Addiction - 2 - 26 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 26

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 26

अजिंक्य तिचा हात धरून बाहेर निघाला तेव्हा सर्वांना वाटलं की तो मृणाललाच बाहेर काढणार पण त्यालाही बाहेर जाताना पाहून प्रज्ञा म्हणाली , " बाबा तुम्ही पण जाणार आहात ? ..नका जाऊ न आम्हाला तुमची फार गरज आहे ..विशेषतः मला !! " आणि अजिंक्य तिच्यावर हसत म्हणाला , " बेटा मला तुझा मुळीच राग आला नाही ..मान्य आहे की तुला खूप त्रास झाला पण विचार केल्यावर तुला लक्षात येईल की मी मृणालला घरी आणलं नसतंच तर यातलं काही घडलं नसत ..मुंबई शहरातच असतो तर सर्व काही छानं असत तेव्हा नकळत का होईना याला सर्वस्वी जबाबदार मी आहे आणि अप्रत्यक्षरित्या तुझे शब्द माझ्यासाठी होते ..तस पण तुला सावरायला तो आहे , आजी आहे सो तू सावरुन घेशील स्वतःला ..जस तू आपल्या प्रेमासाठी जगते आहेस तसच मी माझ्या प्रेमासाठी जगतो आहे आणि तिला एकट सोडण्याचा प्रश्नच येत नाही ..सो जा आजपासून आम्हा दोघांची सावली देखील तुझ्या भविष्यावर पडणार नाही ..हवं तसं जग पण कुठल्या वडिलांना जन्म का दिला हा प्रश्न विचारू नको ? ..कारण तू या जगात आलीच नसती तर तू तुला हे सुंदर जग पाहायलच मिळाल नसत ..मग तुला प्रेमही झालं नसत आणि त्या प्रेमाला वाचविण्यासाठी तू एका आईला घालून पाडून बोललीही नसती ...सॉरी भरपूर बोललो ..तुला झालेला त्रास मी परत तर करू शकत नाही पण प्रयत्न करेन की पुढे कुठलाच त्रास होणार नाही ...सो वन्स अगेन सॉरी डिअर .."

अजिंक्य आपल्या बॅग्स घेऊन कारमध्ये ठेवू लागला ..तर मृणाल शांत होऊन सर्व काही बघू लागली ..तिने डोळ्यात अश्रू साठवून ठेवले होते ..कोणत्याही क्षणी ते बाहेर पडणार होते म्हणून ती काहीच बोलली नाही पण तिथे उभी असताच आई हळू आवाजात मृणालला म्हणाली , " बघ खरा ठरला ना माझा शाप ? तू जस मला माझ्या अजिंक्यपासून वेगळं केलं अगदी तसच तुझ्या मुलीनेही तुला स्वतःपासून दूर केलं .." आईच्या शब्दाने मृणालचे घाव आणखीच ताजा केले ..गाडीत बॅग ठेवणाऱ्या अजिंक्यला सर्व ऐकू गेलं होतं आणि सर्व बॅग्स गाडीत भरून झाल्यावर तो आईला म्हणाला , " आई बरोबर आहे तुझं ..मी तुला सोडलं तसच प्रज्ञाने मृणालला सोडलं फक्त फरक इतकाच हा निर्णय माझा स्वतःचा होता ..ज्या मुलीला जीवन नकोस होत तिला समाजात स्थान मिळावं म्हणून मी तिच्याबाजूने उभा झालो तर तुम्ही आपला हट्ट पूर्ण करण्याकरिता प्रज्ञाच्या मनात गोष्टी भरत राहिलात ..आई मी याआधी तुला कधी काही बोललो नाही पण आज नक्कीच बोलेन ..ती ही की जेव्हा तू पहिल्यांदा मृणाल गंदी आहे असं प्रज्ञाला सांगत होती तेव्हा मी ते सर्व एकल होत शिवाय प्रज्ञा - मृणालमध्ये पहिल्यांदा वाद झाले होते तेव्हाही मी रात्री तुमचं बोलणं एकल आणि तू तिला समजावून सांगण्या ऐवजी तिने कस चांगलं केलं हे तू सांगत होतीस ..आई प्रज्ञाला आमचा राग होता म्हणून ती आमच्याशी काहीच बोलू शकत नव्हती पण ती तर सर्व सांगायची तुला ..मग तिच्या मनातलं ओळखलं असत आणि योग्य पद्धतीने समजावून सांगितलं असत तर आज तिला इतका त्रास झाला नसता ..असो तुला जे हवं होतं तेच झालं ..आता सांभाळ तिला आणि बर का तू म्हणाली न की तुझा शाप खरा झाला ..हो हे खरं आहे पण माझं पण एक एकूण घे ..जस तू प्रज्ञाला मृणाल पासून जाणून वेगळं केल तसच माझंही वचन आहे की तू माझा चेहरा जिवंतपणी कधीच पाहू शकणार नाही ..तुलाही आपल्या मुलाचं तोंड पाहायला खूप खूप तरसाव लागेल ..काही जास्त बोललो असेल तर माफ कर ..चल आम्ही निघतो .."

