Shodh Chandrashekharcha - 11 in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | शोध चंद्रशेखरचा! - 11

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 110

    ભાગવત રહસ્ય-૧૧૦   મહાભારતના શાંતિ-પર્વમાં એક કથા આવે છે.વૃંદ...

  • ખજાનો - 77

    " શું થયું મિત્ર...! તમારા ચહેરા પર આ ડર અને ચિંતા કેમ વર્તા...

  • પ્રિય સખી નો મિલાપ

    આખા ઘર માં આજે કઈક અલગ જ વાતાવરણ ઉભુ થયુ છે સામન્ય રીતે ઘરની...

  • ધ્યાન અને જ્ઞાન

        भज गोविन्दम् ॥  प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्य विवेक...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 11

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

Categories
Share

शोध चंद्रशेखरचा! - 11

शोध चंद्रशेखरचा!

११--

किरकोळ अपघाताने गायत्रीचे आयुष्य उद्धस्थ झाले होते. अपघातात तिचे दोन्ही पाय गेले होते. आणि ती व्हीलचेयरवर आली. पप्पाच्या माघारी तिने, त्यांच्या कंपनीचा डोलारा नुस्ता संभाळलाच नव्हता तर, तो वाढवून नावारूपाला आणला होता. मॅनेजमेंट मास्टर्स डिग्रीच्या शेवटच्या वर्षांपासून ती चंद्रशेखरच्या सम्पर्कात होती. मृदू बोलणारा, समोरच्याला न दुखावता, आपले टार्गेट गाठणारा हा तरुण तिला आवडला. हौशी होता. रसिक होता. नाटकात कामे पण करायचा. अभिनयाच्या अनेक ट्रॉफी त्याला मिळाल्या होत्या. तिने त्याच्याबरोबर लग्न केले. अर्थात पप्पांची संमती घेऊन. चंद्रशेखरच्या सॉफ्ट स्किलचा गायत्रीला, तिच्या व्यसायात फायदा होत होता. हळूहळू चंद्रशेखरचे कंपनीत वजन वाढत गेले. सगळे सुरळीत आहे, असे वाटत असताना तो अपघात झाला. सुलतान त्यादिवशी सुटीवर होता म्हणून चंद्रशेखरने, नवा ड्रायव्हर, त्या दोन दिवसापुरता घेतला होता. त्याच्या सोबत येताना, त्या ड्रायव्हरने गाडी साईडला घेऊन उभी केली.

"मॅडम, समोरच्या मेडिकल स्टोर मधून औषध घेऊन येतो. फक्त दोनच मिनिटात! प्लिज तोवर गाडीत थांबा." असे म्हणून, तो रस्ता क्रॉस करून औषधाच्या दुकानाकडे निघाला, तेव्हड्यात अचानक एक बारचाकी ट्रक गायत्रीच्या कारला, मागून धडकून, बेगुमान पणे निघून गेला!

पाय गमावलेली गायत्री चंद्रशेखरवर विसंबून होती. उपचार आणि मन थाऱ्यावर येईपर्यंत सहा महिने उलटले होते. ती कंपनीच्या कारभारात लक्ष्य घालण्याच्या विचारात होती, पण 'गायत्री, मी बघतोय सगळं, तू कशाला त्रास करून घेतेस. तू या पुढे फक्त आराम कर.' असे प्रेमाने म्हणून,चंद्रशेखर तिला अडवत असे.

तिच्या कंपनीचे शेयर्स घसरत होते. गायत्रीला वेगळाच संशय येऊ लागला. तिने ऑफिसला फोन लावला तर, अकाउंट्सचे वसंतराव ऐवजी दुसरच कोणीतरी बोलत होत! तिने सरळ सुलतान ड्रॉयव्हरला फोन लावला, कारण तो विश्वासातला होता. सुलतानाने जे सांगितले त्यावर तिचा विश्वासच बसला नाही. जुने बरेसे लोक चंद्रशेखरने काढून टाकले होते! आणि हल्ली तो कस्तुरीनावाच्या, नव्या सेक्रेटरी सोबत रात्री बेरात्री फिरत होता! तिने मान खाली घातली. कापलेल्या पायाकडे पहाताना तिच्या डोळ्यात पाणी आले. शेखरला विचारायला हवे होते. आज आत्ता! समोर चंद्रशेखर आल्याचे तिला कळलेहि नाही.

०००

"शेखर, मी काय ऐकतीयय?"

"काय ऐकलंस?" चंद्रशेखरने निर्विकारपणे विचारले.

"कंपनीचे शेयर्स वीक होत आहेत. का?"

"गायत्री, शेयर मार्केट असत. कमी ज्यास्त होत रहातात शेयर्सच्या किमती!"

"आपला प्रॉफिट हि गेल्या दोन क्वार्टर मध्ये डिक्लीन झालाय!"

"हो, म्हणून तर शेयर्स घसरलेत!"

"तू त्यासाठी काय केलंस?"

"मी त्यासाठी जुना म्हातारा स्टाफ कमी करून, नवीन रक्ताला वाव दिला! कमी पगारात काम करणारी पोर घेतलीत!"

