Dominant - 8 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 8

Featured Books
Categories
Share

डॉमिनंट - 8

डॉमिनंट

भाग आठ

डॉमिनंट भाग सातपासून पुढे....

चंदूचा फोन काही केल्या लागत नव्हता. वैतागलेल्या डिग्रीने टेबलवर ठेवलेला दारूचा भरलेला ग्लास तोंडाला लावत गटागट रिकामा केला. थोडासा गळ्याला शेक बसल्यावर डोकं शांत ठेवत त्याने भायला फोन लावला. त्याला आवश्यक ती सर्व माहीती सांगितली. नसीरच्या खुनाबद्दल ऐकून भाय बहुधा चवताळला असावा, कारण पलीकडून डिग्रीला शिव्या पडत होत्या.

"तुम लोगों को बोला था मैंने, यहा से दूर निकल जाओ.. लगता है तुम चारों को पर निकल आये है..." भायचा पलीकडला आवाज मदनलाही ऐकायला आला.

"नहीं भाय.., पर हमने सोचा.. कुछ पता लगा लेंगे उस हरामी का.. तो आपके सर से भी टेन्शन कम हो जायेगा.." डिग्री आपधी बाजू सावरत बोलत होता.

"भग्.. भो**के... खुदा के वास्ते अब अपना मगज दौडाना बंद कर.. और जैसा कहता हुं वैसा कर.. मंदार का बंदोबस्त मैं कर लुंगा.. तुम दोनों वहा से निकल के मेरे घर जाओ.." भायने शिव्या घातल्या पण आपल्या माणसांची काळजी त्याला होतीच.

"भाय, और भी कुछ कहना है...." डिग्रीच्या मुखातुन नकळतच निघालं आणि पटकन आपण केलेल्या चुकीचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याला भाईशी मदनबाबतच बोलायचे होते. पण मदन तर बाजूलाच उभा होता. सांगणार तरी कसं.. आपोआप त्याचे डोळे गच्चकन मिटले गेले आणि जीभ चावली गेली. त्याच्या मनात चाललेल्या कालवाकालवीत तो पुरता गुंतला होता.

"बक्.. और क्या किया है.." भायने पलीकडून विचारले.

"नहीं भाय, चंदू नहीं मिल रहा..." डिग्रीने विषय सफाईने फिरवत भायला सांगितले.

"उसकी फिक्र मत कर.. मैं देख लुंगा.." भायच्या इतक्या खात्रीपूर्वक शब्दांनी डिग्रीला थोडं आश्चर्यच वाटलं. पण भायने सांगितलेय म्हटल्यावर तो थोडा आश्वस्त झाला.

भायने डिग्रीला पुढच्या सर्व सुचना देत फोन ठेवला. त्याच्याशी बोलल्यावर डिग्रीमध्ये कमालीचा आत्मविश्वास आला. उलट एखादं लहान मुल गेम जिंकत असताना जसं खुश होतं अगदी तसाच आनंद त्याच्या चेहर्यावर पसरला होता. त्याच्या चेहर्यावरून भायने काहीतरी महत्त्वाचं असं त्याला सांगितलं होतं.

*************

आरीफदेखील त्यांच्यामागोमाग वॉशरूममधून बाहेर पडला होता. पण थोडासा घुटमळत त्याने मंदारला फोन लावत लॉजच्या दिशेने कुच केले. पलीकडून रिंग वाजत होती पण मंदार फोन उचलत नव्हता. खुन मदनने केल्याची जवळपास खात्री आरीफला झाली होती. म्हणून मंदार पुन्हा खुनाच्या आरोपाखाली फसण्याची शक्यता होती.

मनूला फोन करून इथली परीस्थिती सांगावी तर ती बिचारी आपला जीव धोक्यात टाकण्यासाठी इथे येईल, असा विचार करून आरीफने तिला काही सांगायचे टाळले. मंदारला कसंही करून शोधणे हाच एकमात्र उपाय होता ही सर्व कोंडी सोडवण्यासाठी..

