Dominant - 7 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 7

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

डॉमिनंट - 7

डॉमिनंट

भाग सात

डॉमिनंट भाग सहापासून पुढे....

रूममध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. कुणीही कसलीच हाचचाल करत नव्हते. मेहजबीन शांतपणे बेडच्या डाव्या अंगाला कोपरा पकडून बसली होती. चंदू अकस्मात् परीस्थिती त्याच्या बाजूने वळवून देणार्या संधीची वाट पाहत होता. दरवाज्यातील व्यक्ती भावनाशून्य होत चंदूला न्याहाळत होती. त्याची ती भेदक नजर चंदू आणि मेहजबीन दोघांनाही खायला उठत असल्यासारखे त्यांच्या चेहर्यावरून वाटत होते.

न राहवून एकदाचे काय ते फायनल होऊनच जाऊ दे या अनुषंगाने चंदूने तोंड उघठले.

"कोण आहेस तू.. आणि काय पाहीजेय तुला..?"

"मी कुणीही असो काय फरक पडतो.."

"मग इथं कश्याला आलायस.. आम्हाला मारायला..?" पुढची शक्यता मनात धरत चंदूने विचारले.

"नक्कीच तुला मारायला.. तु हीच्यासमोर काही ओकला असशील तर चिडून मी तुला मारणारच आहे आणि जर तू अजून काही सांगितले नसशील तरी तू भविष्यात माझ्यासाठी धोकादायक ठरणारच आहेस.. म्हणून या ना त्या कारणाने मला तुला मारावं तर लागेलच..."

"एयं हिरो.. तू काय बरळतोयस मला कायच कळत नाहीयं.. कसलं.. काय.. कुणाला सांगायचं..? आणि हीला सांगितलं तर म्हणजे...? ही कोण पोलिस आहे का..?" (मेहजबीनकडे इशारा करत) चंदूने जरा आवाज चढवतच त्याला विचारले. चंदूला खरंतर कळतच नव्हतं की आता ही नसती भानगड कुठून वर आली.

"ती कोण.. (समोरचा व्यक्ती हसु लागला).. ती कोण.. ते तिलाच विचार.. जगात मूर्ख माणसांची कमी नाही.. आणि त्यातलाच तू एक अतिमूर्ख इथे या रूममध्ये येऊन हीच्या जाळ्यात अडकलायंस.."

"काय..." चंदू जवळजवळ हडबडला.

त्याच्या मनात एकावेळी दरवाज्यातील व्यक्ती आणि मेहजबीन दोघांविषयी अविश्वास वाटू लागल्याचे दिसत होते.

"कसं शक्य आहे.. (चंदू मेहजबीनकडे पाहत) तुझी माझी काय दुश्मनी..?"

दरवाज्यातील व्यक्तीने सर्व प्रकार कथन केला. चंदू बारमध्ये आल्यापासून ते मेहजबीनशी त्याची खाली झालेली भेट, त्यानंतर तिने कॉल करून कुणालातरी बोलावून घेणे आणि त्यांचे या रूमवर येणे सगळ्या बाबींवर अत्यंत सफाईने त्या व्यक्तीने पाळत ठेवली होती.

चंदूने मेहजबीनचा फोन तिच्याकडून अक्षरशः हिसकावून घेतला. आणि तो रिसेंट डिटेल्स् चेक करू लागला. मॅसेजेस मधला तो मॅसेज त्याने उघडला आणि तिने शेअर केलेला त्यांचा रूम नंबर आणि लोकेशन त्याला दिसला.

चंदू मेहजबीनकडे रागात पहात होता. त्याचं माथं साफ भडकलंच होतं तिच्यावर. च्यामायला.. ह्या भिक्कार रां*ने आपल्यासोबत असा गेम करावा.. हा प्रकारच त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडला होता. आणि तिच्यावर आपला रोष काढण्यासाठी तो आसुसलेला वाटत होता.

मेहजबीन अजूनही शांत बसून त्यांचे संभाषण ऐकत होती. अशापरिस्थित कसलंही स्पष्टीकरण देण्यासाठी तोंड उघडणे तिच्यासाठी सोईस्कर नव्हते. तिला माहीत होते एक हलकीशी चूक आणि त्या दोघांपैकी कुणीही तिचा जीव घेतला असता. जोपर्यंत वेळ मारून नेता येईल तोपर्यंत गप्प बसून राहण्याशिवाय आणखीन कुठला पर्याय शिल्लक होता तेव्हा..?

