Chuk aani maafi - 8 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | चूक आणि माफी - 8

Featured Books
Categories
Share

चूक आणि माफी - 8

अमेय धावत पळत नीरजाने सांगितलेल्या दुकानात आला .तो पुरता घामाघूम झाला होता .साइकल चालवून त्याचे पायही खूप दूखूण आले होते . त्याच्या घषयाला कोरड पडली होती .पण एकदा निशा भेटली म्हणजे , घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले .अस , अमेय्ला वाटले . तो दुकानांत निशाला शोधू लागला .पण , ना त्याला निशा दिसली न नीरजा .थोड्यावेळाने त्याची नजर एका मुलीवर पडली .ती बहुदा निशा असावी . पण तिच्या बरोबर कोणी मुलगा होता . , अरे हो , ही तर निशा आणि केतन . अमेय म्हणाला . पण नीरजा , तर म्हणाली , की त्या दोघी येणार आहेत .खरेदीला . जर केतन एथे कसा ? आणि केतन एथे आहे .तर नीरजा कुठाय ? आणि निशा नीरजा सोबत का नाही आली . आणि ती केतन सोबत का आली . अमेय्ला काहीच कळेना . पण , एथे निशाला भेटणे योग्य नाही .आणि निशाला भेटायची त्याची ईछ्या पण मेली .
अस , का ? केल असेल निशा ने बर ....तिला जर नीरजा सोबत जायच नव्हते .तर , दुसऱ्या कोणाला ही ती घेऊन जाऊ शकत होती .पण , ती केतन ला कस घेऊन आली .तिला माहीत नाही का केतन कसा मुलगा आहे .गावातील सगळ्यात विचित्र मुलगा आहे . आणि .....आपण तिला सांगितल पाहिजे .केतन कसा मुलगा आहे , ते . तिला , खरच त्याच्या विषयी काही माहीत नसेल , म्हणूनच ती त्याच्या सोबत गेली असेल . आपण तिला त्याच्याविषयी सांगू .पण , आता तिला त्याच्या विषयी सांगणे चुकीचे आहे .आपण तिला हे सगळ नंतर सांगू .म्हणून आल्या पाउलांनी अमेय परत निघाला .
निशाला आपल्याला भेटायला मिळाले नाही , ह्याची खंत तर त्याला होतीच .पण निशा केतन बरोबर गेली ह्याच दुःख त्याला फार झाल होत .आणि आज केतन पासून तिला वाचवू .पण गावातील सगळ्याच मुलांची नजर तिच्यावर आहे .गावातील लोक तिच्याबद्दल वाईट वाईट ही बोलू लागलेत . तिच्या कपड्यांविषयी तिच्या बिनधास्त स्वभावाविषयी .पण आपण तिला हे सगळ सांगणे योग्य आहे का ? का ? योग्य नाही .नक्कीच योग्य आहे .आपण तिचे मित्र आहोत .आणि ती ही आपल्याला तिचा मित्रच मानते . विचार करता करता घर कधी आल .अमेयला कळलच नाही . तो घरात शिरला .तेवढ्यात अमेयची गौरी ताई अमेय्ला म्हणाली .अरे , अमेय आताच टी .वि वरती बारावीच्या रिज़ल्ट ची तारीख कळली .आज पासून चार दिवसानी रिज़ल्ट आहे .
आता आधीच त्याचा मूड चांगला नव्हता .त्यात आता ह्या रिजल्ट ची गोष्ट समोर आली .आता रिजल्ट लागल्यावर शेवटचा पेपर न दिल्यामुळे मी नापास झालौय .ही गोष्ट घरी समजणार . आणि ....मग .त्याला तर कल्पनाच करावेंना . आपण फार मोठी चुकी केली हे तर त्याला मान्य होतेच .पण घरातल्याची ही आपण मन दूख्व्तोय .ह्याचे दुःख त्याला होतेच . आणि आता घरातले जे शिक्षा देतील ती त्याला मान्य होती . आता येयील त्या वेळेला सामोरे जायचे त्याने ठरवले होते . पण त्या आधी निशाला केतन पासून सावध करायला पाहिजे .
दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला .आणि त्यानी तडक निशाला गाठले . निशा खरेदीला तालुक्याला निघाली होती .तिच्या सोबत आज नीरजा असल्यामुळे त्याला आज बोलायची संधी सुध्दा मिळणार होती . निशा आणि नीरजा ज्या दुकानात खरेदीला गेल्या , त्या दुकानांत अमेय आला .अमेयला पाहून निशा आणि नीरजा दोघींना खूप आनंद झाला .