Jivandhara kavyasangrah in Marathi Poems by Writer Shubham Kanade books and stories PDF | जिवनधारा काव्यसंग्रह

Featured Books
Categories
Share

जिवनधारा काव्यसंग्रह

* जीवनधारा...(काव्यसंग्रह)

कवी- शुभम कानडे

कविता पहिली कवितेचे शीर्षक

*करोना अजून भिडायलायच*

एका गल्लीतुन निघालेला करोना आता
दिल्ली पर्यंत पोहचला हाय
या करोनाच्या भीतीनं सारे देश गेले थकून
तरीपण करोना अजून भिडायलायच
कधीच नाय झालं ते करून दाखवलं
सारं मार्केट ते बंद झालं
देशाला पूर्ण लाँकडाऊनच केलं
तरीपण करोना अजून भिडायलायच
पूर्ण प्रशासन थकून गेलं
लोकांना घरात बसा म्हणून आव्हानच केलं
तरीपण करोना अजून भिडायलायच
सैनिक,पोलीस,डॉक्टर लोकांचे
करोना कवच म्हणून पुढे झाले
पण तेच लोक त्यांच्यावर पलटले
तरीपण करोना अजून भिडायलायच
आता काय हाती नव्हता पर्याय
ज्यांच्यासाठी पुढे झाले
त्यांनाच ठोकायचे काम हाती आले
तरीपण करोना अजून भिडायलायच
करोनाने जाता जाता एक शिकवलं
पैसा होता हाती पण कोणी काही करू नाही शकलं
शेवटी जीव मुठीत धरून घरीच बसावं लागलं
तरीपण करोना अजून भिडायलायच


कविता दुसरी कवितेचे शीर्षक

माझी परी

माझी परी दिसत होती खूप छान
म्हणूनच तिला मी म्हणत होतो परी जाण
माझी परी होती माझ्यासाठी गोडी
म्हणूनच तिला शोभून दिसत होती साडी
माझी परी माझ्यासाठी होती पूर्ण माणुसकी
म्हणूनच ती माझ्या आयुष्यासाठी होती लकी
माझी परी माझ्यासाठी होत माझं पाहिलं प्रेम
म्हणूनच आमचं एकमेकांवर प्रेम होतं सेम
माझी परी आणि मी आमची जोडी होती छान
म्हणूनच ती माझी होती आयुष्यभराची जाण
माझी परी माझ्यासाठी होता पूर्ण विश्वास
म्हणूनच तिच्यासाठी मी सोडीन अखेरचा श्वास


कविता तिसरी कवितेचे शीर्षक

डिलेट

माझे प्रेम होते पाखरू पाखरू
पण आता मनाला कसे सावरू
ती होती माझ्यासाठी माझी गोंडस परी
पण तिनेच मला करून टाकले खूप दुरी
जीच्यावरती मी प्रेम केलं खूप मनापासून
तीच गेली मला एकटे टाकुन
ती स्वप्नामध्ये प्रेमाचं घर बनवायची
पण तिलाच गडबड होती ती स्वप्न लोटून लावायची
मी तिच्यासाठी माझ्या जीवाच रान केलं
पण तिनेच त्या रानाला नांगर लावून टाकलं
जीच्यावरती मी खूप जीवापाड प्रेम केलं
का ठाऊक तिने मला तिच्या आयुष्यातूनच
कायमच डिलेट केलं


कविता चौथी कवितेचे शीर्षक

पाऊस

पाऊस आला धरती वरती येऊन
नदी मध्ये वाहू लागला
झाडे झुडपे फुलू लागली
करपुस डोंगर तो हिरवागार झाला
पाऊस आला धरती वरती येऊन
नदी मध्ये वाहू लागला
बळीराजा तो डोलणाऱ्या तरु कडे पाहू लागला
वारा देखील झाडे झुडपे तरुण सोबत खेळू लागला
पाऊस आला धरती वरती येऊन
नदी मध्ये वाहू लागला
धरणे साठली, दुष्काळाचे प्रश्नही सुटले
बळीराज्याच्या डोक्यावरचे ओझे ते हटले
पाऊस आला धरती वरती येऊन
नदी मध्ये वाहू लागला


