बारा जोतिर्लिंग भाग ३
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यात हे ठिकाण आहे.
पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे.
याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे.
येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे.
तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे.
येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे.
असे मानतात की येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले.
श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो.
राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला.
या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले.
पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले.
इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.
इथे कृष्णा नदी वर जे एक बहुउद्देशीय धरण बांधले आहे ते राज्याच्या वीजनिर्मिती साठी वापरले जाते .
हे धरण हैदराबाद पासुन 245 कि.मि. आणि नांद्याल पासुन 132 कि.मि. दूर आहे .
श्री शैलम चे स्थान16.0833° उत्तर अक्षांश तसेच 78.8667° पूर्व देशांतर वर आहे .
याची समुद्र सपाटी पासुन उंची 409 मीटर (1345 फुट) आहे .
शिवपुराणात उल्लेख केल्या प्रमाणे हे स्थान पवित्र असल्याचे मानले जाते.
१८ महाशक्ती स्थानां पैकी १, वीर शैव संप्रदायाच्या ५ प्रमुखमठां पैकी १ आहे.
आर्य-द्रविड, व शैव यांच्यात या पवित्रस्थानी एकता झाली.
इ.स. १४०४ मध्ये विजयनगरच्याराजाने यामंदिराच्या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली. याचठिकाणी श्रीकृष्ण, देवराय, हरिहर, व ब्रह्मानंदा यांनी ३ गोपुरे बांधली.
या ठिकाणी मूळशिवलिंगावर, छोटे १००० शिवलिंगकोरले आहेत.
या खेरीज मल्लिकार्जुन, पार्वती, रावण, नंदी, कैलासपर्वत यांच्या चांदीच्यामूर्तीआहेत.
प्रत्येक भिंतीवर शिल्पकृतीआहे.
महाशिवरात्रीच व रथउत्सव विशेष प्रसिद्ध आहे.
या सदाहरित जंगलातील कृष्णा नदी पात्र हे श्रीशैलमचे प्रमुख आर्कषण आहे .
कृष्णा नदी पुढे नागार्जुन सागर जलाशयाला मिळते त्या आधीचा तिचा प्रवास केवळ नयनरम्य आहे. नदीच्या दोन्ही तीरावरील विविध जीवसृष्टी आपले मन मोहवून टाकते.
१२ ज्योतिर्लींगां पैकी एक ठिकाण असल्याने इथे वर्षभरात महाशिवरात्री ब्रम्होत्सव, तेलुगु नववर्षाचा उगादी सण, दसरा, कुंभोत्सवम, संक्रांती, कार्तीकामोहोत्सव असे अनेक सण साजरे केले जातात.
या मंदिराचा मूळ उगम अज्ञात आहे .
स्कंद पुराणात श्री शैल काण्ड नावाचा अध्याय आहे .
यात या मंदिराचे वर्णन आहे.
यामुळे या मंदिराची प्राचीनता लक्षात याते .
तमिळ संतांनी सुद्धा प्राचीन काळापासून याची स्तुती गायली आहे .
असे मानतात की आदि शंकराचार्यानी जेव्हा या मंदिराची यात्रा केली तेव्हाच त्यांनी शिवानन्दलहरी ही रचना लिहिली .
श्री शैलमचा सन्दर्भ प्राचीन हिन्दू पुराणात आणि ग्रंथ महाभारतात येतो .
धार्मिक आख्यायिका प्रमाणे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग चे पुजन केल्यास अश्वमेघ यज्ञ केल्यास जे पुण्य प्राप्त होते तसेच पुण्य याच्या दर्शनाने मिळते .
श्रीशैल पर्वत कृष्णा नदीच्या तीरावर आहे या नदीला पातालगंगा सुद्धा म्हणतात .
पातालगंगा मंदिराच्या पूर्व दरवाजापासून 2 मैल दूर पर वाहाते .
या नदीच्या एका बाजूस 852 पायऱ्या आहेत.
या नदीत भक्त स्नान करतात त्यामुळे पाप नष्ट होते तसेच अनंत सुख प्राप्ती होते असा समज आहे .
या गंगेच्या पवित्र पाण्याने शिव भगवान यांना स्नान घालतात .
थोड्या अंतरावर ही नदी दोन अलग अलग नाल्यामधून वाहाते या ठिकाणाला त्रिवेणी म्हणतात .
श्रीशैल हा पुर्ण जंगलाचा भाग आहे त्यामुळे वन्य क्षेत्रापासून फक्त मोटरने जाता येते .इथली पायी यात्रा फक्त शिवरात्रीला असते .
याची एक पौराणिक कथा सांगतात ..
भगवान शिव आणि माता पार्वती यांचे दोन पुत्र होते .
गणेश आणि कार्तिकेय ..
एकदा गणेश आणि कार्तिकेय आपापसात विवाहाबद्दल भांडत होते .
त्यांचा वाद वाढत गेला पण त्यातून मार्ग निघेना .
म्हणून ते आपल्या आई वडिलांकडे गेले .
त्यावर तोडगा म्हणून माता पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांना सांगितले की तुमच्यापैकी जो कोणी या पृथ्वी ची प्रदक्षिणा प्रथम पुरी करून येईल त्याचा विवाह प्रथम होईल .
