कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
भाग- ७ वा
----------------------------------------------------------------------
नमस्कार ,
मी सरिता
मला माहिती आहे..
तुम्ही आश्चर्यचकित झालात ,
या आधी आपण भेटलेलो आहोत आणि आज पुन्हा मी माझे नाव सांगत
मी तुमचे असे स्वागतकरते आहे की आपण पहिल्यांदाच भेटत आहोत
, हे तुम्हाला चमत्कारिक वाटणारे आहे.
काय करू ? कुणी नववाकोरा चेहेरा माझ्या समोर आला की ,मला लगेच कळते
..हा सागरचा माणूस नक्कीच नाहीये “,
मग माझ्या मनाचा बांध असा फुटू लागतो ..आणि मी माझ्या मनाला थांबवत नाही ..
बिचाऱ्या मनाने तरी किती आणि काय काय सहन करायचं ?
सांगा बरे तुम्हीच .
मग मागच्या वेळेला मी बोलत राहिले आणि तुम्हाला पुन्हा येण्यास सांगितले .
तुम्ही परत गेलात खरे , तुमचा चेह्रेरा मला कळात होता .
मनात तुम्ही म्हणत होता – काय चमत्कारिकच आहेत बुवा या सरिता मैडम !
पण, तुमचे काम करणे माझ्या हातात होते ना , म्हणून तुम्ही काही न बोलता त्यादिवशी
निघून गेलात , ते थेट आताच आलात.
त्यामुळे मला लगेच आठवले नव्हते ..त्यामुळे सॉरी बरे का
तुम्ही कोण आहात , काय काम आहे ? वगेरे विचारले नाही मी ,
एकदा इथे येऊन गेलेलं आहात म्हणून आता तुम्ही इतक्या आत ,
अगदी हॉल मध्ये येऊन बसलात म्हणजे ..
बाहेर बसलेल्या सागरच्या माणसाला नक्कीच माहिती आहे ..
तुमचा माझा काही एक संबंध नाहीये ..
तुमची चौकशी करून झाल्यावर ..तुम्हाला आत सोडण्यात आलाय .
काही देणगी वगरे घेण्यासाठी आला असाल तुम्ही ,
मग, बरोबर आहे ,
सागरने सगळ्यांना सांगून ठेवलय ..असा कुणी .मदत मागणारे , आणि कुणी भिक-मंगे “
येतील तेव्हा ..त्यांना अडवू नका ..
मैडमशी भेट घालून देत जा –
त्या देत जातील काही न काही खैरात .
मागच्या भेटीत तुम्हाला सांगण्याची संधीच दिली नाही , आज अगदी संकोच न करता सांगा ,
तुम्ही काही मदत होईल या अपेक्षेने आला असाल तर सांगा ,
तुमच्या पदरात निराशा नक्कीच नाही पडणार .
काही ना काही नक्कीच मिळेल तुम्हाला .
पण, तुम्ही इथे भिकारी म्हणून आला आहात “,असे कृपया तुमच्या मनात आणू नका .
अहो तुम्ही कुणाला मदत करू इच्छिता , हाच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.
सार्वजनिक स्वरूपाचे कार्य करणाऱ्या सगळ्याचं संस्थांना आर्थिक मदतीची गरज असते “,
भक्कम आर्थिक पाठबळ देणारे पैसेवाले तुमचे आश्रयदाते असतात ,
इतक्या वर्षांच्या अनुभवातून मी शिकते आहे या सगळ्या गोष्टी.
सांगा ..किती रुपयांची मदत हवी आहे तुमच्या संस्थेला ?
तुम्ही अपेक्षित मदत सांगा ..तितका चेक मिळेल तुम्हाला ,
हा बघा माझ्या सह्या करून ठेवलेल्या अनेक बँकांच्या चेक - बुक्सचा गठ्ठा “
हे पाहून तुम्ही तुमच्या मनात माझ्या बद्दल काय म्हणत असाल हे पण मला माहिती आहे ,
काय बाबा ,नशीब एकेकाचे , सागर देशमुखची बायको झालीय , मग,काय पहायचं ,
वैभवात लोळत उपभोग घायचा या बाईसाहेबांना “,दुसरा काय काम असणार याशिवाय .
असा हेवा नका करू माझा .
.हे वरवरच सगळ पाहून पहाणार्यांना असेच वाटते .
नंतर माझ्याबद्दल कळाले की, हेवा वगरे काही नाही वाटणार ..
एकदम ..दया ,करुणा , सहानुभूती ..असे काही वाटू लागेल .
हे सगळ राहू द्या .
हे चेक घ्या ,आणि निघा आता , मी उगीच काही बोलून बसेल ..
