kadambari premavin vyarth he jeevan - 4 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन - भाग-४

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन - भाग-४

नमस्कार मित्र हो,

मी अभि, अभिजित सागर देशमुख .. 

या अगोदर आमच्या देशमुख परिवारातील – दोन व्यक्तींशी तुमची भेट झाली आहे 

त्यातले श्री. सागर देशमुख म्हणजे माझे बाबा,

आणि सौ.सरीत देशमुख .माझी आई .यांच्याशी तुमची भेट झाली आहे . दोघांनी तुम्हाला 

त्यांच्याबद्दल काय सांगितले आहे ? हे मी तुम्हाला विचारणार नाहीये.

कारण स्वतःबद्दल सांगतांना प्रत्येकजण काळजीपूर्वक सांगत असतो,स्वतःचा परिचय 

कुणी वाईट शब्दात थोडाच करून देत असतो ? नाही ना ..

त्यापेक्षा आणखी एक महत्वाचे..ते म्हणजे .आपण किती चांगले आहोत “, हे ठासून 

सांगतांना ..आपल्या भवतीचे सारे जे आहे ते आपल्यापेक्षा कसे आणि किती कमी आहेत “, हे सांगितल्याशिवाय 

तर आपला मोठेपणा सिध्द होत नाही, हे सगळ्यांनाच कळत असते .

त्यामुळे मी जास्त काय बोलू ?

माझ्या आई-बाबांनी तुमच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधलाय, तुम्हाला त्यांनी त्यांच्याबद्दल 

सांगितले आहेच .

त्यांच्याशी ओळख करून घेतल्यावर तुमच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना 

निर्माण झाल्या असतील ?

..याचा थोडा थोडा अंदाज मी करू शकतो ..

आता आपली भेट होते आहे, माझ्याबद्दल तर मी सांगतो आहेच, आमच्या परिवाराबद्दल 

सुद्धा तुम्हाला माझ्याकडून कळेल .

आमच्या परिवाराततले आम्ही ..तसे म्हटले तर परस्परात आमचे खूप छान,खूप जवळचे 

असे भावनिक सबंध आहेत  “ असली पुस्तकी वाक्यं मी नक्कीच वापरणार नाही.

कारण आमच्यात नाते आहे, ते नाते जगजाहीर आहे. पण, आमच्यातले नाते आतून कसे 

आहे ? 

हे आम्ही बाहेरच्या जगात जाणवू देत नाहीत . 

कारण तसे करणे कुणाच्याच हिताचे नाहीये “,

याची जाणीव होण्याइतकी समझदारी .या जगात आणि लोकात वावरतांना आली आहे.

“हे असे अकाली प्रौढ होणे “,अनेक मुलांच्या नशिबी लहानपणापासून येत असते .

मी – अभिजित,असाच एक मुलगा ..हे मनाशी उमजून घेत घेत मोठा होतो आहे.

सागर देशमुख माझे वडील, माझे पिता, माझे बाबा ..सर्व काही ..पण, आमच्या मनात 

या नात्याविषयी काही ही ओलाव्याच्या भावना शिल्लक नाहीयेत .

मी आता जे सांगेन ..त्या उदाहरणावरून तुम्हाला माझे म्हणणे पटायला हरकत नाही ..

बाप-आणि बेटा “, पिता आणि पुत्र, वडील आणि मुलगा “ हे तीन शब्द एकाचच नात्याशी 

जोडले गेलेलं आहेत, पण त्याच्यातील अर्थ किती बदलतात ते पाहिले तर तुम्ही पण म्हणाल ..

अरेच्या .. हा अभिजित..वयाच्या मानाने फारच प्रौढ –मनाचा वाटतो आहे.

असे होण्याची कारणे मी वर दिलेल्या “नाते –दाखवणार्या शब्दात दडलेले आहेत..

ऐका तर ..

१.बाप आणि बेटा –

हे वाक्य म्हटले की ..बापसे बेटा सवाई ..हे आठवते .. सक्सेसफुल बापाचा वारसा पुढे नेतो तो बेटा 

सवाई म्हणवला जातो.

