अमेय निशा आणि नीरजा जवळ जाऊन बसला . निशा त्याला तिने बहिणीच्या लग्नासाठी केलेली खरेदी दाखवत होती . अमेय ही ती आवडीने पाहत होता .आणि त्याचे कौतुक करत होता .नीरजा म्हणाली , माफ कर अमेय दादा .....काल माझा पाय घसरल्यामुळे मला नीरजा सोबत नाही येता आल .आणि तुला सुधा नाही कळवता आल . तिला मधेच थांबवत अमेय म्हणाला .' ' ती चर्चा एथे नको , ह्या विषयी नंतर बोलू . ' '
पुढे अमेय निशाशी बोलू लागला .निशाला भेटल्यावर अमेय्ला आनंदच झाला होता .तिच्याशी किती बोलाव त्याला कळतच नव्हते .तीही आवडीने तिच्या बहिणीच्या लग्नाच्या खरेदीविषयी सांगत होती .आणि अमेय ही तीच कौतुकाने ऐकत होता . एकदम तिने केतनचा विषय काढला .त्यादिवशी ती केतन बरोबर खरेदीला कशी गेली .नीरजाचा पायाला दुखापत झाल्यामूले तिला बाबांच्या सांगण्यावरून केतन सोबत जावे लागले . यावर अमेयला कळले की , बाबांच्या सांगण्यावरून निशा केतन सोबत गेली .आणि आपण तिला काय समजलो .
अमेय निशाला म्हणाला , अग निशा , पण केतन मुलगा कसा आहे तुला माहीत नाही का ? आणि गावातील सगळीच मुले चांगली नाहीत ग ? त्यामुळे तू जरा जपूनच वाग......यावर निशा म्हणाली , तुज बरोबर आहे रे , पण आपण वय्व्सतीथ वागले , तर काही नाही होत ..आणि मुंबईत तर खूपच वात्रट मूल असतात . त्यामुलाशी ही मी जपूनच वागते .त्यामुळे मला सवय आहे .तू काळजी नको करू . आता ह्यावर अमेयला काय बोलाव कळेना . त्यानी शांत बसायचे ठरवले .
सगळी खरेदीला झाली होती .आता अमेय , नीरजा आणि निशा घरी निघाले . निशाने त्याला बहिणीच्या लग्नाचे आमंत्रण दिले . त्यानी ही नक्की येणायाचे तिला कबूल केले . विरह हा प्रेम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यतला अविभाज्य घटक आहे .' ' जर विरह आला , तर पुन्हा भेटून प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळावी .' ' तर आयुष्यत विरहची मजा आहे .नाहीतर ......पुढे विरहचा वियोग होतो . निशा आणि अमेयच्या आयुष्यत पुढे हेच काही तरी होणार आहे .
दोन दिवसानी अमेयचा रिज़ल्ट लागला .आणि तो नापास झाला , हे घरी समजले . अमेयची आई तर रडायला लागली .कारण , अमेयची परीस्तीथी बेताची होती .त्याच घर म्हणजे झोप्डिच , मोठी मुलगी थोड्या दिवसानी गरोदर पणासठि येणार होती . छोटी मुलगी लग्नाला आली होती .तिच्यासाठी स्थळ पाहणी चालू होती . आई शेतात काम करत असे .आणि बाबा नोकरी करून कस बस दोन वेळेच जेवण मुलांना घालत असे .आणि शिक्षण देत होते .पण अमेय नापास झाला , हे ऐकून त्याच्या बाबांची नुसती चिडचिड होत होती .त्यात निशाची गोष्ट ही त्यांच्या कानावर आली होती . अमेय ला ते रागावू लागले .काय , केलास हे पोरा ....तू नापास कसा झालस .तुला नीट अभ्यास करायला मिळावा , तूझा जाण्या येण्यात वेळ जाऊ नये .म्हणून आह्मी तुला होस्टेलवर ठेवला .आणि तू काय केलस . जगाच हसू केलस . माझी मान खाली घातलीस .आणि हे सगळ त्या पोरी मुळे झालय ना .....जिच्या मागे तू फिरतोस .सगळी गावातली पोर ... तिनी येडि केल्यात. ' ती पोरांना माग माग ...फिरायला लावती .आणि तू ......तू ही तिच्या रूपाला भाळलास .आता ह्या पुढे तुज तू बग ......मला काय तुला पुढे शिकवता येणार नाही .पुढे काय करायच ते तूच ठरव .
पुढील कथा वाचत रहा .भाग -10 मधे .