स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल .. त्यापेक्षा ,मीच जाते आता इथून ..
तुम्ही आलात ते काम करू या अगोदर ..
हा घ्या तुमच्या संस्थेसाठी .चेक ..
सरिता-सागर प्रतिष्ठानकडून भरघोस मदत मिळवलीत ,त्याबद्दल
तुमची संस्था तुमचा मोठा सन्मान करील ,
लिहून घ्या माझ्याकडून .
असे पाहत काय बसलात माझ्याकडे ..?
चक्रम आहे की काय मी ? असे तर वाटत नाही न तुम्हाला ?
मग ठीक आहे.. या तुम्ही आता . तुमच्या संस्थेला आता २ वर्षांनीच मदत करील
सागर-सरिता प्रतिष्ठान . डायरीत तारीख लिहून ठेवा .
मग ठीक आहे.. या तुम्ही आता.
हे काय ,
तुम्ही कोण , गेला नाहीत का त्या संस्थेच्या माणसांच्या बरोबर ?
त्यांच्यातले आहात असे वाटले ,त्यामुळे काहीच बोलले नाही मी तुमच्याशी .
बघा , परत एकदा सॉरी म्हणायची वेळ आलीच माझ्यावर .
इतका वेळ झाला तुम्ही समोर बसला आहात , काही न बोलता बराच वेळ बसता आले तुम्हाला
कमाल आहे बाई , अहो, लोक एक्जागी असे न बोलता बसतात ? फार दिवसांनी पहायला मिळाले .
एक सांगू का ..
मला सारखे वाटतंय ,तुम्ही माझ्या खूप ओळखीचे आहात ,पण अजिबात आठवत नाहीये
तुम्हाला सांगते अलीकडे माझा हे असेच होत चालले आहे हो ,
स्मरण रहात नाही , मला , माझे आणि माझ्याबद्दलचे सगळे काही विसरून गेले आहे मी .
अकाली वृध्द झाले आहे मी .
खरे सांगा बरे , दिसते का हो मी माझ्या वया पेक्षा दहा –वीस वर्षांनी म्हातारी ?
खोटे नाका बोलू हं- माझ्याशी , खरे काय आहे ते सांगा .
माझ्या नवर्याला तसे दिसते ,तसे वाटते , म्हणून तर तो त्याच्या दोष आणि दूषण “
देण्याच्या पिंजर्यात कोंडून टाकतो , आणि दुरूनच रिंग-मास्तर कडे असतो तश्या चाबकाच्या
फटकारे देऊन वागायला लावतो .
सागरने आज काय काय सांगून गेलाय ,त्या प्रमाणे वागण्यात , बाकी सगळ्यांचा विसर पडतो .
आणि भीती याची असते मनात ..
सागरच्या मनाप्रमाणे नाही वागले “असा रिपोर्ट, त्याला त्याच्या या माणसांनी
दिला तर ?
नको रे बाबा ..आता सहन नाही होत शिक्षा ..मनाला आणि थकत चाललेल्या शरीराला
हे असे काही तरी बोलून जाते ..आणि तुम्ही भेटायला आलेले लोक ..बाहेरच्या जगात जाऊन ..
माझ्या कडून हे ऐकलेले ..स्वताच्या शब्दात ..त्यात स्वतःची काल्पनिक भर घालून तिखटमीठ लावून सगळ्यांना सांगणार ,
हे सगळा पाझरत पाझरत सागर पर्यंत पोंचणार ..मग काय ..
त्याची पुन्हा वेगळीच शिक्षा ,ती मलाच भोगावी लागते ,
तुम्ही कोण ते सांगा कि नका सांगू , माझे अंतरमन मला कधी पासून सांगते आहे की ,
तुम्ही माझ्या परिवारातले आहात , परके तर मुळीच नाहीत .
बरे झाले तुम्ही आलात , कधी पासून समोर बसून आहात ..
जुन्या गोष्टींच्या बद्दल तुमच्याशी बोलायलाच हवं
तुम्हाला आठवतंय का हो ..
बाबांच्या आयुष्यात भाग्याच्या पावलांनी आलेल्या त्यांच्या पत्नीच्या “प्रेमलता “ या नावावरून
आणि तिच्या वास्तव्याने त्यांच्या आयुष्याला संपन्न बनवणार्या माझ्या आईच्या कायम
आठवणीचे प्रतिक स्वरूप म्हणून या ..वास्तूचे नाव त्यांनी मोठ्या हौसेने “प्रेमालय “ असे ठेवले .
ज्या घरात “प्रेमलता “ राहते ..हे घर तिच्या नावने ओळखले जावे अशी बाबांची प्रेमळ इच्छा जणू
“प्रेमालय “या नावाने पूर्ण झाली.
