Addiction - 2 - 29 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 29

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 29

मृणाल जिवाच्या आकांताने अजिंक्य अजिंक्य ओरडत होती पण समोरून अजिंक्य काहीच बोलत नव्हता ..तर बाजूची गर्दी त्याला वाचवा वाचवा अस म्हणताना तिला फोनवर एकूण येत होतं.. यावरून अजिंक्यचा अपघात झाला असल्याचं तिला कळालं होतं पण तो काहीच बोलत नसल्याने तिच्या मनात बऱ्याच शंका निर्माण झाल्या होत्या ..तरीही तिने त्याच नाव घेन थांबवलं नव्हतं ..तिचा प्रयत्न सफल झाला आणि समोरून कुणाचा तरी आवाज आला ..तो बोलू लागला , " ताई ..इथे तुमचा नंबर वाईफ म्हणून सेव्ह आहे तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या पतीचा फार मोठा अपघात झाला आहे ..त्याची स्थिती फारच गंभीर आहे ..तेव्हा तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या ..आम्ही त्यांना तिथेच घेऊन जात आहोत .."

मृणाल समोर काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला ..मृणालला काय करू नि काय नको असं झालं ..ती वेंधळ्यासारखं रूममध्ये काहीतरी शोधू लागली पण तिला काहीच सापडत नव्हत उलट संपूर्ण रूम अस्ताव्यस्त झाली होती ..पर्समध्ये असलेले पैसे घेत ती जिवाच्या आकांताने रस्त्यावर धावू लागली ..सर्व लोक तिच्याकडे पाहत होते पण तीच कुणाकडेच लक्ष नव्हतं ..तिने पायात काहीच परिधान केलं नसल्याने पायाला जखम होऊन त्यातून रक्तस्राव होऊ लागला होता पण तिला हॉस्पिटलमध्ये जाण्याची इतकी घाई झाली होती की ते घाव देखील तिला कुठल्याच यातना देत नव्हते ..ती कशीबशी ऑटोस्टॅण्डवर पोहोचली ..तिने जास्त पैसे देऊन रिक्षा चालकाला सिटी हॉस्पिटलला नेण्याची विनंती केली ..रिक्षा सुरू झाली आणि ती त्याला लवकरात लवकर नेण्यासाठी आर्जव करू लागली ..तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर भीती ..रिक्षा चालकाला कळून चुकलं होत की काहीतरी अनपेक्षित घडलंय त्यामुळे तोही होईल तितक्या लवकर रिक्षा चालवत होता ...काही क्षणात रिक्षा हॉस्पिटल समोर थांबली ..आणि मृणाल रिक्षा चालकाला पैसे देऊन वाऱ्यासारखी हॉस्पिटलच्या आत पोहोचली ..ती पोहोचली तेव्हा समोर रिसेप्शनला बरीच गर्दी होती आणि काहिच अंतरावर लोक देखील तिला उभे दिसले ..मृणाल रिसेप्शनिस्टला काहीतरी विचारत होती पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते ..शेवटी कस बस तिने अजिंक्य हे नाव उद्गारल आणि रिसेप्शननिस्टने तिला समोर असलेल्या गर्दीकडे बोट दाखवलं ..मृणाल सुपर फास्ट ट्रेनप्रमाणे गर्दीकडे धावू लागली ..मागे पायातील रक्ताच्या निशानाणे सर्व लोक तिच्याकडे पाहू लागले होते ..मृणाल कशीतरी गर्दी मागे सारत समोर पोहोचली आणि समोरच दृश्य बघून ती जागेवरच थांबली ..अजिंक्यच संपूर्ण शरीर रक्ताने माखल होत ..त्याच्या डोक्याला जबर जखम झाली होती आणि डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्याने काही लोक त्याच्या डोक्याला हात लावून होते ..तो काहीच क्षणात श्वास सोडणार अस लोकांचं बोलणं सुरू होत ..अजिंक्यनेही मृणाल येईपर्यंत स्वतःला कसतरी जिवंत ठेवलं होतं ..त्याला दुरूनच मृणाल दिसली आणि तो तिला येण्याचा इशारा करू लागला ..त्याने इशारा करताच गर्दी बाजूला झाली आणि मृणालने धावतच त्याचा हात हातात घेतला ..आणि अजिंक्य अडखळत बोलून गेला , " मृनाल सॉरी तूझ्यासाठी कसतरी स्वताला सावरुन ठेवल होत आता वेळ आली आहे माझ्या निघन्याची ..सॉरी मी तूला अर्ध्यातच सोडुन जातोय ..आता तुलाच आपलं प्रेम जपायचं आहे आणि जिवंत राहायचं आहे ..सॉरी .."

