Addiction - 2 - 25 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 25

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 25

मृणाल - प्रज्ञाचे संबंध थोडे फार सुधारू लागले होते त्यामुळे मृणाल त्यातून स्वतःला सावरू लागली ..अजिंक्य ऑफिसच्या कामात बिजी राहायचा ..प्रज्ञा - मृणालमध्ये अशी स्थिती असतानाही अजिंक्य काहीच का बोलत नाही हे बघून मृणाल गोंधळली होती ..अजिंक्य नेहमीच स्पष्ट मत दर्शविणार्यातला होता तेव्हा त्याच शांत बसणं म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्या मनात शिजत होत ते काय होत याचा शोध ती घेऊ लागली होती तरीही तिच्या हाती काहीच लागलं नव्हतं .. ..प्रज्ञा भीतीमुळे का असेना पण मृणालशी बोलू लागली होती तर प्रज्ञाबद्दलची गोष्ट अजिंक्यला सांगावी हे मृणालच्या मनातही आलं नव्हतं पण प्रज्ञाला याबाबत शाश्वती नसल्याने ती शंकेच्या रुपानेच मृणालकडे पाहत होती ...भरपूर दिवस झाले असतानाही मृणाल अजिंक्यला तिच्याबद्दल काहीच न बोलल्याने तिला मृणालवर थोडा फार विश्वास बसू लागला आणि प्रज्ञा तिच्या जवळ जाऊ लागली ..

सलील - प्रज्ञाही आपल्या नात्यात फारच खुश होते ..जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे ते एकमेकांच्या फारच जवळ येऊ लागले ..शाळेत तिच्या गावचे मित्रच नसल्याने मृणालच सत्य सलीलपासून लपून होत त्यामुळे प्रज्ञा निवांत होती .त्याच्या सोबतीने तिने आपलं स्वतःच एक जग निर्माण केलं ..तिने या वयातच आपली काही सुंदर स्वप्न रचली होती ..आणि ते प्रत्येक स्वप्न सलीलविना अपूर्णच होत ..प्रज्ञा त्याच्या प्रेमात पूर्णतः वेडी झाली होती ..तीच बालपण तर फक्त दुःखात गेलं होतं त्यामुळे सलीलसोबत एक सुखाचा संसार तिला जगायचा होता ..त्याच्याशी लग्न करून त्याची अर्धांगिनी बनायचं होत आणि म्हणूनच तिने त्याला आपल सर्वस्व अर्पण केलं अर्थातच ती आपलं शरीर देखील त्याला सोपवायला तयार होती पण त्याने स्वतःच नकार दिल्याने तिला त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास बसला होता ..आणि ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती ..कुठेतरी त्यांची प्रेम कथा अजिंक्य - मृणालसारखी वाटत होती पण नियती काय सांगणार होती याच उत्तर फक्त आणि फक्त वेळच देणार होती..

दिवसेंदिवस त्यांचं रिलेशनशिप आणखीच घट्ट होऊ लागलं ..स्वतःच्या घरून विरोध होईल हे माहिती असल्याने प्रज्ञाला स्वतःच करिअर बनविण फार गरजेच होत ..एकदा की ती इंडिपेंडेंट झाली की मग कुणी होकार दिला किंवा मग नकार दिला तरीही त्याने तिला काहीच फरक पडणार नव्हता त्यामुळे ती खूप जास्त अभ्यास करू लागली ..शिवाय अजिंक्य त्यांच्या नात्याला होकार देईलच याबद्दल तिला कुठलीच शंका नव्हती त्यामुळे तिने आपलं सर्व लक्ष अभ्यासाकडे लावलं ..सलील आणि प्रज्ञा आता फारच कमी वेळ एकमेकांशी बोलू लागले होते आणि बाकी संपूर्ण वेळ अभ्यासात व्यस्त राहायचे ..शेवटी त्यांना त्यांच्या मेहनतीच फळ मिळालं आणि खूप चांगल्या मार्क्सने दोघांनीही दहावी पास केली ..त्यादिवशी प्रत्येकच व्यक्ती खुश होता ..प्रज्ञाच्या आजी आजोबांनी पेढे वाटून तीच स्वागत केलं होतं पण अजिंक्यने मात्र शुभेच्यांच्या वर काहीच दिल नाही त्यामुळे प्रज्ञा थोडी हिरमुसली होती पण ती त्याबद्दल काहीच बोलली नाही ..यामध्ये सर्वात जास्त खुश होती ती म्हणजे मृणाल ..आपल्या मुलीच कौतुक बघून तिचे डोळे आनंदाने भरून आले होते आणि त्यावेळी पहिल्यांदा ती मृणालशी भरभरून बोलली होती ..