त्याला शोधून परत मदन आणि डिग्रीवर वॉच ठेवणे देखिल निकराचे होते. साला.. मेरी लाईफमें सब झमेले एकसाथही आ जाते है.. पर इन सबमेंसे रास्ता तो बनाना ही पडेगा.. पर कैसे....?

काय करू काय नको या विवंचनेत आरीफने निश्चय केला आणि लॉजमधले एकेक करत ओळीने सगळ्या खोल्यांचे दरवाजे ठोठावू लागला. कुणीतरी वॉशरूमकडे जाऊन पोलिसांना फोन करायच्या आधीच आपण थोडी अफरातफरी निर्माण केली तर मंदारला वाचण्यास थोडा वेळ तरी भेटेल या आशेने आरीफने हे पाऊल उचलले होते.

**********

तिकडे एकाएकी बाहेर सुरू झालेल्या भगदौडीमुळे रूममधल्या प्रत्येकासमोर येणार्या परीस्थितीत तग धरून राहण्याचे अथवा तिथून सुखरूप बाहेर पडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. सर्वप्रथम तर बाहेर काय घडलंय याचा आढावा घेणं गरजेचं होतं.

"पोलीस सहजासहजी इथं येणार नाहीत... नक्कीच काहीतरी मोठा मॅटर असेल.. अश्यापरीस्थीत आपलं असं इकडे थांबणं ठिक रहाणार नाही.." विक्रम मनूला समजावत म्हणाला.

"ते मलाही माहीत आहे.. बाहेर काय झाले असेल ते पहीले कळू दे.. तोपर्यंत जागचा हलू नकोसऽऽ.. नाहीतर आहेस तिथंच शेवटचा श्वास घेशील.. मंदार आणि तुझ्यात नेमके काय झाले होते त्याचीही मला सविस्तर माहीती दे.. " मनू पिस्तूल त्याच्यावरून न हटवता दरडावत म्हणाली.

"सगळेच जर एकाच नावेत स्वार आहेत आणि नाव बुडणारच असेल तर एकमेकांशी वैर धरण्यात काय फायदा.. तुर्तास आपली दुश्मनी विसरून पुन्हा कधी आपापसात सामना करूच.. आता इथून सटकणं केव्हाही चांगलंच.." विक्रम अजूनही समजावणीच्या सुरात बोलत होता.

"वेट... तुला एकदा सांगून कळाले नाही का..? मनू त्रासत उद्गारली. आणि तिने मेहजबीनकडे पाहत इशार्यानेच तिला बाहेर जाऊन पाहण्यास सांगितले.

मेहजबीन बाहेर जाण्यास उठली आणि एकदोन पाऊल पुढे आली पण दरवाज्याकडे पाहत तशीच थबकली. मनूला तिच्या नजरेत भीती दिसली म्हणून तीने त्या दिशेला पाहायला मान वळवली. पण हाय् रे... मनूला काही समजण्याच्या आतच तिच्या हातातलं पिस्तूल समोरच्या दणकट बाहूंनी हिसकावलं. तिचा पुढे आलेला हात खेचून पिळवटत त्या नराधमानं तिला आपल्या बकोटीला धरलं.

अंगातल्या काळ्या रंगाच्या पठाणीत इरफान भायचं भारदस्त शरीर एखाद्या परफेक्ट विलेनला साजेसं असंच होतं. त्याच्या हातातला तो जाडजूड कडा मनूच्या गालावर रूतत होता. आणि एव्हाना तर त्या कड्याने तिच्या गालावर लालसर रेघेचं आपलं अस्तित्व उमटवलंही होतं.

त्याच्या तावडीतून सुटकेचा मनू प्रयत्न करत होती. ह्याच्या.. तर.. साला कुठून कडमडला मध्येच येऊन काय माहीत.. त्याला हाताच्या कोपरानं मारण्याचादेखील तिनं प्रयत्न करून पाहीला.. पण छे.. सपशेल फेल.. त्याच्यावर काही असरच होत नव्हता. मनू हताशतेने विक्रमकडे पाहू लागली.