एका बाजूला हिंस्त्र श्वापद आणि दुसर्या बाजूला कठोर काळजाचा शिकारी यांच्यामध्ये अडकलेल्या सावजासारखी तिची अवस्था यावेळी होती. त्यावेळी सावजाला सरंडर केल्याप्रमाणे डोळे मिटून गप्प बसावंच लागतं. कुणास ठावूक कदाचित गप्प राहिल्याने येणारा मृत्यु कमी त्रासदायक होईल. किंवा शांत राहील्याने आपला जीव तरी वाचेल. तिनेही डोळे बंद केले.. कुठूनतरी कुणीतरी यावं आणि आपण अलगद यातून बाहेर पडावं या आशेने ती वाट पहात होती.

चंदूने तिच्यावर धावून गेला आणि सटासट् चार-पाच कानसुडात खेचून दिल्या.

"हरामखोर.. साली.. छि**...."

हळूहळू त्याचा जोर वाढू लागला आणि तो तिला लाथाबुक्क्या मारू लागला..

मेहजबीन वेदनेनं कळवळू लागली..

आता तर मृत्यू अटळ झाल्याप्रमाणे परीस्थिती झाली होती. चंदू तुफान पिसाळल्यासारखा तिच्यावर तुटून पडला होता. जर मरायचेच आहे तर असे का मरावे.. प्रतिकार करणे आता निकराचे झाले होते..

नाहीतर त्याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाल्ल्यानंतर कदाचित प्रतिकार करणेही आवाक्याबाहेर जाईल.. तिच्या मनात विचार आला.

जेव्हा सुटकेचा दुसरा कोणताच मार्ग दिसला नाही तेव्हा भिती झुगारून तीने चंदूवर प्रतिहल्ला चढवला. अचानक तिचे हात चालू झाल्यामुळे चंदू एकदोन क्षण हबकला.. आणि तिनं त्याच्या त्याच एकदोन क्षणांच्या निष्क्रीयताचा फर्स्ट ॲडव्हान्टेज् घेत त्याला जमेल तसं मारायला सुरूवात केली.

सपासप् पडू लागलेल्या फटक्यांनी चंदूला काही सुचेनासे झाले. टाळ्या वाजवून कडक झालेल्या तिच्या तळहातांचे फटकार् त्याच्या चेहर्यावर खोलपर्यंत वेदना दित होते. त्याला मारत सावरत उठून तिने गुडघ्यांना हत्यार बनवत जीव खावून त्याच्या पोटावर वार केला.. आणि चंदूचा तोल जावून त्याचं डोकं पहीले बेडच्या कोन्यावर आणि पुढच्याच क्षणी खाली जमिनीवर आदळले. अक्षरशः डोक्यात झिणझिण्या आल्यासारखे झाले त्याला..

दरवाज्यातली व्यक्ती अजूनही तिथेच उभी राहून तमाशा पाहत होती. चंदू खाली पडताच मेहजबीन थांबली. खुप वेळापासून सुरू असलेल्या गोंधळात अचानक कुणीतरी येऊन 'स्टॅच्यू' म्हणावं आणि एकसाथ सगळं काही शांत व्हावं असं काहीसं तिथं घडलं.

"च्च्....च्च्...च्च्...च्च्... छ्या.. एका हि**कडून मार खाल्लास.." हातातलं पिस्तूल समोरच्याला दिसेल असं दाखवत दरवाज्यावरची व्यक्ती म्हणाली.

"मार तीलाऽऽ.. गोळी मारऽऽ.. तु बोलशील ते मी करीन.. पण आता तीला मारऽऽ.. मला डोळ्यासमोर ती जिवंत नकोयऽऽ.." चंदू अडखळत त्याला विनवणी करत आपली शुद्ध हरपत होता.

"अरे मग कश्याला पुढेपुढे करत शहाणपणा केलास.. मला ना सुरूवातीपासूनच असल्या मारझोडीसारख्या फाल्तू गोष्टीत अजिबात इंट्रेस नाही. आपला हिसाब एक ट्रिगर दाबला आणि खेळ खल्लास्... मी तीला मारणारच होतो.. तु उगाचच हिरी बनायला गेलास्..." दरवाज्यावरील व्यक्ती आपल्या कुल ॲन्ड काल्म् आविर्भावात म्हणाली.