अजिंक्यचा हात तिच्या हातात होता आणि सॉरी बोलून अजिंक्यने आपला अखेरचा श्वास सोडला ..मृणालला आताही काहीच कळत नव्हतं ..अजिंक्यच्या जाण्याने सर्व गर्दी शांत झाली होती ..आणि मृणालला हे सर्व लक्षात येताच ती अजिंक्यला जोरा - जोराने हलवू लागली ..तिच्या अश्रूंनी प्रत्येक व्यक्ती हादरला होता ..आणि ती त्याला हलवत म्हणाली , " अजिंक्य तू मला असं ऐकट सोडून जाऊ शकत नाही ..तुझ्याविना मी इथे काय करू ? ..मलाही घेऊन चल ..नकोय मला तुझ्याविना हे आयुष्य ..अजिंक्य काहीतरी बोल ना ? ..तू म्हणाला होतास ना की मी असताना तुला कसलेच कष्ट पडणार नाहीत मग आज बघ मी रडते आहे ..आणि अश्रू पुसायलाही कुणी नाही ..प्लिज उठ ना !! ..प्लिज!! ..का असा रुसून बसला आहेस ? ..इतका राग की माझ्याशी बोलायचदेखील नाही ..कस सांगू तुला की तुझ्याच हिमतीने मी आजपर्यंत जगत आले होते पण तूच नसशील तर मी कशी जगेन ..प्लिज परत ये एकदा ..आपण इथून कुठेतरी दूर जाऊ ..प्लिज ये ना रे ..!! "

तिला अजिंक्यला अस हलवताना पाहून बाजूची नर्स तिला बाकावर बसवायला घेऊन गेली ..ती जिवाच्या आकांताने ओरडत होती ..तिला सावरन अशक्य झाल होत .. त्यामुळे दोन तीन मुलींनी तिला आवरून धरलं होत ..मृणाल बाजूच्या नर्सला पकडून पकडून रडत होती आणि त्यामुळे तिचे डोळे फारच सुजले होते ..बाजूची नर्स तिला आवरत होती आणि मृणालच आपल्या हाताकडे लक्ष गेलं ..तिच्या हातावर अजिंक्यच रक्त लागलं होतं आणि त्या रक्तात त्याचा चेहरा तिला दिसू लागला ..तिला स्वतःचीच भीती वाटू लागली ..ती त्या रक्तात हरवली आणि काहीवेळ तशीच होती ...अजिंक्य तिच्या विचारात होता आणि तिला पुढचे शब्द सतावू लागले ..

तुमको भी है खबर
मुझको भी है पता
हो रहा है जुदा
दोनो का रास्ता
दूर जाके भी मुझसे
तुम मेरी यादो मे रहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना

जितनी थि खुशीया
सब खो चुकी है
बस एक गम है के जाता नही
समझा के देखा बेहला के देखा
दिल है के चैन इस्को आता नहीं
आता नहीं
आसू है के है अंगारे
आग है अब आखो से बहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना

रूत आ रही है रुत जा रही है
दर्द का मौसम बदला नहीं
रंग यह गम का इतना है गहरा
सदियो मे होगा हलका नही
हलका नही ..
कोण जाणे क्या होणा है
हम को है अब क्या क्या सहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना

तुमको भी है खबर
मुझको भी है पता
हो रहा है जुदा
दोनो का रास्ता
दूर जाके भी मुझसे
तुम मेरी यादो मे रहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना

कभी अलविदा ना कहना

आणि पुढच्याच क्षणी मृणाल जोराने ओरडली , " अजिंक्य नको जाऊस ना मला अस ऐकट सोडून ..मी कशी जगू रे तुझ्याविना ? " ..