दहावी संपली आणि कॉलेज सुरू झालं ..सलील प्रज्ञाने एकमेकांशी चर्चा करुन एकच कॉलेज निवडलं ...शाळा म्हटलं की बंधन पण कॉलेज म्हटलं की मोकळीकता ..शाळेत असताना फारच कमी वेळा त्यांना बाहेर क्षण घालवता येत होते पण कॉलेजला आल्यापासून त्यांना कुठलंच बंधन नव्हतं ..क्लासेस सुरू असायचे पण त्याहीपेक्षा एन्जॉयमेंट जास्त असायचं ..कधी कधी लेक्चर नसले की सलील तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचा ..मूवी तर आठवड्यात एकदा ठरलेला असायचा ..बाकी बाहेर खान पिन यात कुठलंच बंधन नव्हत ..अर्थात हा सर्व पैसे प्रज्ञाकडून खर्चला जायचा ..प्रज्ञा कधी आजीकडून तर कधी अजिंक्यकडून तर वेळ आल्यावर मृणालकडूनसुद्धा पैसे घेत असे ..तिला विचारणार कुणीच नसल्याने तीही बिनधास्त जगू लागली होती ..तिने स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा घ्यायला सुरुवात केली ..प्रज्ञाच तासंतास कुणाशी तरी बोलण होतं हे मृणालच्या लक्षात येत होतं पण मागच्या घटनेमुळे मृणालसुद्धा प्रज्ञाला काहीच बोलली नाही ..कॉलेजला आल्यावर एक बदल नकळत घडून आला ..शाळेत त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कुणालाच माहीत नव्हतं पण कॉलेजमध्ये त्यांचं वागणं कुणापासूनच लपल नव्हतं ..या मधहोशीत जगताना प्रज्ञा विसरूनच गेली की लोक आपल्यावर नजर ठेवून आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो ..ती एन्जॉय करत राहिली आणि तिच्या नकळत काही गोष्टी रचल्या गेल्या होत्या ज्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हत ...

काही दिवस झाले होते ...प्रज्ञा आणि सलीलच नात वेगळं वळण घेऊ लागल ..मागील काही दिवसांपासून सलील प्रज्ञासोबत एक शब्दही बोलला नव्हता ..ती स्वतःहून बोलायला गेली की तिला टाळू लागला होता ..आणि एक वेळ अशी आली की ती दिसताच तो आपली वाट बदलू लागला ..प्रज्ञाला हे असं का होत आहे ते कळतच नव्हतं ..तिने त्याच्याशी बोलण्याचे वारंवार प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ..ती दर रात्री त्याला कितीतरी मॅसेज करायची पण एकाही मॅसेजच उत्तर त्याने दिल नव्हतं आणि कॉल उचलण्याचा प्रश्नच नव्हता ..प्रज्ञा या सर्वात फारच खचली होती ..त्याच्या न बोलण्याने तिचा प्रत्येक दिवस खराब जाऊ लागला आणि दिवसेंदिवस तिची चिडचिड होऊ लागली ..एवढंच काय तर सलील प्रज्ञाला सोडून बाकी सर्व मुलींशी हसून हसून बोलायचा त्यामुळे तिचा राग आणखीच वाढत होता ..आजही ती कॉलेजला आली तेव्हा सलील मुलींशी बोलत होता ..सकाळी - सकाळीच तीच डोकं खराब झालं आणि ती क्लास करण्याऐवजी बाजूला असलेल्या गार्डनला गेली ..तिला सलीलवर फारच राग येत होता पण कारण न जाणून घेता त्याच्यावर रागावणं तिला आवडलं नाही म्हणून तिने एक मॅसेज टाइप करून त्याला पाठवला.. " त्यात तिने लिहिलं होतं की आज तू जर आला नाहीस तर मी आत्महत्या करेन आणि यास सर्वस्वी जाबाबदार तूच असशील ..तेव्हा प्लिज मला फक्त एकदा भेट ..आपलं बोलणं झालं की मी तुला त्रास देणार नाही ..माझ्यावर प्रेम केलं असशील तर प्लिज एकदा ये .."

