Trushna ajunahi atrupt - 15 in Marathi Horror Stories by Vrushali books and stories PDF | तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १५

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १५

" घाई करायला हवी..." हातातील सामान पटापट पिशवीत भरत गुरुजी ओरडले. अनयच्या हाताला खेचत ओम त्याला त्याच्या घरी घेऊन आला होता. अचानक भेटणं, ओळख दाखवणं, हक्काने ओढत घरी घेऊन येणं.... अनयसाठी ओमच वागण अनपेक्षित असल तरीही त्याला ह्या क्षणी कशालाच विरोध करायचा नव्हता. ओमच्या घरी आल्यावर त्याला अजून एक धक्का बसला. तिथे गुरुजी व तिचे बाबा आधीच उपस्थित होते. जराही वेळ न दडवता जुजबी ओळख करून घेऊन ओम व गुरुजींनी मिळून त्याला सगळ काही थोडक्यात समजावलं. शेकडो वर्षांआधी घडल्या गोष्टींचे असे काही पडसाद उमटले जाऊ शकतात ह्याची त्या बिचाऱ्याला काही कल्पना नव्हती... जगात ह्या ही गोष्टी असतात....त्याची बुध्दी ह्या सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. परंतु मन... ते मात्र तिच्याकडे ओढ घेत होत. तिच्यावर आलेलं प्रत्येक संकटाला त्याला पुढे होऊन सामना करायचा होता. अग्नीच्या सात फेऱ्यांत त्याने वचन जे दिलं होत. त्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ येऊन ठेपली होती.

" काय झालंय गुरुजी..." अनयने काळजीने विचारलं.

" तिच्यावर हल्ला झालाय..." गुरुजींच्या अंतर्दृष्टीला तिच्यासोबत घडल्या घटनेची जाणीव झाली.

" हे कसं शक्य आहे.." बाबांच्या अनुभवात ते प्रथमच अस ऐकत होते. अनयने जरा रागानेच त्यांच्याकडे पाहिलं. पण त्याच अस पाहणं गुरुजींच्या नजरेने बरोबर टिपलं.

" आजवर त्या शक्तीसाठी तीच एकमेव माध्यम होती मात्र आज ते आपल्या मितीत येण्यासाठी सज्ज आहेत. एकदा का त्यांना आपल्या मितित प्रवेश मिळाला की त्यांच्यासाठी तिची गरज संपते... आणि तिच्याच माध्यमातून त्यांना पुन्हा त्यांच्या मितीत परत पाठवता येईल व म्हणूनच त्याचा आपल्या जगात प्रवेश होताच ते सर्वात आधी तिला संपवतील....." गुरुजी एका दमात बोलून मोकळे झाले. आणि ते ऐकून बाबा व अनयची हालत बघण्यासारखी झाली.

" नाही... आपल्याला काहीतरी करायला हवं..." ओमच्या तोंडून नकळत निघून गेलं. तसंही आज सकाळपासून त्याला काहीतरी विचित्र वाटत होत. त्याच वागणं बोलणं पूर्णपणे बदलून गेलं होत. अनयला अचूक ओळखून ज्या प्रकारे तो त्याला घरी घेऊन आला होता ते त्याच्याचसाठी अनपेक्षित होत. आवश्यक सामान भरलेल्या पिशव्या उचलत त्याने बाहेर धाव घेतली. त्याच्या मागोमाग बाकीचे तिघेही उरलं सुरल सामान घेऊन वेगात निघाले.

रात्रीचे साधारण आठ वाजले असावेत. सर्वत्र अगदी थंडगार शांतता पसरली होती. वातावरणही रोजच्यापेक्षा जरा जास्तच गडद होत. आभाळातील ढग काळोखात माखून गेले होते. आजच्या रात्रीवर फक्त आणि फक्त काळोखाची सत्ता असल्याप्रमाणे चांदण्याही लुप्त होऊन गेल्या होत्या. वारा अगदी जबरदस्ती वेगाने वाहून दमून मंदावला होती. त्याची रोजची शीतल चंचलता हरवून गेली होती. कोणी येऊन आपल्या साऱ्या क्रियांवर हुकूमत गाजवावी तसा साऱ्या वातावरणात कसलासा दबाव भरून राहिला होता. त्या अशुभाची चाहूल आधीच प्राण्यांना लागली असावी म्हणूनच ते पोटतिडकीने रडत भेकत होते. त्यांच्या करुण आरोळ्या त्या काळयाकुट्ट्या वातावरणाला अजुनच भयाण बनवत होत्या. सकाळी वाऱ्यावर बेधुंद डोलणाऱ्या झाडांनी चढत्या अंधारासोबत घाबरून मलूल होत माना टाकल्या होत्या. मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ होता तो मानव... बाबा,गुरुजी,अनय व ओम सोडता बाकी कोणालाच घडणाऱ्या प्रकाराची खबर नव्हती.

कुठल्याशा गावच्या शंकराच्या मंदिरात एका पुजाऱ्याला काहीतरी अघटीत घडेल की काय ह्याची शंका चाटून गेली. संध्याकाळपासून बदलून गेलेल्या आकाशाचा रंग पाहून त्याच मन चलबिचल झाल होत. भडक रक्तवर्णी छटा आभाळभर पसरल्या होत्या. कोणी त्याला चमत्कार समजून नमस्कार करत होत तर कोणी आश्चर्याने फोटो काढत होत...पण भर संध्याकाळी नारंगी निळ्या छटा गायब होऊन हे काहीतरी भलतंच दिसत होत हे कोणाच्या साधं मनातही आल नाही... मात्र त्या पुजाऱ्याने हे बदल लगेच हेरले. विचार करण्यात क्षणाचाही विलंब न करता शुचिर्भूत होऊन पूजेला बसला. जे काही घडेल त्यात ह्या जगाला शिवशक्ती तारून नेईल ह्यावर त्याचा पक्का विश्वास होता. रात्रीच्या अंधारातही ते मंदिर प्रकाशमान दिव्यांनी आणि त्याच्या मंत्रजपाने उजळून निघत होत.