Chuk aani maafi in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | चूक आणि माफी

Featured Books
Categories
Share

चूक आणि माफी

ही कथा आहे , अमेय आणि निशाची , अमेय आणि निशा हे दोघे एकच गावात लहानाचे मोठे जाहले .अमेय तसा लाज्राबुज्रा कोणाशी ही पटकन न बोलणारा , कोणत्याही मुलीशी बोलायचे म्हणजे त्याच्या अंगाचा थरकाप व्हायचा .' ' तीन बहिणी आणि आई वडिलांचा लाडका .' ' त्याला कोणाही काही बोलले की तो घरी रडत यायचा . दिसायला ही ठीकठाक. त्याची परिस्ति ही नाजूक . वडील जे काही कमवून आणायचे त्यात त्याच्या तीन बहिणी आणि आई , तो आणि वडील उदरनिर्वाह करायचे .
याउलट निशा होती .सुंदर , गोरीपान , मोठे केस , बोलकी , कोणाचे ही मन लगेच जिंकून घेणारी .
त्याही तिघी बहिणी होत्या . पैशाने श्रीमंत , सुंदर पण त्यातल्या त्यात निशा खूप सुंदर होती .आणि मनाने ही .
अशाह्या निशावर अमेयच़ जीव जडला .तीही एक वेगळीच कहाणी आहे .
तशी अमेयला मुली जास्त अव्डय्च्याच नाहीत .आणि अमेयचा मित्र नीरज त्याची बहीण नीरजा आणि निशा एकदम जिवलग मैत्रिणी .एकमेकीन शिवाय त्याना अजिबात करमत नसे .जिथे जातील तिथे ह्या दोघी एकत्रः
होळीचा दिवस सगळे आनंदात होळी खेळत होते .नीरजा आणि निशाचा ही होळीचा खेळ चालू होता . अचानक नीरजा गायब जाहली .ती कुठे तरी लपून बसली असेल म्हणून निशा तिला ईकडे तिकडे शोधू लागली . निशा वाटले नीरजा नक्कीच घरात लपून बसली असणार . म्हणून पाण्याची बादली घेऊन निशा चोरपावलांनी नीरजाच्या घरात शिरली . घरात तिला कोणीच दिसेना . म्हणून ती परत निघाली . तेवढ्यात तिला तिथे कपाटच्या मागे सावली दिसली .तिने नीरजच असणार म्हणून निशाने मागे पुढे न पाहत तिच्या अंगावर पाण्याची बादली ओतली
समोर बघते तो काय , नीरजा नव्हती . तो अमेय होता , चिड्लेला , भिजलेला , रागावलेला . तो रागाने निशाकडे बघत होता . आणि निशा स्तब्ध उभी होती .आता हा अमेय आपल्याला रागवेल , म्हणून ती जोरात पळत सुटली . तिने मागे वळून सुध्दा बघितले नाही . तिने जी धूम ठोकली , ती घरात जाऊन लपून बसली .
ईकडे अमेयला त्याच्यासोबत काय जाहला , ते कळलंच नाही .एक मुलगी येते काय , त्याच्या अंगावर पाणी टाकते काय आणि अचानक पळून जाते काय . .....ईत्कयात तेथे नीरज आला , ' ' अमेय , हे काय ? ओला कसा झाला ' ' . कोणी तुला होळी खेळायला लावली . रागाने त्याच्याकडे बगत.अमेय म्हणाला , कोणी तरी मुलगी आली काय , पाणी टाकल काय आणि पळून गेली काय ? सगळा क्षणाचा खेळ . अमेयच़ बोलण मधेच थांबवत नीरज म्हणाला .' ' मुलगी , आणि एथे ? ' ' कोण येणार . अमेय म्हणाला , मला काय माहीत . कदाचित नीरजा कडे आली असेल . ' ' चल मी निघतो .' ' आणि अमेय निघून गेला .
ईकडे नीरजनि नीरजाला चांगल फैलावर घेतल .ती मुलगी कोण विचारल ? . घाबरत घाबरत नीरजा सांगू लागली .' ' ती समोरची निशा , मज्यकडे येते ती , ती ....ती सुट्टीला येथे गावाला आली आहे . आणि आज आह्मी होळी खेळत होत .मी लपून बसले होते .ती मला शोधायला आली , तिला वाटले की अमेय दादा म्हणजे मीच आहे .म्हणून तिने माज्यावर पाणी ओतले . पण तो अमेय दादा आहे हे कळल्यावर ती घाबरून पळून गेली . दादा ...तू तिला रागावू नकोस . ती अमेय दादाची माफी मागायला सुद्धा तयार आहे .