पंधरा मिनिटे झाली होती ..तिची संपूर्ण नजर गेटवर लागली होती आणि क्षणात सलील तिथे पोहोचला ..तिने त्याला बसायला सांगितलं पण तो एवढ्या रागात होता की तो तिच्यासमोर उभा राहत म्हणाला , " काय झालं मला का त्रास देत आहेस ? ..तुला एवढंही कळत नाही का मला तुझ्याशी बोलायचं नाही .." आणि प्रज्ञा त्याचा हात पकडत म्हणाली , " हो पण तू असा का वागतो आहेस ? ..आपल्यात तर सर्व काही ठीक होत मग अचानक अस काय झालं की तू माझ्याशी बोलणंच बंद केलं ..सांग ना रे असा काय वागतो आहेस ..? " आणि सलील रागावत म्हणाला , " उलटा चोर कोतवाल को डाटे !!..हे मस्त आहे तुझ !! ..तू माझ्यापासून सर्वात महत्त्वाची गोष्ट लपवली आणि वरून मलाच विचारते आहेस काय झालं असं ? "

" काय लपवल रे मी ? ...तुझ्यावर जेवढा विश्वास केला तेव्हढा कुणावर सुद्धा केला नाही आणि तू अस म्हणतोस " , प्रज्ञा म्हणाली आणि सलील तिचा हात जोराने पकडत म्हणाला , " विश्वास !!! तुला या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ? तू इतके दिवस आपल्या लोकांबद्दल काहीच सांगितलं नाही ...मी ते मान्य केलं पण त्यामागे अस काही असेल असं वाटलंसुद्धा नाही ..तू एका वैश्येची मुलगी आहेस आणि तू मला हे सांगितलंसुद्धा नाही..तुला ते सांगणं गरजेचं नाही वाटलं ?.."

सलीलच्या तोंडून मृणालच सत्य बाहेर यावं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले ..तिला काय बोलाव तेच कळेना ..सलीललाही बराच राग आला होता आणि तो तिच्याशी काहीच न बोलता निघू लागला ..तेवढ्यात प्रज्ञा म्हणाली , " सलील फक्त दोन मिनिटं माझं एकूण घे ..मलाही काहीतरी बोलायच आहे मग तू मला सोडून गेलास तरी मी तुला काहीच बोलणार नाही ..( तो तिथेच थांबला ) ..सलील " वैश्या " हा शब्द माझ्या आयुष्याचा असा डाग आहे की मी तो विचार करून सुद्धा पुसून काढु शकत नाही ..आईच सत्य जेव्हा बाहेर आल तेव्हा तिला सर्वांनी अपशब्द बोलायला सुरुवात केली ..त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून लोकांनी मला टार्गेट बनवलं ..ज्या वयात मला त्या शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नव्हता तेव्हापासून हा शब्द मी जगते आहे ..सलील काय चूक होती रे माझी यात ? लोकांना फक्त विषय हवा होता ..मागे काय झालं होतं मला माहिती नाही पण आईबाबांच्या वाट्याला येणारे सर्व बोल मला खावे लागले ..त्या लहान वयातही लोकांनी मला सोडलं नाही ..मी त्यांचं टार्गेट बनत राहिले ..मनातला आईबद्दलचा राग बाहेर येऊ लागला होता तरीही तिलाही बोलायची हिम्मत झाली नाही पण एवढं मात्र खर कीं ती माझ्या दूर होत गेली .. तिच्यामुळेच मी स्वतःला हरवून बसले .. नंतर नंतर तर मी एकटी पडले तेव्हाच तू आयुष्यात आलास आणि पुन्हा नव्याने जगायची इच्छा निर्माण झाली ..तू माझा जीव होत गेलास आणि तुला नकळत गमवायची भीती वाटू लागली..माझ्या डोक्यात सदैव हाच प्रश्न होता की तुला माहिती होईल तर काय ? तू आईची शिक्षा मला तर देणार नाहीस ना ? आणि बघ तू तेच करतो आहेस ..म्हणूनच मला तुला यातलं काही सांगायचं नव्हतं..आज मी पुन्हा एकदा हरले सलील ..पुन्हा एकदा हरले ..तुही जा मला सोडून .आता मला जगायचंच नाही ..जा तुही सोडून ..मी कधीही न केलेल्या चुकीची शिक्षा देऊन "

