिच्या अनपेक्षित प्रतिक्रियेला तो संतापला. रागाने त्याने आपल्या मुठी घट्ट आवळायचा प्रयत्न केला. पण एखादा मंत्र फुंकून जागीच बंधिस्थ करून ठेवावं तस तो एकाच स्थितीत जखडून ठेवला गेला होता. तिने अंगावरील चादर उचलून बाजूला फेकावी तसा त्याला तिरस्काराने अंगावरून ढकलला. तिला ह्याक्षणी प्रतिकार करावा ह्याचा विचारदेखील त्याच्या मनात आला नाही. आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी स्त्री कडून त्याला अशी वागणूक मिळत होती आणि त्या धक्क्याने त्याची मती बधीर होऊन गेली.

त्याला ढकलून तिने आपली विस्कटलेली साडी नीट केली. चुरगळलेल्या निऱ्याना चापून चोपून नीट बसवलं. तिच्या चेहऱ्यावर एक कसलस अनोखं तेज पसरलं होत. तो मात्र भ्रमित असल्यासारखा तिच्याकडे बघतच राहिला. खरतर त्याला बऱ्याच शिव्या द्यायच्या होत्या परंतु त्याच तोंड जबरदस्तीने शिवल्यासारख बंद होत. ती सावकाश चालत पुढे गेली जणू तिथे कोणीतरी तिची वाट पाहत होत. त्या कोणाकडे तरी बघून तिने स्मित केलं आणि बऱ्याच काळानंतर स्वतंत्र झाल्याप्रमाणे त्याच्यात स्वतःला झोकून दिलं. तिचा नवरा तटस्थ उघड्या डोळ्यांनी जे चाललंय ते पाहत होता. कारण जे काही घडत होत ते मेंदूच्या जाणीवेपलीकडे होत. ती काहीतरी करतेय पण कोणासोबत... दिसत तर कोणीच नाहीये.

तिला आता फक्त तो दिसत होता... तिच्याकडे प्रेमाने ओथंबून भरलेल्या नजरेने बघणारा. त्याने तिला आपल्या बाहुपाशात खेचलं. ती शहारली. त्या शहाऱ्याच्या गोड झिणझिण्या तिच्या मेंदूवर घिरट्या घालू लागल्या. तिच्या शरीराला तो स्पर्श हवासा वाटू लागला. ती अजुनच त्याच्या त्याच्या जवळ गेली. त्यानेही आपली मिठी तिच्याभोवती घट्ट केली. आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदा ती इतका आश्वासक स्पर्श अनुभवत होती. त्या मिठीत तिला विरघळून जावस वाटत होत. हा क्षण थांबून रहावा.. कधी संपूच नये. तिच्या हृदयाची वाढलेली धडधड त्याला ऐकू येत होती. रोज भीतीने गोळा येणाऱ्या पोटात हजारो फुलपाखरं गुदगुल्या करत उडत होती. त्याने अलगद बोटांनी तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटेला बाजूला सारलं. तीच विशाल कपाळ, माहीत नाही त्या ललाटावरच्या रेषांवर काय भविष्य गोंदवल होत, पण त्याचाच भाग म्हणून बाजूला पडलेल्या, विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या त्या विकृत नवऱ्याच्या नावाचं कुंकू तिला समाजासाठी मिरवाव लागत होत. त्याने आपले मऊ उबदार ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो स्पर्श तिच्या अंगात एक वेगळीच वीज निर्माण करून गेला. त्याच्या हव्याहव्याशा त्या मिठीत तिचा श्वास अडकला. अतीव समाधानाने तिने हलकेच डोळे मिटले. पुन्हा तोच स्पर्श तिला आपल्या डोळ्यांवर जाणवला. त्या स्पर्शाने तिच्या शरीरात जणू हजारो विजा सळसळू लागल्या. कपाळापासून सुरू झालेला त्याच्या ओठांचा प्रवास तिच्या मानेवरून उतरून खालच्या दिशेने कूच करत होता. तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडलेल्या विजांची गरमी संचारली होती. अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला "आहह..... उहह..." अंगात तापलेला प्रणयज्वर तिला अस्वस्थ करत होता. त्याच्या चुंबानाने तीच शरीर हलकस कंपन पावत होत. तिच्या थरकणाऱ्या शरीराला तो अजुनच जोराने जखडत होता. तिच्या मऊशार कांतीवरून फिरणारा त्याचा हात तिच्या वक्षस्थळाच्या मधल्या भागातून तिच्या स्त्रीत्वाचा माग काढत खाली उतरत होता. त्याच्या स्पर्शाने ती अजुनच उत्तेजीत होत होती. क्षणाक्षणाला तिच्या अंगावर उमलणाऱ्या रोमांचावर घामाचे थेंब दवबिंदू होऊन चमकत होते. शेवटी तिला तृप्त करणारा बिंदू त्याला सापडला. ती एखाद्या मासळीसारखी तडफडत होती. तिच्या तडफडून उठलेल्या शरीराला त्याच्या वेगाची साथ लाभून त्या प्रणयरसात ती चिंब भिजून गेली. त्या प्रणयाच्या तेजात तिचा चेहरा नुकत्याच उमललेल्या टपोऱ्या गुलाबासारखा फुलला होता. आजवर सुखाच्या शोधात असलेली ती पहिल्यांदाच तृप्त झाली होती. तिचा निर्वस्त्र देह घर्मबिंदूनी चमकत होता. आपण इतके सुंदर असू शकतो.... ती स्वतःशीच खुदकन हसली. इतका वेळ प्रणयात न्हाऊन निघालेल्या स्वतःच्याच देहाला ती पुन्हा पुन्हा चाचपडत होती. अचानक तिची नजर विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या तिच्या नवर्‍याकडे गेली. काहीतरी भयानक पाहून तो अर्धमेला झाला होता. तिच्यातील प्रेयसीचा त्याने कधीच आदर केला नाही. तिच्या तडफडून उठणाऱ्या शरीराला कधी शांत केलं नाही. उलट स्वतःची हवस तिच्या शरीराला कुस्करून भागवून घ्यायचा. असा नवरा असून काय फायदा....? तिने आपले तृप्त झालेले डोळे त्याच्याकडे रोखत त्याला एक मादक स्माईल दिली.

