Breakupnantar - 2 (Last part) in Marathi Love Stories by Hemangi Sawant books and stories PDF | ब्रेकअपनंतर - २ (अंतिम भाग)

Featured Books
Categories
Share

ब्रेकअपनंतर - २ (अंतिम भाग)

मग रोज भेटन व्हायच. त्याच येणं सोबत गुलाब चॉकोलेट. खूप रोमॅंटिक वाटायच सगळं. कधी एक वर्ष झालं कळलंच नाही. छान गेले दिवस. एक दिवस घरी कळलं मग मी ही सांगून टाकले की प्रेम आहे. मुलगा छान आहे. पण मध्ये आली ती जात. हो तीच जी सर्वांच्या प्रेमामध्ये येते. आमच्याही आली. घरच्यांना मनवायचा प्रयत्न चालू झाला. पण शेवटी ती "जात" जिंकली प्रेमा पुढे.



आम्ही दूर राहायचं ठरवलं. पण जोपर्यंत घरचे मूल- मुली बघत नाहीत तोपर्यत सोबत रहायच ठरल. आणि चालू झालं एकमेकां पासून दूर होणं. तो मला इग्नोर करू लागला. आपल्या मित्रांना जास्त आणि मला मात्र थोडाही वेळ नाही द्यायचा. कधी कधी वाईट वाटायचं. त्रास व्हायचा. पण मग एकत्र नाही येणार, मग कशाला त्याला त्रास म्हणून मी गप्प राहीली. मी भेटायचं म्हटल की' त्याच्याकडे वेळ आणि पैसे नसायचे. पण मित्रांसोबत पार्टी, पिक्चरला जायला होता वेळ आणि पैसा.



मी मात्र त्याच्या वेळेत नव्हतेच. सगळीकडून मी मात्र एकटी झालेले. ना कोणी होत बोलायला की, नाही कोणाकडे मी व्यक्त होत होते. एक दिवस त्याचा मॅसेज आला की, त्याच्या घरच्यांनी मुलगी बघितली त्याच्यासाठी. माझ्या तर पाया खालची जमीनच सरकली. रडायला येत होतं पण समोर आई मग काय चेहऱ्यावर मोठी स्माईल ठेवत बाहेर गेले आणि त्याला कॉल केला. त्यालाही नव्हत करायचं मग मीच समजवल की कर. स्वतः साठी नाही निदान आईसाठी लग्न कर.



रडला तोही आणि मी देखील. आणि एक दिवस असाच मित्रांसोबत जातो सांगून गेला. दिवसभरात एक मॅसेज नाही काही नाही. वाट बघुन मी मात्र कंटाळले शेवटी आज बोलायच नाही ठरवलं. त्याचा मॅसेज आला, "कॉल करू का...?" मी मात्र रागात नको असं सांगुन टाकलं. त्याने ही ओके बोलत रिप्लाय केला. गुड नाईट बोलून दिवस संपला.
मी पाठ फिरवली तर तो ही निघून गेला. का...? कशासाठी...? म्हाहित नाही.



मी मात्र अजून ही त्याच वळणा वर त्याची वाट बघत उभी आहे. आज बाहेर खुप पाऊस कोसळतोय त्या दिवसा सारखा, सोबत वीज ही, पण घट्ट मिठी मारायला मात्र जवळच आपल अस कोणीच नाहीये.


अजून ही अबोला तसाच आहे. नाही त्याचा मॅसेज आहे नाही माझा. काल सोबत असलेले आम्ही.., आज मात्र एक-मेकांसाठी अनोळखी झालोय. बस देवाकडे एकच प्रार्थना त्याला सुखात ठेव.


प्रयत्न करतेय मी रोज खुश राहण्याचा पण त्याची आठवण काही केल्या जात नाही. अजून ही वेडी आशा त्याची वाट बघतेय. कदाचित तो येईल त्याच वळणवर भेटायला.
आज मी आणि सोबातीचा पाऊस वाट बघतोय त्याची.....



आपण नेहमी दुसऱ्यांमध्ये आनंद शोधत असतो. त्यांना हक्क देतो आपल्यावर रागवायचा, पण आपणच त्यांना आपल्याला दुःख द्यायचा ही हक्क देऊन बसतो.
आपण आपला आंनद तर त्यांच्या हातात देतोच पण दुःख देण्याचा ही हक्क त्यांच्या हातात नकळत जातो.
काही लोक मनाला लागेल अस बोलुन जातात पण काही जण न बोलतात निघुन जातात लाईफमधून. त्रास होतो जेव्हा आपण एवढा जीव लावायचा एखाद्याला आणि तो काही शुल्लक कारणाने निघुन जातो.

कस असत ना प्रेम. आपण पाठ फिरवली तर ते व्येक्ती ही पाठ फिरवुन निघुन जाते.


लाईफमध्ये खुप लोकं येतात जातात, पण एक वेक्ती नेहमी आपल्या सोबत असते. आपण कधी तिच्यावर प्रेम करतच नाही. नेहमी दुसऱ्यांमध्ये प्रेम शोधत बसतो. नेहमी आपल्यासोबत आपल्याला कोणी ना कोणी लागतेच. पण ती वेक्ती कितीही सोबत असली तरी आपण तिचा कधीच विचार करत नाही. ती वेक्ती म्हणजे.., आपण स्वतःच. सो आधी स्वतः वर प्रेम करा आणि मग दुसऱ्या वर.



******
ढगफुटी व्हावी तसा पडतोय तो पाऊस, पण मनातल्या पावसाचं काय..?
तो पाऊस मात्र अजून ही वाट बघतोय बरसण्याची.
बाहेर तुफान पाऊस आहे,
पण मनातल्या पावसाला.. त्याला काही वाट फुटत नाहीये.
वाटत तो ही मनातल्या सगळ्या भावना बाहेर काढतोय. पण मनातल्या पावसाला बाहेर यायला जमेल अस काही वाटत नाहीये.
पण येईल तो ही बाहेर येईल..... एक दिवस...!

*********
समाप्त