आज मी माझ्या पहिल्या कथेचा पहिला भाग लिहिला आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा..😀😀
आज नक्षत्रा आणि स्वप्नील चा लग्नानंतरचा पहिला व एकंदरीत दुसरा व्हॅलेंटाईन डे. बघुयात कसा साजरा करतायत ते
स्वप्नील: नक्षत्रा अग आवर ना विसरलीस का आज काय आहे ते?
नक्षत्रा: अरे हो हो किती दंगा करतोयस आणि तस ही काय आहे आज? ना तुझा वाढदिवस ना माझा ना आपल्या लग्नाचा मग काय आहे आज ?(मनातल्या मनात हसत ती त्याची खोड काढत असते)
स्वप्नील: (लटकेच रडत रडत ) मला खरंच वाटलं नव्हतं कि मी इतक्या ढ मुलीच्या प्रेमात कसा पडलो ते ? देवा वाचावं रे मला. अगं माझे राणी आज व्हॅलेंटाईन डे आहे विसरलीस कि काय?
नक्षत्रा : नाही रे विसरली नाही रे मी पण आज संडे आहे आणि त्यात मी हा पसारा आवरायला काढलाय ना त्या मुळे लक्षातून गेलं इतकंच.
स्वप्नील: (जोरात ओरडत बोलतो ) इतकच??? इतकंच??
नक्षत्रा: (जोर जोरात हसू लागते व बोलते) अरे हो हो सावकाश मला तर वाटलं होत फक्त drama quene असतात हे ऐकलं होत पण आज साक्षात तुझ्या रूपाने drama किंग पाहायला मिळाला खरच जाम मजा आली. पण आता पुरे. या राजे मदत करा मला पसरा आवरायला. एकच रविवार असतो सार्थकी लावू या.
स्वप्नील: (नाराजीने) अगं का का इतकी दुष्ट वागत आहेस तुझं खरच माझ्या वर प्रेम नाही ना?
नक्षत्रा: (उगाचच) हो नाहीच आहे माझे तुझ्या वर प्रेम आणि म्हणूनच इतकी वर्ष गप्प बसले होते ना (डोळ्यातले पाणी लपवत हसते) .
(स्वप्नील सुद्धा अचानक भावुक होतो व तिला मिठीत घेतो)
स्वप्नील: सॉरी ग मला तुला दुखवायचं नव्हतं पण आज एक तर आपला पहिला वाहिला व्हॅलेंटाईन आणि त्यात तू बाहेर यायला नाही बोलीस म्हणून चुकून बोलो ग खरच सॉरी.
(नक्षत्रा त्याच्या मिठीतुन अलगत बाहेर येते)
नक्षत्रा: असू दे रे बर चल पुरे आता चल मला आवरायला मदत कर .एक काम कर ती जुनी ग्रेटींग कार्ड्स आहेत ना ती एका बॉक्स मध्ये लावून घे तो पर्यंत मी डाळ भाताचा कुकर लावते आणि हो रात्री मला जेवायला घेऊन जायचं आहेस तू कळलं..
स्वप्नील: अगं हो जाईन कि घेऊन (स्वप्नील आता एक एक ग्रेटींग नीट बॉक्स मध्ये लावण्यात मग्न होऊन जातो )
अचानक त्याच्या नकळत तो हसू लागतो. त्याला कारण हि तसेच असते, तो लावत असलेलं प्रत्येक ग्रेटींग हे त्यानेच तिला गिफ्ट दिलेलं असत. असच एक ग्रेटींग त्याच्या हाती लागत व तो नकळत भूतकाळात हरवून जातो.
बरोबर दीड वर्षां पूर्वी त्यानेच हे पहिलं वाहिलं ग्रेटींग तिला एक कविता लिहून दिलेलं असत.
तू श्वास माझा तू प्राण माझा
इतके वर्ष कसे जगलीस माझ्या विना
सांगायचे होतेस मला विचारायचे होते मला
का त्रास दिलास मला का त्रास दिलास स्वतःला
एकदा सांगायचे होतेस मला एकदा विचारायचे होतेस मला
मी ही सांगितले असते तुला कि तू श्वास माझा नि तू प्राण माझा
माहित आहे नाही झाली इतकी चांगली कविता पण काय करू तुझ्या साठी दुसरं काहीच सुचत नाही मला.
वाचता वाचता तो भूतकाळात रमून जातो
नक्षत्रा टपोऱ्या डोळ्यांची सावळी पण प्रेमळ अशी ही मुलगी. तर स्वप्नील handsome चॉकलेटे बॉय अगदी पाहता क्षणी कोणी ही प्रेमात पडेल असा.
स्वप्नील आणि नक्षत्रा एकाच अपार्टमेंट राहायला होते पण वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये पण खिडक्या अगदी समोर समोर.
नक्षत्रा तर अगदी लहान पण पासून त्याच्या वर प्रेम करत होती पण सांगू शकत नव्हती त्याला कारण ही तसेच होते तो तिच्यापेक्षा वयाने ५ वर्ष मोठा होता. तिला भीती होती कि आपण जर त्याला काही सांगितले तर तो घरी येऊन सांगेल म्हणूनच ती गप्प होती.
त्यातच काही कारणांनी तिला ते घर सोडून अचानक गावी यावं लागलं.. मग काय तिच्या एकतर्फी प्रेमाला तिथेच विराम मिळाला तो विराम होता कि पूर्णविराम..
to be conitinued .....