Dominant - 11 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 11

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

डॉमिनंट - 11

डॉमिनंट

भाग अकरा

डॉमिनंट भाग दहापासून पुढे....

दुसर्या दिवशी उन्हं पडायच्या आतच मनूची स्वारी आरीफला भेटण्यासाठी तो ज्या हॉस्पिटलमध्ये होता तिकडे वळाली. काल रात्री मोठ्या मुश्किलीने तिने विक्रमला आपल्या निवासाच्या जागेपासून दुर थांबवत माघारी जाण्यास सांगितले होते. जेणेकरून त्याला आपले घर नक्की कुठे आहे ते सहजासहजी सापडू नये, असा उद्देश तिच्या मनात होता. आणि त्यात ती यशस्वीही झाली होती. विक्रम तिच्यासमोर डिसेंट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, हे मनूने चांगलेच ओळखले होते. म्हणूनच तो तिचा पाठलाग करेल असे तिला जराही वाटत नव्हते. तरीही खबरदारी म्हणून रात्री घरी पोहोचेपर्यंत ठराविक अंतराने ती मागे वळून वळून पाहत होती.

आरीफला शोधून मनू त्याच्या रूममध्ये गेली. बाहेर असलेल्या हवालदाराने तिला ओळखले होते, त्यामुळेच त्याने तिला आत जाण्यापासून आणि आरीफला भेटण्यापासून रोखले नाही.

मनूला पाहताच आरीफ उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला पण मनूनेच त्याला तसं करण्यापासून परावृत्त केले. तब्येत वगैरे विचारण्याची फॉर्मॅलिटी पूर्ण होत त्यांच्यात मूळ विषयावर चर्चा रंगू लागली.

"आरीफ, हमने गलत इन्सान पे भरोसा रखा.." मनूने विषयाला हात घातला.

"मतलब, कहीं तुम्हारा इशारा मंदार की ओर तो नहीं..." आरीफने मनूला विचारले.

"हा... आरीफ.. हमने उसे इनोसंट समझा था.. पर वो शातीर खिलाडी निकला.. तुम यकीन नहीं करोगे पर दीदी का खुन उसने ही किया है... और आगे की गलती मेरी थी.. मुझे तुम्हे उसके साथ नहीं छोडना चाहीये था..." मनूच्या चेहर्यावर पश्चात्ताप साफ दिसून येत होता.

"मनू.. मौसम का खुन... मंदार ने... ये तुम किस बिनाह पर कह रहीं हो..." आरीफने थोडं आश्चर्य व्यक्त करत विचारले.

"तो और कौन कर सकता है... आरीफ.. उसने तुम्हें मारने की कोशिश की.. क्या ये वजह काफी नहीं.." मनू त्वेषात म्हणाली.

पण तिचं बोलणं मध्येच खोडत आरीफ बोलू लागला.

"नहीं.. नहीं... मंदारने मुझपर हमला नहीं किया... और इसिलिये मैं सौ टका कह सकता हुं के मौसम को भी उसने नहीं मारा.."

"क्या..." मनू अक्षरशः किंचाळलीच.

खरंच आता आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी तिचीच होती.

"मगर ये कैसे हो सकता है.. मैंने खुद अपनी आंखो से मंदार को तुम्हें जखमी हालत में नीचे जमिन पर रखतें देखा था.. और मौसम के पैसे वो भी तो उसी हरामी के पास थे.. आरीफ ठिक से याद करों.. कल क्या हुआ था... वो मंदार ही था ना.. जिसने तुम्हारी पीठ पर वार किया.."

मनूच्या इतक्या कॉन्फिडन्टली बोलण्याने आरीफही एकक्षण विचार करू लागला. खरंच काल नेमकं काय झालं होतं.. घडलेल्या एकेका घटनाक्रमाला तो जोडत जोडत बोलू लागला. मनू शांतपणे तो सांगत असलेला घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर चित्ररूपात आणू लागली.

