Aghatit - 20 - last part in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अघटीत - भाग २० - अंतिम भाग

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

अघटीत - भाग २० - अंतिम भाग

अघटीत भाग २०

रात्री नऊ वाजता पद्मनाभ घरी आला .
आज दिवसभर भरपूर पळापळी झाली होती त्यामुळे खुपच थकला होता .
सकाळपासून जेवायला पण फुरसत नव्हती मिळाली
वरदा नुकतीच दवाखान्यातून येत होती .
आता परत जेऊन तिला डबा घेऊन जायचे होते .
पद्मनाभला बघुन ती म्हणाली” बरे झाले आलास रे.. जेऊया एकत्रच ..
सकाळी लवकर गेला आहेस ते आलाच नाहीस ना आज परत ..
मावशी सांगत होत्या “
तिच्याशी काही बोलायच्या आधी पद्मनाभ क्षिप्राच्या खोलीकडे निघाला
खोलीत डोकावल्यावर त्याला दिसले क्षिप्रा पाठमोरी बेडवर झोपली होती .
तो परत येऊन हातपाय धुऊन जेवायला आला तेव्हा वरदा म्हणाली
“अरे आज जरा तिला बरेच वाटत नाहीये ,मावशी सांगत होत्या दिवसभर झोपुनच आहे
जेवली पण नाहीये नीट ,आता उद्या मीच तिला दवाखान्यात नेते “
“हो ग असे असेल तर उद्या घेऊन जा तिला डॉक्टरकडे ..
मला तर बिलकुलच वेळ नाही मिळत हल्ली ..एक वेळ जेवायला मिळते हेच खुप आहे ...”
वरदाने डबे भरले आणि ती पद्मनाभ सोबत जेवायला बसली .
त्याने आईच्या आणि मेव्हण्यांच्या तब्येतीची चौकशी केली ..
आता आईची तब्येत ठीक आहे आणि उद्या ती घरी येईल हे समजल्यावर त्याला बरे वाटले .
दोघांचे जेवण आटोपत आले तोपर्यंत पद्मनाभचा फोन वाजला .
डाव्या हाताने फोन घेत जेवता जेवता तो बोलत होता .
त्याने फोन ठेवला आणि वरदाला सांगितले त्याला ताबडतोब निघायला लागेल .
एका ठिकाणी ऱेडसाठी जायला लागणार आहे ..
वरदा म्हणाली “काय रे ही ऱेड रेव्ह पार्टीची आहे का ?
“हो ग आजकाल याशिवाय दुसरा विषय नाही बघ .ही श्रीमंतांची पोरे नुसती चेकाळली आहेत .
लाजा सोडल्यात त्यांनी ..
अल्पवयीन पण आजकाल आहेत यामध्ये आणि मुली तर आघाडीवर आहेत अगदी !!
बरे यांना आत टाकावे तर यांचे श्रीमंत आईबाप वरती वशिले लावुन पैसे फेकून सोडवून घेऊन जातात .
समाजातला मुळ प्रश्न मात्र तसाच धडधडत राहिला आहे,आणि अमली पदार्थांचा विळखा वाढतोच आहे “
बोलता बोलता परत कपडे चढवून तो तयार झाला .
दारात जीप आली होतीच . वरदाचा निरोप घेऊन तो बाहेर पडला व जीपमध्ये बसला .
वरदाने टेबल आवरले डबे घेतले व मावशीना सांगुन ती निघाली .
जाताजाता ती लेकीच्या खोलीत डोकावली ,झोपलेल्या लेकीला पाहून तिला कसेसेच झाले .
पोरीकडे काहीना काही कारणाने आजकाल लक्षच द्यायला वेळ मिळत नाहीये आपल्याला .
तिच्या मनात अपराधी भावना दाटून आली .
आता उद्या मात्र तिच्यासाठी वेळ द्यायचाच आणि उद्या सासूबाई पण येतायत घरी .
हलकेच तिने क्षिप्राच्या खोलीचे दार लोटून घेतले ..
पद्मनाभची जीप भरधाव पुण्याबाहेर निघाली .
नुकताच खबऱ्याकडून मेसेज मिळाला होता ,पुण्यातल्या एका फार मोठ्या कॉलेज मधील मुले गावाबाहेर रेव्ह पार्टी करीत आहेत .