कविता पाचवी कवितेचे शीर्षक

मरण

मरणाच्या आधी माणसे वाईट चिंततात
पण मरणानंतर माणसे मात्र आपले गुणगान गातात
पण ते आपण ऐकू शकत नाही
मरणाच्याआधी नातेवाईक कापड्यांचाही परवा करत नाहीत
पण मरणानंतर मात्र सर्वजण कफन घेण्यासाठी
पुढे धावतात
पण ते आपण अंगावरती घेऊ शकत नाही
मरणाच्या आधी नातेवाईक जे जेवण हवं असत ते देत नाहीत
पण मरणानंतर आपल्यासमोर पाची पक्वान्न ठेवली जातात
पण मात्र आपण त्यांची चव ही पाहू शकत नाही
मरणाच्या आधी कोणी कोणाच नसत
पण मरणानंतर प्रत्येकजण आपलं आपलं म्हणत
पण ते आपण पाहू शकत नाही
मरणाच्या आधी सर्व काही विचित्र असत
पण मरण खूपच छान असत
पण ते आपण पाहू शकत नाही


कविता सहावी कवितेचे शीर्षक

सुंदर जीवन

एक सुंदर जीवन आहे
त्याचे नाव झाड आहे
जीवनामध्ये आई आहे
त्याचे नाव बी आहे
जीवनामध्ये वडील आहे
त्याचे नाव पाणी आहे
जीवनामध्ये यश आहे
त्याचे नाव फांद्या आहे
जीवनामध्ये मित्र आहे
त्याचे नाव पाने आहे
जीवनामध्ये सुख आहे
त्याचे नाव फळ आहे
जीवनामध्ये नातेवाईक आहे
त्याचे नाव पशुपक्षी आहे
जीचनामध्ये माणुसकी आहे
त्याचे नाव सावली आहे
जीवनामध्ये दुःख आहे
त्याचे नाव रोग आहे
एक सुंदर जीवन आहे
त्याचे नाव झाड आहे


कविता सातवी कवितेचे शीर्षक

मृत्यू

मृत्यू माणसांना जवळ घेतो
माणसांना लांब करतो
आणि माणसांना एकत्र ही करतो
मृत्यू आला की माणसे रडतात
अंगावरती फुले टाकतात
आणि निघून जातात
मृत्यू हा दुःख देऊन जातो
हा किती अनोळखा असतो
आणि हा एकदाच येतो


कविता आठवी कवितेचे शीर्षक

क्षणभंगुर

ते क्षणभंगुर करणारे क्षण मला अजूनही आठवतात
आणि काही क्षणातच डोळ्यातून अश्रू ही वाहू लागतात
वर्षभर होतो एकत्रच आम्ही पण दूर झालो काही क्षणातच
याचे कारणही तीच होती जी मला माझ्या आयुष्याच्या वळणावर मध्येच येऊन भेटली होती
माझे ते प्रेम अनावर होते हे तिला ही माहिती होते
आणि तेच प्रेम मी माझ्या जवळच्या ताम्रपटावरती
कोरून ही ठेवले होते
मात्र तिच्यामुळेच विसरली मी सारी नाती गोती, घरच्या परिस्तिथीची झालेली माती,तिला माहिती होत की मी तिच्यासोबत केली होती प्रेमाची हिरवीगार शेती
आता मात्र प्रेमापासून दूर गेल्यावर घरच्या
परिस्थितीची जाणीव मात्र तळहातावर येऊन थांबली आणि त्या उंच नभाकडे आशा करू लागली
ते क्षणभंगुर करणारे क्षण मला अजूनही आठवतात
आणि काही क्षणातच डोळ्यातून अश्रू ही वाहू लागतात


