कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
भाग- ३ –रा
----------------------------------------------------------------------
नमस्कार ,
मी सरिता ,
मिसेस सरिता सागर देशमुख , सुप्रसिध्द उद्योजक श्री.सागर देशमुख यांची पत्नी “,
ही माझी एकमेव ओळख आहे.
याशिवाय माझी काही एक ओळख आता शिल्लक उरलेली नाही ,आणि काही खाणाखुणा
उरल्याच असतील तर ,
सागर लगेच त्या खाणाखुणा अगदी नष्ट करून टाकण्यासाठी तत्पर असतो
आणि त्याला वेळ नसेल तर ..
त्याने सतत माझ्या भवती ठेवलेली त्याची विश्वासू माणसे ही अशी कामे अगदी आज्ञाधारकपणे करीत असतात ,
न करून ते तरी काय करतील बिचारे “,
त्यांना पगार मिळतो तो फक्त याच कारणासाठी .
त्यांचे सर -सागर देशमुख यांच्या प्रेस्टीजला कधी ही, कुठे ही धक्का लागू नये ..
तो देखील माझ्यामुळे “,
आणि समजा असे झाले ,चुकून जरी ..
"मी चूक वागली आहे " ज्या माणसाच्या लक्षात हे आले नाही , त्याची नोकरी
त्याक्षणी गेलीच म्हणून समजायचे ,मग, पुढे कधी ही .या किंवा त्या कुणाला –सागर
देशमुख यांच्या राज्यात प्रवेश कायमचा बंद असतो.
माणसाचा पुनर्जन्म “आहे का नाही ? हे मला माहिती नाही ,
पुण्य ,सत्कर्म , पूर्वजन्म –संचित ..या गोष्टी आणि
पूर्वजन्मात केलेली पाप , केलेले अपराध , दिलेले त्रास
या गोष्टीवरून म्हणे ..या जन्मात आपल्याला मिळाले आयुष्य असते असे म्हणतात ,
मग,असे असेल तर ..
गेल्या जन्मात माझ्झ्या हातून खूप चांगले असे कमीच झाले असेल ,आणि घोर अपराध
दुष्कर्त्ये असे काही नक्कीच खूप घडलेले असावे ..
मग ,या पापांची शिक्षा म्हणून तर ..
मी या जन्मी सागर देशमुख या माणसाची पत्नी झाले असेल का ?
आमचे लग्न झालेले आहे ना मग,
मी त्याची बायको , पत्नी “म्हणून ओळखली जाणार ,
आता , ते त्याला आवडो किंवा न आवडो ..
किंवा असे ही म्हणा हवं तर ..
मला ही ते आता आवडो ना आवडो ...
तसा तर काहीच फरक पडणार नाहीये ...
कारण सागरच्या मते -
प्रेम "ही एक वायफळ गोष्ट आहे, हळवे मन ,भाबडे मन , स्वप्नाळू मन "अशा मनोकल्पना करून
प्रेमाच्या झुल्यावर झुलण्याचा "मूर्खपणा करणार्याचा त्याला खूप राग आहे ,
माझ्याबद्दल तर त्याचे त्याचे लाडके आणि आग्रही मत आहे .
.जे तो सतत मला ऐकवत असतो ..
मूर्खमाणसांच्या नंदनवनात राहणारी तू एक हळवी ,भाबडी , स्वप्नांळू ..मूर्ख आहेस..
प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .."
हे असले गाणे पुन्हा कधी माझ्यासमोर म्हणायचे नाही.
जरा डोक्याने विचार करून पहा कधी तरी .म्हणजे कळेल ..
पैशाविना व्यर्थ हे जीवन "
समजून घेतले तर जीवन जगता येईल , उपाशी नाही मरणार कधी "
तुम्हीच बघा ..
आमच्यात किती तफावत आहे ..
आहे हे खरे ..पण ,असे झाले तरी कसे ?
आता मूड नाही सांगायचा ..कधी तरी सांगेन नक्की .
आपण माणसे किनाई ,फार मतलबी आहोत , सगळ काही सोयीच्या शब्दांचा आधार घेऊन मोकळे
होत असतो .
आता .मी आणि सागर, दोघे ही नात्याने जोडलेले आहोत ..यात मनाचा पत्ताच नाही.
पण.उघडपणे कधी काही बोलणार नाही..
कारण .
प्रतिष्ठित आहोत न आम्ही , जग काय म्हणेल,? लोक काय म्हणतील ?
ही ढाल पुढे केली की झाले ..
मोठे मोठे शब्द ,त्याचे अर्थ “ माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहेत .त्यामुळे
अशा गोष्टीवर चर्चा करावी , काही बोलावे “ इतकी माझी पात्रता नाही “,
सबब मी काही बोलायचे नाही “,
हे certificate सागरने मला देऊन टाकले आहे “
त्यामुळे .मी पुन्हा माझे तोंड उघडायचे नाही “
ही सूचना लक्षात ठेवायची ..
सागरच्या अशा सततच्या सुचना , बंधनं ,ऐकून ऐकून आता माझी बुद्धी ..म्हणा स्मरणशक्ती म्हणा
..इतकी यंत्रवत होऊन गेली आहे की ..माझा मेंदू फक्त आणि फक्त ..सागरच्या आज्ञा ,
त्याच्या ऑर्डर प्रमाण मानतो , इमोशनलेस रोबोट “ करून टाकलाय सागरने मला .
आपण बसलोय त्या घराचे नाव मी किती हौसेने ठेवले होते ..प्रेमालाय "
माझ्या पप्पांनी बांधली आहे ही वास्तू , म्हणून या वास्तूचे नाव बदललेले नाहीये ,
पप्पांच्या आवडीचे नाव म्हणून .कदाचित त्यांच्या विषयीच्या भीतीयुक्त आदरापोटी सागरने
प्रेमलय "हे नाव तसेच राहू दिले आहे .
आम्हा दोघांनाच काय ,आमच्या घरातील सर्वांना माहिती आहे..
प्रेमाचा अजिबात पत्ता नाहीये ,आणि म्हणे ..घराचे नाव ..प्रेमालय..
--------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------
बाकी वाचू या -पुढच्या भागात ..
भाग - ४ था लवकरच येतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
भाग - ३-रा
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------