प्रज्ञाच्या डोळ्यात अश्रू पाहून सलील थोडा कोमेजला आणि तिचा हात पकडत म्हणाला , " सॉरी मी तुझी स्थिती समजूच शकलो नाही ..प्रज्ञा आपण बरेच पूढे आलो आहोत ..मी माझा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत बघू लागलो आहे ..पुढे लग्न करण्याचाही विचार सुरू आहे तेव्हा या सर्वात तुझ्या आईच सत्य नेहमीच अडथळा बनेल आणि माझी इच्छा नसतानाही तुला स्वीकारता येणार नाही ..तुही मला समजून घे ..आपण सोबत राहण्यासाठी मला फक्त एकच उपाय दिसतो आहे .." आणि प्रज्ञा त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली , " सलील तू बोल फक्त मी तुझ्यासाठी काहीही करू शकते ? " आणि सलील लांब श्वास घेत म्हणाला , " तुला तुझ्या आईसोबत असलेले सर्व नाते तोडावे लागतील ..."

त्याचे शब्द बाहेर यावे आणि ऍटम बॉम्ब पडावा अशी शांतता झाली ..सलील तिच्या उत्तराची वाट पाहत होता आणि प्रज्ञा म्हणाली , " बस एवढंच !! जी आधीच मेली आहे तिच्यासोबत नात तोडण्यात कुठली मोठी गोष्ट ?..सलील तुझ्यापेक्षा माझ्या आयुष्यात आणखी कुणीच मोठं नाही ..तस पण आईमुळे मी माझ्या जीवनात फार सोसलं आहे तेव्हा आता तिच्यामुळे मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही .कुणी स्वार्थी म्हटलं तरीही चालेल पण मला तू हवा आहेस ..सलील मला फक्त थोडा वेळ दे ..मी तुला वचन देते की ती माझ्या आयुष्यात कधीच असणार नाही पण प्लिज मला सोडून कधी जाऊ नको ..तुझ्याविना मी हे जीवन विचारसुद्धा करु शकत नाही ..तू नसलास तर मी मरून जाईल रे ..सो प्लिज पुन्हा अस बोलणं सोडू नको .." प्रज्ञाचे शब्द ऐकताच सलीलचा चेहरा आनंदाने बहरून निघाला ..त्याने त्याचक्षणी तिला मिठीत घेतले आणि दोघेही कितीतरी वेळ तसेच होते ..दोघात एक नात तयार झालं होतं तेही कुना तिसर्याच सुख हिरावून ...
त्या क्षणानंतर सलील - प्रज्ञाच आयुष्य पुन्हा एकदा पटरीवर आलं ..ते पुन्हा मनमोकळं जगू लागले पण प्रज्ञा मात्र सुखाने झोपू शकत नव्हती ..तिने त्याला वचन तर दिल होत पण ते पूर्ण कस करायच याचा विचार करून तीच डोकं सुन्न झाल होत ..मृणाल असल्याने किंवा नसल्याने तिला काहीच फरक पडणार नव्हता पण अजिंक्यला त्रास देऊन नात तोडणं तिला मंजूर नव्हतं पण तिच्याशी नात तोडायच म्हटलं की त्याला त्रास होन निश्चित होत ..तिला काहीच सुचत नव्हतं..डोक्यातला गोंधळ बराच वाढला होता आणि त्याच वेळी तिला आयती संधी मिळाली ..प्रज्ञा रात्रीचे नऊ वाजले तरी घरी पोहोचली नव्हती त्यामुळे अजिंक्य तिची दारावरच वाट पाहत होता ..अजिंक्य खूप दिवसानंतर इतक्या रागात जाणवत होता त्यामुळे मृणालला फारच भीती वाटत होती ..आणि राहून राहून काहीतरी चुकीचं घडणार असल्याची शंका तिच्या मनात येऊ लागली ..आता फक्त वाट होती ती प्रज्ञा घरी येण्याची ..रात्रीचे नऊ वाजून दहा मिनिटे झाले होते जेव्हा प्रज्ञा घरी आली आणि फ्रेश होण्यासाठी स्वतःच्या बेडरूमकडे जाऊ लागली ..ती आत जाणारच तेव्हा अजिंक्य रागात म्हणाला , " प्रज्ञा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायच आहे सो सरळ इकडे ये ..( ती काहीही न बोलता त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली ..) प्रज्ञा आज इतका उशीर का झालाय तुला ? आज तर काही खास नव्हतं की तुला इतक्या उशिरा थांबावं लागेल .." आणि प्रज्ञा नजर वर करून म्हणाली , " बाबा मैत्रिणीकडे गेले होते म्हणून थोडा उशीर झाला .." आता मात्र अजिंक्यचा पारा फारच वाढला आणि तो म्हणाला , " प्रज्ञा तुला माझ्याशी खोट बोलताना काहीच वाटत नाही का ग ? तुला काय वाटत तू काय करते आहेस ते आम्हाला कळत नाही की काय ? तू एका मुलासोबत दिवसभर फिरत होतीस ना ? आणि तरीही डोळे वर करून खोट बोलायच .."

