अमेयने नवीन नोकरी शोधायचे ठरवले .जिथे आपल्याला ह्या कामापेक्षा जास्त पैसे मिळतील . आता त्याची मुंबई मधे बऱ्या पैकी ओळख झाली होती . त्याने एक दोन जणांना त्याच्या नवीन नोकरी बदल सांगितले .आणि त्याने सुट्टीच्या दिवशी नवीन नोकरी शोधायचे ठरवले .झाल , अमेयचा दिनक्रम बददला , ईतर दिवशी मोबाइलच्या दुकानावर काम करायचे , आणि सुट्टीच्या दिवशी , नवीन नोकरी शोधायची .आता अमेय दिवसरात्र मेहनत करू लागला .कधी कधी , त्याला खूप कंटाळा यायचा , कधी कधी काम करून तो दमून जायचा , कधी कधी त्याला घरची आठवण यायची .पण फोन साठी जास्त पैसे खर्च करणे ही त्याला शक्य नव्हते .आणि गावी जाऊन आई वडिलांना भेटून येणे ही , त्याला परवडणारे नव्हते .
पण म्हणतात ना परीस्तीथी माणसाला सगळ शिकवते तेच अमेयच्या बाबतीत झाले होते. त्याने ते जगण स्वीकारले होते .
ईतर दिवशी काम आणि सुट्टीच्या दिवशी नोकरी अस अमेयने महिनाभर न थकता केल , महिन्याने त्याला एका ऑफीस मधे नोकरी मिळाली . पगार जास्त नव्हता .पण त्याच्या आधीच्या कमापेक्षा दोनशे रुपए वाढवून होते . आणि ते काम ही अमेयला फार आवडले होते . त्यानी ते काम करायचे ठरवले .
दुसऱ्या दिवसापासून अमेय नवीन कामावर जाऊ लागला . तिथे ही तो मन लावून काम करत होता .खूप मेहनत करत होता . त्याने आता थोडेसे पैसे वाचवून पुन्हा बारावीची परीक्षा द्यायची ठरवली .त्याने तशी तयारी ही चालू केली . तो दिवसभर काम करत होता . आणि रात्री दिव्यावर अभ्यास करत होता .लाइट जाळली की , त्याची मामी त्याला ओरडायची . पण अमेयचा मामाचा मुलगा मात्र त्याला अभ्यासात मदत करायचा .आईवडिलांच्या चोरून पैशाची मदत करायचा . हा , पण अमेयकडे पैसे आले की , अमेय ते पैसे देऊन टाकायचा . अमेयला खूप वाटायचे की आपण ही चांगले कपडे घालून ऑफीस मधे जावे .पण हे सगळ त्याच्या खिशाला परवडणारे नव्हते .म्हणून तो गप्पच बसत होते . हे सगळ करताना , मात्र त्याला निशाचा गोड चेहरा आठवायचा . ती कधीतरी अशी अचानक आपल्या समोर यावी अस त्याला वाटायच .पण वडिलांना दिलेले वचन त्याला आठवायच. आणि तो गप्प बसायचा .
अमेयला आता मुंबईत येऊन सहा महिने पूर्ण झाले होते , सहा महिन्यात त्यानी भरपूर कष्ट घेतले होते . भरपूर हालअपेष्टा काढल्या होत्या .पण आता त्याची बारावीची परीक्षा येणार होती . त्याचे कॉलेज गावाला असल्यामुळे त्याला परीक्षा द्यायला गावाला जावे लागणार होते .परीक्षे च्या निमित्ताने घरच्यांना ही भेटता येयील.म्हणून अमेयने गावाला जायचे ठरवले . त्याने पगारातून येणारे थोडेसे पैसे साठवले .कामावरून परीक्षे पुरती सुट्टी घेतली .आणि साठवलेले पैसे घेऊन तो घरी निघाला .मुंबईला आल्यापासून घरच्यांची त्याने जास्त खबरबात सुधा घेतली नव्हती .
अमेय घरी आला .अमेय्ला अस अचानक पाहून अमेयचे आई वडील दोघेही खूप आनंदी होते .अमेय मुंबईला गेल्यापासून खूप गोष्टी घडल्या होत्या .अमेयच्या मोठ्या बहिणीला मुलगी झाली होती .अमेय मामा झाला होता . त्याच्या छोट्या बहिणीच लग्न ठरले होते . आठदिवसात लग्न करून द्या अशी मागणी त्या माणसांनी घातली होती . त्यानी हुंडा वेगेरे काही मागितला नव्हता .पण लग्न तर करून द्यावेच लागणार होते .अमेयच्या वडिलांना आजाराने ग्रासले होते .त्यामुळे त्याना आता जास्त काम होत नव्हते . शिवाय त्याच्या दवाखानासाठी ही पैसे लागत . अमेय आल्यापासून त्याच्या आईने हे सगळ सांगायला सुरवात केली होती .अमेय कसा आहे तो बरा आहे की नाही , तो मुंबईत कसा राहिला .हे सगळ कोणीच विचारले नाही .ह्याचे अमेय्ला फार वाईट वाटले .