"एक मिनीट मनू, कल.. मैं बाथरूम में जैसे ही गया.. मैंने देखा.. मंदार वहा वॉशबेसिन इस्तेमाल कर रहा था.. फिर.. (पुन्हा काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत) हा... मेरी नजर उसकी बॅग पर गई.. जैसा के तुमने फोन पर बताया था.. मैंने मौसम के पैसो को मंदार के पास ही पाया.. उसके बाद... हमारे बीच थोडीबहूत बातचीत हुई.. फिर..(डोक्याला जोर देत) लेकीन मनू, उसकी एक भी हरकत से ऐसा नहीं लगा के वो मुझे मारनेवाला था... बकायदा वो पैसे देखकर मैं उसपर झपटा, पर फिर भी उसने मुझपर हाथ नहीं उठाया.."

"कुछ तो बात होगी आरीफ, वरना मंदार चुप नहीं रहता.. उसमें भी जरूर उसकी कोई साजिश होगी.." मनू अजूनही मंदारविषयी काहीशी साशंक होती.

"वैसा लग तो नहीं रहा था.." आरीफ.

"पैसो के बारें में क्या कहा उसने.. कैसे आये उसके पास मौसम के पैसे.." मनूने विचारले.

"उसने बताया जो कुछ उस रात हुआ था..." असे म्हणत आरीफने त्याचे आणि मंदारचे कालचे संभाषण मनूला पूर्णपणे सांगितले. मंदार आणि मौसमची भेट, एकाएकी झालेला मौसमचा खुन, मंदारचं तिथून पळून जाणे, जाताना मौसमचे पैसे घेणे हे सर्व आरीफने जसे मंदारकडून ऐकले होते, त्याने तसेच्या तसे मनूच्या कानावर घातले.

"और एक बात मनू... हमारे बीच बातें चल ही रहीं थी... के अचानक किसीने पीछेसे मुझपर हमला किया.. मैं उस शक्स को तो देख नहीं पाया.. पर इतना पक्का के मंदार मेरे सामने था.. वो मुझे बचाने की कोशिश में था.. हा.. बेहोश होने से पहले मैंने देखा था मंदार मुझे बचाने की कोशिश में था.. हा मनू.. मंदार खुनी नहीं हो सकता.." आरीफच्या मनात आता कोणताही संदेह नव्हता त्याला जणू काही हरवलेली वस्तू मिळाल्यासारखं मनातून वाटत होतं.

पण त्याच्या तश्या खुलाश्यानं मनूचा साफ अपेक्षाभंग झाला होता. आता तिच्या डोळ्यासमोरून आरीफ सांगत असलेल्या किस्स्याचं चित्र नव्हतं.. ते केव्हाच हटलं होतं.. आता मनूच्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र होतं.. काचेची खिडकी... तिला रेलून काहीसा अवघडलेल्या स्थितीत उभा असलेला एक माणूस.. आणि त्याला लाथ मारण्याच्या पावित्र्यात असलेली त्याच्या समोरची मुलगी.. बघता बघता त्या मुलीने तिच्या समोरच्या इसमाला लाथ मारलीच.. अगोदरच अवघडलेला तो.. त्या धक्क्यानं खिडकीच्या काचा छेदत खाली जाऊन आदळला... हो आता त्याचा चेहरा काहीसा स्पष्ट दिसू लागला होता.. मंदार.. हो.. मंदारच होता तो.. वर खिडकीत पाहावं.. तर...

"अह्हआअ..हह्.."

मनू स्वतःला भ्रमात त्या खिडकीत पाहून दचकतच भानावर आली. तिच्या चेहर्यावर पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता. शिट्.. हे काय भलतेच होऊन बसले माझ्याकडून.. मंदारला मीच खाली ढकलले होते.. कदाचित तो आरीफला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल.. मी खरे काय आणि खोटे काय याची चाचपणीदेखिल न करता त्याला शिक्षा दिली. तो जर खुनी नाही तर... किंवा तो खर्या गुन्हेगाराच्या मागावर असेल तर केवळ माझ्यामुळे आता तो ते ही करू शकत नाही. एकतर तो जखमी आहे आणि त्यात पोलिसांच्या ताब्यात.. त्याचं आता बाहेर पडणं खुपच अवघड आहे...

