अमेय आज वडापाव खायाला आला नाही .त्या माणसांनी ओळखले त्याच्याकडे पैसे न सल्ल्यामुळे तो तिथे वडापाव खायला आला नसणार आहे . त्याने त्याच्या हाताखाली कामाला असणाऱ्या मुलाला त्याच्या जवळ बोलावले . आणि अमेय्ला एथे घेऊन ये म्हणून सांगितले . तो मुलगा ही धावत अमेयच्या जवळ गेला . आणि आमच्या मालकांनी तुम्हाला बोलावलय म्हणून सांगितल . अमेय ही फार काही विचार न करता , त्या वडापावच्या दुकानात गेला . तिथे गेल्यावर अमेयला पाहताच त्या माणसाने अमेयला बसायला सांगितले .आणि त्याच्या हातात वडापावची प्लेट दिली . त्या माणसांनी हातात दिलेली प्लेट पाहून , अमेय त्या माणसाला म्हणाला , मज्यकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत . यावर तो माणूस हसत म्हणाला , अरे माहीत आहे मला , आज तू वडापाव खायला आला नाही , तेव्हाच मी ओळखले , की तुज्याकडे पैसे नसणार म्हणून तू आला नाहीस . तू चांगल्या घरातला दिसतोस .एथे काम शोधायला आलेला दिसतोस .अरे ह्या मुंबईत किती तरी लोक असे येतात . एथे आपलीच माणसे परकी होतात .आणि परकी आपली . घे खा ....वडापाव .
त्यामाणसाचे बोलण ऐकून अमेय्ल रडू अवरेना . तो माणूस बोलत होता ते बरोबर होते .एथे आपलीच माणसे परकी होतात आणि परकी आपली .
आज अमेय्ला खूप भूक लागली असताना अमेय्ला वडापाव देऊन त्याला आपलस केले होते .
पण दुसऱ्याच क्षणाला डोळ्यातले पाणी आवरले . आणि तो म्हणाला , पण हा वडापाव नाही घेऊ शकत . यावर तो मालक म्हणाला , कारे , काय जाहला
यावर अमेय म्हणाला मी हा वडापाव फुकट नाही खावू शकत .त्याबद्दल तुम्ही मला काही तरी काम सांगा .मी ते करीन .पण मी फुकट नाही खाऊ शकत .यावर त्या मालकाला अमेयचे कौतुक वाटले .तो म्हणाला . तू चांगल्या घरातला दिसतोस .मी तुला काय काम सांगणार .पण तुला ह्या हिथे जे काम आवडेल .ते कर .आणि जितके दिवस करायचे , तितके दिवस कर .दिवसाला मी तुला शंभर रुपये देयीण .अमेयला तो माणूस म्हणजे त्या वेळी देव माणूसच वाटला .माणसातला देव माणूस .अमेय लगेच तयार झाला .
अमेय आता त्या वडापाव गाडीवर पडेल ते काम करत असे .आणि मधल्या वेळेत नोकरी शोधत असे . संध्याकाळी परत काम आणि रात्री रेल्वे स्टेशन वरती जौप्त असे .असे त्याने तिथे दहा दिवस काढले . एक दिवशी तो असाच दमून भागून रेल्वे स्टेशन वरती जौप्ला .सकाळी पहाटे पहाटे त्याच्या मामाच्या मुलांनी त्याला स्टेशन वरती जौप्लेले पाहिले . तो काही कामानिमित्त तिथे आला होता , अमेयला पाहताच त्याच्या जवळ गेला .त्याला त्याने झोपेतूण जागे केले .आणि तो असा का झौप्ला आहेस ? आणि चार दिवसात येतो म्हणून सांगून गेलास .आणि आज ईतके दिवस जाहाले तरी घरी आला नाहीस . आणि तुजा फोन पण का लागत नाही म्हणून विचारले .
आता ह्या प्रश्नांवर अमेयला काय उत्तर द्यावे , ते कळेना . तो खोटेच सांगू लागला , अरे मी हैदराबादला गेल्तौ .तिथे चार दिवस परीक्षा दिली . एक वर्कशॉप साठी थांबलेलो .तो केला , आणि एथे घरी यायला निघालो .तर रस्ता चुकलो .म्हणून स्टेशन वरतीच रात्र काढायची ठरली .आणि एथेच झौपलो .आणि अरे रेंज मुळे फोन नसेल लागेत . अमेयला त्यावेळी जे सुचले ते त्याने सांगितले . यावर अमेय्चा मामाचा मुलगा म्हणाला काय रे , तू एक फोन केला असतास तरी मी न्ह्यायाला आलो असतो .