दुसऱ्या दिवशी पोस्ट मोर्टेम मध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं स्पष्ट झालं. शेजाऱ्यांनी तिच्याच बाजूने जबानी दिली. तिचा नवरा आधीपासूनच विक्षिप्त आणि हेकेखोर होता. त्याच्या विक्षिप्तपणाला वैतागून शेजारीही दुरावले होते. आजूबाजूच्या बायकांकडे तो अश्या काही नजरेने पहायचा त्याच्यावरून त्याच्या बायकोने काय सहन केलं असावं म्हणून सगळ्या शेजाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत होती. ' सुटली बिचारी ' एक खाष्ट काकू न राहवून बोललीच. तिच्या कानात ते शब्द शिरले. तिने चमकून त्या काकूंकडे बघितले. त्यांनी गोऱ्यामोऱ्या होऊन तिथून काढता पाय घेतला. ती ही आपले अनावर झालेले अश्रू पुसत घरात धावत गेली. धाडकन दरवाजा आपटला. आता सांत्वनासाठी कोणी येणार तर नव्हतच आणि खोटी सहानुभूती पण नको होती तिला. दरवाजाची कडी घालता घालता ती हसू लागली. त्याच्या कैदेतून सुटका झाल्याची खुशी होती. अचानक काहीतरी जाणवलं... त्यादिवशी अंधारात त्या वळणावरच्या रस्त्यावर जाणवलं आणि काल रात्रीदेखील... तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर पालटले. हजारो जन्म तळमळत असल्यासारखी ती त्याला बिलगली. स्वतःला विसरून ती त्याच्या स्वाधीन झाली. आपली तहान त्याच्या स्पर्शाने प्यायचा प्रयत्न करत होती. कित्येक वेळ तीच शरीर मागणी करत राहील. त्याच्या गुलाबी मिठीत सुखाच्या परमोच्च प्रवासाकडे जाताना ती मनात विचार करत होती काल रात्री अमावस्या नसती तर.....?

समाप्त