Made for each other - 5 in Marathi Love Stories by Hemangi Sawant books and stories PDF | मेड फॉर इच अदर - ५

Featured Books
  • મારા અનુભવો - ભાગ 24

    ધારાવાહિક:- મારા અનુભવોભાગ:- 24શિર્ષક:- હાહાકારલેખક:- શ્રી સ...

  • ભાગવત રહસ્ય - 163

    ભાગવત રહસ્ય- ૧૬૩   ઘરમાં કોઈ મોટો મહેમાન આવ્યો હોય તો –તેની...

  • રેડ સુરત - 5

    2024, મે 18, પીપલોદ, સુરત સાંજના 07:00 કલાકે પીપલોદના કારગિલ...

  • ફરે તે ફરફરે - 60

    ફરે તે ફરફરે - ૬૦   વહેલી સવારે  અલરોસાની હોટેલમા...

  • સોલમેટસ - 5

    આગળના ભાગમાં તમે જોયું કે રુશી આરવને અદિતિની ડાયરી આપે છે. એ...

Categories
Share

मेड फॉर इच अदर - ५

हळुहळू वेळ पुढे ढकलत होता आणि तिचा बर्थडे जवळ येत होता. मानसने मनस्वीचा बर्थडे कधी असतो हे सोशिअल मीडिया वरून नोट करून ठेवला होता. पुढच्या वीकमधे तिचा बर्थडे येत होता आणि तो त्याला स्पेशल कराचा होता. तसा त्याने प्लॅन ही केलेलाच म्हणा. आता वाट बघत होता तो त्या दिवसाची.



आज तिचा वाढदिवस होता. "वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा," घरच्यांनी तिला विश केल. पण तीच अर्ध लक्ष होत ते मोबाईलकडे अजून त्याने तिला विश केल नव्हत ना....! "त्याला म्हाहित तरी असेल का आज माझा बर्थडे आहे ते, बहुदा नसेल जाऊदे झोपुया." स्वताच्या मनाशी विचार करून ती झोपी गेले.



मानस आज जरा जास्तच लवकर आलेला ऑफिसमध्ये केक आणून त्याने माळ्यावर ठेवला का तर तिला कळल नाही पाहिजे म्हणुन. ऑफिसमधे सर्वांना सांगुन ठेवल होत कोणीही विश करायच नाही. आपण तिला सरप्राईज देऊया. सर्वांना ते पटल आणि त्यांनी तसच वागायच ठरवल. मनस्वी आली तेव्हा सर्वजण आप-आपली काम करत बसली होती जस काही कोणाला म्हाहितच नव्हत की, आज काय आहे. मनस्वीला जरा वाईट वाटलं कोणीच तिला विश करत नाहीये याच. मग तिनेही कोणाला काही न सांगता स्वतःच काम करायचं ठरवलं...



आमिर ने मानसला विचारले.. "अरे तो बॉक्स नीट ठेवलास ना.." हे मनस्वी ने ऐकल. "कसला बॉक्स रे आमिर..?" तिने लगेच आमिरला विचाराल. "अग काही नाही ग असच कामाच विचारात होतो..." कस बस त्याने वेळ मारली. पण मनस्वीला शंका आलेली काही तरी चालू आहे याचं माझ्यापासून लपवून. पण जास्त लक्ष न देता काम करत राहिली.'



"लक्ष्मी मॅम.., तुम्ही तिला तुमच्या जवळ बोलावून घ्या आम्ही बाहेर सगळ अरेंज करतो. आमचं झालं की तुम्ही तिला घेऊन बाहेर या." मानस सर्वांना सूचना देत होता व सगळे त्याच पालन ही करत होते. प्राची मॅमला सांगताना नेमक मनस्वी ने ऐकल आणि तिला सगळा प्लॅन कळला. पण ती अशी दाखवत होती जस काही तिला म्हाहितीच नाही. खुप भरून येत होत तिला कोणीतरी ऐवढ करतय आपल्यासाठी. नकळतच तिच्या डोळ्यात पाणी आल. प्रेम हे असच असत. आपल्या जवळच्या व्येक्तीने केलेली छोटीशी गोष्ट ही आनंद देऊन जाते.



संध्याकाळी टी टाईमला केक कापायचे ठरले. तिचे डोळे बंद करून तीला खुर्चीवर बसवण्यात आलं. मानस केक घेऊन आला पण तोपर्यंत केक वितळत आलेला कारण केक फ्रीजमध्ये ठेवायला तो विसरलेला. "अरे मानस तु केक फ्रीजमध्ये नाही ठेवलास ना बघ तो वितळायला लागलाय" आमिर बोलला. "अरे सॉरी मी विसरलोच. जाऊदे आता असाच कापायला लागेल." यावर सगळेच हसले.. शेवटी त्यांनी तो केक तसाच कापला सर्वांनी मनस्वीला भरवल ही. मानस पुढे येत त्यानेही केक भरवला. आज मनस्वीला तिच्या आयुष्यातल सर्वांत मोठ गिफ्ट मिळल होत. हे बघून नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा पणावल्या. त्याने खुणेनेच विचार असताना तिने फक्त एक स्माईल दिली..



