बारा जोतिर्लिंग भाग १६
सकाळी 7 वाजायच्या सुमारास एक ज़ोरदार आवाज़ ऐकु आला जणु काही एखादा पहाड तुटून पडला असावा आणि मग केदारनाथ मंदिरात जोरदार पाण्याचे लोट येऊ लागले आणि पाण्याची पातळी वाढू लागली .
ही विनाश लीला 20-25 मिनटा पेक्षा जास्त वेळ चालला नसेल ,पण तो काळ आत अडकलेल्या लोकांना जणु काही कित्येक तासासारखा वाटला .
आत आलेले पाणी आपल्यासोबत विशालकाय दगड घेऊन आले होते .
भूगर्भशास्त्र जाणकारांच्या भाषेत मोठ्या दगडांना बोल्डर आणि खुप मोठ्या दगडांना ब्लॉक म्हणले जाते .
या परिभाषेनुसार अर्ध्यापेक्षा अधिक दगड हे ब्लॉक श्रेणी मधले होते म्हणजे भीमकाय दगड .
या दगडांच्या धडकांमुळे सर्व काही तत्काळ नेस्तनाबूत झाले होते .
मंदिराच्या समोर असलेला प्लेटफॉर्म जो ज़मीनीच्यापेक्षा कीतीतरी फुट ऊंच होता तो आता वाळु आणि चिखल भरल्यामुळे आता एकाच उंचीवर आले .
इथे अनेक प्रेते चारीकडे विखरून पडली होती .
पाउस आणि पुरानंतर आता कडक ऊन पडले होते आणि आता यातील अनेक प्रेते सडायला सुरवात झाली .
मंदिराचे मुख्य प्रवेश स्थान आणि नंदीची मूर्ति यांच्यामध्ये प्रेतांचा खच पडला होता ज्यात महिला आणि मुले सुद्धा होती .
काही काही लोक जे भयाने मंदिराच्या छतावर चढुन बसले होते त्यांनी पाणी कमी झाल्यावर वरून उड्या मारल्या पण चिखल इतका होता की ते सर्व पाच सहा फुट चिखलात गाडले गेले .
केदारनाथ मध्ये त्या वेळेस चोहोकडे भयंकर दृश्ये होती जी पाहून माणुस वेडा झाला असता .
सगळीकडे आरडाओरडा किंचाळ्या चे वातावरण होते .
प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या माणसांना शोधत होता जो शोध त्यानंतर कित्येक दिवस कित्येक महीने आणि कित्येक वर्षे चालु राहीला .
5 ते 16 जून 2013 या कालावधीत उत्तराखंडात, विशेषत: केदारनाथ परिसरात अत्यंत दु:खद, विनाशकारी आणि चित्तभेदक दृश्य होते.
प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिवितहानी आणि वित्तहानी झाली, गावेच्या गावे होतीची नव्हती झाली होती .
हे असे आक्रीत प्रथमच घडले होते .
त्यावेळेस अतिवृष्टी, ढग फुटी आणि भुस्खलन याचा इशारा हवामान खात्याने दिला व केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करावी किंवा पुढे ढकलावी असेही सुचविले.
असे का घडले ? याचा शोध घेणे महत्वाचे आहे कारण उद्या पुन्हा हे घडू नये असे जर वाटत असेल तर टाळायची तयारी प्रथमपासुनच व्हायला हवी.
नाहीतर कदाचित यापेक्षाही मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ भविष्यकाळातच पुन्हा येऊ शकते.
यापूर्वी सन 2011 मध्ये राष्ट्रीय गंगा खोरे प्राधिकरणाने असे सुचविले होते की गोमुख ते उत्तरकाशी ही 130 कि.मी लांबीचा प्रदेश 'पर्यावरण संवेदनाशिल क्षेत्र' म्हणून घोषित करावा.
त्याहीपुर्वी सन 1970 चिपको आंदोलन या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण केली गेली होती.
मात्र 1970 मधल्या अलकनंदेच्या महापुराने पहिली धोक्याची घंटी वाजवली.
पर्यावरणाचे संरक्षण की विकास हा जगभर सर्वत्र सुरू असलेला वाद आहे. त्यामुळेच शासन कुठल्याही पक्षाचे असो यांना आर्थिक विकास हवा असतो, त्यातून मिळणारे कराचे उत्पन्न हवे असते. आपल्या कार्यकाळात ते जास्तीत जास्त कसे वाढविले हे दाखविण्याचा प्रयत्न असतो.
15 जूनच्या रात्री जे घडले ते चित्र मोठे विध्वंसक होते. अवघ्या 3 मिनीटात पाण्याचा जो प्रचंड लोंढा आला त्यात सर्व केदारनाथ गाव वाहून गेले. फक्त मंदिर बचावले. तेही फार मोठा खडक गडगडत खाली आला आणि त्याने पाणी दुभंगले.
पाऊस नेहमीच इथे भयानक पडतो.
