कादंबरी – जिवलगा .
ले- अरुण वि.देशपांडे
---------------------------------------------------------------------------
कादंबरी – जिवलगा..
भाग-२० वा
-----------------------------------------------------------
नव्या सेक्शनची जबाबदारी आणि काम सुरु करून आता जवळपास २ आठवडे होत आले होते ..
‘ नेहाला हे नवे काम ठीक ठीक जमते आहे ,असेच सांभाळून काम करीत राहिले तर
घाबरून जाण्यासारखे काही होणार नाही “,
सगळ्यांनी असे feedback दिल्यामुळे ,
नेहाच्या मनातला आत्मविश्वास चांगलाच जोर धरू लागला होता .
सोनिया आणि अनिता ..वेळोवेळी तिला सांगत असत .
.त्यामुळे कुणाला कसे फेस करायचे ?
याची पण कल्पना येत गेल्यामुळे ..टेन्शन-टेन्शन ! असे जे .वाटले होते ,
तितके घनघोर असे काही झाले नाही , घडलेले नाहीये .
रोज काम संपवून घरी जातांना – नेहा – मोठ्या समाधानाने -सोनिया आणि अनिताला म्हणे –
आजचे काम सुखरूप पार पडले ! खूप हलके हलके वाटते असे झाले म्हणजे .
सोनिया म्हणे-
नेहा –याचे महत्वाचे कारण म्हणजे -काम करण्याची तुझी पद्धत –
ती समोरच्या माणसाला वैतागून टाकणारी नाही.
समोरच्या व्यक्तीशी तुझे वागणे आणि बोलणे ..दोन्ही सोबर असते .
त्यामुळे समोरचा जो कुणी असेल तो तुझ्यावर विनाकारण भडकेल कशाला , ?
लोकांना त्यांचे काम सहजतेने झाले तर ,त्यात समाधानच असते.
असे असून ही -जर कुणी तुझ्याशी वाद घालतोच आहे “ असे दिसले तर अशावेळी अशा भांडखोर
व्यक्तीला तुझ्या ऐवजी इतर लोकच सुनावतील , लोकांना काही सांगायची गरज नसते नेहा .
भारावलेल्या आवाजात नेहा म्हणली –
थंक्स- सोनिया –अनिता – तुम्ही दोघी माझ्यासारख्या न्यू-कमरला खरेच खूप सपोर्ट करता आहात ,
त्यामुळेच मी मोठ्या धीराने काम करू शकते आहे. याचे श्रेय मी तुम्हालाच देते.
आज घरून ऑफिसला जाताना नेहाला हे सारे आठवले ,
ती मनाशीच म्हणाली –
आपण सर्वांच्या बरोबर चांगलेच वागायला हवे ,तरच आपल्याशी सगळेजण नीट वागतील.
सोनिया –अनिता मदत करतात , म्हणून ठीक आहे .
पुढे कधी आपल्याला पण अशीच कुणाला मदत करण्याची तयारी दाखवावी लागेल .
ऑफिसमध्ये आल्यावर ..नेहा लगेच तिच्या सेक्शनकडे जाण्यासाठी निघाली होती ,
तोच ..
सोनियाने तिला – इकडे ये नेहा ..! असे खुणावले ..
अगोदर तर नेहाला काही कळाले नाही , आवाज न देता ..सोनिया असे खुणा
करून का बोलावते आहे ?
काही प्रोब्लेम तर नाही झाला ना ?
मनातल्या मनात नेहा म्हणाली – देवा , सगळ ठीक ठीक असू दे !
सोनियाच्या टेबलाजवळ जात नेहा उभी राहिली ..
खुर्चीकडे पहात सोनियाने “बस इथे ! असे खुणावले .
नेहा खुर्चीत बसल्यावर , सोनिया तिच्याशी अगदी हळू आवाजात बोलू लागली ..
मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक नेहा –
तुझ्या स्वभावाची , तुझ्या कामाची ,वागण्या-बोलण्याची ..सगळ्याची ..
थोडक्यात तुझ्याच परीक्षेची वेळ आज आली आहे ..!
आपल्या मेनबॉसचा मेहुणा – बायकोचा भाऊ .. जगदीश ..
हे जगदीशसर ,बरेच दिवसानंतर ऑफिसमध्ये येत आहे .साहेबांचा मेहुणा इतकीच यांची ओळख नाहीये .
हे आपल्या कंपनीच्या अनेक डायरेक्टरपैकी एक डायरेक्टर आहेत .
त्याच बरोबर ..आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनचा , तसेच ऑफिसच्या स्टेशनरीचा –हाच सर्वेसर्वा आहे.
या दोन्हेकडे काम करणारी सगळी माणसे त्याचीच आहेत .
ऑफिसचे दरवेळी निघणारी सगळी टेंडर “इतर कुणाला कधीच न मिळता ..फक्त जगदीशशेठला मिळत असते “
कंपनी -प्रेसिडेंट ,सीइओ ..म्हणजे आपले बॉस--,आपल्या बायकोच्या भावाला काही बोलू शकत नाहीत ,
नाजूक नाते आहे ना !
याचाच फायदा –हा जगदीशसेठ घेतो . सध्या तरी सगळ्या आर्थिक नाड्या याच्या हातात आहेत
जिथून पैसा मिळेल तिथून पैसा घेत रहाणे ,फक्त हेच त्याचे काम .
त्याचा पावर –गेम “ तो सगळ्यावर चालवतो . त्याची माणसे त्याची कामे करवून घेतात ,
हा अधून-मधून अचानक उगवतो .आणि आपण काय करू शकतो ? याची झलक दाखवतो ,
समोरच्यांना भीती दाखवून -घाबरवून टाकणे याला फार आवडते .
कंपनी याच्याच मालकीची असल्यासारखे हा वागतो ..त्याला ही एक कारण आहे .
आपल्या बोसच्या मोठ्या भावाचा मुलगा ..याचाच जावाई आहे . जगदीशसेठचे एक
स्वप्न आहे ..त्याच्या या जावयाला एक न एक दिवस कंपनी- प्रेसिडेंट बनवणे .
आपल्या बॉसला एकच मुलगी आहे, ती पण खूप उशिरा झालेली ..त्यामुळे ती सज्ञान
होई पर्यंत काय काय होणार ? काही अंदाज नाही.
अशा या परिस्थीतीत जगदीशसेठ आणि त्याचा जावाई ही म्हणजे कंपनी आपल्या बापाची आहे
असे समजून वागत असतात .
आज ही जोडी ..सगळी पेमेंट घेण्यासाठी येणार आहेत . त्यांची माणसे बीलं सबमिट करतील ,
आपण फक्त ती मंजूर करून .कॅश मध्ये देणे ..इतकेच आपले काम .
सगळ काही न बोलता करायचे असते !
जो कुणी काही बोलेल ,त्याची खैर नाही .कारण जगदीशसेठ त्याच्या विरोधी बोलणारा
इम्प्लोयी पुन्हे इथे त्याच्या नजरेसमोर दिसणार नाही ..अशी कायमची व्यस्था करतो.
सोनियांनी सांगितलेले ऐकून घेत नेहा म्हणाली -
बाप रे ,कठीणच आहे ,आणि सर्वांच्या मते मी तर नियमा प्रमाणे काम करते ,आज जर
माझे कुणाशी वाद झाले तर ?
मग - ,आज माझे काही खरे नाही.. नोकरी गेलीच माझी “, असे समजायचे.
तसे नाही नेहा – इतकी पण घाबरून जाऊ नकोस ,
नोकरी जाणे ही काय इतकी सोपी गोष्ट थोडीच आहे ?