मानस ने विचारल "येऊ का आज सोडायला म्हणजे स्टेशनपर्यंतच येतो." तिने लगेच होकार दिला. दोघे निघाले गप्पा मारत. "थँक्स आज जे केलस ना तस कोणी नाही केलेल माझ्यासाठी." तिने त्याच्या डोळ्यात बघत सांगितलं. "अरे वेडी आहेस का.., त्यात थँक्स काय.. आपल्या माणसासाठीच करतो आपण नाही का..!!" त्यानेही तिला बघत स्माईल दिली. "चला मॅडम घरी वाट बघत असतील." अस बोलताच ती निघाली. घरी देखील तिचे फ्रिएन्ड आलेले बर्थडे साजरा करायला. त्याने तिला स्टेशनला सोडत निरोप घेऊन तो निघाला. मानस जाईपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत राहिली. त्यानंतर ती देखील घरी जायला निघाली. घरी पोहोचली तर सगळे तिचीच वाट बघत होते. सर्वांनी मिळुन केक कापला छान जेवण झाल आणि ते आप-आपल्या घरी परतले. मनस्वीने सर्वांचे आभार मानले. मनोमन मानसचे ही. आज ती सर्वांत जास्त आनंदी होती.




अशीच काही महिने त्यांनी एकत्र ऑफिसमधे काम केले पण त्यांना काही दिवसांनी कळलं की, ते ऑफिस आता कर्जात बुडत आहे त्यांना त्यांची सॅलरी ही मिळत नव्हती. शेवटी दोघांनी नवीन जॉब शोधायचा विचार केला. तसही दोघांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या जॉबची गरज होती त्याचीच ते वाट बघत होते.




एक दिवस मनस्वीने मानसला कॉल केला आणि तिने त्याला एक आनंदाची बातमी दिली........ "हॅलो मानस... मनस्वी बोलतेय" " हा बोल ग काय झाल आजचा इंटरव्ह्यू कसा झाला." "अरे तेच सांगायला कॉल केलेला मी सिलेक्ट झाली आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये जॉइनिंग आहे. आता तू देखील चांगला जॉब शोध." "अरे वाह अभिनंदन आता पार्टी हवी मला. हो मी पण बघतोय चांगल्या कंपनीत. एक-दोन दिवसात बघतो चांगल्या कंपनीत इंटरव्ह्यू देईन म्हणतो. चल आता ठेवते कॉल भेटुन बोलूया." "हो चल बाय." दोघांनी बोलून कॉल ठेवला.




असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ येत होती. छान दोघांची मन ही जुळत होती. रोज मॅसेजवर बोलण व्हायच. अजून घरी सांगितल नव्हता दोघांनी, कारण वेळ घेतला होता नात्याला समजायला. एक दिवस मनस्वीने मानसला मॅसेज सेंड केला आणि नंतर तिला कळलं की आपण चुकीच्या व्येक्तीला सेंड केलाय. तो मॅसेज तिने मानसला नाही तर तिने आपल्या मोठ्या बहिणीला सेंड केलेला. मग काय तिच्या बहिणीने विचारलं सरळ तिला.. "काय ग कोण आहे तो..?" तिने स्वतःच्या बहिणीला समजावलं. बहिणीने ही समजून घेतलं. मग शेवटी त्यांनी सर्वांना सांगायचा निर्णय घेतला. तिने आपल्या बहिणीला आधी सांगितल की मानस कसा आहे, काय करतो वेगेरे तिच्या बहिणीला काही प्रॉब्लेम नव्हताच तिने, "आईला विचार" सरळ सांगून टाकल. मोठ्या बहिनीकडून तिला ग्रीन सिग्नल मिळालेला.



एक दिवस तिने आईचा मूड बघून विषय काढला. तशी आई जरा ओरडलीच कोण आहे, कसा आहे. पण जेव्हा तिने सांगितल आपल्याच गावचा आहे. फोटो दाखवला तेव्हा तिने त्याला घरी बोलाव अस सांगून टाकले. "पण बाबांना ही सांग ते गावावरून आले की कळल ना." तिने लगेच होकार दिला. तिकडे मानस आज आपल्या घरी मनस्वी बद्दल बोलणार होता. जरा अवघड होत त्याला पण शेवटी त्याने त्याच्या आई बाबांना सांगितले. त्याच्या आईला मनस्वी आवडली.. त्यांनीही तिला घरी बोलवायला सांगितले. दोघांनी एकमेकांना सांगितल की घरून होकार आला. किती छान झालेल ना न भांडता सहज होकार मिळणं म्हणजे भाग्यच. जेव्हा बाबा गावावरून आले त्यांचा मूड बघून तिने परत तो विषय काढला आणि त्यांचा ही होकार मिळवला. खूप हॅपी होते ते दोघेही.




आता ते बिनदास्त भेटत होते. एक वर्ष कधी निघुन गेले ते त्यांनाही कळल नाही. परत तिचा बर्थडे येत होता आणि या वेळी त्याने तिला आपल्या घरी न्यायचा विचार करत होता.


To be Continued