मेहजबीन आणि दरवाज्यावरची व्यक्ती यांमध्ये रूमच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंतच अंतर होतं. शिवाय दोघांच्या मध्ये बेडचीही अडचण होती. अश्यावेळी खरंतर तिनं त्याच्यावर झेप घ्यायलाही कमी केलं नसतं. पण त्याच्याकडच्या पिस्तूलामुळं तो सरस होता. आणि ती त्याच्या जवळ पोहचेपर्यंत त्याने पिस्तूल चालवली सुद्धा असती.

"अरे.. पर साहब मेरेको मारके आपको क्या मिलेगा ना.. मैंने क्या बिगाडा आपका..?" मेहजबीन त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली.

"सुकून... सुकून मिलेगा मुझे.. मैं जानता हुं कोई तो है जो मरेमुर्दे जगाने की कोशिश में लगा है.. और तुम उसका साथ दे रही हो.. आज तुम लोग इस तक पहुंच गये हो.. कल को इसके साथीयों तक भी जा सकते हो.. और यही मैं नहीं चाहता.. जो कुछ उस लॉज पे हुआ.. मैं वहा से जुडे हर सबूत को मिटा दुंगा.. तुम बेफिक्र होकर उपर का रास्ता देख लो.. तुम्हारे बाद (खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या चंदूकडे पाहत) मैं इस नामर्द को भी मार डालूंगा और फिर इसके साथियों को भी.." दरवाज्यावरच्या व्यक्तीने असं बोलत बोलतच विकट हास्यानं जल्लोष केला.

त्यानं हातातल्या पिस्तूलाची पकड घट्ट केली आणि मेहजबीनवर ताणून धरलं.

"अम्म् म्म... मतलब्.. मौसमको तूने मारा है..?" मेहजबीनने त्यापरीस्थितीतही कुतुहलाने विचारले.

"नहीं... मैंने किसीको नहीं मारा.. और ना ही मैं ये जानता हुं के वहा हुआ क्या था.. पर तुम अब मरनेहीवाली हो तो जानलो.. वहा जो कुछ होनेवाला था वो मेरा ही प्लॅन था... पर अफसोस ये नाकारा और इसका महाचू** भाय अपना काम ठिकसे नहीं कर पाये... और खामखां किसीकी जान गई.. इनफॅक्ट मैंने तो इन लोगों को पहले ही बोला था की पुलिस तक बात नहीं जानी चाहीये.. खैर अब सबको मारके मुझे उनकी गलतियों की सजा तो देनीही पडेगी.. कल किसीभी एक की वजह से पुलिस मुझतक नहीं पहुंचनी चाहीये.." त्याचा बोलण्यातला टोन अजूनही कमालीचा थंड होता.

"मुझे मत मारों.. मैं किसीको कुछ नहीं बताऊंगी.." मेहजबीन विनंती करू लागली.

"अरे यार.. मुझे कोई खुशी नहीं हो रही तुम्हें मारने में.. पर क्या करें, (दिर्घ श्वास घेत) मरना तो तुम्हें पडेगा.." त्यानं स्पष्ट केलं आणि पिस्तूल चालवायला तो सज्ज झाला.

ट्रिगरवरची त्याची बोटं हालचाल करणारच होती की कसलातरी जबरदस्त आघात त्याच्या हातावर झाला. त्या आघातानं तो थोडा तोल जाऊन काहीसा धडपडला आणि त्या गडबडीत त्याचं पिस्तूल खाली जमिनीवर पडलं. थोडीशी झटापट झाली आणि तेवढ्या वेळातही त्याचं लक्ष मागून कुणी हल्ला केलाय ते न पाहता, खाली जमिनीवर पडलेल्या पिस्तूलाकडेच त्याचे हात सरसावले.

ते पिस्तूल अगदी त्याच्या हातात येणारच होते की मागून कुणाच्यातरी लाथेने ते अजून पुढे फेकले गेले. मेहजबीनने पाहीले.. साक्षात मृत्यू तिला नुकताच स्पर्श करून गेला होता. पण आता ती सेफ होती. जिची वाट ती इतक्या वेळापासून पाहत होती त्या मनूने रूममध्ये प्रवेश करत तिथली सुत्रं आपल्या हातात घेतली होती.

