Made for each other - 7 in Marathi Love Stories by Hemangi Sawant books and stories PDF | मेड फॉर इच अदर - ७

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 112

    ભાગવત રહસ્ય-૧૧૨   જીવનો જ્યાં જન્મ થયો-કે-માયા એને સ્પર્શ કર...

  • ખજાનો - 79

    ડર...ભય... ચિંતા...આતુરતા...ને ઉતાવળ... જેવી લાગણીઓથી ઘેરાયે...

  • ભાગવત રહસ્ય - 111

    ભાગવત રહસ્ય-૧૧૧   પશુ-પક્ષીની યોનિમાં અનેક પ્રકારના દુઃખ ભોગ...

  • વિશ્વની ભયંકર જળહોનારતો

    જ્યારે પણ જળહોનારત અંગે વાત નિકળે ત્યારે લોકોનાં મોઢે માત્ર...

  • ખજાનો - 78

    "રાત્રી નો સમય છે, આંદોલન વિશે સુતેલા અંગ્રેજોને જાણ તો થઈ ગ...

Categories
Share

मेड फॉर इच अदर - ७

चहा पाणी घेऊन मानस निघाला. या डेंग्यूमुळे मानस अजूनच मनस्वी च्या जवळ आलेला. गोळ्यांच्या प्रभावामुळे ताप कुठच्या कुठे पळाला होता. त्या गोळ्या खुप स्ट्रॉंग होत्या आणि त्याचा परिमाण म्हणून की काय मनस्वी चे केस गळायला लागले होते. तिला खूप अशक्तपणा आलेला. चेहेऱ्या वरचा ग्लोव कमी झालेला. ती ठीक होत होती पण त्या स्ट्रॉंग मेडिसिनमुळे तिच्या शरीरात बदल होत होते. काही दिवसांनी ती ठीक झाली. आता मानस रोज घरी येऊ लागला होता. छान सर्वांसोबत मिक्स झालेला. असाच एक दिवस तो आलेला तिला भेटायला. मला आज मॅगी खावीशी वाटतेय, तिने मानस ला सांगितले. ते छोट्या बहिणीने ऐकले. आई मनूला ला मॅगी हवीये ती पण जीजुच्या हातची. आईने लगेच किचन मानसच्या स्वाधीन झाले. त्याने सर्वांसाठी मॅगी बनवली. मनस्वीला स्वतःच्या हाताने भरवली. मॅगी खात छान दिवस गेला.




आता त्यांना 'तलाव-पाली' ला जायचं नाही अशी सक्त मनाई होती. मग खूप दिवसांनी मनस्वी बाहेर पडली. आज ते मॉलमध्ये जाणार होते. ते पोहोचले मॉल ला. काही तरी खायचं म्हणून मानस थोडस घेऊन आला आणि गप्पा मारत बसले. "मानस तुझ माझ्यावर अजून ही तेवढंच प्रेम आहे ना आधी होत तेवढ." मनस्वी ने विचाराल.. "का ग काय झालं आज अस का विचारतेस..?" "नाही ते माझे केस आता पुर्वी सारखे नाही राहिले आणि नाही मी." ती दुखी होत बोलली.
मानस हसला,.... "काय झालं हसलास का..?" तिने विचारल. "अग वेडाबाई तुझ्या मनावर प्रेम आहे माझ तुझ्या सौंदर्यावर नाही. तू आधी जशी होतीस ना प्रेमळ, माझ्यावर रागावणारी. मला समजवणारी आणि माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी तशीच मला आवडतेस आजही आणि नेहमीच कळल का...चला खा ते आता आईस क्रीम नाही तर वितळेल." ती खूप भावुक झाली. देवाने तिला खूप छान लाईफ पार्टनर दिला होता आणि ती प्रत्येक क्षणी त्याचे आभार मानत होती.



सगळे जमले होते. घरचे, मित्र-परिवार, आणि यांच्या सानिध्यात त्यांचा साखरपुढा झाला. दोघांचे छान छान फोटो काढण्यात आले. एक फ्रेममध्ये तिची आणि त्याची फॅमिली आणि एक क्लिक. "चांगले फोटो आलेत नाही साखरपुड्याचे," मनस्वी मानसला सांगत होती. मग लग्नात ही हाच बघूया का की दुसरा." "हा नको रे खूपच पैसे सांगतोय आपण दुसरा बघूया तू म्हणशील तसच."




२८ एप्रिल २०१८ स्थळ घाटकोपर. तो स्टेजवर तिची वाट बघत होता. तिच्या जवळच्या लोकांनी तिला आणल. मानस तिला त्या पिवळ्या नऊवारी साडीमधे बघून नव्याने तिच्या प्रेमात पडत होता. आजूबाजूचा आवाज कमी कमी होत बंद झालेला. आजूबानूची लोक ब्लर झाली. त्याला फक्त तीच येणाच दिसत होत. तिच्या पायातील पैंजणीचा आवाज त्याला मंत्रमुग्ध करत होता. तिचा रेखीव चेहरा बघून परत एकदा तो तिच्या प्रेमात पडला. सात फेरे घेत ते आयुष्य एकत्र जगण्याची शपथच घेत होते.




तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तो जगाला जणू सांगतच होता की ही आता फक्त माझीच आहे. फोटोग्राफर फोटो काढत होते. विधी झाल्या. भदजींनी जाहीर केले. "विवाह सोहळा संपन्न झाला." नवीन जोडप्याला सगळे शुभेच्छा देत होते. जेवणाच्या ताटावर मानस मनस्वीला घास भरवत होता. सगळे तिलाही त्याला घास भरवायचा आग्रह करत होते. मैत्रिणी जिजूला त्रास देत होत्या. सर्व उरकून मंडळी घरी परतण्याची तय्यारी करत होते. ऑरेंज शालूमध्ये मनस्वी अजूनच खुलून दिसत होती. मानस ही डार्क ब्लू कोर्ट मध्ये राजबिंडा दिसत होता. घरच्यांची भेट घेत ते निघाले आपल्या नवीन संसाराची नवीन सुरुवात करायला..... अशी ही नवीन सुरुवात प्रेमाची झालेली..




सो तुम्ही ही असच आपल्या जिवलगा वर प्रेम करा. रागवा, चिडा पण बोलण बंद करू नका. कारण भांडणे झालेली बरी. पण न बोलण बर नाही. एक-मेकांना जपा. आयुष्य खूप छान आहे. ते आपल्या जीवनसाथी सोबत घालवा. मनात राग धरून नका ठेवू. आपल्या पार्टनरसाठी तिला/ त्याला आवडेल ते खायला बनवा. एकत्र म्हातारे व्हा. जेव्हा उद्या नातवंडा सोबत फोटो काढताना कवडी लावून आणि चिईझ करताना एकत्र हवेच ना. काळजी घ्या आणि हॅपी रहा.


To be continued