"अरे, पण अनुभवी माणूसबळ मोलाचं असत!"

"गायत्री! मला, प्लिज, नको ते उपदेश करुस. मला नाही आवडत. कारण मी काय आणि का करतोय ते मला कळत!"

"अरे, माझ्या कंपनीची परस्थिती डबघाईला येताना दिसतीयय आणि तरी मी साधी चौकशी करू नये? आणि ती हि तुझ्या कडे? आणि हि कस्तुरी कोण? ती तुझ्या सोबत बरीच फिरतीय म्हणे!"

चंद्रशेखरने आपले कपाळ खाजवले. आता या बाईला फार काळ अंधारात ठेवून उपयोग नव्हता. आणि तसेही आपले उद्योग तिच्या पासून लपून रहाणारच नाहीत. 'उद्याच्या' ऐवजी आजच तुकडा पडून मोकळे व्हावं झालं!

"बोल शेखर, मी काय विचारती आहे? तुझं काय चाललंय? काहीतरी बोल! आणि न बोललास तरी चालेल! मी उद्याच ऑफिसला येऊन पहाणारच आहे!"

"गायत्री, नको असा त्रागा करुस! मी आज, आत्ता सगळं तुला सांगणार आहे. फक्त मन घट्ट करून ऐकावं लागेल. इतकंच!" त्याचे ते स्मित भयानक होते. गालावर हास्य होते, ते त्याच्या डोळ्यात खुनशीपणा होता ! गायत्री मनातून हादरली. हि समोर बसलेली व्यक्ती, तिचा 'शेखर' नव्हता!

"काय असेल ते, एकदाच सांगून टाक! मी खंबीर आहे ऐकायला!"

"तर ऐका गायत्री मॅडम! आपण जेव्हा प्रथम भेटलो, तेव्हा मला तुमची, तुमच्या पप्पांच्या कंपनीची, संपूर्ण कुंडली माहित होती! मी अनेक नाटकात काम केलीत. त्यातील तुम्ही काही स्टेजवर पहिली आहेत! तसेच मी अनेक कामात पण नाटक केलीत! त्यातलं एक तुम्ही अनुभवलं आहे! प्रेमाचं नाटक! तुमच्या पप्पाच्या पैशासाठी केलेले!"

"बापरे! म्हणजे तू केलंस ते ----"

"पुढे ऎका, तुमचे पप्पा आपल्या लग्नाच्या वेळीस सत्तरीत होते. जीर्ण देह कधीतरी कोसळणार हे जगाला माहित होत! काळ लागणार हे मी गृहीतच धरलं होत. आणि तसाही मला वेळ हवा होता. तुमच्या कंपनीत हात-पाय पसरायला! पप्पा परमेश्वराची भेट घेण्यास निघून गेले. तुम्हाला मनःपूर्वक सहकार्य करून कम्पनीची भरभराट करून घेतली. मग तुम्हास तो अपघात झाला! कंपनीच्या कामी अडथळा नको म्हणून, तुम्हीच अनलिमिटेड पी.ए. माझ्या नावे करून दिलीत! त्या बद्दल धन्यवाद! पण वाईट झालं! ट्रक ड्राइव्हरने पन्नास हजार घेतले! पण काम अर्धवटच झालं होत! दवाखान्यात मी तुमच्या सोबतच होतो. ट्र्कमुळे जे होवू शकले नाही, ते डॉक्टरकडून करून घेण्याचा घाट घातला. साला, डॉक्टर भेकड निघाला! पण मी प्रामाणिक प्रयत्न केला होता! मी किती प्रयत्नवादी आहे, हे तुम्हाला सांगणेच नको! असो! प्रत्येक संकटात एक संधी असते, तशी ती मला मिळाली! मीच तुमच्या कंपनीची हालत, तुमच्या सारखी अपंग करून टाकली! कंपनीचे शेयर्स 'गॅलॅक्सि'ला मिळतील अशी सोय करणे मला फारशे कठीण नव्हते!

आज ना उद्या मी हात वर करणार. येणे मी वसूल करून घेतलंय! देणेकरी तुमच्याकडे येतीलच! गायत्रीजी, आता तुमच्या सारखी 'मोडकी' बायको घेऊन मी काय करू? म्हणून कस्तुरी बरोबर लग्न करणार आहे! तुम्ही आजवर माझ्यावर अनंत उपकार केलेत, घटस्फोट देऊन शेवटचा उपकार करा म्हणजे झालं! आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन!"

गायत्रीला ऐकवेना. तिचे डोके गरगरू लागले. कुठल्याही सिनेमातली किंवा कथेतील खलनायक इतका हलकट दाखवला नसेल! किती घाणेरडा आपला उपयोग, याने करून घेतलाय? हे गायत्रीच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. तिची शुद्ध हरवली!

