किती वेंधळी आहेस तु एक काम धड करनार नाहीस, चेतनचा स्वर सकाळी सकाळी चढला होता, तस प्रियाला हे काय नविन नव्हत.
चेतन आणि प्रियाच लग्न ६ महिनापुर्वी झाल होत, अशा वेळी लग्न काढल होत की लग्नासाठी जेमतेम सुट्टी भेटली होती त्यामुळे कुठ फिरायला जायचा प्रश्नच येत नव्हता, त्यात लगेच कामावर रुजु झाले साहेब आणि एकदा कामावर रुजु झालं म्हणजे कसल फिरण आणि कसल काय,
चेतन तस राञी उशीराच घरी येत होता, हवा तितका वेळ प्रियाला देता येत नव्हता, कामाच टेंश्नन, रागीट स्वभाव त्यामुळे दोघांमधे प्रेम कमी आणि वाद जास्त होत होत, आणि अर्थात सुरवात चेतन कडुन होत होती, पण प्रिया समजुतदार होती त्याची परिस्थीती समजुन होती कामाचा ताण तिला कळत होता, त्याची सर्व काळजी घेत बायको आणि सुन या दोन्ही जवाबदारी अगदी हसतमुख चेहर्याने पार पाडत होती तरी आतुन कुठ तरी खंत होतीच आणि तिची ही खंत तिचा सासू पासुन काय तिला लपवता येत नव्हती शेवटी सासू पण एक स्ञी होती, सुनेच्या मनातली घालमेल त्यांना समजत होती पण मुलाच्या स्वभावामुळे त्या पण हतबल होत्या,
हे अंसच सुरू होत आणि एक दिवस संध्याकाळी एक बातमी वार्यासारखी पसरत होती, ती म्हणजे कोरोनाची, वुहान मधुन आता इतर देशात देखील कोरोना पसरत असल्याची बातमी ऐकुन सर्व चांगलेच घाबरले होते, कारण चिनची परिस्थीती काय कोणापासुन लपुन नव्हत, आणि शेवटी भारतात पण त्याचे परिणाम दिसले आणि सरकारने लाॅकडाऊन घोषित केला, सर्वकाही जागच्या जागी थांबल होत, चेतनाला देखील घरुनच काम कारायला सांगीतले आणि दुसर्या दिवसा पासुन त्याच वर्क फ्राम होम सुरु झालं,
आता दोघांना वेळ मिळणार होता एकमेकांना समजुन घेण्यासाठी अशी घरच्यांना वाटत होत, पण चिञ जरा वेगळच दिसत होत चेतनची चिडचिड जास्तच वाढत होती, घरातील किलकील मुळे त्याला काम करता येत नव्हत आणि घरातुन काम करण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता,
पण ते बोलतात ना कर्म कर फल की चिंता मत कर तस काही प्रियाचा बाबतीत घडल त्याची आज चिडचिड कुठ दिसत नव्हती, राग राग करत नव्हता, त्याची नजर आज फक्त शोधत होती ती प्रियाला, त्याच लक्ष कामात कमी प्रिया कडे जास्त होत, आणि हे तिचा लक्षात आल होत, पण ती देखील मुद्दाम दुर्लक्ष करत होती शेवटी बायकोच ना ईतक्या सहज कस समजु देईल ती पण, दिवस असाच गेला त्यामुळे काम काय आज झाली नव्हती म्हणुन राञी उशीरा पर्यंत काम सुरू होत त्यामुळे तो टेबल वरच डोक टेकुन कधी झोपला हे समजलच नाही त्याला, त्यामुळे त्याची आजची संधी हुकली होती,
सकाळी प्रियाला जाग आली तर चेतन बेडरुम मधे नव्हता, सकाळी सकाळी कुठ गेलेत हे, हा विचार करत असतांनाच चेतन समोरुन तिचा साठी चहा आणि स्वता साठी काॅफी घेऊन येतांना दिसला आणि प्रियाला शाॅकच बसला हे सर्व तिला अनपेक्षित होत, घे गरमा गरम चहा, चेतन तिचा हातात चहा देत बोलला, आणि तिचा शेजारी जाऊन बसला,