"मनू, क्या हुआ... क्या सोच रही हो...?" आरीफ तिच्या गंभीर चेहर्याकडे पाहत विचारू लागला.

"आरीफ, लगता है मुझसे बहुत बडी गलती हुई है.. शायद मुझे मंदार के साथ ऐसा नहीं करना चाहीये था.." मनूच्या आवाजात खेद होता.

"क्या.. ऐसा क्या किया तुमने..?" आरीफ जाणून घेण्यास ऊत्सुक होता.

मनूने आरीफला विक्रम, मंदार यांचे पूर्वेतिहास तसेच इरफान भाय आणि त्याची माणसं, सध्यस्थितीत विक्रम आणि मंदार यांचं वैमनस्य आणि काल आरीफ बेशुद्ध झाल्यानंतरचा प्रकार या सगळ्याचा वृत्तांत सांगितला. त्या विषयावर बराच वेळ त्यांच्यात चर्चा झाली पण अजूनही ते दोघे कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहचले नव्हते.

"मुझे लगता है आरीफ, मंदार बेवजह अब बूरी तरह से फंस गया है.. और इसकी जिम्मेदार मैं हुं..." मनू खंत करत उद्गारली.

"हम्मम्... एक बात तो पक्की हैं.. मंदार पुलिस के साथ होने के बावजूद डिग्री का खुन होता है मतलब मुझे लगता है कोई मंदार और विक्रम के बीच की दुश्मनी को आपसी फायदे के लिये इस्तेमाल कर रहा है.. या फिर ये भी हो सकता है के ये सब विक्रम ने करवाया हो.. मनू.. ये गुत्थी सुलझाना बहुत ही मुश्किल लग रहा है.. और मेरे खयाल से हमें मंदार की जरूरत है.." आरीफ मनात येईल तसं बोलून मोकळा झाला.

"हा पर कैसे..? पुलिसने उसको कहा रखा है किसे पता.." मनू वैतागली होती.

"थोडा रिस्क उठाना पडेगा.. मैं जानता हुं मंदार कहा है.." आरीफ म्हणाला.

"क्याऽऽ....?" मनू हर्षाने ओरडलीच.

"हा... मंदार इसी हॉस्पिटल में यहीं कोनेवाले कमरें में है... बकायदा वो जखमी है तो उसकी निगरानी सिर्फ एकही हवालदार कर रहा है.. पर खबर मिली है के वो एक-दो दिन में थोडा तंदुरुस्त हो जायेगा.. तब शायद उसपर पहरा बढ सकता है.." आरीफ मुळातच खबरी असल्याकारणाने त्याने अगोदरच सगळी माहीती काढून ठेवली होती.

"यु आर् टु गुड् आरीफभाई..." मनू त्याच्या हुशारीवर खुश होत म्हणाली.

"खबरे निकालनीही पडती है.. अपना तो काम ही पहले से यही है.." आरीफ स्वतःलाच शाबासकी देण्याच्या भावात म्हणाला.

पण आताच लगोलग हालचाल करणे सोईचे झाले नसते. मंदारला रिकव्हर होण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक होते. आणि त्याचदृष्टीने नीट विचार करून पुढे पावले टाकण्याचा मनूने निश्चय केला.

बराच काथ्याकूट केल्यावर शेवटी मनूच्या सुपीक डोक्यात आयडीया आली आणि ती आरीफला सांगून मोकळीही झाली. आरीफलाही तिचे म्हणणे पटले आणि त्याने त्या अनुषंगाने तिला साथ देण्याचे कबुल केले.

*************

दोन दिवसांनंतर....