त्यात तुझी नेमणूक बिग-बॉसने स्वतः केली आहे , तुला तशी भीती नाहीये आणि
जगदीशसेठ तसा मोठा धूर्त आहे , तू मधुरिमाची कुणी जवळची आहेस हे त्याला नक्कीच
माहिती असणार , आणि बॉस आणि मधुरिमा चांगले फ्रेंड आहेत .हे त्याला चांगले माहिती आहे.
त्यामुळे इतर सामन्य लोकांवर जसा दबाव आणतो , तसे दबाव तुझ्यावर तो आणणार ही नाही .
पण, काय सांगावे ?
..समोरच्या माणसावर आपण कुणी तरी विशेष आहोत ,हे दाखवण्याची त्याला सवय आहे .
आपल्या हातात खूप पावर असल्यामुळे आपण कुणाचे ही काही करू शकतो “, ही भीती दाखवतो ,
त्यामुळे “याच्या नादी लागून ..नसता मन:स्ताप कोण वाढवणार ?
त्या पेक्षा ..आज आलेली ही बला “ निघून जावी ,
म्हणून सगळे ..त्याला घाबरल्यासारखे दाखवतात मग, हा पण खुश होऊन
मिळेल तितके पैसे .खिशात घालून निघून जातो.
शेवटी काय ..? कंपनीला फसवणे , न केलेल्या कामाचे पैसे घेऊन लुबाडणे “ हेच याचे उद्योग आहेत.
आपण काय शेवटी नोकर –माणसे आहोत ..
कंपनीचे पैसे, कंपनीचा माणूस घशात घालतोय ..एका अर्थाने
“कंपनी त्याचीच आहे “. मग आपण कशाला उगीच त्याला खेटा?
कधीतरी येतो ना,
आलेली पीडा हाकलून द्यायची आणि मोकळे व्हायचे.
सोनियाने सांगितलेले ऐकून घेत नेहा म्हणाली ..
हे सगळं ठीक आहे , पण , तो जी कामे करवून घेतो , पेमेंट घेतो ..वरकरणी तरी ती बरोबर
आहेत , चुकीची नाहीत “याची तरी काळजी घेतो की नाही ? ऑडीट च्या वेळी हे पेमेंट चुकीचे ठरवले
तर आपल्या कडून वसूल करील न कंपनी ?
सोनिया म्हणाली –
नेहा ,
या गोष्टी तर खूप पुढच्या झाल्या , आता आज..तो येईल ..केबिन मध्ये बसेन ,
तुझ्या समोर त्याचा पी ए येऊन बसेल कधी कुणी इतर माणसे येतील
, आणि समोर बिलं ठेवून म्हणतील ..
साहेबंनी सांगितलाय ..याचे पैसे लगेच द्या , त्यांना लगेच मिटींगला जायचे आहे.
त्यांना तू कसे सांभाळशील हा मोठा प्रश्न आहे .
नेहा म्हणाली .. सोनिया – तुला या पूर्वी आलेल्या अनुभवा मुळे तू हे सगळं सांगितले आहे.
त्याचा मला उपयोगच होईल .
पण .... मी सहज सहजी चुकीच्या पद्धतीने काम करणार नाही.
बघू काय होते ते .
सोनिया म्हणाली – नेहा , प्लीज ,एक कर,
गोष्टींना फार ताणून धरू नको , कारण जगदीशसेठ
शेवटी ..सत्तेच्या खुर्चीत्ला माणूस आहे.
आणि आपण ..त्याचे पगारी नोकर माणसे.
तेव्हा ..सांभाळून कर ..जे काय करायचे ते.
thanks- सोनिया – माझ्या विषयी तुझ्या मनात खूप आपलेपणाच्या भावना आहेत.
काळजीपोटी तू हे सांगते आहेस .
तुझी काळजी वाढेल असे मी वागणार नाही . निश्चिंत रहा तू.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात वाचू या –
भाग -२१ वा लवकरच येतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – जिवलगा
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
9850177342
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------