चहाचा एक घोट घेतेना घेत तोवर "स्वारी" अस तिचा कानावर पडले तिने चेतन कडे पाहिल तर काॅफीचा हातातला कप टेबलवर ठेवत आपले कान धरुन तो प्रियाचा समोर उभा होता, प्रियाला काही कळत नव्हत काय चाललय ते, तिने पटकन त्याचे हात खाली केले आणि कशाकरता स्वारी म्हणुन विचारल,
चेतनने तिचा हात आपल्या हातात घेतला, मी खुप वाईट वागलो तुझा सोबत, खुप ञास दिला, चिडचिड केली, रागवलो विनाकारण त्याच बोलण एेकुन तिला हसु येत होत पण ती स्वताला आवरत त्याच बोलण एेकुन घेत होती, तु दिवसभर घरी असते काही काम नसत आणि आम्ही दिवसभर राबत असतो, कामावर बडबड एेकतो, आणि घरी आलो की तो राग घरच्यांवर निघतो, पण तु कधी उलट बोलली नाहीस, किंवा वाद घातला नाहीस नेहमी समजुन घेतल मला ते जमल नाही, कधी तुझा चेहर्यावर थकवा दिसत नाही, ज्या महिला घर आॅफिस दोन्ही करता त्यांचे किती हाल होत असतील धावपळ होत असेल तरी त्या कधी कसली तक्रार करत नाही, मी घरी ऊशीरा येतो जेवन केल की थकलो असल्यामुळे कधी झोप लागते कळत नाही, त्यामुळे तुझी ही धडपड कधी दिसली नाही, पण या कोरोना मुळे मला वेळ मिळाला आणि तुला किती काम असतात आईला किती काम असायची ते समझल दिवस संपतो पण तुमची काम नाही, पण तुमची कधी तक्रार नसते, या पुढे मी तुला नेहमी मदत करेल जसा वेळ भेटेल तसा.
बस् बस् साहेब आज प्रेम जरा जास्तच ऊतु जातय प्रिया लाडक्या स्वरात बोलली, आणि दोघ हसु लागले, आणि कामाचं बोलत असाल तर आज कांदे तुम्ही चिरुन द्या आणि दळण पण आणायच आहे, पाणी पण भरायंच आहे, तुम्ही काय करणार यातल सांगा, चेतनचा चेहरा कारल खाल्ल अस झाल होत ते पाहुन प्रियाला हसु आवरल नाही, तुम्ही बोललात तेवढच खुप झाल प्रियाने उत्तर दिल,
बरं तसा चहा चागंला करता तुम्ही, मला कसला येतोय चहा करता ते आईने सांगितल आणि मी तस चहा साखर टाकली आणि आईने सांगितल तितका वेळ उकळु दिला, चेतनच हे बोलन एेकुन प्रिया असा चेहरा केला जणु ३० फुटाचा अजगर पाहिला असावा, काय आईला माहितीये की तुम्ही माझ्या साठी चहा केला ते आई ओरडतील मला आता आणि वहिणी आणि ननंदबाई तर चिडवुन चिडवुन हैरान करतील मला, काही नाही बोलनार आई चेतन बोलला तितक्यात बाहेरुन ननंदबाईचा आवाज आला,
PM आणि CM साहेबांनी घराबाहेर पडु नका अस सांगीतल आहे, बेडरुम बाहेर पडु नका अस सांगितल नाहीये, आणि घरात एकच हासु पसरले, प्रिया चेतनचा हात सोडवत बाहेर आली सर्व बाहेर पाहुन ती अजुन लाजली, वहिणी तुम्हाला तर काय आता रोज बनवुन तयार चहा भेटनार बुवा आमच काय होणार काय माहीत, प्रिया लाजत किचन मधे गेली, मागुन सासुबाई आल्या आणि त्यांनी नेहमी अशीच हसत रहा म्हणत प्रियाचा डोक्यावरुन हात फिरवला माञ या वेळी प्रियाचा डोळ्यातुन अश्रु आले, आणि प्रियाने आई म्हणत मिठी मारली.
©प्रशांत सुनिता अशोक मराठे.
( पुणे)