मनूच्या त्या हरकतीने चिडून त्या व्यक्तीने तिचे पाय धरून खेचण्याचा प्रयत्न केला. पण मनूच्या चपळाईमुळे तो प्रयत्नही साफ फोल ठरला. ती व्यक्ती सावरून उठेपर्यंत मनू त्याच्या पालथ्या अंगावर बसली होती. वरून दोन-चार ठोसे पडताच त्याचा प्रतिसाद थंड पडू लागला. मनूने शक्य तितका तिला चोप देऊन त्याला नमवले. भलेही ती स्त्री असली तरी तिने चातुर्याने ताकदीशी मिलाप करत त्याला गार केले होते. युद्ध फक्त ताकदीने जिंकले जात नाही त्यात बर्यापैकी चतुराई, जलद निर्णय, आणि काहीवेळा कुटनितीचा वापर करावाच लागतो.

"मग महाशय.. खेळून दमला असाल तर सांगण्याचं कष्ट कराल का की हे सगळं कश्यासाठी..? नाही.. म्हणजे मघाशी बाहेरून थोडंफार ऐकलंच आहे पण मला पूर्ण माहीती हवीयं.. हे सर्व का केलंस.. मौसमला मारण्यात तुझाच हात असणार.., हो ना..?" मनूने आवाजात जरब दाखवत विचारले.

"फॉर गॉड सेक्.. बंद करा हे मौसम पुराण.. मी कुणाला सांगितलं नव्हतं मौसमला मारायला.. तिचा खुन का झालाय मला नाही माहीत.." चवताळलेली ती व्यक्ती मनूच्या तावडीतून सुटण्यासाठी हिसके देत होती. पण मनूनेही त्याला आपल्या विळख्यात घट्ट पकडून ठेवले होते.

"मग मंदारला कोलह्पूरहुन इथे का आणलंस..?"
मनूने त्याला अजूनच दाबत विचारलं.

पण तिच्या त्या प्रश्नाने त्याचं हिसके देणे थांबलं. नुकतच एखादं वादळ येऊन जावं आणि अचानक एकाएकी आसपासचं वातावरण स्तब्ध होऊन जावं. तसंच सन्नाटा पसरल्यासारखी शांतता त्या रूममध्ये पसरली. आपण काही विक्षिप्त तर नाही ना विचारलं असं काहीसं मनूच्याही मनात एकवेळ आलं. छेऽऽ.. तीनं तर सरळ मुद्द्याला हात घातला होता.

खाली पडलेली व्यक्ती काहीच प्रतिसाद देत नव्हती.

ते पाहता मेहजबीनने उठून पुढे गेलेली पिस्तूल उचलली आणि मनूकडे देत म्हणाली,

"ये साला ऐसे नहीं बोलेगाऽऽ.. पक्का क्रिमिनल है ये..."

तिच्या बोलण्यातला रोख मनूने ओळखला. ज्याअर्थी हा बिनधास्त पिस्तूल घेऊन फिरतोय त्याअर्थी नक्कीच हा कुणी छोटामोठा गुन्हेगार नसणार, आणि तसं असेल तर याच्याशी शक्य तितक्या लवकरात लवकर ठिल करून माहीती काढणं आवश्यक होतं.

मनूने पिस्तूलाचा निशाना त्याच्यावर लावत त्याच्यापासून चार हात मागे जाणं पसंद केलं. आणि धमकावत त्याला बोलतं होण्यास प्रवृत्त केलं.

मनू मागं जाताच थोडंसं धडपडत तो उठला. तिच्याकडून वळून त्यानं अवकाश घेतला आणि बोलू लागला..

"मी विक्रमऽऽ..."

त्यानं स्वतःचं नाव सांगताच मनूचं लक्ष त्याच्या मानेवरच्या दाट बोल्ड आणि वळणादार इंग्रजी अक्षरातल्या 'V' कडे गेलं. त्यानं मध्येच कुठल्याही बेसावध क्षणाचा फायदा घेऊ नये म्हणून मनू त्याच्यावर पिस्तूल रोखूनच होती. पण तो मात्र त्याच्या मूळ अॅटीट्यूडप्रमाणेच काल्म झाल्यासारखा बोलत होता.

