Aghatit - 19 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अघटीत - भाग १९

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

अघटीत - भाग १९

अघटीत भाग १९

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती चहा घेण्यासाठी स्वयंपाक घरात गेली .
आजही तिला तसे बरे वाटत नव्हते ,पुर्ण विश्रांती घ्यायचे तिने ठरवले होते .
आजची संध्याकाळची पार्टी तिच्यासाठी खुप खास असणार होती .
गौतमने तिच्यासाठी खुप खर्च केला होता आणि तिलाही खुप उत्सुकता होती त्याची .
टेबलावर बाबा,आई दोघेही चहा घेत बसले होते ..
बाबा तिच्याकडे पाहून हसला ..”हेल्लो प्रिन्सेस कशी आहेस बेटा ..
कॉलेजला नाही का जायचे ?
आणि असा का दिसतो आहे तुझा चेहेरा ...
बरे वाटत नाही का पिल्लूला ?..असे म्हणून बाबाने तिचा हात प्रेमाने हातात घेतला .
कधी चिंकी तर कधी प्रिन्सेस तर कधी पिल्लू लाडाने काहीही बोलवत असे बाबा तिला
त्याच्या प्रेमामुळे क्षिप्राला अगदी भरून आले ....ती म्हणाली
“नाही रे बाबा ठीक आहे मी ..थोडे थकल्या सारखे झाले आहे मला .
त्यामुळे आज जाणार नाहीये मी कॉलेजला घरीच अभ्यास करेन .”
“पुरे ग कीती सारखा अभ्यास करीत असतेस सारखी ..
पद्मनाभ तु सांग रे हीला काहीतरी ..आजकाल सारखी सारखी अभ्यासात डोके घालून बसलेली असते .”
तब्येत कशी करून घेतली आहे बघ “
वरदाने तक्रार केली ..
“काय ग काय म्हणतेय आई तुझी ...प्रिन्सेस तु पण तब्येतीची काळजी घे बर का बेटा ..
हेळसांड नको करूस अशी .”
क्षिप्राने हसून मान हलवली ..
“चला मी निघतो असे म्हणून बाबा ड्युटीवर निघाला ..
मग वरदाने क्षिप्राला सांगितले ..
“बेटा खाऊन घे मग लागली तर पेनकिलरची गोळी घे आणि आराम कर ...
मला आता निघायला लागेल दवाखान्यात जायला
आणि हो तुझी तब्येत ठीक नाही ,इतक्यात दवाखान्यात नको येउस .
मी रात्री डबा घेऊन दवाखान्यात गेले की तिकडेच राहीन
मावशी आहेत सोबत तुझ्या “
क्षिप्राने मान हलवली आणि चहा नाश्ता समोर ओढला .
फार काही तिला खाताच आले नाही ,घास तोंडात फिरत होता .
तोंडाला चवच नव्हती ..
ती खोलीत गेली आणि तिने दार लाऊन घेतले आणि नेहेमीप्रमाणे सिगारेट काढली आणि झुरके घेऊ लागली .
पण तिला त्यात सुद्धा फारशी मजा वाटेना
आता गौतम कडून ते नवीन ब्रांडचे पाकीट मागुन घ्यायला हवे असे तिने ठरवले
खुप मस्त वाटते ती ओढल्यावर
नंतर दिवसभर तिने झोपून काढला .
मध्ये फक्त मावशीनी जेवायला हाक मारली म्हणून ती अन्नाचे चार घास चिवडून आली .
मी खोलीत अभ्यास करते आहे असे तिने मावशीना सांगितले .
संध्याकाळी आठ वाजताच तिने मावशीना सांगुन जेवून घेतले .
मी गोळी घेऊन झोपते आहे मला आता उठवू नका असे तिने त्यांना सांगितले
आणि खोलीत जाऊन स्वतःचे कपडे आवरून घेतले.. मस्त आकर्षक मेकअप केला
लाईट बंद करून खोलीचे दार थोडे लोटून घेऊन
गौतमच्या फोनची वाट पहात बसली .
नऊ वाजता त्याचा फोन आला तेव्हा तिने त्याला बंगल्याच्या मागील बाजूस येण्यास सांगितले .
तिच्या खोलीचे मागले दार तिथे उघडत होते .