मृणालची बीपी लो झाली आणि ती बेशुद्ध पडली ..इकडे अजिंक्यलाही शव घरात पाठवण्यात आल होत ..अजिंक्यच्या बॉडीच सकाळी पोस्ट मॉर्टम होणार होत आणि मृणालची स्थिती काहीशी खास नसल्याने डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिल ..आजची रात्र ना मृणाल बोलणार होती ना ..ना अजिंक्य ..नियतीसमोर दोघेही शांतच होते ..जगाशी भांडणारे ते दोघेही आज नियतीसमोर शांत झाले होते ..

दुसरा दिवसाचा सूर्य उजळावा आणि सिटी हॉस्पीटलमध्ये गर्दीच गर्दी जमा झाली ..मृणाल होशमध्ये आली तेव्हा तिच्या समोर रिया उभी होती ..नर्सने रियाला फोन करून बोलावून घेतलं होतं..तर रियाने ही बातमी सर्वानाच दिली ..अगदी त्याचे आईबाबापासून सर्व ऑफिसमधील कलीग जमा झाले होते..रियाला पाहताच मृणाल तिला मिठी मारून रडू लागली ..रियालाही बातमी मिळाली आणि ती रात्री 12 वाजताच हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती ..तिचेही रडून रडून डोळे सुजले होते तर आजूबाजूला फक्त रडण्याचा आवाज येत होता ..अजिंक्यचे आईवडील अजिंक्यला पाहण्यासाठी आतुर झाले होते पण त्यांना भेटण्याची मुभा दिली गेली नव्हती ..अजिंक्यच्या सरांनी देखील त्यांना घरी पाठवून अंतिम संस्काराची तयारी करायला सांगितली होती ..सरांनी त्यांच्या घरच्यांना त्रास होउ नये म्हणून अंतिम संस्काराची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली ..रियाला सांगून सरांनी मृणाललादेखील घरी पाठवून दिल होत ..अजिंक्यची शेवटची इच्छा म्हणजे त्याच्या घरीच शेवटचा विधी व्हावा ही असल्याने त्याला गावाला नेण्यात येणार होत ..अजिंक्यच्या घरी बरीच गर्दी जमा झाली होती आणि अजिंक्यच पोस्ट मॉर्टम होऊन तोही शेवटच्या यात्रेसाठी तयार झाला ..

