तिने मोठा श्वास घेत डोपे बंद केले.. आणि बोलायला सुरुवात केली..., "म्हणजे कुठुन सुरुवात करू कळत नाहीये.., पण जेव्हा पासून आपण चांगले मित्र झालोय तेव्हा पासून मला तु आवडायला लागला आहेस." कस बस तिने एकदाच सांगुन टाकल. हे ऐकुन मानसच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते..
मनस्वी मी तुझ्या या बोलण्याचा मान ठेवतो.. पण मला माफ कर. कारण मी आई-बाबा ठरवतील त्याच मुलीशी लग्न करेन अस ठरवल आहे." त्याच्या या बोलण्याने तिला खुपच वाईट वाटलं. सगळे होते म्हणून तिने स्वतःला सावरलं. पण डोळे मात्र पाणावले होते नकाराने. पिकनिक वरून आल्यावर तिला खूप वाईट वाटत होत. आता मानस माझ्याशी बोलेल की, नाही हे देखील तिला कळत नव्हत. आपल्या अशा बोलण्याने आमच्यातली मैत्री तर तुटणार नाही ना याची तिला भीती वाटू लागली. त्याला मॅसेज करण्याची ही हिम्मत होत नव्हती. शेवयी गप्प झोपून जाव ठरवून ती झोपी गेली. पण उशी मात्र भिजलेली.
सकाळी उठून फ्रेश होत तिने सर्व आवरल आणि निघाली ऑफिसला जायला. आज तिचा बिलकुल मूड नव्हता ऑफिसला जाण्याचा पण पर्याय ही नव्हता. कशी बशी पोहोचली ऑफिसला. रोज सारख गुड मॉर्निंग विश ही नाही केल मानस ने तिला. खूप वाईट वाटत होत तिला. मग गप्प स्वतःच्या डेस्क वर काम करत बसली.
मानस ही मनातुन खरतर तिचाच विचार करत होता. तिचं त्याच्याशी बोलण, मस्ती मध्ये त्याला तीच मारणं त्याला खुप आवडु लागलं होतं. ती त्याच्याशी पर्सनल गोष्टी शेअर करायची हे त्याला खुप आवडायच. आपल्याला ही ती आवडू लागली आहे असे त्यालाही जाणवू लागले होते. पण वाईट वाटत होतं की, आपण तिला नकार देऊन टाकला तोही लगेच काहीही न विचार करता. थोड गिल्टी वाटत होत त्याला. पण आता गप्प रहाव हेच योग्य होत. हळूच त्याने तिच्याकडे नजर फिरवली आणि तो हळवा झाला कारण तिच्या डोळ्यात अश्रु होते. आपल्याला नकार मिळाला या कारणांने तिला मात्र त्रास होत होता, आणि नकळतच तो त्रास मानसला ही झाला.
शेवटी त्याला हे सहन नाही झाल आणि तो तिच्या जवळ गेला. अचानक मानस आलेला बघुन ती घाबरली आपले डोळे फुसत तिने खोटी स्माईल देऊ केली. " अरे काही काम होत का..??" तिने खी तरी बोलायच म्हणुन विचारल. "मनस्वी काय झालं..? का रडते आहेस...!.." त्याने डायरेक्ट विचारून टाकलं. "काही नाही मानस असच डोळ्यात काही तरी गेल सो पाणी आलं." तिनेही काएन पूढे केलं होत. "कशाला खोट बोलते आहेस.., म्हाहित आहे मला तू रडते आहेस ते.., नको ना रडूस मला त्रास होतोय तुझ्या डोळ्यात पाणी बघुन." तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिल... "मला माफ कर काल जसा मी वागलो त्यासाठी मी लगेच नकार नको द्यायला हवा होता, पण काल रात्री मी खुप विचार केला. मी देखील नकळत तुझ्यात गुंतलो आहे. माझ उत्तर हो आहे." मान खाली घालून त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली.. "खरचं मानस..??" त्याने डोळ्यानेच होकार कळवळा. मनस्वी खुप खुश झाली होती. काय करु आणि काय नाही असं तिला झालेल.
त्याच्या होकाराने त्यांचं नातं मैत्रीच्या पुढे गेलं होतं. असच फिरत असताना तिने विषय काढला. "मानस आपल आधी आपल्या नात्याला वेळ देऊया." "म्हणजे ग मनु..?" त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.. "अरे म्हणजे.., आपल एकमेकांवर खरचं प्रेम आहे का की, आकर्षण आहे हे कळल पाहिजे ना आपल्याला.. सो आपण आपल्या नात्याला वेळ देऊया तोपर्यंत आपण ही आप-आपल्या करिअरकडे लक्ष देऊ." मानसला तिच म्हणण पटल. त्याने ही लगेचच आपला होकार आहे असं सांगुन टाकल.
To be continued