Ek nirnay - 1 in Marathi Short Stories by Hemangi Sawant books and stories PDF | एक निर्णय - 1

Featured Books
Categories
Share

एक निर्णय - 1

ती- हॅलो.... मी बोलतेय.

तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?

ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी.

तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!
सरळ नकार दे. कळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...

ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार...

तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..?

ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला.

तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील मला... पाच वर्ष फिरलास आणि लग्न नाही केलंस.. हसतील अग माझ्या तोंडावर. एक काम कर आज तू शांतपणे विचार कर. मी सगळी तय्यारी करून ठेवेल, तू फक्त होकार दे.. प्लीज ग राणी. अस नको बोलुस.
उद्या निर्णय सांग. आणि हो प्लीज होकारच दे हा....
वाट पाहतोय मी..

कॉल कट...

बीप बीप करत मोबाईल बंद झाला आणि तिचा मेंदूही. आज ती अशा वाटेवर उभी आहे जिथे तिला तिच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. एका वाटेवर घरचे तर दुसऱ्या वाटेवर तीच प्रेम. काय निवडु आज तेच कळत नाहीये.

दुसऱ्या दिवशी मनाशी काही ठरवुन तिने त्याला कॉल केला.

ती- हॅलो... मी बोलतेय.

तो- हा बोल ना... काही झालय काय..? तू ठीक आहेस ना..?

ती- हो मी ठीक आहे. मला तुला माझा निर्णय सांगायचं आहे.
मी काल खुप विचार केला. आपल्या नात्याचा, प्रेमाचा आणि माझ्या घरच्यांचा. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत पळुन. मला माझ्या घरच्यांना सोडुन नाही यायचं.


तो- अग काय डोकं फिरलंय काय तुझं...? आणि आपलं प्रेम, त्याच काय..? पाच वर्ष एकत्र होतो त्याच काय..? आणि आज तुला तुझ्या घरच्यांचा पुळका का येतोय एवढा..


ती- आपण फक्त पाच वर्ष एकत्र होतो, तर तुला एवढा त्रास होतो आहे. मग तूच विचार कर माझ्या घरच्यांना किती त्रास होईल त्यांनी तर मला एकवीस वर्ष वाढवलं आहे. आणि आपलं हे वय ही नाहीये लग्नाचं. मला अजुन शिकायच आहे.


तो- आता तू तीचं कारण देणार ग. साली कमीनी तु... एवढे वर्ष माझ्यासोबत टाईमपास केलास तेव्हा नाही कळलं का... चल निघ. तुझ्यापेक्षा छप्पन पोरी माझ्यावर फिदा होतील. तुझं खरच प्रेम असत ना तर आली असतीस पळुन माझ्यासोबत ही अशी कारण नसती दिलीस. परत कधी तुझं तोंड नको दाखवुस.


अजुन चार शिव्यात घालत त्याने कॉल कट केला.
सर्व ऐकुन तिच्या डोळ्यातुन पाणी अलगद तिच्या गालावर तरंगल.



कस असत नाही प्रेम. शेवट लग्नावर येऊन थांबवतोच. खरंच प्रेमाचा शेवट हा आहे...?! प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा, प्रेम म्हणजे एखाद्यासाठी त्याग करणे. पण काही जणांसाठी प्रेम म्हणजे लग्न. असतो ना. पण त्यासाठी सर्वांची संमती असणे गरजेचे आहे नाही ...!. कारण लग्न हे दोन जीवांना जोडते आणि सोबत दोन कुटुंबातील लोकांना देखील. पण काही जणांसाठी जर मुलीने पळुन जाऊन लग्नाला नकार दिला तर तीच प्रेम, हे प्रेम नसत. खरचं...!!



मुली या ज्यांच्यावर प्रेम करतात ना त्यांच्यासाठी काही ही करू शकतात. पण त्या इमोशनल असतात. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना कधीही त्रास होऊ नये याचाच त्या नेहमी विचार करत असतात. मग त्या सर्वात त्यांना त्यांचा बळी द्यावा लागला तरी त्या नेहमी तय्यार असतात.

मुलांना वाटत की मुली काही काळ सोबत राहतात व लग्न भलत्याच मुलासोबत करायला तय्यार असतात. पण त्यामागे काही कारणे असू शकतात याचा करतात का विचार मुलं..???


To be continued