इस्पितळातल्या आपल्या खोलीत काहीसा स्वस्थ होऊन बेडवर पडलेला मंदार निवांत वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर त्याच्यावर पहारा ठेवून असलेले दोन हवालदारही आपापसांत गप्पा मारण्यात व्यस्त होते. दुपारची लंचनंतरची वेळ असल्याने हॉस्पिटलमध्ये फारशी वर्दळ नव्हती. आणि कामावर असलेला कर्मचारी वर्गही सुस्तावलेल्या चालीने कामे करत होता. घड्याळात दुपारच्या तीनचा ठोका पडला आणि तितक्यात आरीफच्या रूममधून त्याच्या मोठमोठ्याने विव्हळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

क्षणात तिथले वातावरणच बदलले. आरीफच्या बाहेर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेला हवालदार लगबगीने आत जाण्यासाठी उठला पण रूमचा डोअर आतून बंद असल्याने त्याला आत प्रवेश करता आला नाही. जोरजोरात दार ठोठावूनही आतून दार उघडले जात नव्हते. तिथूनच ये-जा करणारे कर्मचारी काय झालेय ते पाहण्यासाठी जमा होऊ लागले. आतून आरीफच्या ओरडण्याचा आवाज जास्तच मोठा होत चालल्यामुळे त्याच्या रूमच्या बाहेर संभ्रमाची परीस्थिती निर्माण झाली होती.

तिथे वाढत चाललेली गर्दी पाहता मंदारवर नजर ठेवून असलेले दोन्ही हवालदार सहज प्रतिक्रिया म्हणून आरीफच्या रूमकडे धावत सुटले. जाताना खबरदारी म्हणून त्यातल्या एका हवालदाराने बाहेरून कडी लावली आणि आतमध्ये मंदार एकटाच राहीला. नाही म्हणायला मंदारलाही बाहेरील परीस्थितीचा थोडासा अंदाज आलाच होता. काहीतरी गडबड झाली आहे आणि आपल्यावर पाळतीला असलेला पोलिस सध्या दरवाज्याच्या बाहेर नाही आहेत हे त्याने ओळखले. धडपडत उठत मंदारने दरवाज्यात येऊन कानोसा घेतला. आरीफच्या ओरडण्याचा अस्पष्टसा आवाज अजूनही बाहेरून ऐकू येत होता.

मंदारने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण नाही... दरवाजाला बाहेरून कडी असल्याने तो उघडू शकला नाही. संधी चालून आली होती.. हीच वेळ होती पळण्याची.. बाहेर पडण्याचा अन्य मार्ग शोधण्यासाठी मंदार मागे आला. खिडकीपाशी जाऊन त्याने पडताळा करून पाहीला. खाली जमिनीपर्यंतचे अंतर खुप होते. थोडंस उन्नीस-बीस झालं तर पुन्हा हातपाय मोडले असते. यावेळी ती रीस्क मंदार घेऊ शकत नव्हता. काय करू आन् काय नको.. मंदार याच विवंचनेत होता. अन् शेवटी त्याने फायनल केलेच.. दरवाज्यासमोर दहा पाऊल मागे येत त्याने आक्रमक पवित्रा घेतला. दरवाजा तोडून बाहेर पडण्याचे तायाने मनाशी नक्की केले होते. अश्यावेळी जर त्या आवाजाने बाहेरील हवालदार जरी सावध झाले तर त्यांनाही दरवाज्यासारखंच तोडण्याचा धाडसी निर्णय मंदारनं घेतला.

आपली पोझिशन पक्की करत मंदार दरवाज्यावर स्वतःला झोकून देण्यास जाणारच होता की, त्याला दरवाज्यावर काहीशी हालचाल जाणवली. आपल्या पाळतीवर असलेले पोलिस पुन्हा आले की काय.. मनात एकक्षण असा विचार करत मंदार खट्टू झाला पण पुढच्याच क्षणी दरवाज्याची बाहेरून लावलेली कडी सरकली आणि दरवाजा उघडला गेला.

डोळ्यांवर जाड भिंगाच्या गडद काळ्या रंगाच्या फ्रेमचा चष्मा लावलेली नर्सच्या पोशाखातील ती व्यक्ती पाहून मंदारला आश्चर्य वाटले. तिला एका फटक्यात बाजूला फेकण्यात त्याला फारसे कष्ट पडले नसते. पण तिची कमनीय फिगर आणि त्या चष्म्याच्या आतले तिचे गुझबेरीच्या आकाराचे डोळे त्याला अस्वस्थ करू लागले. शिवाय त्या डोळ्यात त्याला काहीतरी ओळखीचे असल्याचे जाणवत असल्याने तो प्रहार करायला पुढे जाऊ शकला नाही.