विक्रम मात्र जणू आतापर्यंत काही झालंच नाही अश्या आविर्भावात आपला ब्लेझर् हलकासा झाडत पुन्हा त्याच्या रिलॅक्स मूड आला. हम्म्.. मात्र यावेळी त्याच्या चेहर्यावर छद्मी हास्याची झलक होती.

"च्..च्..च्च.. बिच्चारी... तुला काय वाटलं, इतकं सहजसोपं असेल मला पकडणं आणि मारणं.. अगं इतका वेळ तर मी तुझ्याशी खेळत होतो बस्स्... हाहा.. दम आहे बाकी तुझ्यात... पण उतावीळ खुप आहेस तू.. तुला काय वाटलं मस्क्यासारखं सगळं सुरळीत आहे का.. हाऽऽहाऽहाऽऽ.. पण घाबरू नकोस मी कुणी सायको खुनी वगैरे नाही.. तुला माझ्यापासून काही धोका नाही.." विक्रम शांतपणे भिंतीला रेलून उभा राहत म्हणाला.

"जर एवढा शहाणा आहेस तर मग मघापासूनचे नाटक कश्यासाठी..." मनूने आश्चर्य व्यक्त करत त्याला विचारले.

"थोडीशी माहीती काढून घ्यायची होती.. बस्स्.. बाकी कुठला वाईट इरादा नव्हता.. चंदूला जाळ्यात ओढून इथे कोण येणार आहे तेच पाहायचे होते मला.. मी मंदारची अपेक्षा करत होतो, पण इथे तर तु आहेस..आता तुच मला सांग.. की तु मंदारला सामील आहेस की आणखीन काही.." विक्रमने धीम्या आणि सुस्तावलेल्या आवाजात म्हणाला.

मनू त्याच्या प्रश्नावर थोडा विचार करू लागली. मेहजबीनने परीस्थिती ओळखलो आणि ती तिकडून हालचाल करण्यास पुढे आली. पण चंदू तिला आडवा गेला. त्याच्या एका फाईटमध्येच ती बेडवर जाऊन पडली. यावेळी चंदूने जीव खावून मेहजबीनच्या चेहर्यावर मुक्का दिला होता. म्हणूनच त्या वेदनेनं ती तशीच पडून राहीली.

"तुम निकलो यहा से.. हम लोग इनको संभाल लेंगे.. मदन का फोन आया था.. बार में नसीर का खुन हो गया है.. और पुलिस को उस बात की खबर भी पड गई है. हमें इस चक्कर में फसने से पहले यहा से निकलना होगा.." भायने विक्रमला घाई करत निघण्यासाठी सांगितले.

भलेही त्यांच्यात अगोदर वाद झाले असले तरीही विक्रम हा इरफान भायचा क्लाईंट होता आणि म्हणूनच त्याला या प्रकरणात सेफ ठेवणं भायचं कर्तव्य होतं. इरफान भाई आपल्या धंद्यात पक्का होता. विक्रम आणि भाय दोघेही तिथं एकत्रच आले होते. फक्त कोणताही धोका उत्पन्न झाला की मदत म्हणून भाय मागे थांबला होता. आणि आता ऐनवेळेस रूममध्ये येऊन त्याने विक्रमचं पारडं जड केलं होतं.

"व्हाॅट्ऽऽ.. क्या कहा...? नसीर का खुन...? मतलब मंदार यही पर है.. उसे ढुंढो.." विक्रम तावातावाने ओरडला.

"उसकी जरूरत नहीं विक्रमसेठ.. अपना काम पुरा हो गया है.. मंदार अब बुरा फस गया है.. आज पुलिस उसको पकड ही लेगी.." भाय विक्रमला समजावत म्हणाला.