अजिंक्यचे शरीर घरी आणल्या गेले तेव्हा दुपारचे 12 वाजले होते ..त्याच शरीर अंगणात ठेवल्या गेलं आणि घरातला प्रत्येक व्यक्ती ओरडून ओरडून रडू लागला ..अजिंक्यशी एक शब्दही न बोलणारी त्याची आई त्याला बिलगून बिलगून रडत होती ...काकू असो की काका सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते ..अजिंक्यच्या बाबांना त्या धक्क्यातून स्वतःला सावरन अशक्य झाले आणि ते आवाक होऊन भिंतीला टेकून बसून होते ..गावातले मंडळीही हळुहळु जमा झाले होते ..लाजेच्या खातर का होईना अजिंक्यचे मित्रही त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करत होते ..ज्या समाजाला ते दोघे नकोसे झाले होते तोच समाज आज किती वाईट झालं म्हणून गोष्टी करत होता ..क्षणात सर्व काही बदललं होत ..प्रज्ञाला कुणीच बोलवू नये असं मृणालने सांगितलं असल्याने तिच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नव्हती ..तर मृणाल शून्यात हरवली ..लोकांची गर्दी बरीच होती पण ती आताही आपल्या हाताकडे बघत होती ..अजिंक्यच रक्त तर पुसल्या गेलं होतं पण त्या जखमा अजूनही तिला त्रास देऊ लागल्या ..काहीच क्षणात अजिंक्यचा शेवटचा प्रवास सुरु झाला ..गावापासून 2 - 3 किलोमीटर अंतरावर छोटीशी नदी होती तिथेच त्याचे अंतिम संस्कार होणार होते ..मागे काही लोकांना घेऊन प्रेतयात्रा समोर समोर जाऊ लागली ..सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते ..मृणालची तब्येत बरी नव्हती पण त्याला शेवटच पाहण्यासाठी तिलाही रिया घेऊन गेली होती ..राम नाम सत्य है म्हणत ती प्रेतयात्रा समोर समोर जाऊ लागली ..ज्या लोकांनी कधीतरी अजिंक्यच्या मार्गात काटे रोवले होते तेच आज फुलांचा वर्षाव करत होते ..अजिंक्य आज जिवंत असता तर नक्कीच तो सर्वांवर हसला असता पण आज तो निपचित पडलेला देह कुणावरच हसू शकणार नव्हता आणि समाजाला हे विचारू शकणार नव्हता की अस का झालं ? मी कुठे चुकलो ?

प्रेतयात्रा नदीवर पोहोचली तेव्हा सायंकाळ होऊ लागली ..जिवंतपणी एकमेकांची काळजी घेणारे लोक रात्र होईल म्हणून लवकरात लवकर अजिंक्यच शरीर जाळण्यासाठी सांगत होते ..तर त्याचे सर्व सखेसोबती त्याच्या अंगावर पडून पडून रडत होते ..सर्वांनी सरण रचायला सुरुवात केली ..काड्या रचून झाल्या आणि सर्वांच्या समोरूनच अजिंक्यला सरणावर ठेवण्यात आले ..एक एक काडी त्याच्या शरीरावर ठेवून त्याला त्या काड्यात बंदिस्त करण्यात आले ..आता वेळ होती ती अजिंक्यचा चेहरा झाकण्याची ..कुणीतरी काडी घेऊन चेहरा झाकणार तेवढ्यात शून्याच्या बाहेर येऊन मृणाल त्याच्याकडे धावली ..सर्वाना वाटलं की ही आता सर्व काड्या अस्तव्यस्त करून त्याला बाहेर काढेल म्हणून सर्वच तिच्या मागे धावले ..रियाही तिच्या मागे जाऊन उभी राहीली ..पण अस काहीच झालं नाही ..मृणालच्या डोळ्यातून येणारे अश्रू अचानक थांबले आणि मृणाल त्याच्या चेहऱ्यावरून आपला हात फेरत त्याला शेवटची श्रद्धांजली देऊ लागली ..तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि रियाने तिला बाजूला केलं ..कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावर शेवटची काडी टाकली आणि अजिंक्य कायमसाठी दिसेनासा झाला ..अजिंक्यची शेवटची इच्छा असल्याने त्यांच्या बाबांनी त्याला अग्नी दिला .. हळूहळू अजिंक्यच ते शरीर आगीच्या मोठं - मोठ्या लाटात जळून खाक होऊ लागल ..रडणारे रडत होते तर बाकी सर्व आपलं काम संपल म्हणून घरी जाऊ लागले होते .मरणाची गाथाही वेगळीच असते ..शरीर नष्ट व्हायला आलं की लोकांना आपला छोटासा वेळही वाया घालवायचा नसतो ..शेवटी अजिंक्यच संपूर्ण शरीर जळून खाक झालं ...

