Chuk aani maafi - 2 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | चूक आणि माफी - 2

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

चूक आणि माफी - 2

दुसरा दिवस उजाडला .अमेय कॉलेजला जायला निघाला . त्याच सगळ उरकून तो बसस्टँड वर बसची वाट बगत उभा होता . ऐत्क्यात तेथे काल त्याला पाण्याने भीज्व्णारी मुलगी दिसली .ती चालत चालत त्याच्याकडेच़ येत होती . ही मुलगी एथे काय करते ह्याच अमेय विचार करू लागला . तेवढ्यात ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली . तिचे ते बोलके डोळे , तिचे सुंदर मोठे लांबलचक केस , तिची ती शरीरयष्टी , तो सुंदरबांधा पाहून क्षणभर अमेय हरखलाच . ती काय बोलून निघून गेली , त्याला कळलेच़ नाही . एवढ्यात बस आली , तो बस मधे बसून निघून गेला .
अमेय मुली कडे ढुकुण ही कधी पाहत नसे .पण आज त्या मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्या समोरून जातच़ नव्हता . अमेय कॉलेज वरून घरी आला . घरात मजा मस्करी चालू होती . एत्क्यात नीरज अमेय च्या घरी आला .तो ही त्या मजा मस्करीत सामील झाला . घरात दंगामस्करी चालू असतानाच .बाहेरून केतन नि नीरज ला आवाज दिला . ' ' त्याच्या जवळ चा नवीन मोबाईल दाखवण्यासाठि त्याने आवाज दिला ' ' .नीरज आणि अमेय दोघे ही मोबाइल बघण्यासाठी बाहेर पडले .
दोघेही केतनच्या घरात शिरले .केतन नि मोबाइल बाहेर काढला .त्याच्या सोबत केतनचे अनेक मित्र होते . अनेक जण केतनच्या मोबाइलची स्तुती करू लागले . हातात घेऊन बघू लागले . एत्क्यात केतनचा एक मित्र नीरज अरे , ती तुमच्या घराच्या समोर रहायला आली ती मुलगी कोण आहे रे . आणि ती सारखी तुमच्या घरी येते रे ती .
काही तरी आठवल्या सारख करत , नीरज म्हणाला , कोण रे ती ? ' ' निशा ' ' तर नाही ना म्हणत . अरे ती , आमच्या समोरच्या काकांची धाकटी मुलगी आहे .एरव्ही ते लोक मुंबईला राहतात , पण आता सुट्टी साठी गावाला आलेत . आणि हो आमच्या नीरजाची मैत्रीण आहे ती , त्यामुळे तिच्या सोबत खेळायला येत असते ती ......
केतन म्हणाला , वय काय रे तीच . नीरज म्हणाला , अरे , नववी आहे . त्या घोळक्यातला एक मुलगा म्हणाला , पण काय दिसते रे ती ... तिला बघितल्या पासून झौप्च येयीणा . तो , नीरज ला म्हणाला .आमची ओळख करून दे ना , तिच्याशी . नीरज रागाने उठत म्हणाला , मला नाही जमणार .चल अमेय .....आणि अमेयला घेऊन नीरज तेथून निघाला . अमेयला त्याच्या घराजवळ सोडून नीरज त्याच्या घराकडे निघाला .
दुसरा दिवस उजाडला , नेहमी प्रमाणे अमेय कॉलेजला निघाला , वाटेत निशाच घर लागले . आतून निशाचा गोड असा आवाज येऊ लागला . त्या आवजाकडे दुर्लक्ष करत अमेय पुढे निघाला . क्षणभर त्याच्या मनात आले .' ' किती गोड आवाज आहे ' ' ? पुढे तो कॉलेज मधे आला . सर्व लेक्चर उरकून तो घरी निघणार .ऐत्क्यात त्याला नीरज भेटला , अरे अमेय घरी निघालास .हो , कारे ,अमेय म्हणाला . यावर नीरज म्हणाला , काही ....नाही रे , नीरजाचा फोन आलता , तिला उसाचा रस प्यायचाय .पण बाबा तिला काय एकटीला सोडणार नाहीत .त्यामुळे मलाच तिला घेऊन जायला लागेल . ती येयील्च ईत्क्यात , मग आपण सगळेच जाऊ .यावर अमेय म्हणाला ठीक आहे . दोघे ही निशाची वाट बघत बसले . पुढील कहाणी , ' ' चूक आणि माफी भाग -3' ' मधे .