अमेय होस्टेलवर रहायला आला .बारावीचे वर्ष निशा मुळे तो आधीच अस्वस्थ होता .त्यात घरापासून दूर आल्यामुळे तो आणखीनच़ दुःखी झाला . त्याला एकटे वाटू लागले . त्याला अधूनमधून वडील भेटायला येत . थोडेफार पैसे देऊन जात .त्याची घरची परीस्तीथी बेताचीच़ होती . त्यामुळे त्याच्या आईला त्याला भेटायला यायला जमत नसे . आणि अमेयला त्याच्या घरात सगळ्यात जवळची आईच़ वाटत असे .
ईकडे अमेयचे होस्टेल मधे नवीन मित्र जमले . आता सगळ विसरून तो अभ्यासाला लागला होता . कॉलेज आणि अभ्यास ह्यात तो रमून गेला होता . बारावीची परीक्षा दिल्यावर त्याने नेव्ही ची परीक्षा द्यायची ठरवली . तो जोमाने अभ्यास करू लागला .कॉलेज मधे परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाचे वातावरण निर्माण झाले .त्यामुळे सगळीच़ मुले अभ्यासात रममान झालेली . त्यारात्री अमेय उशीर पर्यंत अभ्यास करत होता . अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली . त्याने त्या रिंग कडे दुर्लक्ष केले . पुन्हा रिंग वाजली .अभ्यासातून लक्ष विचलित झाल्यामुळे अमेय रागावला होता . त्याने रागाने फोन उचला . तो जोरात हेलो बोलणार .एवढ्यात समोरून , गोड असा आवाज आला ,मी ......निशा ......नीरजाची मैत्रीण . अचानक अमेय्च्या समोर , त्याचा गाव , नीरज , नीरजच़ घर , होळीचा तो दिवस , बादली घेऊन उभी राहिलीली ती निशा , त्यांची ती नंतर सतत होणारी भेट .सगळ सगळ .....एकदम त्याला आठवल . समोरून ...पुन्हा आवाज आला , हेलो .....मी निशा ओळखले का ? एकदम भानावर आल्यासारखे करत अमेय म्हणाला .हो , मी ओळख तू कसा आज फोन केला . आणि तुला माझा नंबर कसा मिळाला . ..आणि तू बरी आहेस ना ....एवढ सगळ बोलुन अमेय नि मोठा श्वास सोडला . अरे , आह्मी सगळे गावी गेलो होतो .त्यावेळी नीरजाला तुज्याविष्यि विचारले , तर तू एथे शिक्षणानिमित्त एथे होस्टेलला आहेस कळल .आणि तिनेच तुजा हा नंबर मला दिला . ' ' तू ...कसा आहेस .' ' नेहा म्हणाली . खूप दिवसानी जवळच माणूस मिळाल अस अमेयला वाटल .' ' मी ....मी बरा आहे ' ' .ऐत्क्यात निशा म्हणाली , चल ठेवते , खूप रात्र झाली .मी परत फोन करेन .
निशाशी बोलून , अमेय नि पुन्हा अभ्यासाला सुरवात केली .पण आता त्याचे अभ्यासात लक्ष लागेना .फोन आल्यापासून अमेय्च्या डोळ्या समोरून निशाचा चेहरा जयीणाच .निशाणी त्याला समोरून फोन केल्यामुळे तो खूप खुश होता .' ' हरवलेली एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सापडल्यावर जो आनंद होतो .तो आनंद त्याला झाला होता' ' .तो खूप खुश होता . निशाचा विचार करत करत तो कधी जोपी गेला , त्याच त्याला कळले नाही . दुसऱ्या दिवशी अमेय उठला .ऐत्क्या दिवसानी त्याला छान झौप आली होती .तो खूप खुश होता . आता तो रोजच खुश दिसत होता . आता तो अभ्यास ही जोमाने करू लागला होता .अधून मधून निशाचा त्याला फोन येत असे .मग तासतास भर त्यांच्या गप्पा चालू असत . अमेय आता खूप खुश होता .त्याला त्याच्या अयुषत कश्याचीच कमी वाटत नव्हती .
त्याला वाटणारा एकटेपणा आता कमी झाला होता .ह्या जगात आपल्याला समजून घेणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे निशा अस त्याला वाटू लागले .आता परीक्षा जवळ आली होती .आता लवकर परीक्षा देऊन घरी जायचे .निशा ही गावाला सुट्टी साठी येणार होती .शिवाय गावात जत्रा सूध्हा होती .आता तिच्यासोबत जत्रेत काय काय मजा करायची .ह्याची स्वप्न तो रोज पाहत होता .