आता मात्र प्रज्ञाला राग अनावर झाला आणि ती मृणालकडे रागाने बघत म्हणाली , " तरीही म्हटलं आई इतके दिवस शांत कशी होती ? मला वाटलंच एकाचे दोन करून तुम्हाला ती नक्कीच सांगेल आणि तुम्ही काहीही विचार न करता मला ओरडाल ..याशिवाय तिला येत तरी काय ? " आणि अजिंक्य ओरडत म्हणाला , " प्रज्ञा तू आपल्या चुकांच खापर तिच्यावर फोडते आहेस आणि तस पण मला तू अजून उत्तर दिलं नाहीस ..मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची .." प्रज्ञाचा राग आता पराकोटीला पोहोचला होता .." शेवटी दाखवलीच न आई तू आपली जात ..आधी आजीला बाबांपासून वेगळं केलंस आणि आता मला ..तुझ्याकडून अपेक्षाच काय करावी ? आधी स्वतः आपल्या आयुष्यात रंग उधळले तेव्हा काहीच वाटलं नाही आणि मी फक्त मित्रांसोबत बाहेर काय फिरले तर तू बाबांना चढवून सांगते आहेस ..बरोबर म्हणतात ग लोक तुला ' वैश्या ' " ..तिच्या तोंडून तो शब्द बाहेर निघावा आणि आतापर्यंत शांत असलेल्या अजिंक्यने तिला थोबाडीत मारली .." मृणाल त्यांच्या जवळ धावत गेली तर अजिंक्यचा चेहरा संतापाने लाल झाला होता ..प्रज्ञा डोळ्यातून अश्रू बाहेर काढत होती ..अजिंक्य म्हणाला , " तुला काय वाटत प्रज्ञा मी काय लहान आहे मृणालच्या शब्दात यायला .काही दिवसांपूर्वी मी तुला त्याच्यासोबत पाहिलं आणि त्यानंतर माझी तुमच्यावर नजर होती ..आजही मी तुम्हाला बघितलं आणि बऱ्याच वेळ मागावर होतो .मला वाटलं आज तरी खर बोलशील पण तुझं खोट सांगणं बरच काही सांगून गेलं ...तू आपली चूक लपविण्यासाठी तिला काहीही बोलणार आहेस का ? कुणी दिलाय तुला हा हक्क ? "