बाबांनी खूप कष्टाने ,परिश्रमाने आणि संघर्षाने . त्यांच्या समोर आलेल्या संकटावर मात करीत
स्वतःचे नाव मोठे केले , कृतीशील –कार्यप्रवण आणि महत्वाकाक्षी असलेले माझे बाबा
जीवनातील वास्तवांना सामोरे जायचे .
काही न करता मोठे व्हायचे अशा स्वप्नाळू –लोकांना त्यांच्या लेखी काही किंमत नसे.
सगळीकडे बाबांची यशोगाथा ऐकायला मिळू लागली . बाबा स्वताच्या साम्राज्यात खुश होते ,
आनंदात होते . नेहमी सावध असणारे बाबा आनंदाच्या झुल्यावर झुलताना थोडे बेसावधच झाले असावे .
चारी बाजूनी संकटे ,समस्या , त्यांच्यावर कोसळत गेली .
त्यांच्या प्रिय पत्नीला ..उशिरा दिवस गेले ..किती आनंदाची गोष्ट ..पण इथेच पहिली वाईट गोष्ट घडली ..
त्यांना “कन्या –प्राप्ती “झाली ..माझा जन्म झाला ..पण बाबांच्या पदरात सुख काही पडलेच नाही.
मंदबुद्धी आणि हलके व्यंग घेऊनच मी बाबांच्या भेटीला आले, आईचा आजार या धक्याने अधिकच
बळावत गेला .. शेवटी व्हायचे तेच झाले ..
वयाने –शरीराने मोठ्या होत जाणर्या मंद बुद्धी मुलीला वाढवतांना ..माझे बाबा आतून खचत जातांना
मी पाहत होते ..
घरच्या आघाडीवर ..हे असे , त्यामुळे स्वतःच्या व्यवसायाकडे जरा दुर्लक्ष होऊ लागले ..याच
संधीचा फायदा हितशत्रूंनी घेतला नसता तरच नवल ..
हे सगळ असह्य झाला असावे ..
आणि अशा जीवघेण्या अस्वस्थेत बाबांच्या मदतीला देवाने जणू एक ..देवदूतच पाठवला असावा .
बाबांनी कधीकाळी आपल्या एका गरीब मित्राच्या मुलाला कंपनीत नोकरी दिली होती ,
सागर देशमुख “हे त्याचे नाव.
बाबांच्या मदतीला तो पुढे आला , बाबांच्या हातून निसटून चालेलेल्या सगळ्या गोष्टी त्यांने
पुन्हा बाबांच्या हातात आणून दिल्या . बाबांना त्याने आधार दिला , कोसळून गेलेले माझे बाबा
पुन्हा उभारीने काम करू लागले , जणू सागर देशमुखच्या रूपाने त्यांच्या जीवनदान
मिळाले होते .
मला म्हणजे सरिताला - - मंद-बुद्धी , बावळट , भोळसट ‘, काही भान नसणारी , अशी विशेषणे
आमच्याच परिवारातील नातेवैकांनी दिली होती .बाबांनी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही.
माझा एक पाय जरा अधू होता , पण समोरच्यांना हा फरक लक्षात येत नसे.
हे सोडले तर .माझ्यात काहीच दोष नाहीये “ यावर बाबा ठाम होते .
आणि बाबांच्या समोर त्यांच्या एकुलत्या लाडक्या लेकीला नावं ठेवण्याची कुणात हिम्मत नव्हती “
हे पण तितकेच खरे ..
थकत चालेल्या बाबांना माझ्या भविष्याची चिंता आतून पोखरत होती .. त्यांच्या मनात माझ्या बद्दल
नक्कीच काही चालत असावे ..
आमच्या घरात सर्वांना प्रेवेश नसायचा . बाबांच्याकडे बिझीनीस साठी येणाऱ्या लोकाना भेटता
यावे म्हणून बाहेच्या मोकळ्या जागेत ..२ रूमचा स्वतंत्र ब्लोक होता . हे बाबांचे बिझिनेस –हाउस होते .
एक दिवस ते मला म्हणाले .. सरिता – आज दुपारी तू बिझीनीस हाउस मध्ये येशील .
तुला खूप दाखवायचे आहे, समजावून सांगायचे आहे आणि मला तुझ्याशी खूप
महत्वाचे बोलायचे आहे . न विसरता ये मी वाट पाहतोय .
नाना प्रश्न माझ्या डोक्यात सुरु झाले .बाबा असे का बोलत असावेत ?
बिझिनेस हाउस मध्ये काय काय होणार ?
----------------------------------------------------------------------------------------------------
वाचू या पुढील भागात ..
भाग -८ वा लवकरच येतो आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------