कविता नववी कवितेचे शीर्षक


हुतात्मा

एक हुतात्मा होऊन गेला
तो साऱ्या समाज्यासाठी लढला
बायका पोर विसरून त्यानं आमूलाग्र बदल केला
समाज्याच्या हक्कासाठी अन उद्धारासाठी
रक्ताच पाणी करून अमर तो झाला
चौदार तळाचे पाणी पाजून समाज्याला माणूस बनवून गेला
समाज्याच्या संरक्षणासाठी त्या महामानवाने
शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन गेला
माया लेकिनसाठी स्वतःच पुढे झाला
अन ताठ मानेने जगायला शिकवून गेला
देशासाठी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान देऊन गेला
भारत देशाचा तो शिल्पकार झाला
जाता जाता त्यानं समाज्याला जगणे शिकवून गेला
अन सर्वश्रेष्ठ बौध्द धम्म देऊन गेला
एक हुतात्मा होऊन गेला
तो साऱ्या समाज्यासाठी लढला


कविता दहावी कवितेचे शीर्षक


सोबती


आपली सोबती फक्त दोनच वर्षांची होती
या वर्षांत खूप काही घडून गेले की ते अवर्णनीय होते
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तुला पाहता तुझ्या प्रेमातच पडलो
या प्रेमात इतका हरवलो की दुसऱ्याच दूनयेत जाऊन पोहचलो
कॉलेज मध्ये मी फक्त तुलाच पाहण्यासाठी यायचो
आणि पाहता पाहता तुझ्यातच हरवून जायचो
तू तर न बघताच समोरून निघून जायचीस
पण माझ्याकडे तू एकदा तरी बघावं याच आशेवर जगायचो
म्हणून मी मुद्दाम तुझ्या समोरच येऊन उभा राहायचो
तुझ्यावर असलेले माझे ते निरागस प्रेम तुला कधीच दिसले नाही
माझ्यासाठी मात्र ते प्रेम अनमोल होते पण ते तू जाणूनच घेतले नाहीस
मला खूप काही बोलायच होत पण ते राहूनच गेलं
अन माझं ते अविस्मरणीय तुझ्यावरच प्रेम अधुरच राहील
तू गेलीस दूर पण आता मात्र ते प्रेम आठवणीतच राहील

कविता अकरावी कवितेचे शीर्षक


पाऊलवाट


त्या तुझ्या पाऊल वाटांवर अजूनही
खुळ्यासारखा हिंडतोय
कधीतरी समोर येशील याच आशेवर जगतोय
त्या पाऊल वाटांनवरून रात्रीचे चालत जात असताना
त्या रातराणीचा सुगंध अजूनही येतोय
आणि मला तू याच वाटेवर असल्याचा भास होतोय
पण रात्रीच्या त्या चंद्राच्या उजेडामध्ये
ती माझी चांदणीच मला कुठे दिसत नाही
ती चांदणी अमावस्येच्या रात्रीतरी दिसेल याचीच वाट पाहतोय
त्या काळ्याभुर अंधारात ती वाट फारशी दिसतही नव्हती
काजव्यांनी मात्र ती वाट प्रकाशमय करून टाकली
जणू काही त्यांना ही मला मदत करायची होती
रात्री माझ्या स्वप्नामध्ये फक्त तूच येतेस
आणि मला जागे करून कुठेतरी लपूनच बसतेस
मला वाटते कदाचित तू माझ्याशी लपंडावच खेळतेस
सकाळी उठून परत आणि तीच पाऊलवाट
अन त्या पाऊल वाटांवर जाणवणारे मला परत तुझेच ते भास