मग तिने तिच्या बेडवर उशी आणि तक्क्याचा वापर करून एखादी व्यक्ती पाठमोरी झोपली आहे
असा आभास निर्माण केला ..वर पांघरूण घातले ..
तिला माहित होते रात्री कितीही उशिरा बाबा आला तरी तिच्या खोलीत डोकावत असतोच .
मग हलकेच तिने दार उघडे टाकले आणि मागच्या दाराने बाहेर पडून मागचे दार बाहेरून लाऊन घेतले .
बाहेरच गौतमची गाडी उभी होती ,ती पटकन आत जाऊन बसली .
तिचे टाईट कपडे आणि मेकअप पाहून गौतम खुष झाला त्याने डोळा मारून तिला दाद दिली .
ती पण हसली ...गाडीत त्यांचे आणखीन पण मित्र मैत्रिणी होते .
सोबत अजुन पण तीन चार गाड्या होत्या
त्यांचा सगळा गृपच या पार्टीला निघाला होता .
गौतमने तिच्याकडे एक ब्यांड दिला व हातात घालायला सांगितले .
आजच्या पार्टीत या ब्यांडमुळेच प्रवेश दिला जाणार होता .
खुप वेळानंतर गाडी पुण्याबाहेरच्या एका मोठ्या फार्महाउस समोर थांबली .
त्याच्या आजूबाजूला बऱ्याच छोट्या छोट्या झोपड्या उभारलेल्या दिसत होत्या
गौतमने गाडीतुन उतरून तिच्या कमरेत हात घातला आणि तिला घेऊन आत निघाला
सगळे दोस्त लोक सोबत होतेच,.....ब्यांड पाहून सर्वांना आत प्रवेश मिळाला .
आतले वातावरण पाहुन क्षिप्रा थक्क झाली ..
झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात त्या भल्या मोठ्या हॉलमध्ये रंगीबेरंगी कपड्यात पाचशे ते सहाशे मुले मुली बेफाम नाचत होती
भरपूर मोठ्या आवाजात डीजे म्युजीक वाजवत होते .
गेल्या गेल्या सर्वांना सिगारेटी ऑफर केल्या गेल्या ..बाजूला टेबलवर दारूचे पेले भरलेले होतेच .
सिगारेट पाहिल्या बरोबर क्षिप्राचे डोळे चमकले ..ताबडतोब तिने त्याचे झुरके घ्यायला सुरवात केली
एक दोन सिगारेटी झाल्यावर सर्वांनी दारूचे पेले उचलले आणि रिचवायला सुरवात केली .
क्षिप्रा पण आता त्या तालावर नाचू लागली ..या गर्दीत गौतम कुठे गेला कोण जाणे ..
पण तिच्या शेजारी अजूनही काही तरुण नाचत होते ..नाचता नाचता ते पण तिच्या अंगचटी येऊ लागले .
दोघांनी तिला मिठीत पकडली आणि तिची चुंबने घ्यायला सुरवात केली ..
तिच्या कपड्यात आत हात घालून कुस्करा कुस्करी चालू केली होती .
क्षिप्रा तर आधीच बेधुंद झाली होती ..तशात गर्दी आणि कोलाहल इतका होता की कोण काय करतेय समजतच नव्हते .
तेवढ्यात कुठूनतरी गौतम येऊन तिला ओढुन बाहेरच्या झोपडीत घेऊन गेला .
आता तिथे त्या दोघांचे सेक्स रंगात आले तेव्हाच आणखीन पण त्यांच्या ग्रुपमधील मुले मुली आत आली .
सगळीच बेताल झाली होती ..
आता ग्रुप सेक्स प्रकार सुरु झाला ,अत्यंत बीभत्स आणि हिडीस प्रकारचा तो खेळ सगळी आवडीने खेळत होती .
नशेच्या आहारी गेल्याने कोणालाच काही वाटत नव्हते ..
नंतर सगळी आपले कपडे कसेतरी गोळा करून आत निघाली ..
परत आता तसेच दारू सिगारेट आणि अमली पदार्थांचे सेवन सुरु झाले .
क्षिप्रा आजची ही पार्टी अगदी एन्जोय करीत होती ..
इतरांच्या प्रमाणेच ना तिला कपड्यांची शुद्ध होती ना स्वतःची .
जणु स्वतःचे आस्तित्वच ती विसरून गेली होती .



क्रमशः