उत्तराखंडात ढगफुटी हा प्रकारही दरवर्षी अनेकदा घडतो.
त्यामुळे मोठे पुरही येतात.
अशा स्थितीत लोकांच्या संरक्षणाची, स्थावर जंगम मालमत्तेच्या रक्षणाची, रस्ते आदि पायाभूत सुविधांची, अन्न, पाणी, निवारा हे सगळ्यांना निश्चितपणे मिळू शकेल याची किमान आपत्कालीन स्थितीत ही व्यवस्था कशी असावी याचे कोणतेही नियोजन तिथे नव्हते .
अलकनंदेचा काठ, किंबहुना सर्वच नद्यांचे उगम पावण्याचे काठ, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांचे काठ हे गाळाच्या मातीचे आहेत .
नदीच्या पुराने अगदी काठावर उभ्या असलेल्या इमारती खालची माती वाहून जाऊन तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळू शकते .
केदारनाथ सारख्या डोंगरातील दुर्गम भागात असणाऱ्या नद्यांतील पाणी पुरामुळे आजूबाजूला पसरू शकते व विध्वंस घडवू शकते,एवढी ही जाणीव शासन, प्रशासन आणि लोकनेते यांना नव्हती .
नदीच्या महापुरामुळे जो प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आला तो ह्या परिसरातील 200 गावांमध्ये साठला.
अनेक ठिकाणी एक मीटरपेक्षाही जास्त एवढा थर जमा झाला होता .
अनादिकालापासून इतका पाऊस दरवर्षीच येथे पडतो मग असे यावेळेस का घडले ?
या प्रश्नाचे उत्तर विकासाच्या नावाखाली निसर्गाचा जो विध्वंस माणसाने चालविला आहे त्यात मिळते .
आपल्याकडे पाऊस पडतो, तो ढगातून. हे ढग सर्वसाधारणत: 5 - 10 कि.मी इतक्या उंचीवर असतात. तिथून पावसाचा थेंब निघतो, गुरूत्वाकर्षणानुसार त्याचा प्रवेग वाढत जातो आणि अतिशय वेगाने तो जमिनीवर येऊन आपटतो. जेव्हा डोंगरावर घनदाट झाडी होती तेव्हा पावसाचे हे थेंब प्रथम, झाडाच्या पानावर पडत तिथे अडवले जात, त्यांचा वेग तिथे संपतो , ते थांबतात व नंतर हळूच घरंगळून जमिनीवर पडतात .
जवळजवळ शून्य वेगाने आणि तिथे पाणी थांबते , आडते आणि जमिनीतही मुरते .
परंतु माणसाने आपल्या तात्पुरत्या फायद्यासाठी जंगले कापून टाकल्यामुळे तेथील वृक्षराजींचे, पानांचे झाडोऱ्यांचे जे संरक्षण मातीला मिळत असे तेही संपले.
त्यामुळे केवळ 1 हेक्टर इतक्या लहान क्षेत्रातून, 60 ते 70 टन इतक्या मोठ्या प्रमाणावर माती वाहून जावू लागली. या 200 गावांचा उत्तराखंडातील जो परिसर आहे त्यातून सुमारे 50 कोटी टन माती वाहून येते असा अंदाज दिला जातो .
जसजशी मोठ्या प्रमाणावर माती वाहून जाईल तसतशी डोंगर बोडके होतात .
खडकांना व दगडांना धरून ठेवणारे मातीचे कवच नष्ट होते , दगडांचा आधार संपतो यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण व भूस्खलनाचे प्रमाण आणि वारंवारता वाढतच जाते .
पाऊस पडणे, त्याचा कालावधी, त्याची तीव्रता ह्या गोष्टी मानवाच्या हातात नाहीत.
मात्र त्यापासून स्वत:चे संरक्षण करणे हे नक्की त्यांच्या हातात आहे.
अशी कोणतीही आपत्ती ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समोर उभी राहून ठाकत नाही.
निसर्ग त्याच्या अनेक सूचना वारंवार देत असतो.
आपण मात्र त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले तर असा फटका बसतो.
त्याहीपेक्षा भयानक बाब म्हणजे ह्या दुर्गम भागात कोणत्या तारखेला किती पर्यटक गेले, किती परत आहे याची कोणतीही नोंद कुठेही केली आहे असे दिसले नाही. ही गंभीर बाब होती.
वारंवार होणार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हवामानात बदल होत होते .
तरीही २०१५ साली साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचे पावन पर्वात गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे भक्तांसाठी खुले झाले .
याबरोबरच यावर्षीच्या हिमालयातील चारधाम यात्रा देखील सुरू झाली .
आहेत. सन २०१३ मधील भीषण आपत्तीनंतर यात्रेकरूंना पुन्हा आकर्षित करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली गेली .
केदारनाथ यात्रा आता सुरक्षित असल्याचा संदेश देशभरात गेल्याने भाविकांच्या संख्येत वाढ झाली .
क्रमशः