कविता बारावी कवितेचे शीर्षक


माझी कविता


माझी कविता आजकाल माझ्याशी बोलतच नाही
मनातील भाव काही बाहेर काढतच नाही
पहिल्यांदा खूप काही बोलायची
अन सतत सोबतच असायची
मनातील भाव मला अश्रूवाटे सांगायची
माझी कविता आजकाल माझ्याशी बोलतच नाही
मनातील भाव काही बाहेर काढतच नाही
माझी कविता रोज मला अशा
वेगवेगळ्या वाटेवर न्यायची
चालता चालतच स्वतः
मध्ये सामावून घ्यायची
माझी कविता आजकाल माझ्याशी बोलतच नाही
मनातील भाव काही बाहेर काढतच नाही
रोज वेगळी अशा अन निराशा
शब्दावाटे बाहेर यायची
अन त्या शब्दांना गुंफून
माझी ती कविताच मला त्या मध्ये दिसायची
माझी कविता आजकाल माझ्याशी बोलतच नाही
मनातील भाव काही बाहेर काढतच नाही
आता मात्र माझी कविता
शब्दांना गुंफून थकलेली दिसते
माझ्याशी बोलायलाही भाव
हे अंतरमानीच ठेवते
माझी कविता आजकाल माझ्याशी बोलतच नाही
मनातील भाव काही बाहेर काढतच नाही

कविता तेरावी कवितेचे शीर्षक

अवतीभवती


सूर्य मावळला अन चंद्र दिसला
जणू काही सूर्याने त्याचा वेशच बदलला
अवकाशात निरखून पाहिल्यावर
जणू चांदण्यांची शाळाच भरलेली दिसते
घार नभामध्ये भरारी मारून एक
यशाची आशाच दाखवते
नभामध्ये पाहावे तर एक
अवकाशात चित्र मैफिलच दिसते
पक्ष्यांची किलबिलाट एक असा
स्वर तयार करते की संगीतमय दुनियाच जाणवते
वारा स्पर्श करून जातो अन
हा स्पर्श मला मायेचा जाणवतो

कविता चौदावी कवितेचे शीर्षक


तुला प्रेम कसे दाखवू...


आठवणीच्या डोहामध्ये बुडून
गेलेल्या त्या मनालाच विचारावे
आता तुला प्रेम कसे दाखवावे
दुःखाने ग्रासलेल्या त्या
विचारांनाच विचारावे
आता तुला प्रेम कसे दाखवावे
पाण्याने व्याकुळ झालेल्या
त्या नैनांनाच विचारावे
आता तुला प्रेम कसे दाखवावे
एकांतामध्ये निस्तब्ध झालेल्या
त्या हृदयालाच विचारावे
आता तुला प्रेम कसे दाखवावे
स्वतःला आचरणामध्ये
आणणाऱ्या त्या स्वभावालाच विचारावे
आता तुला प्रेम कसे दाखवावे

कविता पंधरावी कवितेचे शीर्षक


प्रेम आता स्वार्थी झाले...


निस्तब्ध श्वासासारखे हे प्रेम
काही वेगळेच शिकून गेले
हे प्रेम या मनामध्ये
रंगून गेलेल्या या माझ्या
भावनांशी खेळून गेले अन
प्रेम आता स्वार्थी झाले
आता नाही होत कोणावर
प्रेम कारण हे प्रेम माझ्या
विश्वासालाच तोडून गेले अन
प्रेम आता स्वार्थी झाले
भास मनीचे प्रेम दूनयेचे
आता आता संपून गेले कारण
प्रेम आता स्वार्थी झाले


कविता सोळावी कवितेचे शीर्षक


प्रेम प्रेम काय हाय हे...


कुणाच्या अद्यात नि कुणाच्या मध्यात
प्रेमाच्या रांगेत नि पुरीच्या जाळ्यात
नाय रहायच राव नाय राहच
घसरून पडशील तवा समजेल तुला हे
प्रेम प्रेम काय हाय हे
रोजच्या फोन कॉल
मध्ये अडकून बसायच नाय
शॉपिंगच्या नादात क्रेडिट कार्ड च
बिल वाढवायचं नाय
ती होईल आपली या
गैर समाजातून बाहेर यायच हाय
नाय राव नाय इथं प्रेम नाय
तर प्रेमाची नाटकी हाय
प्रेमाच्या पलीकडे आयुष्य हाय
त्या आयुष्याकडे बग आणि बिनदास जग
प्रेम प्रेम काय हाय हे


* धन्यवाद....