मृणालचा काही केल्या तिथून पाय निघत नव्हता तर अजिंक्य तिचा हात ओढून तिला तिथून घेऊन जाऊ लागला ..गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी एकदा पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या घराकडे पाहिलं आणि एकही क्षण न थांबता ते तिथून निघून गेले ..जे काम पूर्ण गाव मिळून करू शकले नव्हते तेच काम प्रज्ञाने करून दाखवलं होत ..अर्थात तिचा हा निर्णय तिला स्वातंत्र्य देणार होता की बंधन हे समोर माहिती होणार होत ...

रात्रीचे 11 वाजले होते ..एवढ्या रात्री कुणाच्या घरी जाण योग्य वाटणार नाही म्हणून अजिंक्यने गाडी ट्रायस्टार हॉटेलकडे घेतली ..चौकशी केली असता तिथे रूम्स अवेलेेबल असल्याची त्यांना माहिती मिळाली ...उद्यापासून राहायला नवीन जागा शोधावी त्यामुळे आजची रात्र तिथे काढायचं त्यांनी ठरवलं ..दोघांच्याही पोटात अन्नाचा कण सुद्धा गेला नव्हता तरीही त्यांची काहीच खायची इच्छा नव्हती त्यामुळे बॅग्स रूममध्ये ठेवून ते बेडवर बसले ..इतक्या वेळापासून शांत असलेल्या मृणालने आपले अश्रू मोकळे केले ..ती त्याच्या मांडीवर झोपून आपले अश्रू मोकळे करीत होती आणि स्वतःचेच अश्रू पुसत मृणाल म्हणाली , " अजिंक्य आज जे झालं ते अनपेक्षित होत ..माझ्यामुळे माझ्या मुलीला इतका त्रास झाला असेल असं कधी वाटलसुद्धा नव्हतं ..खरच रे मी त्यांच्या आयुष्यातून आधीच निघून जायला हवं होतं ..मी वेडी समजत होते की सर्व काही ठीक होईल आणि माझे प्रयत्न त्यांच्या मनात घर करून जाईल पण मला कधी जाणवलंच नाही की हेच प्रयत्न सर्वाना खूप जास्त त्रास देत आहेत ..आपण जगाच बोलणं कधीच मनावर घेतल नाही पण आज प्रज्ञाच्या शब्दांनी काळजाचे हजार घाव केले ..आज हे क्षण काढणंही असह्य झालं आहे .." आणि समोर अजिंक्य स्मित करू लागला ..त्याला तस पाहताच मृणाल म्हणाली , " का रे तुला त्रास होत नाही का ? किती शांतपणे घेतोस हे सर्व ? " आणि अजिंक्य पुन्हा हसत म्हणाला , " कोण म्हणत की मी शांत आहे ..मनात खूप वादळ आहे ग फक्त त्यांना सांभाळून ठेवलय कारण ते बाहेर आले की सर्व अस्ताव्यस्त होऊन जाईल ..तुला माहिती आहे प्रज्ञाच बोलणं मला आज मनाला का लागलं नाही कारण तिने जर तो त्रास खरच सहन केलाय तर मग तू सहन केलेला त्रास तिला समजला कसा नाही ? हा विचार मनात आला म्हणून हसतोय ..सध्या तिच्या डोक्यावर प्रेमाचं भूत आहे जेव्हा ते भूत उतरेल आणि जगात मानस कशी असतात हे समजेल तेव्हा तीच स्वतः आपल्याकडे परत येईल ..त्यामुळे आपण त्या क्षणाची वाट पाहू फक्त एकच भीती आहे की तोपर्यंत तिने खूप काही गमावलेल असू नये .."

