Bara Jyotiling in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | बारा जोतीर्लींगे

Featured Books
Categories
Share

बारा जोतीर्लींगे

बारा जोतीर्लींगे भाग १

शिव हे हिंदू धर्मातील देवांचे देव आहेत .
तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली आहे.
शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो.
वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे.
‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाचे ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे.
भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत आणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते.
''शिव' हे संपूर्ण सृष्टीचे करता - धरता आहेत.
हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांचे ते देव' मानले गेले आहेत.
ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली आहे हे अजूनही कळू शकलेले नाही.
त्यांना अनादी आदीपुरुष मानले गेले आहे.
हे हिंदू धर्मातील प्रमुख, परम आणि सर्वश्रेष्ठ आहेत.
त्यांच्याजवळ त्रिशूळ आहे ज्याचा अर्थ शिव हे अस्त्र - शस्त्र आदींचे ज्ञाता आहेत.
जेव्हा शिवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांच्यासोबत रज, तम् आणि सत यांची उत्पत्ती झाली ते म्हणजे त्रिशुळाचे प्रतीक असुन वाद्य डमरू हे शिवाचे तांडव नृत्याचे अविष्कार दर्शवते.
शिवाच्या गळ्यात नाग आहे. त्यामागची कथा अशी सांगतात ,
पुराणामध्ये जेव्हा नागांचे साम्राज्य होते आणि त्यासोबत सागर मंथन वेळेस समुद्रातून अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागाला दोर म्हणून वापरले गेले होते त्यावेळेस समुद्रातून खुप चित्रविचित्र गोष्टी निघत होत्या.
ज्या काही गोष्टी निघणार त्यांचा स्वीकार कोणीतरी करायलाच हवा होता.
बऱ्याच वस्तू श्री विष्णूंनी स्वीकारल्या, परंतु जेव्हा त्यामधून विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं, कारण ह्या विषाचा एकही थेंब जर धरतीवर पडला तर संपूर्ण सृष्टीला ते घातक झाले असते. म्हणून ते विष शिवाने प्राशन केले.
ते पिताच शिवाच्या अंगात दाहकता वाढली आणि त्यांचे कंठ काळे-निळे झाले. ती दाहकता नष्ट करण्यासाठी सगळ्या देवांनी त्याचबरोबर राक्षसांनी शिवाला अनेक गोष्टी देऊ केल्या जेणे करून दाह कमी होईल .
पण दाहकता काही कमी होईना. त्यावेळेस श्री विष्णूंनी शिवाचे कंठाची दाहकता कमी होण्यासाठी वासुकी नागाला ( शेषनाग यांच्यानंतरचे नाग लोकांतील राजा ) दिले, तेव्हा शिवाची अंगाची आग शांत झाली आणि त्याचबरोबर शिवाला नाग हे प्रिय झाले आणि श्री विष्णूनी शिवाला " नीलकंठ " हे नाव प्रदान केले.

पवित्र त्रिमूर्ती दत्तात्रयांपैकी एक म्हणजे शिवशंकर.
विनाशाचा देव.
पौरुषत्वाचा आदर्श, समस्त महिला वर्ग तपस्या करून मागेल असा पती.
तपश्च्रयेला लवकर फळ देणारा भोळा सांब सदाशिव...
देशात सर्वाधिक मंदिरं ज्या देवाची आहे तो हा महादेव शिवशंकर.. या शिवशंकराची महाशिवरात्रीभारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्

परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति

हिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति "वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचा नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपत असेल तर तिच्या सात जन्‍मातील झालेल्या सर्व पापांचा विनाश होतो.

या जोतीलींगाची गावे व प्रदेश असे आहेत ..

सोमनाथ (गुजरात - वेरावळ),मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य),महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर),वैजनाथ (महाराष्ट्र - परळी),भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)

रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर),नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ),विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर),केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ),घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)

संतांची समाधी जशी भूमीच्या खाली असते, तशी ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगे भूमीच्या खाली आहेत. या शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यातुन अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालु असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते. त्याच्यासह ज्योतिर्लिंग आणि संतांचे समाधीस्थळ यांतून पाताळाच्या दिशेनेही सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होऊन त्यांचे सतत पाताळातील वाईट शक्तींशी युद्ध चालु असते. त्यामुळे भूलोकाचे पाताळातील शक्तीशाली वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून (हल्ल्यांपासून) सतत संरक्षण होते

असा पूर्वापार समज आहे .

कोणत्याही शिवमंदिराची वैशिष्ट्ये अशी असतात .

शिव हा दांपत्यांचा देव ! ‘शक्त्यासहितः शंभुः ।’ असा आहे. शक्ती नसेल, तर शिवाचे शव होते. इतर देव एकटे असतात; म्हणून त्यांच्या मूर्तींत अल्प ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या देवळात थंडावा वाटतो, तर शिवाच्या देवालयात अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्याने शक्ती जाणवते.

शिव ही लयाची देवता आहे. त्यामुळे शिवाच्या जोडीला इतर देवतांची आवश्यकता नसते.
म्हणून शिवाच्या देवळात इतर देवता नसतात.

काही ठिकाणी देवळाच्या व्यवस्थापन समितीने भाविकांना एकाच वेळी विविध देवतांच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या हेतूने किंवा अन्य कारणास्तव शिवाच्या जोडीला अन्य देवतांची स्थापनाही शिवालयात केलेली आढळते.

शिवाची पूजा ब्राह्मणाने मोडायची नसते, म्हणजे निर्माल्य काढायचे नसते; म्हणून शिवाच्या देवळात गुरव असतात आणि पार्वतीच्या देवळात भोपे असतात. शिवपिंडीवरील निर्माल्य काढत नाहीत.

ब्राह्मण शिवपिंडीला वैदिक मंत्रांनी अभिषेक करतात; परंतु त्याच्या नैवेद्याचा स्वीकार मात्र करत नाहीत. पूजा करणारे ब्राह्मण पिंडदान विधीही करत नाहीत.

क्रमशः