kadambari premaveen vyarth he jeevan - 2 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ ही जीवन - भाग-२

Featured Books
  • You Are My Choice - 35

    "सर..."  राखी ने रॉनित को रोका। "ही इस माई ब्रदर।""ओह।" रॉनि...

  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ ही जीवन - भाग-२

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

कादंबरी – भाग – २ रा

ले- अरुण वि.देशपांडे

----------------------------------------------------

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

क्रमशः कादंबरी – भाग-२ रा

-----------------------------------------------------------------------------

सागर –

नमस्कार मी सागर , तुमच्या नजरेसमोरची ही वास्तू दिसते आहे ना ,त्या “प्रेमालय नावाच्या वास्तूचा मी घरमालक “.आहे.

माझी ओळख मी स्वतहा करून देण्याची गरजच नाहीये, तरीही आपण पहिल्यांदाच भेटलो आहोत ,म्हणून माझ्याबादल सांगतोच थोडे .

तसे तर सारे शहर मला ओळखते , सर्वांना मी परिचित आहे . पण, असतात तुमच्या सारखे काही ,ज्यांना मी परिचित नसतो ,कारण तुमचे माझे जग खूप वेगळे आहे.

“मी समाजातील

एक आदर्श म्हणवले जाणारे असे एक व्यक्तिमत्व आहे”. “ self-made-man “ म्हणतात मला .

शून्यातून –विश्व निर्माण केलाय मी “, माझी सृष्टी मी निर्माण केलीय “, असे मी नाही सांगत “

माझ्याबद्दल आजूबाजूचे लोकच सांगत असतात , माझ्या कानावर माझ्याबद्दलच असे शब्द पडतात ,

माझ्या कानावर माझ्याबद्दलच असे शब्द पडतात ना , त्यावेळी खरेच खूप आनंद होतो मला .

माणसात जिद्द , आत्मविश्वास , मेहनतीची तयारी हे तर असायलाच पाहिजे ..या साठी प्रयत्न

करावे लागतात ,

माझे तर मत आहे..आणखी एक गोष्ट तुमच्या नशिबात हवी ..ती म्हणजे ..योग्य वेळ आणि ,आलेली

संधी ..

हे जर साधता आले तर माणूस “मुकद्दर का सिकंदर “ होतो आणि आलेली संधी ..हातून निसटू दिली ,

आणि काहीच केले नाही तर .. हाताची झोळी ..फाटकी आहे “ असे म्हणून ..आयुष्यभर रडत बसण्याची

वेळ स्वतःच्या नाकर्तेपणा मुळे येते “

हा माझा जीवन-अनुभव आहे मित्रांनो.

माझे शब्द तुम्हाला .आत्म-प्रौढी वाटतील , वाटू दे , आय डोन्ट केअर ,

मी गर्विष्ठ आहे, कमी वयात मोठा आणि यशस्वी उद्योजक झालोय ..”

म्हणून मी सगळ्यांना सदैव तुच्छतेने बोलत असतो “

सरळ आणि समजेल अशा शब्दात सांगतो -

माझ्या बद्दल लोक खूप काही बोलत असतात , काहीबाही खोटे –नाटे समज पसरवत असतात ,

बोलणार्याचे तोंड मी कसे धरू शकणार ? बोलू द्या त्यांना , मी सरळ दुर्लक्ष करतो अशा

माणसांच्या बोलण्याकडे

बाहेरचेच लोक कशाला ..

अहो , माझ्याच परिवारातले , नातेवाईक काय , माझे मित्र काय ,हे सारे

एकाच माळेचे—आहेत , कारण , त्यांच्या मनात एकच भावना आहे माझ्याबद्दल -

हा सागर ..आयत्या बिळावरचा नागोबा आहे. सासर्याची इस्टेट , त्याची एकुलती एक पोरगी मिळाली आहे

मग माज येईल नाही तर काय होईल दुसरे ?

हो आहे मी माजोर्डा , काय करणार तुम्ही ?

कुणीच माझे काही वाकडे करू शकणार नाही ,याची मला खात्री आहे .

कारण –

दुनिया झुकती है “ जो इसे झुकता है “, आणि माझ्यात तर या दुनियेला हलवून सोडण्याची ताकद

आहे .

मी फुकट बाता मारणारा माणूस नाहीये .

बोलतो ते करून दाखवतो.

मला एकच भाषा समजते ..पैश्याची ,

प्रेम, मुहब्बत , लव्ह “ अशा शब्दांना तुम्ही लोक कितीही अर्थपूर्ण म्हणा , माझ्या लेखी ये सब बकवास

है !

माझ्या जगात फक्त माझ्या दृष्टीने “लायक आहेत” अशाच लोकांना प्रवेश असतो .

माझी बायको – सरिता ..

अजून तीच माझ्या लायकीची नाही होऊ शकत “..तिथे तुमची काय बिशाद ..?

तुमच्या दृष्टीने आम्ही नवरा-बायको , पण, माझ्या दृष्टीने ..सरिता ..एक अति सामान्य ,

माझ्या सासर्याने माझ्या गळ्यात बांधलेली धोंड ..

महाबदमाश निघाला माझा सासरा ..मरायच्या आधी त्याने उद्योग-धंदे, अफाट संपती मला दिले खरी ,

पण, जाताना स्वताची पोरगी माझ्या गळ्यात बांधून गेला .

जाऊ द्या ,

काही वेळा बिझनेसमनला अशी रिस्क घ्यावी लागते , चुकतो हिशेब कधी कधी ..

सरिता . अशीच आहे माझ्या आयुष्यात , चुकलेल्या हिशेबाची एक नोंद ..झाली माझ्या हाताने.

आणि

मला न शोभणारा ..माझा मुलगा ..अभी ..बापाची इतकी संपत्ती आहे त्याच्या साठी ,पण ढुंकून ही

पहात नाही ..

म्हणतो ..पापा , मी माझ्या पायावर उभा राहीन , स्वाभिमानाने जगेल , तुमच्यासारखा एक

दगडी मनाचा माणूस " तर मी मुळीच होणार नाहीये मी ..

हे असे असते बघा माणसाचे आयुष्य ..

मी असा नशीबवान ,कर्तुत्ववान ,श्रीमंत ..आणि माझी बायको ..जी मला कधीच माझी बायको

वाटत नाही , वाटणार नाही ..

आणि हा अभी ..स्वप्ने पाहतोय .ती सुद्धा दरिद्री होण्याची ..

जाऊ द्या ..जो तो आपापले नशीब घेऊन येत असतो..

........--------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढे ...

भाग – तिसरा लवकरच ........

क्रमशः कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जिवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------