सायंकाळ झाली आणि अंधार पडू लागला ..थंडीचे दिवस असल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता आणि खाली पायाला रेतीही थंड वाटू लागली ..जवळपास सर्वच घरी पोहोचले होते ..फक्त बाकी होते ते चार व्यक्ती ..त्याचे आईवडील , मृणाल आणि रिया ..कितीतरी वेळ ते तिघेही तसेच बसून होते ..शेवटी रात्र पडू लागली आणि त्याचे आई बाबा घराकडे जाऊ लागले ..त्यांना जाताना पाहून मृणाल म्हणाली , " आई अजिंक्य जिवंत असताना तर तुम्ही आमचं काहीच एकूण घेतलं नाही आणि मी तेव्हा काहीच म्हणू शकले नाही पण आज तुम्हाला माझं सर्व ऐकावं लागेलच ...तुम्हाला अजिंक्यची शपथ .." त्याची शपथ घातल्याने ते तिथेच थांबले आणि मृणाल म्हणाली , " आई अगदी लहान होते तेव्हापासूनच आई बाबांचे वाद मी पाहत आले होते ..त्यांना कधी सुखामध्ये मी बघितलं नाही ..बाबा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आईला त्रास द्यायचे आणि ती बिचारी मुकाट्याने सर्व सहन करायची ..एक दिवस तिच्या मनात काय आलं माहिती नाही पण ती आम्हाला सोडून गेली ..जेव्हा मला काहीच समजत नव्हतं तेव्हा सोडून गेली ..ती गेली आणि आजीच्या भरवश्यावर मी जगू लागले ..वडिलांचा तो रागीट चेहरा मी सतत पाहत आले होते आणि त्या चेहऱ्याने इतकी दहशत निर्माण केली की बालपण काय असत हे कधीच कळलं नाही ..बाबा आजीच्या वादात बाबाने आजीचा जीव घेतला आणि मी तेव्हाच पोरकी झाले ..हे सर्व कमी होत की काय माहीत नाही म्हणून माझ्याच बापाने माझा बलात्कार केला ..जेव्हा एखादा व्यक्ती चिमुरडीवर बलात्कार करतो तेव्हा तिला काय जाणवत हे कुणी समजू शकणार नाही ..अगदी त्या वयात मी ते सर्व सहन करू लागले .
मी त्या नराधमाला कधीच प्रतिकार करू शकले नाही ..अस नाही की जीव द्यावासा वाटला नाही पण ती हिम्मत सुद्धा करू शकले नाही आणि माझाच बाप माझ्यावर सतत बलात्कार करत राहिला ..शेवटी देवाला दया आली आणि त्याने बापाला बोलवून घेतले ..मी तेव्हा स्वतंत्र तर झाले पण पूर्णतः नाही ..आपल्यावर ही ओझं होईल म्हणून याच सो कॉल्ड समाजाने मदत केली नाही ..आणि मला जगाच्या गर्दीत शिराव लागलं ..बलात्काराचा त्रास मी माझ्या मनातून कधीच काढू शकले नाही आणि त्यापासून सदैव पळू लागले ... हा प्रवास माझ्यासाठी खूप भयानक होता ..लोकांच्या नजरापासून मी माझं शरीर लपवून दिवस काढू लागले तेही नौकरी मिळेल या अपेक्षेत ..पण नौकरी तर सोडा मला या जगाने जीवन जगण्याचा हक्क सुद्धा नाकारला ..या प्रवासात कितीतरी दिवस मी उपाशी राहिले पण मला कुणीच मदत केली नाही आणि नाईलाजाने मला माझं शरीर विकाव लागलं आणि एक छोटीशी मुलगी वैश्या झाली ..प्रज्ञाला जो शब्द लहान वयात त्रास देत होता तो त्रास मी त्या वयात भोगला ..वैश्या झाल्यावर मी स्वतःच्याच जगात बेभान उडत होते ..