Samarpan - 1 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - 1

Featured Books
Categories
Share

समर्पण - 1

समर्पण -

सब कुछ पा लिया जिंदगी मे
फिर भी कुछ कमी सी है।
दिल के एक हिस्से मे मेरे
आज भी तु मौजूद है ।


२ वर्षांनंतर आज जेव्हा त्याला बघितलं तेव्हा वाटलं किती अपूर्ण आयुष्य जगत आहे मी. काय म्हणायचा तो " सोनु, हे सगळं आपण ठरवून थोडी केल, हे तर घडत गेलं." हो, बरोबर अगदी बरोबर, पण त्या नंतर त्यानी जे काही केलं ते मात्र ठरवून...मी काय केलं असेल, माझं काय झालं असेल याचा विचार न करता निघून गेला.....कायमचा.....आणि आज असा अचानक माझ्या समोर येऊन माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर आणुन ठेवला.
जर देवाला त्याला माझ्या आयुष्यात ठेवायचचं नव्हत तर त्याची आणि माझी भेट तरी का घडवली. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी कारणाने येतो असं माझं मत आहे. काही व्यक्ती खूप खास असतात आणि त्यांचा आपल्या आयुष्यात येण्याचं कारण हि खूप खास असतं. ते खूप काही देऊन जातात...मग ते दुःख असो किंवा सुख... हे मात्र आपल्यावर आहे की आपण त्यांनी दिलेल दुःख आठवून रडत बसायचं की त्यांच्या सोबत घालवलेले आनंदी क्षण आठवून हसायचं....

म्हणतात ना की जी व्यक्ती आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते तीच व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त रडवते.. मी नाही मानत.. मला असा वाटतं की ज्याने आपल्याला खूप प्रेम दिल, तो कधीच आपल्याला रडवण्याचं कारण बनू शकत नाही. आपण त्रास करून घेतो स्वतःला कारण त्या वेळेला आपल्याला गरज असते त्या व्यक्ती ची आणि ती आपल्या जवळ नसते. आणि त्या वेळी ती व्यक्ती आपल्या जवळ का नाही ते पण समजून घेणं फार महत्त्वाचे असते. "जिथे विश्वास नाही तिथे प्रेम नाही" त्यानेच शिकवलं मला ...पण तरीही जेंव्हा तो निघून गेला खूप राग आला मला, खूप चिडली, असं वाटलं फसवलं आहे याने मला....पण हा फक्त माझा राग होता, मनात अजूनही विश्वास आहे नक्कीच काहीतरी विचार करूनच त्याने हा निर्णय घेतला असावा....नातं मैत्रीचं हॊत की प्रेमाचं नाही सांगता येत पण आमचं नात त्याही पलीकडचं होतं.. अपेक्षा एकमेकांकडून काहीच नव्हत्या, फक्त हवी होती साथ एकमेकांची... मी नैनिका आणि तो विक्रम...आणि ही आमची अधुरी कहाणी....

-------------------------------------------------------------------

इंजिनीरिंग फायनल इयर ला असताना वयाच्या २१ व्या वर्षी माझं अभय शी लग्न झालं. २ महिन्यात साखरपुडा आणि लग्न सगळंच आटोपलं. आणि त्यात माझी फायनल सेमिस्टर ची परीक्षा, त्यामुळे मला आणि अभय ला एकमेकांना समजून घेण्याचा काही वेळच मिळाला नाही. आणि लग्न झाल्यावर लगेच अभय ला ६ महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागलं. पण या ६ महिन्यात मला असा कधी वाटलंच नाही की अभय ला माझ्या बद्द्ल काही वाटत असेल, कारण नेहमी मीच त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला.. तो कधीतरी बोलत असे. मला वाटलं जेव्हा तो परत येईल, आम्ही सोबत राहू सगळं ठीक होईल. अभय परत आल्यावर त्याला मुंबई ऑफिस मिळालं त्यामुळे मी नागपूरकर ची मुंबईकर झाली. अभय एकदम सरळमार्गी, शांत, हुशार व्यक्यिमत्व.....काहीसा अबोल, कदाचित माझ्या साठी.

मुंबईला राहायला आल्यावर मला असं वाटलं की कदाचित माझं आणि अभय चं नात घट्ट होईल, सगळं काही सुरळीत होईल. पण अस काहीच झालं नाही. एक चांगला नवरा म्हणून तो त्याचे कर्तव्य सगळे पार पाडत होता. त्याने मला कधीच कोणत्या गोष्टी साठी बंधन घातलं नाही. मग माझं जॉब करणं असो किंवा मैत्रिणींबरोबर फिरणं असो. प्रत्येक गोष्टीच स्वातंत्र होत. नव्हता तो फक्त प्रेमाचा संवाद.... माणसाला पैसा, घर, संपत्ती कितीही मिळाल तरी प्रेमाची आणि आपुलकीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मलाही अभय कडून याच गोष्टींची अपेक्षा होती. पण माहीत नाही का, मला नेहमी वाटायचं की तो माझ्या पासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय... कालांतराने या सगळ्यांची सवय झाली मला. दुनियेच्या नजरेत आम्ही एक आदर्श पती पत्नी होतो, पण घरात मात्र भयाण शांतता... मी या गोष्टीचा स्वीकार केला होता की कदाचित हा अभय चा स्वभाव आहे आणि मी तो बदलू शकत नाही. सगळं काही सुरळीत सुरू होतं. संथ पाण्याच्या प्रवाहासारखं माझं आयुष्य वाहत चाललं होतं अभय सोबत.... पण हे कोणाला माहीत होतं की या शांत पाण्याच्या प्रवाहात एवढे उधाण येतील.......
-------------------------------------------------------------
क्रमशः