गाडी चालवत निवांत घरी जात असताना त्याला एक फोन आला ,
तिकडून आवाज आला , "भाऊ इस महिने का रोकड कहा पे जमा करवाणा है?" ,
सूर्या इकडून काहीतरी पुटपटला," तू अब कहा पर है?"
"भाऊ मै अब अड्डे पे हू"
"तो वही पर रुक, मै आधे घंटे मे पहोंच रहा हु"
सूर्या थोड्याच वेळात तिथे पोहोचला . तिथे गेल्या नंतर दोन लोक समोर आले. त्यातल्या एकाला सूर्या ने नमस्कार केला, दुसऱ्याने लगेच एक मोठा पैश्याचा बंडल काढून सूर्या च्या हातात दिला. वेळ न घालवता सूर्या तेथून बाहेर पडला.
आता त्याला घरी जायला उशीर झाला होता , आणि आई काहीतरी बोलणार होती तेही तो विसरला नव्हता. घाई करत तो घरी निघाला. घरी पोहोचायला त्याला कदाचित वेळ झाला असावा. कारण घर पूर्ण शांत झालं होत. आई झोपली असावी. आता काही उपयोग झाला नाही. असे विचार करत तो त्याच्या आलिशान बंगल्याच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपला.
पहाटे चार लाच उठायची सवय होती त्याला. रात्री कितीही उशीर झाला तरी त्याच्या दिवसाची सुरुवात ही पाहाटे चार लाच होई. चार ते पाच तो काहीही करत नसे. फक्त ध्यान करण्यात त्याचा वेळ घालवणे. मग पाच ते साडे सहा कसरत करणे. नंतर सात पर्यंत पोहणे आणि मग कपडे मग बाकी अवरून शॉपिंग मॉलमध्ये जाऊन ऑफिस ची सर्व आयात निर्यातीवर लक्ष घालून व्यवस्थित कामगारांची विल्हेवाट लावणे. मग आकरा वाजेपर्यंत मंगल कार्यालयात जाऊन तेथील ऑफिस मधली सगळी कामे बघून तो पाच वाजेपर्यंत तिथेच बसलेला असायचा. थोडक्यात कार्यालयाचा एसी ऑफिस मोठं अन खास त्याला भेटण्याचं ठिकाण होत. मग पाच वाजता क्लास मध्ये जाऊन एकच ब्याच दोन तास घेऊन सात वाजता परत कार्यालय आणि मॉल मध्ये जाऊन आठ वाजेपर्यंत घरी पोहचून जेवण आईवडिलांशी गप्पा मारून करणे आणि मग दहा वाजेपर्यत इकडे तिकडे करून दहाला झोपणे हा त्याचा दिनक्रम. काही वेळी कामामुळे यात बदल होत असे. पण होऊ नये याकडे सूर्याचा कल असायचा.
आजही तो त्या प्रमाणे चारलाच उठला होता . नियमितपणे सगळं आवरून तो चहा घेण्यासाठी बसला असता त्याला आठवले. आई आपल्याशी काही बोलणार होती. तसा त्याने किचनमध्ये खुडबुड करणाऱ्या आईला आवाज दिला.
" आईसाहेब "
" काय रे सूर्या ?" आई येऊन त्याच्याजवळ बसत म्हणाली, "चहा बरोबर नाही झालाय का?" सुषमा ..... दादांना दुसरा चहा बनवून दे आणि हा घेऊन जा "
सुषमा म्हणजे सूर्याची अत्या आणि त्याच्या वडिलांनी मानलेली बहीण. सुष्माचे त्यांच्याच गावात एका माणसाशी लग्न झालं होत. पण व्यसणी माणूस असल्यामुळे तो तिला खूप त्रास द्यायचा. मग आईवडिलांच्या घरी न पाठवता तिला बहीण मानून आपल्या घराचा सदस्य बनवून घरी आणले होते एका दिवसा आधी.
"नाही नाही चहात काही गडबड नाहीये, बस तू पण आत्त्या" तिला बस म्हणत सूर्याने कप टेबल वर ठेवला.
" आव नई दादा , लई कामं रायलीत, अजून धुणे बी धुवयच हाय"
" बस ग आत्या, तुला काय कामासाठी नाही आणलेलं इथे" तिला बसवत सूर्या आईशी बोलायला लागला,
" काल रात्री तू काय बोलत होतीस, मला काय सांगायचं होत"
" काल पाच वाजता रंगू मामाच्या मुलाचा फोन आला होता "
" अरे तो नितीन "
" ह्म्म"
" काय म्हणाला ? सगळ बर आहे ना "
" त्याने तुझ्यासाठी रंगू मामाचा निरोप दिलाय"
" काय?" सूर्या उत्सुकतेने विचारत होता.
" रंगू मामाने तुला बोलावलंय भेटायला "
"काबर बोलावलं असेल मामांनी?"
" काही सांगितलं नाही पण आस वाटत होत की मामा तुला मुलगी बघतोय"
" आई अहो पण मला आता आजच पाच दिवसांसाठी युनीवरसिटीत जायचयं, आणि खूप महत्वाचं काम आहे त्यांना सांग मी आलो की लगेच येईल तिकडे"
" हे काय आजच आहे का?" आई चिडून बोलली," नेहमीच आहे आपल, पण ही शेवटची वेळ असेल, याद राखा " असे म्हणत आई उठून गेली
सूर्या पण आत्या कडे बघून हसला आणि निघाला.
पुढील भाग लवकरच...........