"चल निघ लवकर..." तिनं लपवून आणलेला टी-शर्ट त्याच्याकडे फेकत जवळजवळ त्याला ऑर्डरच दिली.

मंदारनेही मग डोक्याला जास्त त्रास न देता पटापट हॉस्पिटलचा शर्ट उतरवून तो टी-शर्ट परीधान केला. आणि तिच्या मागून तो शक्य तितक्या लवकर बाहेर पडला.

आरीफच्या रूमजवळून पास होताना अगदी मंदारच्या मनात पकडले जाण्याचा लवलेशही नव्हता. त्याला माहीत होते जरी ते तीनही हवालदार मिळून त्याच्या अंगावर आले असते तरी त्या तिघांना तो पुरून उरला असता. मंदार अगदी बिनधास्त हत्तीसारखा त्यांच्या मागून पास होत हॉस्पिटलच्या बाहेर आला.

तोपर्यंत आरीफच्या रूमच्या बाहेर असलेले तीनही हवालदार जीव खाऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी चार-पाच निष्फळ प्रयत्नांनंतर कसेबसे त्यांना यश आले आणि ते आत घुसले.

आतमधले दृश्य पाहताच त्या तीन्ही हवालदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या कारणाने आरीफ मघापासून ओरडत होता, ते कारण समजल्यावर त्यांची स्थिती आरीफला खाऊ की गिळू अशीच झाली होती. इतक्या वेळापासून आत काय घडतेय हे जाणून घेण्यास ऊत्सुक असलेली बाहेरची गर्दी हास्यकल्लोळात तिथून पांगू लागली.

काहीतरी भयानक नाट्य आतमध्ये बघायला मिळेल या आशेने जमा झालेल्या काही जणांचा पुरता हिरमोड झाला होता.

आरीफ सेफ जागेवर उभा असल्यासारखा त्याच्या बेडवर उभा राहून जंगलात एकटाच फिरत असलेल्या सिंहासारख्या फरशीवर फिरणार्या झुरळाला हाकलण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडत होता. आणि त्याच्यावर उद्भवलेल्या त्या जीवघेण्या प्रसंगातून वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

वैतागलेल्या एका हवालदाराने हातातल्या दंडूक्याने एकाच फटक्यात त्याच्या आवाक्याच्या क्षेत्रात आलेल्या त्या झुरळाचा आणि पर्यायाने आरीफचाही खेळ खल्लास केला. त्या आवाजाने आरीफ शांत झाला आणि चेहर्यावर सौम्यभाव आणत त्याने त्या हवालदाराला 'थॅन्क्स' म्हटले.

"पागल कहीं का..." दुसर्या हवालदारानं आरीफकडे पाहत नारीजीचा सुर ओढला.

इतक्यात झुरळाला मारण्यासाठी खाली वाकलेला हवालदार तडकन उठून आपल्या सहकार्याला घाईघाईने ओरडत म्हणाला...

"तो एकटाच आहेऽऽ... चल लौकरऽ..."

त्यानं तसं बोलताच हीट ऑफ दी मोमंट तिघेही कॉन्स्टेबल मंदारच्या रूमकडे धावले. पळणार्या त्या तिघांकडे कुत्सित हास्यभर्या नजरेनं पाहत आरीफ शांतपणे रूममधून बाहेर पडून हॉस्पिटलच्या मुख्य एक्झिटकडे कुच करू लागला.

मंदारच्या रूमचा उघडा दरवाजा पुरेसा बोलून गेला होता. पण तरीही काहीशी अंधुक आशा मनात ठेवून पोलिसांनी मंदारच्या रूममध्ये प्रवेश केला. मंदार पळून गेल्याच्या शंकेने त्या तिन्ही हवालदारांच्या तोंडचे पाणीही पळाले.

"सायब्... कच्चा खाईल..." एकजण म्हणाला.

