ईकडे अमेयची परीक्षा चालू झाली .त्याला सगळे पेपर चांगले गेले .आता शेवटचा एक पेपर राहिला ,होता , तो पेपर कधी देतोय आणि कधी निशाला भेटायला गावी कधी जातोय अस अमेयला झाल होता . तो रात्री अभ्यासाला बसला . नेहमीच्या वेळी निशाचा फोन आला . दोघेही गप्पात रंगले . एक तास झाला , दोन तास झाला .तरी सुद्धा दोघे गप्पाच़ मारत होते . थोड्या वेळाने निशाने फोन ठेवून दिला . अमेय ने ही फोन ठेवून दिला . पुन्हा तो अभ्यासाला लागला . आणि अभ्यास करता करता त्याला कधी झोप आली त्याचे त्यालाच कळले नाही .त्यात त्याला निशा सोबत आपण आहोत .अशी गोड स्वप्ने पडू लागली . त्याला उठुच वाटेना .तो तिच्या सोबतच्या स्वप्नात एकदम रममाण झाला होता . थोड्यावेळाने त्याला जाग आली .निशासोबतच्या स्वप्नामुळे तो मस्त आनंदी चेहऱ्याने उठला होता .त्याच्या समोर काय वाढवून ठेवलाय हे त्याला अजून माहीत नव्हते .त्याने सहज घडालयाकडे पाहिले .दुपारचे दोन वाजले होते . तो एकदम दचकला .' ' सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला ' ' . आज त्याने शेवटचा पेपर दिला
नव्हता .पेपरच्या वेळेत झोपूण राहिला होता .' '
त्याच्या रूम मधल्या मुलांनी सुध्दा त्याला उठवले नव्हते . सगळ व्यव्सतीथ चालू असताना हे एवढ मोठ संकट अमेय वरती ओढवल होत .त्यानी ओळखले होते , आता रडून स्वतःला दोष देऊन काहीच उपयोग नव्हता .थोड्या वेळाने सगळी मुले होस्टेल वरती आली .त्यानी आपापल सामान भरले .आणि घरी निघाले .अमेय ही त्याच सामान भरून घरी निघाला .आता घरी कस सामोरे जायच ह्याचा तो विचार करू लागला .
ईकडे ऐत्क्या दिवसानी आपला मुलगा घरी येणार म्हणून , अमेयच्या आईने त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते .घरातले सगळे अमेय येणार म्हणून खुश होते. पण अमेयला तर घरीच़ येऊ वाटेना . घरी जाऊन तरी घरच्यांना काय उत्तर देणार हे त्याला काही कळेना . ईकडे गाडी पकडून अमेय घरी आला . घरी आल्यावर घरातल्याचा उत्साह बघून त्याला अजून कसेतरी वाटू लागले . पण हे सगळ घरच्यांना आताच नको सांगायला .निकालाच्या वेळेला सांगू असा त्यानी विचार केला .
अमेयला येऊन आता दोन दिवस झाले होते .जो तो अमेय्ला त्याच्या परीक्षे विषयी विचारी .अमेय ' ' बाराविला किती मार्क मिळणार हे विचारी ' ' .परीक्षेचा विषय जरी काढला .तरी अमेय गप्प गप्प होई .
आता गावात जत्रेची जोरात तयारी चालू होती .निशा येणार म्हणून अमेय ही खुश होता .कधी एकदा ती आपल्याला भेटते अस अमेयला झाले होते . आता निशा ही अमेय्च्या जीवनातील अविभाज्य असा भाग झाल्ती . सुखात , दुःख त्याला तिचीच़ आठवण येत असे . त्याने ठरवले होते .निशा त्याला भेटली की तो तिला शेवटच्या पेपरच्या दिवशी त्याने जो काही घोळ घातलाय .तो सगळा तिला सांगायचा . तीच आपल्याला समजून घेयील .अस त्याला वाटायच .
अस तो एक दिवशी घरी पुस्तक वाचत बसला होता . आणि त्याला नीरजा कडून कळले.की निशा सुट्टीला गावी आली . अमेयचा आनंद गगनात मावेना . कधी एकदा तिला पाहतोय अस त्याला झाल .पण घरातून अस एकदम जाण ही त्याला जमेना . एवढ्यात आईने त्याला दुकानातून सामान आणायला पाठवले .मग काय त्याला आयतीच संधी सापडली. तो अगदी पळतच़ दुकानाच्या दिशेनि पाळला . तो थेट नीरजच्या घरी येउन्च पोहचला .नीरजच्या घरासमोर निशाच़ घर असल्यामुळे त्याच्या घरातून निशा दिसायची . पण निशा काही केल्या घराच्या बाहेर येयीणा .आणि त्याला ती दिसेना .