जिवंत तर होते पण शरीराने ..कारण मन मी केव्हाच बाजारात विकल होत ..माझंही आयुष्य कधीतरी सुंदर होईल असं वाटलं नव्हतं पण अजिंक्य आयुष्यात आला नि सर्व काही बदललं .पहिल्यांदाच का होईना मी त्याच्याकडे आकर्षिल्या गेले आणि मला त्याच्यासोबतचे सुखी संसाराचे स्वप्न येऊ लागले ..मी स्वतःलाच हरवून बसले असताना माझ्या डोक्यात हा प्रश्न येऊन गेला की एका वैश्येला कोण स्वीकारणार आणि मला कुणाचं जीवन खराब करायचा अधिकार नाही आणि म्हणूनच मला अजिंक्यने लग्नाचं विचारलं असता मी नकार दिला पण आम्हाला मुलगी होण्याची बातमी मिळाली आणि मला तो मातृत्त्वाचा क्षण हवाहवासा वाटला ..त्यामुळेच का होईना आम्ही दोघे एकत्र आलो आणि लग्न केलं ..आई मला तुमचा राग समजत होता ..तुम्ही एकदा जरी प्रेमाने मला सांगितलं असत की अजिंक्यला कायमची सोडून जा तर मी नक्कीच गेले असते पण तुम्ही तो प्रयत्न केला देखील नाही ..अजिंक्य शेवटच्या क्षणी म्हणाला की मी हरलो पण आई खर सांगू तो एकटाच जिंकला बाकी आपण सर्व हरलो ..मी मुलीच्या मोहाने त्याच्या जिवनात आले आणि त्याच जीवन उध्वस्त केलं आणि तुम्ही समाजाच एकूण आपल्या मुलाला परक केलं व प्रज्ञाने आपल्याच बापाला मरण्यास भाग पाडल ..मला आजही कळत नाही की अजिंक्यची यात काय चूक होती ..आई मी अस एकल होत की आईवडील जगात सर्वश्रेष्ठ असतात..त्यांच्या चुकाही ते क्षणात माफ करतात पण तुम्हाला त्याचा इतका राग आला की तुम्ही त्याच्याशी साधे बोलले सुद्धा नाही ..इतका राग कुणाचा ? ..त्या मुलाचा जो तुम्हाला पलटून एक शब्द बोलला नाही की त्या मुलाचा जो आपल्या आईवडिलांना देव मानतो ..प्रज्ञा म्हणाली होती की तिची या सर्वात काय चूक पण मी कुणाला विचारू माझी कुठे चूक होती ? आपण सर्वच स्वार्थी निघालो आई ..फक्त जगला तो अजिंक्य सर्वांसाठी ..ज्या मुलीला त्याने स्वतःच्या प्रानाप्रमाणे जपलं शेवटी तिचेच शब्द त्याला यातना देऊन गेले आणि त्याने आपले डोळे मिटले ..तुम्हीच सांगा आई अजिंक्य कुठे चुकला ? मुलगा म्हणून की एक बाप म्हणून ..चुकले तर मी आई तुमच्या आयुष्यात येऊन आणि नकळत का होईना या सर्वांसाठी मीच जबाबदार आहे ..आई मी तुमची माफी मांगते की तुमच्या मुलाला तुमच्या मुलापासून दूर केलं ..मला माहित आहे हे मी सर्व नीट करू शकत नाही म्हणून पाय पकडून तुमची माफी मागते आणि आपल्याच नवऱ्याला मी मारलं या विचारात आयुष्यभर जगेन ..मला माहित आहे देव मला कधीच माफ करणार नाही पण हा त्रास मला आता सहन करावाच लागेल तेव्हाच मी या सर्वातून मुक्त होऊ शकेल .." मृणाल त्यांच्या पायावर पडून रडत होती तेव्हाच रिया तिला उभं करत म्हणाली , " मृणाल तू चुकली नाही आहेस ..चुकला आहे हा संपूर्ण समाज ..