"कुणीतरी मदत केल्याबिगर हे शक्य नाही..." दुसरा म्हणाला.

"आता करायचं काय पण...?" पुन्हा पहीला हवालदार म्हणाला.

तिसरा हवालदार आतापर्यंत शांत होता. त्याची ड्यूटी आरीफच्या रूमबाहेर होती. त्याच्या डोक्यात काहीशी वळवळ होतच होती. काही संदर्भ एकमेकांशी जुळवून त्याने तर्क मांडला.

"आरीफच्या रूममधून आवाज येतो.. सगळ्यांचं ध्यान तो आकर्षित करून घेतो. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा तर लागणारच होता. त्या कामात आपण तिघांना एकत्र यावच लागणार होतं. आपण तिघेही तिकडे असलो की मग मंदारचं पळून जाणं सोपं झालं असणार. आणि आता पुन्हा आपण मंदारच्या खोलीत आलोय... ते पण.. तिघेही.. म्हणजे.. याचाच अर्थ.. आता आरीफपण...
त्याच्याऽऽ माय्लाऽऽ भोऽऽऽ...."

तिघे कॉन्स्टेबल पुन्हा आरीफच्या खोलीत धावतच आले. पण तिसर्या हवालदाराने मांडलेला तर्क अगदी तंतोतंत खरा ठरला होता. आरीफ कधीच हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता.

सोबत असलेली नर्स दुसरी कोणी नसून मनू असल्याचे मंदारने ओळखले. तिनेहि झाल्याप्रकाराची त्याच्याकडे माफी मागितली. ठरल्याप्रमाणे त्यांच्या मागोमाग काही वेळातच आरीफही येऊन त्यांना भेटला. तिथून निघत त्यांनी नेहमीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत जवळपासचा एक लॉज राहण्यासाठी निवडला.

************

डिग्रीचा खुन झाल्यानंतर तिसर्या दिवशी सायंकाळी मेहजबीन मनूच्या घरी तिला भेटण्यासाठी म्हणून चालली होती. अंधार पाहुन मुद्दामच तिने ही वेळ निवडली होती. तशी कल्पना देण्यासाठी तिने मनूला फोन केला.

"हॅलो... मनू.. उस शाम को जो खुन हुआ था.."

"हा.. दीदी.."

"मैंने उस आदमी को देखा था... उस वक्त मैं वहीं पर थी.."

"क्याऽऽ..." मनू ओरडलीच.

"हा.. मैं उस आदमी को ठिक से नहीं जानती हुं पर तुम लोगो के साथ मैंने उसे पहले भी देखा हैं..."

"ऐसा कैसे हो सकता है दीदी... और आप मुझे दो दिन बाद ये सब बता रही है..."

"मैं वही समझाने आ रही हुं.. खुन करते वक्त उस आदमी ने भी मुझे देखा था.. इसिलिये मैं वहा सें भाग गई थी.. दो दिन छुपने के बाद आज तुमसे मिलने तुम्हारे घर पहुंच रही हुं.... मेरी जान खतरें में है.. तुम घर पर ही हो ना..?" मेहजबीनने घाबरतच विचारले.

मनू, आरीफ आणि मंदार आजच नव्या ठिकाणी लॉजवर येऊन थांबले होते. पुढे काय करायचे याच प्रश्नाचे उत्तर शोधताना आता मेहजबीनच्या रूपात थोडाफार क्लू मिळाला होता. मनूने मेहजबीनला भेटण्याचे ठरवले, त्यात रिस्क जरूर होती पण मेहजबीनकडून मिळणारी माहीतीही तितकीच अत्यावश्यक होती.

"नहीं.. लेकीन फिक्र मत करो, मैं बस आधे घंटे में वहा पर पहुंच जाऊंगी.. " मनूने मेहजबीनला उत्तर दिले आणि फोन ठेवला.