नाहीतरी विक्रमचा मोटो मंदारला मारण्याचा नव्हताच. त्याला फक्त मंदारची बदनामी आणि अटक हवी होती. आणि इरफान भायशी त्याने तश्शीच डिल केली होती.

"पण त्याला एवढी मोठी शिक्षा कश्यासाठी.. असलं कसलं वैर आहे तुमच्यात.." आतापर्यंत गप्प असलेल्या मनूने न राहवून विचारलं. तिच्या मनात मंदारबद्दल आपुलकी होती. आणि त्यामुळेच आता विक्रमबद्दल चीडही वाटत होती.

"व्हॉट् डू यू मीन् बाय् कश्यासाठीऽऽ..." विक्रमने खोचकपणे तिला उलट विचारले.

विक्रमने मौसमचा खुनी मंदारच असल्याचे तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याने नसीरच्याही खुनाचा दाखला दिला. जर आपण सगळे या रूममध्ये आहोत तर बाहेर नसीरचा खुन मंदारशिवाय करणार कोण.. असेही विक्रमने मनूला विचारले.

"अरे.. पण असं नाही होऊ शकत का, की नसीरला कुणी भलत्याच मॅटरमुळे मारलेय..." मनू मंदारची वकीली करत बोलत होती.

"काय प्रेमात पडलीस की काय त्याच्या.. (मनूकडे गांभिर्याने पाहत) हे.. वेट हा.. तुझा काय संबंध मंदारशी.. आणि कश्याचा एवढा पुळका.. मंदार काय चीज आहे ते मी चांगलंच जाणतो.. मला शंभर टक्के खात्री आहे की दोन्ही खुन त्यानेच केले आहेत..." मनूला समजावताना आता विक्रम त्रासला होता.

मनू मात्र अजूनही संभ्रमावस्थेतच होती.

"नहीं, मैं नहीं मानती के मंदार खुनी हो सकता है.." मनूच्या आवाजात खात्रीही वाटत नव्हती.

"तेरे मानने से सच बदलेगा नहीं लडकी.." इरफान भाई मनूच्या कानात पुटपुटला. त्याची तिच्यावरची पकड अजूनही मजबूत होती. तिला तसंच पकडून ठेवत त्याने पुढे बोलायला सुरूवात केली.

"मौसम के खुन के बाद मेरे आदमी वहा से पुलिस के साथ थाने गये.. उसके पहले पुलिसने मंदारके रूमकी तलाशी भी ली थी.. भले ही उन्हे कुछ छोटे-मोटे सबूत मिले हो, पर एक चीज उन्हें वहा नहीं मिली थी, न वो चीज मेरे आदमियों को मिली.."

मनू लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकत होती. इरफान भाईचं बोलणं अजून संपलं नव्हतं.

"वो चीज थी पचास हजार रूपये..! जो हमने मौसम को एक दिन की एक्टींग के लिये दिये थे.. वो पैसे वहा किसिको नहीं मिले थे.." भाईने आवाजातला जोर वाढवत सांगितले.

"ह्ह्.. तेरेही आदमियोंने छुपाये होंगे.. या क्या पता तुम लोगों ने मौसम को उसके पैसे दिये ही नहीं हो.." मनू तुसड्यासारखं बोलून गेली.

पण तिचं बोलणं इरफान भायच्या जिव्हारी लागलं. हातातलं पिस्तूल तिच्या कानाजवळ दाबत तो जवळजवळ ओरडलाच.

"चूप कर.. तेरी बकबक यहीं बंद कर दुंगा.. इरफान भाई भले बेईमानी का धंदा करता हो.. पर अपने प्यादों का खयाल इमान से रखता है.. मेरे आदमी वहा से खाली हाथ पुलिस थाने गये थे.. जब के डिग्री ने मौसम को शाम को ही पैसे दिये थे.."

त्याच्या आवाजातला रोष मनूला एकदा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत होता. कदाचित तो खरे बोलत असावा. पण इथे कुणावर विश्वास ठेवायचा या विवंचनेत ती ही होती.