काकू तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या काळजीने अजिंक्य माझ्या जवळ कितीदा रडला पण तुम्हाला वाटलं की त्याला तुमची काळजीच नाही ..तुम्हाला समाज गरजेचा होता मग मला सांगा कुठे गेला आहे हा समाज ? मला तर कुनीच दिसत नाहीये ..ज्या मुलाला तुम्ही विश्वासघात केला अस म्हटलं त्या मुलाने एका मुलीला नव्याने जगायला शिकविल हे तुम्ही आपल्या अहंकारासमोर कधीच स्वीकारल नाहीत एवढंच काय तर त्याला आपली बाजू मांडण्याची संधिसुद्धा दिली नाही ....काकू आज जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा तिच्या समर्थनार्थ रोडवर उतरणारे खूप लोक असतात पण त्या मुलीला स्वीकारणारे किती आहेत ? ..ती हिम्मत तुमच्या मुलाने दाखवली आणि एका मुलीला आईवडील , मुलगी , पतीचं प्रेम दिल पण तुम्ही या सो कॉल्ड समाजासाठी आपल्या हिऱ्यासारख्या मुलाला हाकलून लावलं ..खरच आई वडील असे वागतात का ?..आपण फक्त समाजात म्हणत असतो की या मुलीच वाईट झालं पण अजिंक्यसारखे मूल जेव्हा त्यांना स्वीकारायची इच्छा दर्शवितात तेव्हा कँडल मोर्चा काढणारे लोकच त्यांना स्वीकारत नाही ..मग कशाला हे ढोंग ? ..तुम्हाला तर अभिमान वाटायला हवा होता अशा मुलाचा ..पण तुम्ही चुकलात आई ..नाही समजू शकले तुम्ही त्याला आणि आज अश्रू गाळत आहात ..काकू मला न हसू येत लोक व्यक्ती जिवंत असताना त्याची काळजी घेत नाही पण मेल्यावर मात्र उगाचच अश्रू गाळतात ..जीवन जगताना त्याला नरक यातना देऊन मेल्यावर अश्रू गाळल्यावर काय मिळत हो ? ..अजिंक्यने समाजात बदल घडवून आणायचं ठरवलं पण या समाजाची शोकांतिका अशी की त्याच्या जिवंतपणी ते त्याला समजून घेत नाहीत आणि तो व्यक्ती जग सोडून गेल्यावर आपन अश्रू गाळतो ..अस का होत समाजातं बदल घडवून आणणाऱ्या लोकांना मरावच लागत ? त्यांच्या जिवंतपणी आपन त्यांचं महत्त्व नाही समजू शकत ? ..काकू आज तुमच्या डोळ्यात हे अश्रू शोभत नाही आणि तुम्हाला तो हक्कसुद्धा नाही ..अजिंक्य बर झालं यार तू या स्वार्थी जगातून निघून गेलास नाही तर तुला यांनी मारून खाल्लं असत ..बर झालं तू गेलास .. आणि बर का काकू अजिंक्य तुमचाच मुलगा आहे ..अजिंक्यने आपला शब्द पूर्ण केला त्याने मरणापूर्वी आपलं तोंडसुद्धा तुम्हाला दाखवलं नाही ..व्हा ग्रेट अजिंक्य ..काकू मला न राहवुन हे म्हणावस वाटत आहे की या दिवसानंतर तुम्हाला पश्चातापामुळे कधीच शांत झोप लागणार नाही ...त्याचा तो निरागस चेहरा प्रत्येक वेळेला एक प्रश्न नक्कीच विचारेल ..यात माझी काय चूक ?..जा जगून बघा या नरक यातना ..जा जगून बघा ।..."

रिया मृणालला गाडीत घेऊन त्यांच्या रूमकडे निघाली तर रियाच्या शब्दाने अजिंक्यच्या आईवडिलांच काळीज भेदून काढलं आणि त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली ..त्यांचे डोळे पाणावले होते पण माफी मागायला अजिंक्य समोर नव्हता .

क्रमशः ...