२. पिता आणि पुत्र – ज्ञानी- पंडित आणि अनुभवसंपन्न –चारित्र्यसंपन्न अशा पित्याचा त्याला शोभेल 

असा आज्ञाधारी पुत्र “ असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे रहाते,

३.वडील आणि मुलगा – आपल्या घराण्याचा नाव -लौकिक, घराण्याचा संपन्न वारसा, जो मुलगा 

स्वतःच्या कर्तुत्वाने अधिक वाढवतो ..असा मुलगा ..म्हणजे सांगे वडिलांची कीर्ती ...

आता माझ्या बाबतीत,आणि माझ्याबद्दल सांगायचे झाले तर ..

सागर देशमुख आणि मी –अभिजित देशमुख ..यांच्यातले नाते ..

बाप आणि बेटा “ असे नाहीये .. त्याचे कारण ..सागर देशमुखांनी उभारलेल्या संपन्न उद्योगाशी 

माझा काही एक संबंध नाहीये . त्यामुळे त्यांच्या सक्सेस ..त्यांच्या पुरताच राहिला, मी तो वारसा 

घेतलाच नाहीये तर .तो वाढवण्याचा प्रश्नच येत नाही ..त्यामुळे ..मी त्यांचा ..सवाई ..बेटा नाहीये ..

२. पिता आणि पुत्र – असे संबंध आमच्यात नाहीत . पिता म्हणून त्यांनी मला काही दिले नाहीये .

त्यांचे व्यावसायिक ज्ञान असो, की व्यक्ती म्हणून घेतलेले जीवन-अनुभव ..” हे सर्व एकमेकांना 

देण्यासाठी दोन व्यक्तीमध्ये एक संवाद –पूल असावा लागतो “, असा संवाद पिता –सागर देशमुख –

आणि त्यांचा पुत्र – अभिजित या दोघात कधीच निर्माण होऊ शकला नाही.

३. वडील आणि मुलगा - पारिवारिक जीवनातील .वडील आणि मुलगा “हे नाते ..आई-आणि मुलगा 

या नाट्य सारखे सरळ- साधे कधीच नसते “ याचा अनुभव ..माझ्या पेक्षा तुम्हाला जास्त आला असेल,

तुमच्या परीचयाच्या घर-घरात ..वडील –मुलगा “या नात्यात असेलेल ..तणाव – तुम्हाला जाणवत असतील.

असे का होत असेल बरे .?

.वडील आणि मुलगा .. हे मित्रत्वाच्या नात्याने का नाही वागू शकत  ?

वडिलांना आपला मुलगा ..हा कायम निष्क्रिय, वाया गेलेला,आत्मविश्वास गमावून बसलेला “

एक झिरो- तरुण “असाच का वाटत असतो .?

मुलाच्या कल्पना, त्याची स्वप्न “ न ऐकण्याच्या लायकीची असतात “ असा ठाम गैरसमज करून घेत 

अनेक वडील – आपल्या मुलांना कायम दुरावले आहेत “,

सागर देशमुख – वडील आणि मी त्यांचा मुलगा – अभिजित ..असेच उदाहरण आहे .

दोन टोकाला –दोघे उभे, हे अंतर मिटावे असे न सागर देशमुखांना वाटते न त्यांचा मुलगा म्हणून मला – अभिजीतला वाटते .

तुम्ही मला विचाराल की –

असे काय घडले की ..तुम्हा दोघात असे दुराव्याचे नाते निर्माण झाले, या नात्यात ..प्रेमाचा ओलावा 

नाही, आपलेपणा आणि जिव्हाळा नाही ..

“प्रेमाविण व्यर्थ हे जीवन “, हे माहिती नसायला आम्ही इतके काही निरक्षर नाहीत .

-----------------

भाग- ४ था बाकी वाचू या पुढच्या भागात ...

भाग -५ वा लवकरच येतो आहे ..

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि. देशपांडे –पुणे.

9850177342