"भाय.. वहा से भागने में मंदार अकेला कामयाब हो गया था.. और इतनी जल्दबाजी में भी, खिडकी से कुदने से पहले उसने अपना बॅग उठाया था.." चंदूने आठवल्यासारखे सर्व सांगितले.

विक्रम त्यांचे बोलणे ऐकत आपल्या मनात एकएक संदर्भ जोडत होता. सरतेशेवटी त्याने तोंड उघडले.
मनूकडे पाहत तो म्हणाला,

"मंदार और तेरे बीच क्या है, मुझे नहीं पता.. तु उसे कहा मिली..? क्यू..? तेरा तू जाने.. हम लोग यहा से निकल रहें है.. बचना है तो तू भी हमारे साथ आ सकती है.. और एक बात समझ ले, मंदार पर इतनी जल्दी भरोसा मत कर.."

विक्रमला मनूला बोलतं करायचं होतं. ती मंदारला कसे ओळखतेय वगैरे डिटेल्स् त्याला हव्या होत्या. पण इतक्यात तिच्यावर त्यासाठी दबाव आणणे घाईचे ठरले असते. म्हणूनच थोडं दमानं घेणं अत्यावश्यक होतं. त्यात विक्रम म्हणजे एखाद्या सायलेंट किलर प्रकारचा माणूस होता. कोणत्याही गोष्टीला डिपली अॅनलॅसिस केल्याशिवाय तो आपले काम करायचा नाही. मनू आज नाही तर उद्या सगळं काही सांगेल याची खात्री त्याला होती. फक्त तिला अनुकूल तशी परीस्थिती निर्माण करणं आवश्यक होतं.

मनू थोडा विचार करून म्हणाली,

"जर मंदार इथेच आहे तर त्याच्याकडून खरंखोटं जाणून घेण्याचा आज माझ्याकडे चान्स् आहे, मी बारजवळ जाऊन एकदा पाहून येईन.. तुम्ही लोक जाऊ शकता.."

"और इसका क्या करने का.." विक्रमने चंदूकडे बोट दाखवत भायला विचारले.

"विक्रमसेठ, वो मेरा आदमी है.. मर जायेगा पर जबान नहीं खोलेगा.. पर ये लडकी को हम ऐसे छोड नहीं सकते.. अगर ये मंदार के साथ होगी तो आगे अपनी मुश्किले बढा सकती है.." भायने विक्रमला चंदूबाबत आश्वस्त केले पण मनूबद्दल शंका व्यक्त केली.

"छोड दो उसे.. वो मौसमके खुन का बदला लेना चाहती है.. और खुन मंदारने किया है तो मुझे इससे कोई खतरा नहीं.. तो फायनली वो मेरी औरतऽऽ.. अह्ह.. अह्ह.. (मुद्दामच खोकत) मतलब इनडायरेक्टली वो भी मेरा साथ ही दे रही है.." मनूकडे स्मितहास्य करत विक्रम म्हणाला.

मनूने त्याला फारसं भाव दिल्यासरखं न दाखवता भायच्या विळख्यातून सुटन्याचा प्रयत्न केला. विक्रमने भायला खुणावले तसे भायने तिला सोडले. मनूने बेडवर पडलेल्या मेहजबीनजवळ जात तिला सावरायला मदत केली. आणि एक जळजळीत कटाक्ष तिने चंदूवर टाकला. विक्रम तिच्या त्या कातिल नजरेवर हसला आणि खिश्यातून एक कार्ड काढून त्याने मनूजवळ बेडवर फेकले.

"कुछ जरूरत हो, तो याद कर लेना.." विक्रम एवढे बोलून तिथून निघाला. इरफान भाई आणि चंदूही त्याच्या मागोमाग गेले.

