अमेय्ची नोकरी तर आता गेली होती .नवीन नोकरी लगेच मिळणे ही अवघड होते . आणि नवीन नोकरी मिळेपर्यंत खर्च कसा भागवयाचा हे ही अवघड होते .गावाला पैसे कसे द्यायचे .मामीला नोकरी गेली हे कळल , तर ती , परत उण्दूण बोलत बसेल .आणि कर्ज फेडायचे आहे ते वेगळच .अमेय वरती एकदम आभाळ कोसळल अस वाटू लागले होते .आणि हे सगळ तो कोणाला सांगू ही शकत नव्हता . त्याला खूप एकट एकट वाटू लागले होते .
अमेय मामाच्या घरी आला .कोणालाही काही न बोलता , त्याने गपचुप रात्रीचे जेवण केले .आणि तो जोपी गेला . जोपी कसला त्याने झौपायचे नाटक केले होते .खरतर त्याच्या डोक्यात नुसते विचार घुमत होते .
दुसरा दिवस उजाडला , अमेयही उठला , सगळ आवरून काहीतरी निश्चय केल्या सारख तो घराच्या बाहेर पडणार . ईतक्यात त्याच्या मामाने त्याला आवाज दिला .अरे अमेय , आज कामावर नाही का जायच .आणि एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालास .यावर अमेयची पंचायत झाली .मामाला खर काय ते तो सांगू शकत नव्हता .आणि खोट कुठ चाललाय म्हणून सांगायचे .काहीतरी आठवल्या सारख करत अमेय म्हणाला , अरे मी , एक परीक्षा देतोय , त्या परीक्षेसाठी चाललोय .लवकरच परत येयील . पण , अमेय्चा मामा अमेय्ला म्हणाला .अरे पण , कुठे आहे परीक्षा .आणि परत कधी येणार .
यावर अमेय म्हणाला , काही नाही मामा , अरे मुंबईच्या , ....बाहेर आहे परीक्षा , आणि चार दिवस तरी जातील परीक्षेला .तू नको काळजी करू .मी जयील व्यव्सतीथ .आणि पळ काढावा तसाच अमेय निघाला . तो थेट रेलवे स्टेशनवरच . तो रेलवे स्टेशनवर आला खरा पण ,
जायच कुठ हे त्याला माहीत नव्हते . त्याने ठरवले होते , मुंबईचा कोपरा न कोपरा फिरायचा पण , नोकरी घेऊनच घरी यायच . त्यासाठी कितीही दिवस लागले तरीही .हे जर त्याने मामाला सांगितले असते , तर मामाने त्याला जाऊन दिले नसते . आणि त्याला लवकरात लवकर नोकरी मिळणे गरजेचे होते . पण नोकरी शोधायला कुठून सुरवात करावी .हे त्याला कळेना . समोरून एक रेलवे आली , क्षणभर त्याने डोळे मिटले , आणि मन घट्ट करून , तो त्या रेल्वे मधे चढला .पुढच्या एका स्टॉपवर गर्दी कमी बघून तो उतरला . खरतर अमेयसाठी सगळच अनोळखी होत .तो ह्या स्टॉप वरती उतरला काय नाहीतर दुसऱ्या स्टॉप वरती उतरला काय . त्याला सगळ अनोळखीच वाटणार होत .
रेल्वे तून उतरल्यावर त्याने नोकरी शोधायला सुरवात केली . त्याने पेपरातील जाहिरात बघून , बाहेरील बोर्ड बघून सगळी कडे नोकरी बघितली . असे त्याने दोन दिवस केले . दिवसभर तो नोकरी शोधायचा .आणि रात्रीचा वडापाव खाऊन रेल्वे स्टेशन वरती झौपय्चा . असे दोन दिवस झाले होते , आता तर त्याच्या जवळचे पैसे सुध्दा संपले होते . आता भूक लागल्यावर काय खायचे , हा तर फार मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा होता . तिसरा दिवस उजाडला अमेय , आज ही दिवसभर फिरून त्याला काही नोकरी मिळाली नाही .संध्याकाळ झाली .आता त्याला खूप भूक लागली . भुकेने त्याच्या पोटात कावळे ओरडत होते . पण , काय करणार .पण समोरच्या एका वडापाववाल्याचे लक्ष त्याच्याकडे गेले .अमेय रोज संध्याकाळी तिथे वडापाव खात असे आणि समोरच असणाऱ्या एका दुकानाच्या अडोश्याला जौपत असे .पण आज अमेय तिथे वडापाव खायला आला नाही . आणि त्याचा चेहरा ही उतरलेला दिसत होता .