सातशे ते आठशे मुले असावीत असा अंदाज होता .
अल्पवयीन मुले आणि जास्त संख्येने असणार्या मुली ही तर नेहेमीचीच माहिती होती .
ज्याने ही पार्टी ठेवली होती त्याचेही नावही समजले होते .
अमली पदार्थासोबत मोठे सेक्स रेकेट ही उघडकीला येणार होते .
त्या भल्या मोठ्या फार्म हाउस मध्ये पोलिसांच्या जीप शिरताच एकच पळापळ चालू झाली .
पण आत शिरताच आधी पोलिसांनी मुख्य दरवाजे बंद केले .
आजूबाजूला तयार केलेल्या झोपड्यामधून अर्धनग्न मुले मुली कपडे सावरत बाहेर पडली .
पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन एकत्र करायला सुरवात केली .
पार्टी ठेवणाऱ्याला आधी ताब्यात घेतले गेले .
कर्फ्यू कायद्याचा भंग करणे,इतक्या रात्री कानठळ्या बसणाऱ्या आवाजात पार्टी ठेवून ध्वनिप्रदूषण करणे,पार्टीची परवानगी न घेणे आणि अवैध अमली पदार्थांचे वाटप करणे ,जरुरीपेक्षा जास्त दारूसाठा बाळगणे असे अनेक चार्जेस लावुन त्याला आधी बेड्या घालण्यात आल्या .
आता एक एक करून अर्धनग्न आणि नशेत असलेली मुले मुली बाहेर येऊ लागली .
मुलेमुली दोघांना आपल्या कपड्याची आणि स्वतःची पण शुद्ध नव्हती .
सर्वजण आपली तोंडे लपवायचा प्रयत्न करीत होती .
पोलीस एकेकाला शिव्या देऊन जीपमध्ये बसवत होते .
हे सगळे बघताना पद्मनाभच्या डोक्यात तिडीक येत होती .
मागच्या ऱेडच्या वेळी त्याने मुलांना अटक केली होती आणि मुलीना समज देऊन सोडुन दिले होते .
आज मात्र तो खुप भडकला होता ..
”घ्या रे त्या मुलीना पण आत..... आज कोणालाही सोडू नका आणि कोणाची गय करू नका.
नावे लिहून घ्या यांची आणि यांच्या आईबापांची आणि मोबाईल नंबर्स पण ..”
आपला तोल पण न सावरता येणाऱ्या त्या मुलामुलींना पोलीस उचलून व्ह्यान मध्ये ढकलत होते .
त्या कपड्यांची शुद्ध नसलेल्या नशेत धुंद असलेली परंतु चांगल्या घरच्या असलेल्या मुली पाहून त्याला अगदी हळहळ वाटली.
तो प्रत्येक मुला मुलीकडे बारकाईने पाहत होता .
त्यात काही मोठमोठ्या उद्योगपतींची पण मुले होती
आणि अचानक त्याच्या नजरेसमोर ती आली ..
देखणी, गोरीपान,तोकड्या कपड्यातली ,पाय लडखडत चालणारी आणि आपला चेहेरा झाकणारी ..
तो एकदम चमकला कारण ती तर त्याची प्रिन्सेस होती ..
होय होय त्याची चिंकी .. त्याची लाडाची लेकच होती ती ......!
नशेच्या धुंदीत अडखळत चालणारी .कपड्यांचे भान नसलेली ..
“क्षिप्रा ...अशी हाक त्याच्या तोंडून निघाली ....
त्या हाकेसरशी तिने विकल नजरेने त्याच्याकडे पाहिले .. तिच्या त्या नजरेत कोणतीच ओळख नव्हती ..
रेव्ह पार्टी वर ऱेड घालणाऱ्या त्याच्या सारख्या तडफदार आणि धडाडीच्या पोलीसाची मुलगी रेव्ह पार्टीत?
आणि ती सुद्धा त्याच्याच ऱेड मध्ये सापडावी ..
हे काय घडले होते त्याच्या आयुष्यात .?.
खुपच भयानक घटना होती ही .त्याच्यासाठी
त्याच्या डोळ्यापुढे अचानक अंधारी आली .
जे घडत होते ते त्याच्यासाठी “अघटीत ...”होते .

समाप्त