ते गेल्यावर मनू तिथून लगोलग निघण्याची तयारी करू लागली. बारमध्ये शक्य तितक्या लौकर पोहोचणे आवश्यक होते. मंदार जर खरेच खुनी असेल तर तो पळून जायच्या आधी त्याला गाठायला हवं. आणि जर तो खुनी नसेल तर बिच्चारा उगाचच पुन्हा नाही तिथे फसून जाईल. मनूला दोन्ही बाजूंनी विचार करावा लागत होता. कारण मंदार आणि विक्रम दोघांनीही तिच्या डोळ्यांत डोळे घालून आपापले सत्य सांगितले होते. आणि दोघांच्याही बोलण्यात खरेपणा वाटत होता. पण मुख्य बाब ही होती की दोघांचे सत्य एकमेकांच्या विरोधात होते. म्हणूनच नेमके कोण खरे बोलतेय याचा पडताळा करणे आवश्यक होते.

"मनू मुझे लगता है.. विक्रम सच कह रहा है.. वो हमें यहा मार भी सकता था पर उसने ऐसा नहीं किया.." मेहजबीनने तर्क लावत म्हटले.

"तुम अगर मंदार की बात सुन लेती तो उसके बारें में भी यही कहती.. मंदारभी मुझे और आरीफ को मार सकता था.. इतना तो मैं जानती हुं के वो दोनों एकजैसी सोच रखते है.. उनके बीच कुछ तो बडा कांड हुआ है.." मनू अजूनही गहन विचार करत बोलत होती.

अचानक आरीफबद्दल आठवून तिने त्याला फोन केला. त्याच्याकडून तिने नसीरच्या खुनाविषयी सगळी माहीती काढली. आरीफच्या म्हणण्याप्रमाणे नसीरचा खुन मदनने केला असल्याची दाट शक्यता होती. कारण बाथरूममध्ये मदनच पहीला दिसला होता. त्याच्यामागून डिग्री गेला होता. त्यांचं तिथं झालेलं संभाषण आरीफने तपशीलवार मनूला सांगितले. शिवाय पोलिस आल्याची अफवा आपणच उडवल्याचंही त्याने मनूला सांगितले.

"हुश्श्... म्हणजे पोलिस आले ही अफवा होती तर.." मनूने आरीफला विचारले.

"हा.. बिलकूल..पर तुम यहा कैसे..?" पलीकडून आरीफने काळजीपूर्वक विचारले.

"मुझे यहा आना पडा.. पर अच्छा ही हुआ.. नसीरका खुन हुआ वहा मंदार के कोई निशान या फिर वॉशरूम में कोई हरकत हुयी थी क्या..? तुम तीनों के अलावा और कोई वहा पर था या नहीं ये देखा था क्या..?" मनूने ऊत्सकतेने विचारले.

"शिट् मुझसे बहुत बडी गलती हो गई है... उस खुन के चक्कर में मैं तो बिल्कूल हक्काबक्का रह गया.. मैंने बाकी चीजों पर ध्यान भी नहीं दिया.." आरीफ पश्चात्ताप व्यक्त करत म्हणाला.

"अब वापस वहा मत जाना.. बाहर से ही कुछ पता चदे तो देख लेना.. आरीफभाय, और भी बहुतसी बातें पता चली है.. सब मिलकर बताऊंगी.. फिलहाल बस आपको मंदारसे मिलकर उसके पास कुछ पैसे वगैरह है या नहीं ये पता लगाना है.." मनूने आरीफला मौसमच्या पन्नास हजार रूपयांबाबतची माहीती दिली.

मनूने मंदारपासून हुशारीने वागण्यास सांगितले. त्याला डाऊट येईल असे काहीच आपल्याला करायचे नाही, शिवाय मनामध्ये त्याच्या प्रत्येक हालचालीवर डाऊट ठेवूनच तपास करायचा यासंबंधीच्या सुचनांची देवाणघेवाण करत आणि बार मध्ये आपण येत असल्याची खबर देत मनूने फोन ठेवला. तसेच तिने मेहजबीनचे आभार मानत तिला जबाबदारीतून मुक्त करत खाली जाण्यास सांगितले.

क्रमशः