मनूच्या घरी जाण्याच्यासंदर्भात त्या तिघांमध्ये सल्लामसलत झाले. एकट्याने गेल्यास धोका होता, पोलिसांपासूनही आणि जो कोणी खुनी होता त्याच्यापासूनही. म्हणूनच तिघांनी जायचे ठरले फक्त आरीफ आणि मंदार मागे राहून आवश्यकता वाटली तरच पुढे येतील अन्यथा मनू मेहजबीनला एकटीच भेटेल असा प्लॅन निश्चित झाला.

तिकडे मेहजबीन अंधारात वाट काढत एक एक गल्ली पाठी टाकत मनूच्या घरी येऊन पोहोचली. थोडावेळ ती घराच्या बाहेरच घुटमळत थांबून राहीली. दरवाजा निरखून पाहता तिला दिसले की मनूचे घराला कुलूप वगैरे नव्हते. म्हणजेच तो उघडा होता. काय करू आत जाऊ की नको या विचारचक्रात मेहजबीन होती. तसे मनूचे घर इतर वस्तीपाहून थोडे बाजूला असल्याने फारशी वर्दळ नव्हती पण बाहेर थांबायचे म्हटले तर कुणीतरी पाहण्याची भिती होती. आणि जर तो खुनी आपल्या मागावर असेल तर मग... नको.. या कल्पनेनेच मेहजबीनच्या अंगावर काटा आला. आणि तिने मनूच्या घरात जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला.

पण तिच्या नशिबात काही वेगळेच लिहीले होते.

आत जाऊन मेहजबीनने सुरक्षिततेच्या दृष्टीने दार आतून बंद केले आणि मागे वळली. समोरच्या भिंतीला लागून असलेल्या सोफ्यावर बसायला म्हणून ती जात असताना तीची नजर उजव्या बाजूला चमकत असलेल्या एका वस्तूवर गेली. त्या अंधारातही बाहेरून येणार्या पुसटश्या प्रकाशाने चमचमत असलेल्या त्या चाकूचे प्रतिबिंब तिला शोकेसच्या आरश्यात दिसत होते. तो चाकू हातात आलटत पालटत असलेली व्यक्ती पाहताच मेहजबीनच्या अंगावर सर्रकन् काटा आला, काळजात धस्स् झाले.. ज्या संकटापासून लपत छपत ती इथं सुरक्षित जागेपर्यंत आली होती त्याच संकटाने तीला याच सुरक्षित जागी गाठले होते.

"त्..त्..तुम्म्... यहां... कैसे..." घाबरलेल्या कापर्या आवाजात तिनं आरश्यातच पाहत विचारलं. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.. अंगातलं त्राणचं जणू गळून पडले होते आणि त्या व्यक्तीकडे वळून पाहण्याचेही धाडस तिच्यात नव्हते.

"मैं तो किसी और वजहसे आया था... पर क्या करें.. तु खुद हलाल होने यहां आ ही गई..."

मेहजबीन त्याच्या या वाक्यानं अजूनच हादरली. तिला खरंतर काय करावे तेच सुचत नव्हते. प्रतिकार करावा की पळावं या द्विधा मनःस्थितीत ती होती. माणसाचं नेहमी असंच होतं, एखाद्या गोष्टीबाबत मनात संभ्रम असेल तर ती गोष्टीस कधीच फलत्व प्राप्त होत नाही.

ती व्यक्ती जसजशी जवळ येऊ लागली तसे मेहजबीनचेही तेच झाले पळू की नको या मनातल्या विचारचक्रातच ती घाफरून दरवाज्याकडे लडखडलेल्या पावलांनी धावली आणि त्याने जीव खाऊन मारलेल्या चाकूने तिच्या पाठीत खोलवर घुसत आपले काम फत्ते केले. तिच्या ओरडण्याचा आवाज फारसा लांब जाऊ शकला नाही. आणि थोडावेळ तडफडून मेहजबीनची हालचाल कायमची बंद झाली.

मागून आलेल्या त्या व्यक्तीच्या चेहर्यावर क्रूर भाव होते. एखाद्या विकृताप्रमाणे विक्षिप्त हसत तिच्या मृत शरीराला लाथाडत तो दाराची कडी उघडून बाहेर पडला.

क्रमशः