विक्रम पूर्वी एका एन जी ओ सोबत काम करायचा. गावाखेड्यातल्या स्त्रीयांना त्यांच्या समस्या आणि हक्क यांविषयी लागणारी मदत त्या एन जी ओ मार्फत मिळायची. विक्रम मुळात पैश्येवाल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलेला होता. आणि त्याच्या म्हणण्यानुसार ते काम तो फक्त सामाजिक जाणिवेतून करत होता.

चार वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापूरजवळच्या गावी तो गेला होता. तिथंच मंदार आणि त्याची भेटही झाली होती. सुरूवातीला झालेल्या मैत्रीचे एके दिवशी अचानक दुश्मनीमध्ये पर्यावसन झाले. नेमके काय घडले होते, ते फक्त विक्रम आणि मंदारमध्येच होते.

पण काही दिवसांतच मंदारने विक्रमला गावातील स्रीयांच्या नियमभंगच्या आरोपाखाली गावकर्यांकडून जबर चोप दिला होता. अक्षरशः मरता मरता विक्रम त्या जीवघेण्या प्रसंगातून वाचला होता. एक-दोन दिवस शहरातील वर्तमानपत्रात विक्रमची बरीच बदनामीदेखील झाली होती.

"माझं काम त्या गावातल्या स्त्रीयांशी निगडीत होतं. मग साहजिकच मला त्यांच्यासोबत राहावं लागायचं. पण मी कुणा स्रीकडे वाकड्या नजरेनं पाहीलं नव्हतं. मंदारने मला उगाचच नसत्या प्रकरणात गोवलं आणि माझी नको तितकी बदनामी झाली.. हे सगळं मी कसं सहन केलं माझं मलाच माहीत.. पण मनात फक्त आणि फक्त एकच विचार होता.. मंदारच्या बदनामीचा.. आणि चार वर्षांनंतर आता मी हा प्लॅन बनवून त्याला पुरता अडकवलाच आहे. तो फक्त पोलीसांच्या हातात येणं बाकी आहे आता..."
विक्रमच्या डोळ्यात मंदारविषयीचा राग झळकत होता.

"हा.. पण असं काय झालं होतं तुमच्यात की.. तुम्ही एकमेकांशी वैर पत्करलंत.." मनूने ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पण बाहेरून येणार्या चाहुलीने त्यांचा विषय बहुधा तिथंच अर्धवट राहणार होता.

बाहेर कुणाच्यातरी धडाधड पळण्याचा आवाज येत होता. एक-दोन लांबून येकू येणारे आवाज..

"पुलीसऽऽ..."

"पुलीसऽऽ..."

"रेड पड गयी हैऽऽऽ...."

"खूनऽऽऽ..."

"खून हुआ हैऽऽऽ...."

लॉजच्या चिंचोळ्या आणि काहीश्या बंदीस्त कॉरीडॉरमधून त्या आवाजांचे प्रतिध्वनी घुमत होते.

आणि आत रूममध्ये एका कोपर्यात मेहजबीन.. बेडच्या अलीकडल्या बाजूला विक्रम.. त्याच्यावर अजूनही पिस्तूल रोखून उभी असलेली मनू.. आणि बेडच्या पलीकडल्या टोकाला नुकताच शुद्धीवर येऊ पाहत असलेला चंदू... बाहेर काय सुरू आहे हे कळायला थोडा अवकाश तर लागणारच होता. पण तिवढ्या वेळात पोलिस तिथं पोहोचले तर रूममधलं वातावरण बघून यांना पकडणारच हे निश्चित होतं.

पण मुळात पोलिस तिथं आलेच कसे..? हा प्रश्न होता. कारण एरवी त्या बार आणि लॉजकडे पोलिस मुद्दाम कानाडोळा करत असत. म्हणजेच आज कुणीतरी खास टीप दिल्याची शक्यता दिसत होती. विक्रमने ते ओळखले. पण मनूच्या हातात त्याच्यावर रोखलेले पिस्तूल असल्याकारणाने तो झटपट हालचाल करू शकत नव्हता. जे काही करायचे ते मनूला विश्वासात घेऊनच करावे लागणार होते.

आणि त्याने त्याअनुषंगाने आपले फासे टाकण्याचे ठरवले...

क्रमशः