प्रज्ञा सतत अश्रू गाळत असल्याने तिचे डोळे लाल झाले होते ..गालावरचा हात काढत ती खूप मोठ्याने म्हणाली , " हो मी फिरते त्याच्यासोबत!! ..आहे माझं त्याच्यावर प्रेम !! ..बाबा तुम्ही हक्काचं बोलताना ..मग माझंही बोलणं ऐकून घ्या ..तुम्हाला कुणी सांगितलं हो मला जन्म द्यायला ? .तुम्हाला माहिती होत ना जन्म झाल्यावर मला किती त्रास होईल तरीही तुम्ही जन्म देऊन माझं जीवन नरक बनविल ...तुम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि मी जन्मले पण या समाजात जगत असताना मला किती त्रास झाला याची तुम्ही साधी चौकाशीसुद्धा केली नाही ..माझी चूक नसताना मी काय काय भोगलं तुम्हाला काय माहिती ? तरीही मी तुम्हाला शब्दाने काही बोलले नाही .कितीदा मी कोपऱ्यात बसून रडले याची जाणीव नाही हो तुम्हाला ..तुमचे वाद असो की लोकांचं बोलणं सर्व मला त्रास देत होत हे कसं नाही कळलं हो तुम्हाला ...मी तेव्हाही काहीच म्हणाले नाही आणि मी एकटीच पडत गेले तेव्हा तो आयुष्यात आला आणि माझं जग बदललं ..पण मला भीती होत तेच झालं ..आईच सत्य बाहेर आल आणि तो मला सोडायला निघाला ..मी त्याच्यावर खर प्रेम केलं आणि तो फक्त या बाईमुळे मला सोडून जाणार होता ..सांगा न बाबा यात माझी काय चुकी होती ? माझं बोलणं एकूण घेतल्यावर त्याने मला स्वीकारलं पण एका अटीवर की तू आपल्या आईशी संबंध तोडावे ..ज्या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम केलं तो सोडून जातोय फक्त हिच्यामुळे ..हिच्यामुळेच आजी आजोबांना साधं जीवन सुखाने जगायला मिळत नाही ...ते एक एक एक मिनिट कसे जगतात त्यांचं त्यांना माहिती आणि आज हिच्यामुळेच माझंही जीवन खराब झालंय .सर्व काही घडतय फक्त या बाईमुळे ..जा न ग आम्हाला सोडून ... आता किती त्रास सहन करु तुझ्यामुळे ..नाही होत ग सहन आता !! आणि नसेल सोडून जाणार तर कमीत कमी माझा गळा दाबून मारून तरी टाका म्हणजे नेहमीसाठी सुटका होईल माझी यातून .."

प्रज्ञाचा आवाज इतका मोठा होता की आजी आजोबा आवाज ऐकून घरी पोहोचले ..प्रज्ञाला रडताना पाहून आजीने तिला सावरलं तर इकडे मृणाल प्रज्ञाच बोलणं ऐकून खाली कोसळली ..अजिंक्यने तिला पाणी पाजलं आणि ती भानावर आली ..तेव्हाच अजिंक्य म्हणाला , " बर झालं आज तरी बोललीस बेटा ..कटू होत पण मनात असलेलं विष बाहेर आला याचा आनंद आहे ..आमच्यामुळे तुमचं आयुष्य खराब झालं आहे ना ? तुला न विचारता जन्म दिला न आणि तुला पोसल ..खरच आमचं खूप चुकलं ..आता वेळ आहे हे सर्व सुधारायची ..तिच्यामुळे तुम्हाला कुठलंच त्रास होणार नाही ..कधीच होणार नाही .मी तो होऊच देणार नाही." अस बोलून तो बेडरूम मध्ये गेला ..अर्धा तास तो आतमध्ये काहीतरी करत होता .रूम मधून फक्त मृणालच्या रडण्याचा आवाज येत होता ..काही क्षणातच अजिंक्य काही बॅग्स हातात घेऊन बाहेर आला आणि त्याने त्या बॅग्स दाराबाहेर काढल्या ..अजिंक्यने मृणालचा हात खूप जोराने धरला होता जणू तो तिला घराबाहेर काढणार होता आणि शेवटी मृणालचा पाय घराबाहेर पडला ...

क्रमशः .....