" अजिंक्य आज ती आपल्याला एवढं काही बोलली तेव्हा ती पुन्हा परत आल्यावर स्वीकारशील तू तिला ? " , मृणाल म्हणाली आणि अजिंक्य उत्तरला , " जर सेल्फ रिस्पेक्ट म्हणशील तर कधीच नाही पण काय करणार ना आई वडिलांच काळीज आहे सो काही दिवस नक्कीच रागावू पण स्वीकारणार हे नक्की ..हो पण हे नक्की की ती पुन्हा तुला काही बोलली न तर मी ते कधीच खपवून घेणार नाही .हा अधिकार मी कुणालाही दिला नाही अगदी स्वतःच्या मुलीलाही नाही आणि तसही जी मुलगी आईच प्रेम समजू शकत नाही ती जागाच प्रेम काय समजेल ? "

मृणाल - अजिंक्य बऱ्याच वेळ गप्पा मारत होते ..गप्पा मारून झाल्या आणि ते शांत बेडवर पडले ..दोघेही एकमेकांकडे पाठ करून झोपले पण झोप काही येईना ..आज प्रज्ञाने त्यांच्या मातृत्त्वावर , पालनपोषणावर , त्यांच्या त्यागावर प्रश्न केला होता आणि ते सर्व त्यांच्या मनात जसच्या तस घुमत होत ..विशेषतः अजिंक्यच्या मनात ..लोक म्हणतात की शांत लोक सहनशील असतात पण त्या सहनशिलतेमागे किती काय लपवल असत आणि त्याचा त्रास किती होतो हे कुणालाच कळत नाही तेव्हा अजिंक्यची स्थिती सहजा - सहजी कुणीच समजू शकत नव्हत तर मृणाल अजिंक्यसोबत सर्व शेअर करू लागल्याने तीच मन मात्र हलकं होऊ लागलं ..आता ही मनामनात असलेली वादळे आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी काय काय करणार होती तेच पाहायचं होत ..मग ते वादळ प्रज्ञाच्या मनातलं असो की आजीच्या , अजिंक्यच्या असो की मृणालच्या ..समीरच्या असो की सलीलच्या की सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलीलच्या घरच्या..जे पुढे जाऊन प्रज्ञाच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग होणार होते ....

मृणाल - अजिंक्यच्या घर सोडण्याने गावकरी , समीर , प्रज्ञा , प्रज्ञाचे आजी आजोबा सर्वच खुश होते ..जे काम ते इतक्या वर्षात करू शकले नव्हते ते काम फक्त प्रज्ञाच्या काही शब्दांनी केलं ..लोक आनंदात इतके गुंग झाले की जणू प्रज्ञाला त्यांनी माफच केलं ...आता गावात तिच्याबद्दल फार चर्चा होत नसत ..तर आपल्या लाडक्या लेकीने सुनेला हाकलून लावलं म्हणून आजी प्रज्ञावर फारच खुश होती ..ते आपल्या जुन्या घरात प्रज्ञासोबत राहू लागले ..मृणाल जाण्याची सर्वच वाट पाहत होते हे यावरून तरी सिद्ध झालं ..प्रज्ञा आजी - आजोबांसोबत सुखाने राहू लागली ...

प्रज्ञाला घर होत तर अजिंक्य - मृणाल बेघर झाले ..अजिंक्यने रूम पाहण्याच काम रियाला दिल होत पण रूम न मिळाल्याने त्यांना काही दिवस हॉटेलवरच राहावं लागलं होतं ..शेवटी एका आठवड्यानंतर त्यांना रूम मिळालीे ..त्यांना पुन्हा एकदा नवीन संसार मांडायचा होता ..त्यांनी सोबत फक्त कपडेच आणले असल्याने त्यांना दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घ्याव्या लागणार होत्या ..या वयात त्यांना नवीन संसार थाटण्याची अजिबात इच्छा नव्हती पण जीवन जगायचं असेल तर त्यांना ते करावं लागणारच होत आणि रियाच्या मदतीने मृणालने घराला लागणाऱ्या थोड्या फार वस्तू आणल्या ..वरकरणी त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू झालं होतं पण आई बाबांविना , प्रज्ञाविना त्यांना जगणं मुश्किल झालं ..इतके वर्ष ते शिव्या देत असले तरी समोर होते त्यामुळे त्यांची कमी जाणवली नव्हती पण आता मात्र त्यांना ऐकट घर खायला निघालं ..शहरात लोकांचा त्रास नव्हता पण आपलेचओक सोबत नसल्याने त्या घराला घरपणसुद्धा येत नव्हतं ..