०००

मोहम्मदअली रोडवरच्या दाटीवाटीने असलेल्या दुकानांच्या मागल्या बाजूस एक फडतूस हॉटेल आहे, जेथे देशी दारू सोबत तळलेली मासोळी 'चाखणा' म्हणून मिळते! हे ठिकाण नेहमीच ओसंडून वहात असते. गलका कायमचाच. मोलमजुरी करणाऱ्यांचे, ते विरुंगुळाचे ठिकाण. सिगारेटीच्या धुराने आतून ठासून भरलेलं!

तेथेच एका टेबलवर फतरू आणि बक्षी हलक्या आवाजात बोलत होते. फतरूला अंडरग्राउंट, 'रिपोर्टर' म्हणून ओळखत असे. पक्की खबर. सिर्फ फतरु!

"इस्को पैचानता?" बक्षीने चंद्रशेखरचा फोटो दाखवत विचारले.

फतरूने क्षणभर डोळेभरून तो फोटो न्याहाळून घेतला. डोळे बंद केले. टीव्ही वाला फोटो!

"हा, पर जानकारी का पाच सौ लेंगा!"

बक्षीने दोन हजाराची गुलाबी नोट टेबलवर ठेवली, गप्पकन हिपपॉकेट मधून काढून अमेरिकन बनावटीचे पिस्तूल त्या नोटेवर पेपरवेट सारखे ठेवले! फतरू बावचळला! म्हणजे आपली जानकारी 'बेशकिमती' आहे! आणि समोरचा मुबईचा काय महाराष्ट्रातलाहि नाही!

"खाली फोटोपे क्या बतायेगा? फोटोवालेका नाम क्या होता, मालूम है तो बताव!"

"चंद्रशेखर!"

"फिर बराबर! बोलो क्या जानकारी मंगता. "

"पत्ता!"

"गॅलॅक्सि सोल्युशन! कॉम्पिटरमे निकालले, गालि का आता पत्ता!" फतरू दोन हजाराच्या नोटेकडे हात लांबवत म्हणाला.

"फतरू! हात पीछे! पुरी जानकारी लुंगा! फिर पैसे दूंगा! कहा रहता, क्या करता, कहा मिलन को सकता?"

"हवला, समझेला क्या? दस हजारवाली जानकारी, दो हजारमे नाय मीलता भिडू!"

बक्षीने पन्नास हजारांचे बंडल गन खाली ठेवले! फतरूच्या घश्याला कोरड पडली. साला कुच्छतो बडा लफडा दिखता!

"क्या, लफडा है?"

"फतरू, तू जानकारी उगल, बादमे सामनेका पैसा निगल! चल, बोलता चल! "

"तो सून! इक मालदार कंपनीका मालिक है! घरका पत्ता मालूम नाही! हिसका गाडी घाटके आंदर, पेंडसे टक्कर मारेला मिला, कुछ रोज हुयेले, अभि तलक, ना तो चंद्रशेखर मिला, ना तो उस्का बाडी! पोलीस तलक हैरात मे है! इसाक बीवी बोलता, कोई तो चंद्रशेखरको किडन्याप कियेला है! पर तेरि को ये जानकारी काय कु मंगता? कोन है तू?" शेवटी न राहून फतरूने विचारले. कारण हि माहिती त्याने टीव्ही वर पाहून ठेवली होती! म्हणजे हा भारतातला नव्हता!

"दुनिया बंदे को, बक्षी के नामसे जानती है!" बक्षी सावकाश म्हणाला.

"तू,---तुम दुबईवाला ---"

"हा वैच!" एव्हाना फतरूच्या कपाळातून पिस्तूलची गोळी, त्याच्या खोपडीत विसावली होती! बक्षीने पिस्तूल हिप पॉकेट्मधे कधी सारले हे, त्याच्या हातालाही समजले नाही! गोळीबाराचा आवाज अर्थात झाला नव्हता, सायलन्सरने चोख काम केले होते! फतरू दोन्ही हात आणि डोके समोरच्या टेबलवर टेकवून पडला. बक्षीने त्या पन्नास हजाराच्या नोटा, भरगच्चं हॉटेल मध्ये उधळून टाकल्या! लोकांची झुंबड नोटा गोळा करण्यात गुंतली होती, बक्षी सावकाश हॉटेल बाहेर पडला. त्या नोटांची फिकर बक्षीला नव्हती, कारण त्या खोट्या होत्या! मुंबईच्या पोलीस खबऱ्यांचे जाळे बक्षी जाणून होता. फतरूशी झालेले बोलणे त्याला महागात पडणार होते. म्हणून फतरूला जिवंत ठेवण्यात अर्थ नव्हता! चंद्रशेखरच्या कारला मोठा अपघात होतो. आणि चंद्रशेखर जखमी किंवा मृत अवस्थेत सापडत नाही. हि काय भानगड असेल? आणि ते 'पाकीट' कोठे असू शकेल? एक -चंद्रशेखरच्या घरात. दोन चंद्रशेखरच्या ऑफिसात. किंवा चंद्रशेखरच्या खिशात! पैकी ऑफिसात किंवा घरात असण्यापेक्षा त्याच्या खिशात असण्याची शक्यता केव्हाही ज्यास्त होती! चंद्रशेखरला हुडकणे गरजेचं होते!

******