हे ऐकुन लगेचच कार्तिकेय प्रदक्षिणेसाठी आपल्या वाहनावर बसुन बाहेर पडले .
परंतु गणेश अजुन तेथेच उभे होते त्यांच्या भरभक्कम शरीरयष्टीमुळे ते लगेच प्रदक्षिणेसाठी नाही जाऊ शकले.
परंतु गणेश सर्वात बुद्धिमान देवता होते.
त्यांनी आपल्या तीव्र बुद्धिचा उपयोग केला .
आणि विचार केला ..
मग त्यांनी आपल्या आई वडिलांना एका जागी बसायला सांगितले .
मग त्यांनी आई वडिलांना सात वेळा प्रदक्षिणा घातली .
अशा तऱ्हेने आई वडिलांना प्रदक्षिणा घालुन त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळवले .
आणि ते जिंकले .
पुत्र गणेशाची चतुराई बघुन पार्वती आणि शिव खुपच संतुष्ट झाले .
आणि गणेशाचा विवाह करून दिला गेला .
जेव्हा कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले तेव्हा ते खुप दुख्खी झाले .
कारण त्यांच्या येण्यापुर्वीच गणेशाचा विवाह पार पडला होता .
कार्तिकेय ने आईवडिलांचा आशीर्वाद घेतला आणि ते तेथुन निघून गेले .
ते क्रोधित होऊन क्रौन्च पर्वतावर जाउन बसले .
हे जेव्हा पार्वती आणि शिवजीना समजले तेव्हा त्यांनी नारद मुनीना कार्तिकेयची समजुत काढून आपल्याकडे घेऊन येण्यास सांगितले .
नारद क्रौन्च पर्वतावर पोचले आणि कार्तिकेयची मनधरणी करू लागले .
पण अनेक प्रयत्न करून सुद्धा कार्तिकेयची समजुत पटेना .
नारद निराश होऊन माघारी पार्वती व शिव यांच्याकडे गेले आणि सर्व कहाणी सांगितली
ते ऐकुन पार्वतीमाता खुप दुख्खी झाल्या .
स्वतः शिवजी सोबत त्या क्रौंच पर्वतावर गेल्या .
आई वडील क्रौंच पर्वतावर आले आहेत हे समजताच कार्तिकेय त्यांच्या पोचण्यापूर्वीच 12 मैल दूर निघून गेले .
तेव्हाच शिवजी तेथे ज्योतिर्लिंग रुपात प्रकट झाले आणि वेगवेगळ्या स्थानावर कार्तिकेयच्या शोधात त्यांनी आपली ज्योतिर्लिंग प्रकट केली .
हेच ठिकाण तेव्हापासून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध झाले .
कारण पौराणिक ग्रंथा प्रमाणे मल्लिका’ माता पार्वती चे नाव आहे आणि ‘अर्जुन’ भगवान शिवाचे नाव आहे . रागावून गेलेल्या कुमारकार्तिकेयाला भेटण्याकिरता (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथे आले म्हणूनमल्लिकार्जुन या नावा ने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पाच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.अशा तऱ्हेने अशा एकत्रित रूपात ‘मल्लिकार्जुन’ नावाने हे ज्योतिर्लिंग सर्व जगात प्रसिद्ध पावले .
आणखी एका कथेनुसार
कौच पर्वताजवळ राजा चन्द्रगुप्तचे राज्य होते .
एकदा राजा चन्द्रगुप्ताची कन्या एका गंभीर संकटात सापडली .
या संकटातुन सुटण्यासाठी ती राजकुमारी पर्वतावर पोचली आणि तपश्चर्या करू लागली.
ही राजकन्या जिवंत राहण्यासाठी जंगलातील फळभाज्या खात होती .
तिच्या जवळ एक गाय होती ,ती त्या गाईची सेवा करीत असे व तिची काळजी घेत असे काही दिवस सर्व ठीक चालले होते .
नंतर मात्र रोज कोणीतरी चोरून या गाईचे दुध काढुन नेऊ लागला .
एक दिवस त्या मुलीने आपल्या गाईचे दुध काढताना एका चोराला पाहीले.
चोराला बघुन रागाने त्याला मारण्यासाठी ती गाई जवळ पोचली ,पण बघते तर काय तिला तिथे चोर न दिसता सगळीकडे शिवलिंग दिसू लागले .
ती आश्चर्यचकित झाली .
नंतर त्या राजकुमारीने त्या शिवलिंगावर मंदिर बांधले .
हे मंदिर खुपच सुन्दर भव्य होते .
आज त्याच शिवलिंगाला पूर्ण विश्वात मल्लिकार्जुन’ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते .
या मंदिराचे निर्माण 2 हज़ार वर्ष जुने आहे .
या मंदिरांचे दर्शन भारतीय शासन कालातील सर्व राजा महाराजानी केले आहे .
आता सुद्धा इथे लाखो श्रद्धाळू दर्शना साठी येतात .
ही पवित्र जागा धार्मिक स्थळ आणि एक एक पर्यटन स्थळ आहे .
क्रमशः