तर इकडे मृणाल - अजिंक्य सोबत नसतानाही कुणाला काहीच फरक पडला नव्हता ..प्रज्ञाची तर चांदीच झाली होती ..आई घर सोडून गेली हे ऐकल्यावर तर सलील फारच खुश झाला होता ..प्रज्ञा आपल्या आईवर गेली होती ..दिसायला अगदी अप्सरेसारखी होती त्यामुळे तिला गमावण त्याला कधीच परवडणार नव्हतं आणि त्याने तिला दोन्ही हातानी स्वीकारल ..मृणाल - अजिंक्य सोबत असताना प्रज्ञावर काही बंधने आपोआप लादल्या गेली होती ..पण त्यांनी घर सोडावं आणि जणू तिच्यावरच बंधनच नाहीस झालं ..आपला बदला घेतला म्हणून आजी प्रज्ञाला शब्दाने बोलत नव्हती ..प्रज्ञाने आयुष्यभर फक्त दुःखच बघितले होते तेव्हा एकाच वेळी सर्व सुख बघून ती त्यात हरवून गेली आणि एकाच क्षणात सर्व जगून घेण्यासाठी ती धरपडू लागली ..अजिंक्य घर सोडून गेला असला तरीही त्याने तिचे बँक कार्ड्स परत घेतले नव्हते आणि ती त्याचाच फायदा घेऊन सर्व पैसे इतरांवर उडवू लागली ..कधी कधी तर मित्रांच्या पार्टीला रात्री - बेरात्री निघायची ..सलील तर तिच्यावर फारच खुश होता ..प्रज्ञाने आपल्याला आवडणारा मुलगा आपल्याच कास्टचा आहे असं सांगितलं होतं त्यामुळे आजीही तिला काहीच बोलत नव्हती तर वेळ आल्यावर आजी आपल्या विरोधात जाईल म्हणून तिने आपलं नात समोर नेण्याची पूर्ण तयारी करून ठेवली होती ..प्रेमाची नशा काय असते हे तिने सिद्ध करून दाखवलं होत ..

दिवस जाऊ लागले आणि आजीची लाडकी असणारी प्रज्ञा आता वेगळंच वागू लागली ..जी तिच्याशी मनातलं सर्व शेअर करायची आता तीच कधीतरी तिच्याशी आवाज वर करून बोलू लागली ..अजिंक्य - मृणालनेही कधी तिच्यावर आवाज उठवला नव्हता हे लक्षात येताच तीच डोकं भिरभिरत्या भोवऱ्यासारखं फिरू लागल ..प्रज्ञा आजच्या काळातली मुलगी होती तर आजी आजोबा जुन्या काळातले लोक त्यामुळे विचारात संघर्ष होऊ लागला ..आधी मृणाल - अजिंक्यला काहीही बोलणारे लोक प्रज्ञाच्या चुकांनाही सपोर्ट करू लागले होते त्यामुळे तिच्या वागण्यात बऱ्यापैकी फरक पडू लागला ..प्रज्ञा आता घरी कमी आणि बाहेर जास्त राहू लागली ..कधी कधी तिला घरी यायला रात्रीचे एक दोन वाजत पण तिला काहीही बोलण्याची हिम्मत कुणीच करू शकल नाही ..कारण फक्त एकच जी आपल्या आईवडिलांना घालून पाडून बोलू शकते ती आपल्याला काय बोलेल याचा विचार आला की सर्व आपोआप शांत बसत ..सलीलने तिच्या मनावर वर्चस्व निर्माण केलं आणि तिला त्याच्याविरुद्ध शब्द देखील ऐकायला आवडत नसे आणि या परिस्थितीत तिचे आजी - आजोबा फक्त डोक्यावर हात ठेवून बसण्यापेक्षा दुसरं काहीच करू शकले नाहीत ..( प्रज्ञाच पात्र आजच्या तरुणांना बघून रेखाटल आहे ..नक्कीच अपवाद सोडून )...

अजिंक्यने सर्वाना शब्द दिल्याप्रमाणे तो या दिवसात एक शब्दही कुणाशी बोलला नव्हता ..मृणालला जास्त आनंदात ठेवण ही त्याची जबाबदारी बनत गेली ..प्रज्ञा , आईबाबा यांची आठवण काढल्या जात होती पण त्यांनी सत्य स्वीकारून जीवनात समोर पाऊल टाकलं होतं ..अजिंक्य मृणाल घरात एकटीच राहत असल्याने तो वेळेवर येऊन तिच्याशी गप्पा मारू लागला ..कधी बाहेर फिरणं असो की एकांतात फक्त नजरेने बोलणे ते सर्व क्षण ते जगू लागले ..सर्वांचच जीवन मस्त सुरू होत ..एकाच घरातल्या तीन पिढ्या वेगवेगळ्या वळणावर उभ्या होत्या ..आता हे वळण , हा दुरावा वाटा एकत्र आणणार होत्या की एकमेकांकडे येणारे रस्ते कायमचे बंद होणार होते हे फक्त पुढच्या काही दिवसातच माहिती होणार होत ..

क्रमशः ...